लेक लाडकी योजना 2024 : महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने हि अतिशय अप्रतिम योजना म्हणजे लेक लाडकी योजना हि 1 एप्रिल 2023 रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. हि योजना महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभाग मार्फत चालवली जाते. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्व मुलींना एक भक्कम असा आर्थिक आधार देण्यात येतो.तसेच राज्यातील ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे खूप कमी आहे.
अश्या सर्व राज्यातील कुटुंबामध्ये मुलगी असणार आहे त्या सर्व मुलींना राज्य सरकार रुपये 101000/- लाख एवढा लाभ आर्थिक या योजनेत पात्र असणाऱ्या कुटुंबातील मुलींना भेटणार आहे. देशातील व राज्यातील मुलींची सध्य परिस्थिती केंद्र सरकार व राज्य सरकार यांसारख्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवत असते, त्यातीलच हि योजना आहे. तर या ब्लॉग मध्ये आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती पहाणार आहोत.
लेक लाडकी योजने पाठीमागचे सरकारचे उद्देश काय आहेत, तसेच या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत, योजनेतून होणारे फायदे . योजने मध्ये सहभागी होण्यासाठी लागणारे पात्रता निकष कोणते, योजनेचा अर्ज करताना लागणारी सर्व कागदपत्रे, तसेच या योजनेसाठी अर्ज कुठे व कश्या पद्धतीने करावा. ह्या सर्व गोष्टींन बद्दल माहिती आपण योग्य पद्धतीने पाहणार आहे.

लेक लाडकी योजने पाठीमागची उद्दिष्टे व धोरणे
- लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व मुलींच्या भवितव्याचा विचार करून त्यांचा सर्वांगीण विकास करणे.
- लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून ज्या आर्थिक मागास असणाऱ्या कुटुंबातील सर्व मुलींना त्यांच्या जन्मापासून ते उच्च शिक्षणापर्यंत आर्थिक साह्य देण्यात येणार आहे.
- राज्यात होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्येला कायमचा प्रतिबंध करण्यासाठी तसेच समाजातील सर्व मुलींना स्वतःच्या पायावरती उभे करून स्वालंबी व त्यांचा आर्थिक विकास करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- राज्यातील बहुतांश कुटुंब ही आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण नसल्यामुळे त्या कुटुंबातील मुलींना शिक्षणात आवड असूनही त्यांचे करिअर घडवता येत नाही, त्यामुळे त्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यात येणार आहे.
- या योजनेद्वारे समाजात होणाऱ्या स्त्री भृण हत्या बंद होऊन मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत होणार आहे, तसेच मुलींना स्वावलंबी बनवणे त्यांना आर्थिक दृष्ट्या हो सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवणे स्वतःच्या पायावरती उभ करणे.
- समाजात होणाऱ्या मुलींविरुद्धच्या नकारात्मक भूमिकांमुळे त्यांचे शोषण न होता त्यांना आर्थिक सहाय्यक देऊन स्वतःच्या पायावर उभा करणे ही या योजने पाठीमागची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
लेक लाडकी योजने बद्दलची वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुलींच्या भवितव्याचा विचार करून त्यांना सक्षम बनवणे यासाठी राज्य शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे.
- देशातील होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने या समस्येला आळा घालण्यासाठी तसेच मुलींना सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने ह्या योजना राबविली आहे.
- लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून आर्थिक मागास असणाऱ्या व ज्यांच्या कडे पिवळ्या रंगांचे रेशन कार्ड आहे त्या कुटुंबातील मुलीचा जन्म झाल्या पासून ते तिच्या उच्च शिक्षणापर्यंत सर्व खर्च सरकार करणार आहे.
- सरकार द्वारे देण्यात येणारी आर्थिक मदत हि या मुलीच्या बँक खात्या मध्ये जमा करण्यात येणार आहे.
- योजनेस ज्यांना हि अर्ज करावयाचा आहे, त्यांना अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
तर हि सर्व वैशिष्ट्ये लाडकी लेक योजना संदर्भातील आहेत.
लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीस मिळणारे फायदे
लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून राज्य शासन हे महाराष्ट्रातील मुलींसाठी एकूण 101000 लाख रुपये आर्थिक सहाय्य करणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना एकूण 5 टप्यांमध्ये हि आर्थिक मदत पुरवली जाणार आहे.
