PM Vishwakarma Yojana : आपल्या भारत देशात पूर्वीपासून वेगवेगळे पारंपरिक व्यवसाय विविध समाजातील आपले बांधव करत आहेत. या व्यवसाय करणाऱ्या बांधवाना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत सरकार द्वारे त्यांना दिली जाणार आहे. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठीमागच्या वर्षी हि देशातील सर्व पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हि महत्वकांक्षी व क्रांतिकारी योजनेबद्दलची घोषणा भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती निम्मित केली होती.
या योजनेद्वारे देशातील सर्व कारागीर असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा मोट्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्या कारागीर नागरिकांना सरकार च्या या पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना अंतर्गत त्या कारागीर नागरिकांना त्यांच्या व्यवसाय बद्दल चे मोफत प्रशिक्षण तसेच त्या व्यवसाय साठी लागणारी सर्व सामग्री व साहित्य सुद्धा ते सरकार मार्फत मोफत देणार आहेत.
देशामध्ये मोट्या प्रमाणात विश्वकर्मा या अंतर्गत येणाऱ्या १४० जाती जमाती मधील व्यावसायिक व कारागीर जे व्यवसाय इच्छित आहेत अश्या सर्व नागरीकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ होणार आहे. देशामध्ये मोट्या प्रमाणात कुशल व अकुशल कारागीर आहेत. ते त्यांचा व्यवसाय हा अतिशय मेहनतीने करत असतात, त्यांच्या या श्रमाला व्यवसायाल बळकटी देण्यासाठी तसेच त्यांना यांच्या व्यवसायाबद्दल अजून प्रशिक्षित करण्यासाठी या योजने मधून हे शक्य होणार आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना विषयी माहिती । What is pm vishwakarma yojana
भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील सर्व विश्वकर्मा यामध्ये येणाऱ्या सर्व कारागीर बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अमलात आणण्याचे घोषणा त्यांनी केली होती. अंतर्गतच देशभरातील सर्व कारागीर लोकांना या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, जे कारागीर या विश्वकर्मा योजनेअंतर्गत या योजनेत सहभागी होतील त्यांना या योजनेमध्ये जे काही त्यांच्या हिताचे निर्णय असणार आहे, ते त्यांच्या फायद्यासाठी असणार आहेत यामध्ये त्यांना त्यांच्या व्यवसाया बद्दलचे सर्व प्रकारचे प्रगत प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
या योजनेमध्ये देशातील जवळजवळ 140 विश्वकर्मा जात जमातीतील बांधवांना मोठा फायदा होणार आहे यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसर तसेच वेगवेगळे प्रशिक्षण त्यांना दिले जाणार आहे. तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये 13,000 कोटींची तरतूद करण्यात आली होती नंतर ती आता वाढवून 15,000 करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील जवळजवळ 30 लाख विश्वकर्मा यामध्ये येणाऱ्या सर्व कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे.
या योजनेद्वारे समाजातील सर्व कारागीर लोकांना आर्थिक मदत तसेच त्यांच्या व्यवसायाबद्दलचे योग्य ते प्रशिक्षण त्यांना पुरवण्यात येणार आहे तसेच त्यांना व त्यांच्या व्यवसायास प्रगत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत तसेच या कारागीर लोकांना सन्मान मिळवून देण्यासाठी व त्यांचे हात व आर्थिक परिस्थिती सुखकर करणे हा या विश्वकर्मा योजने पाठीमागचा उद्देश आहे.
PM Vishwakarma Yojana योजनेचा लाभ समाजातील कोण कोणत्या कारागीर बांधवांना होणार
यामध्ये जे समाज बांधव या विश्वकर्मा समाजात मोडतात अशा सर्व त्या समाजातील कारागीर बांधवांना या योजनेचा लाभ हा होणार आहे यामध्ये सुतार कुंभार चांभार मूर्तिकार दागदागिने बनवणारे सोनार न्हावी यांसारख्या सर्व कारागीर बांधवांना या पीएम विश्वकर्मा योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे.