- पहिला टप्पा – यामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या मुलीस रुपये 5000/- हजार रक्कम दिली जाणार आहे.
- दुसरा टप्पा – या टप्यात मुलगी हि पहिलीच्या वर्गात गेल्यवरती रुपये 6000/- हजार रक्कम दिली जाणार आहे.
- तिसरा टप्पा – मुलगी सहावीच्या वर्गात गेल्यानंतर तिला रुपये रक्कम 7000/- हजार तिला मिळणार आहे.
- चौथा टप्पा – मुलगी अकरावीच्या वर्गात गेल्यानंतर तिला रुपये रक्कम हि 8000/- हजार दिले जातील.
- पाचवा टप्पा- मुलीचे वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर तिला रुपये रक्कम हि 75,000/- हजार दिले जातील.
याप्रमाणे सर्व पात्र असणाऱ्या प्रत्येक मुलीस एकूण रक्कम रुपये 101000/- लाख एवढ्या आर्थिक मदतीचा फायदा त्यांना दिला जाणार आहे. या मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने त्या त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत. जे कुटुंब आर्थिक दृष्टया कमकुवत आहेत परंतु त्यांना त्यांच्या मुलीचे भवितव्य चांगले घडवायचे आहे. अश्या कुटुंबातील मुलींना याचा मोट्या प्रमाणात लाभ होणार आहे.
अर्ज करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वेबसाइट ला भेट देऊ शकता
“मुलगी शिकली प्रगती झाली” या उक्ती प्रमाणे नक्कीच मुलगी तिचे शिक्षण व्यवस्थित पूर्ण करून स्वतःच्या पायावरी उभी राहू शकणार आहे. तसेच कुटुंबावरती मुलीला सांभाळण्याचे दडपण येणार नाही. या उलट मुलगीच स्वतःच्या पायावरती उभे राहून सम्पूर्ण कुटुंबाला सांभाळू शकते. सर्व सामान्य कुटुंबात आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणाने मुलींना त्यांचे करियर घडवता येत नाही परंतु आता या योजना मुळे हे सहज शक्य होणार आहे.
मुलगी जेव्हा तिचे महाविद्यालयीन म्हणजेच 12 वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच तीचे वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर तिच्या पुढील उच्च शिक्षणासाठी त्या मुलीस 75,000/- हजार रुपयांची भक्कम आर्थिक मदत शासन कडून या योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याच्या आधारे ती कन्या तिचे शिक्षण हे व्यवस्थित पणे पूर्ण करून सक्षम बनू शकेल.
तर वरील प्रमाणे सर्व प्रकारचे फायदे योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत.
लेक लाडकी योजनेसाठी लागणारी पात्रता व निकष
या योजनेमध्ये अर्ज करून सहभागी होण्यासाठी कोण कोणते पात्रता निकष लाभ घेणाऱ्या मुलींच्या कुटुंबास पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे ते खालील प्रमाणे आहेत.
- सर्वात प्रथम लाभ घेणारी मुलगी व तिचे कुटुंब हे महाराष्ट्र रहिवाशी असणे गरजेचे आहे.
- मुलीच्या कुटुंबाकडे पिवळ्या तसेच केशरी रंगाचे रेशन कार्ड असणे अत्यंत महत्वाचे आहेत हि कार्ड त्यांच्याकडे असतील तरचं त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- कुटुंबातील ज्या मुलीसाठी अर्ज करणार त्याच मुलीचे बँकेत खाते असणे अनिवार्य आहे, नसेल तर ते काढणे आवश्यक आहे.
- योजना चा फायदा मुलीस तिचे वय वर्ष 18 पूर्ण झाल्यावरती मिळणार आहे.
- लेक लाडकी योजनेचा लाभ हा 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींनाच मिळणार आहे, त्या अगोदर जन्म झालेल्या मुलींना याचा लाभ मिळणार नाही.
- मुलीच्या पालकांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- लाभ घेणारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे यापेक्षा जास्त असेल तर त्यांना लाभ घेता येणार नाही.
- लाभ घेणाऱ्या कुटुंब मध्ये कोणताही सदस्य हा केंद्र किंवा राज्याच्या सरकारी नोकरी मध्ये कार्यरत नसावा.
हे वरील सर्व पात्रता, निकष , अटी व नियम अर्ज करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींनी पूर्ण करणे गरजेचे आहे.