त्यांना त्यांच्या कौशल्यांविषयीचे योग्य ते प्रशिक्षण देऊन तसेच त्यांना वेगवेगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा त्यांच्या व्यवसायामध्ये कसा करता येईल व तसेच त्यांच्या व्यवसायासाठी एक एक प्रकारचा दर्जा प्राप्त करून देणे तसेच त्यांना योग्य ती आर्थिक मदत पुरवणे यांसारखे फायदे याप्रधानमंत्री विश्वकर्मा योजना योजनेअंतर्गत या सर्व समाज बांधवांना होणार आहे मग यामध्ये महिला पुरुष कोणीही असेल तरीही त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
PM Vishwakarma Yojana योजनेअंतर्गत कारागीर बांधवांना कोणकोणत्या प्रकारचे फायदे
- या समाजातील सर्व कारागीर बांधवांना राष्ट्रीयकृत बँकांद्वारे त्यांचे बँक खाते ओपन करून त्यांना आंतरराष्ट्रीय बँकांसोबत जोडले जाणार आहे.
- कारागीर बांधवांना त्यांच्या व्यवसायाबद्दलचे प्रगत प्रशिक्षण देऊन तसेच त्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.
- जे नवीन काम शिकणार असणारे कारागीर आहेत त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरणार आहे यामध्ये त्यांना सरकारतर्फे त्या कारागीराला त्याच्या व्यवसाय संबंधित लागणारे सर्व प्रशिक्षण व तो व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी सर्वसामग्री ही सरकारद्वारे पुरविण्यात येणार आहे.
- या योजनेमध्ये समाजातील सर्व कारागीर बांधवांना म्हणजेच न्हावी, लोहार, कुंभार, शिंपी, मूर्तिकार, सुतार, विणकाम, करणारे हाताने वस्तू बनवणारे यांसारख्या सर्व कारागीर बांधवांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- या योजने अंतर्गत देशातील या विश्वकर्मा समाजा अंतर्गत येणाऱ्या सर्व कारागीर बांधवांना त्यांचे जीवन सुखकर व सुलभ करण्यासारखी या योजनेद्वारे त्यांना मदत दिली जाणार आहे.
- यामध्ये त्या कारागीर समाजातील असणारे बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे व नवीन काम तेथील तरुणांना शिकता येणार आहे. जेणेकरून ते कोणत्याही नोकरीच्या आधारावरती अवलंबून राहता त्यांच्या कौशल्याच्या आधारे ते स्वतःचा व्यवसाय हा योग्य पद्धतीने सुरू करू शकतात.
यांसारखे सर्व फायदे हे विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेअंतर्गत कारागीर समाजातील सर्व बंधूंना आणि भगिनींना होणार आहेत.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणकोणते पात्रता व निकष लागणार
- देशातील किंवा महाराष्ट्रातील जे कोणी कारागीर बांधव या विश्वकर्मा समाजामध्ये मोडतात अशा सर्व 140 जाती-जमातीतील कारागीर बांधव या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- तसेच या योजनेसाठी अर्ज करणारा कामगार हा भारत देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- तसेच या योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे त्या कारागीर बांधवाकडे उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
- यामध्ये वय वर्ष 18 पासून पुढचे सर्व कारागीर बंधू या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
तर हे काही पात्रतेविषयीचे निकष होते ते अर्ज करणाऱ्या कारागीर बांधवांनी लक्षात घ्यावे.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
अर्ज करणाऱ्या कारागिराकडे खालील प्रमाणे सर्व कागदपत्रे असणे अनिवार्य आहे,
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- कारागीर राहत असलेल्या गावचा रहिवासी दाखला
- अर्ज करणाऱ्या कारागीराचे जात प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साइझ फोटो
- कारागिराचे राष्ट्रीयकृत बँक खाते
यामध्ये महत्त्वाचे म्हणजे की त्याचे आधार व पॅन कार्ड आपापसात जोडलेले असावे म्हणजेच की लिंक केलेले असावेतर वरील सर्व कागदपत्रे अर्ज करणाऱ्या बांधवाकडे असणे आवश्यक आहे. यातील कोणतेही कागदपत्रे तुमच्याकडे नसल्यास तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही,त्यामुळे वरील सर्व कागदपत्रे ही अर्ज करणाऱ्या नागरिकांनी अर्ज करतेवेळी सोबत बाळगणे महत्त्वाचे आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी तुम्ही अर्ज कुठे व कसा करणार । How to PM Vishwakarma Yojana
तर मित्रांनो तुम्ही या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करताना तुमच्या गावांमध्ये असणाऱ्या सी-एस-सी केंद्रामध्ये जाऊन या योजनेविषयीची सर्व माहिती सीएससी केंद्रातील कर्मचाऱ्याला विचारून घ्यावी. त्यानंतर त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे ठेवणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला ते या योजनेविषयीची सर्व माहिती देऊन तुमचा अर्ज हा सबमिट करून घेतील.
हा अर्ज करण्याची प्रक्रिया किचकट असल्यामुळे तुम्ही हा अर्ज स्वतः न करता तुमच्या गावातील सीएससी केंद्र मध्ये जाऊन व्यवस्थित रित्या योजनेसाठी अर्ज करावा परंतु तुम्हाला जर स्वतः अर्ज करायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी केंद्र सरकारने अधिकृत वेबसाईट बनवली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन व अर्ज करू शकता अर्ज करण्याची ही प्रोसेस आपण या ठिकाणी दिली आहे त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.
विश्वकर्मा योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म कसा भरणार । How to apply pm vishwakarma yojana online
तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या या योजनेविषयी असणाऱ्या वेबसाईट ची लिंक या ठिकाणी देत आहोत त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून ती लिंक ओपन करा.
पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना – अर्ज करण्यासाठी या Website वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे असा त्या वेबसाईटच होम पेज दिसेल, त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा How to register या बटणावर क्लिक करून तुमचे रजिस्ट्रेशन व्यवस्थित पद्धतीने करून घ्या.
त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल त्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती वगैरे असं संबंधित बाबी तसेच तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी या बाबी घेतल्या जातील. तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा युजरनेम व पासवर्ड मिळेल.
त्यानंतर तुम्ही तो युजरनेम आणि पासवर्ड चा उपयोग करून लॉगिन करू शकता व पुढील प्रक्रिया म्हणजे तुमचा व्यवसाय वगैरे बाकीच्या सर्व बाबी या त्या फॉर्ममध्ये भरू शकता व नंतर तो फॉर्म तुम्ही व्यवस्थितरित्या सबमिट करू शकता. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हा फॉर्म तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये भरून घ्यावा.
कारण तुम्ही हा फॉर्म पहिल्यांदा भरत असल्यामुळे काही तुम्हाला तांत्रिक बाबींची अडचण येऊ शकते, त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या गावच्या सी-एस-सी केंद्रामध्ये हा अर्ज भरण्याचा आग्रह करतो. हे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म योग्यरित्या सबमिट करून तुमचे रजिस्ट्रेशन व अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना निष्कर्ष
केंद्र सरकारने देशातील पारंपारिकत व्यवसाय करणारे व्यावसायिकांना विश्वकर्मा योजनेअंतर्गत ज्या त्या व्यावसायिकाला त्या त्या व्यवसायामधील योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यास तीन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत केली जाते. यामध्ये देशातील चांभार, कुंभार, लोहार, कारागीर, मूर्तिकार, न्हावी, व इतर व्यवसायिक या योजनेमध्ये येतात. यामधून नागरिकांना त्यांच्या व्यवसायास नवीन गती व दर्जा मिळतो. तसेच जे नवीन तरुण व्यवसाय करू इच्छित आहेत अशा नाही प्रशिक्षण देऊन त्यांनाही तीन लाख रुपयांपर्यंत सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.
अधिक वाचा – बँक खात्यात पैसे नाहीत चिंता करू नका, तरीही बँक तुम्हाला 10 हजार रुपये देणार
अधिक वाचा – महिला भगिनींसाठी 5 लाख बिनाव्याजी कर्
अधिक वाचा – नागरिकांना दरमहा मिळणार 9,250 हजार रुपये
मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करू शकता त्यांनाही या योजनेबद्दल ची माहिती देऊ शकता.
FAQ’s
1). पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे काय?
उत्तर- देशातील वेगवेगळ्या छोट्या व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत या विश्वकर्मा योजनेद्वारे केली जाते त्यास विश्वकर्मा योजना असे म्हणतात.
2).पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये कोणकोणते व्यावसायिक अर्ज करू शकतात?
उत्तर- सुतार, चांभार, सोनार, लोहार, मूर्तिकार व इतर व्यावसायिक या योजनेमध्ये अर्ज करू शकतात.
3). पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करणारे व्यावसायिकाचे वय वर्ष किती असावे?
उत्तर- अर्ज करणारा नागरिक हा 18 वर्षे पूर्ण झालेला असावा.
4).प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नेमध्ये किती जनजातींचा समावेश आहे?
उत्तर- विश्वकर्मा योजनेत 140 जनजातींचा सहभाग आहे.
5).पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कोठे करावा?
उत्तर- पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा तुमच्याजवळील सीएससी केंद्रामध्ये किंवा विश्वकर्मा पोर्टल वरती नागरिकांनी अर्ज करावा.
3 thoughts on “तुमच्या व्यवसायसाठी सरकार आर्थिक मदत देणार, PM Vishwakarma Yojana Apply 2024”