अर्ज करताना लागणारी आवश्यक असणारी कागदपत्रे
योजना चा लाभ घेण्यासाठी अर्ज करतेवेळी लागणारी आवश्यक ती लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे दिली आहेत त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या मुलीचे आधार कार्ड
- मुलीच्या पालकाचे आधारकार्ड
- मतदान ओळख पत्र
- कुटुंबाचे रेशन कार्ड ( पिवळे अथवा केशरी )
- कुटुंबाचा वार्षिक आर्थिक उत्पन्नाचा दाखला ( उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी )
- मुलगी शाळा शिकत असेल तर शाळेचे बोनाफाईट प्रमाणपत्र
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र ( बर्थ सर्टिफिकेट )
- मुलीच्या बँक खात्याचे पासबुक ( झेरॉक्स )
- कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- मुलगी अविवाहीत असल्याचा दाखल
- मुलीचे फोटो
- मोबाईल क्रमांक
तर जे नागरिक योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी वरील सर्व आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे. तरच त्यांना या लेक लाडकी योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया पद्धती
लेक लाडकी योजनेसाठी ज्या कुटुंबातील पालकांना अर्ज करावयाचा आहे. त्यांनी अर्ज कश्या पद्धतीने करायचा व कुठे करायचा याबद्दल खालील प्रमाणे माहिती दिली आहे.
सर्वप्रथम ज्या कुटुंबातील पालकांना त्यांच्या मुली साठी अर्ज करायचा आहे त्यांनी त्याच्या गावातील किंवा जवळील अंगणवाडी मध्ये जाऊन तेथील अंगणवाडी सेविकांसोबत योजनेबद्दल च्या अर्जविषयी व्यवस्थित माहिती समजून घ्यावी. त्यानंतर अंगणवाडी सेविका तुमच्याकडून व्यवस्थित पणे अर्ज भरून घेतील . तुम्ही अर्ज भरताना आपण वर सांगितल्या प्रमाणे सर्व आवश्यक ती मूळ कागदपत्रे व त्याची झेरॉक्स प्रत सोबत न्यावी.
अंगणवाडी सेविका तुमची सर्व अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घेतील. अर्ज भरताना तुम्हाला कोणतीही अडचण व समस्या आली तर सेविका तुम्हाला मदत करतील. अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या जवळील अंगणवाडी तील सेविकांच्या मार्फत तुमची अर्ज प्रकिया पूर्ण होईल. एकदा अर्ज भरून त्यांच्याकडे दिल्यानंतर पडली काही अर्जा विषयी अपडेट असेल तर ते तुम्हाला कळवतील.
निष्कर्ष
लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या मार्फत राज्यातील आर्थिक मागास कुटुंबातील व ज्यांच्याकडे पिवळे केसरी रेशन कार्ड आहे तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व कुटुंबांना या लेक लाडकी योजनेचा लाभ घेता येणार आहे यामध्ये शासनातर्फे त्या कुटुंबातील मुलीस जन्म झाल्यापासून ते तिच्या उच्चशिक्षणापर्यंत एकूण 101000/- लाख एवढी आर्थिक मदत त्या मुलीच दिली जाणार आहे. या आर्थिक मदतीच्या माध्यमातून मुली त्यांचे भवितव्य सुरक्षित होऊ शकतं करू शकतात व स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभ्या राहू शकतात.
अधिक योजना विषयी –
महिला भगिनींसाठी 5 लाख बिनाव्याजी कर्ज,Lakhpati Didi Yojana
पुढील 5 वर्ष रेशनकार्ड धारक नागरिकांना मोफत धान्य मिळणार । Free Ration Yojana
शिलाई व झेरॉक्स मशीन ह्या 100 टक्के अनुदानावर भेटणार । Silai Xerox Machine Scheme
FAQ’s
1). लेक लाडकी योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात ?
उत्तर – महाराष्ट्रातील रहिवाशी असणार कुटुंब व त्यांचे वार्षिक उत्पन्न 1लाख पेक्षा कमी आहे अशी सर्व कुटुंबे अर्ज करू शकतात.
2). लेक लाडकी योजना म्हणजे काय ?
उत्तर – या योजनेच्या अंतर्गत मुलींना त्यांच्या जन्मापासून ते तिच्या उच्च शिक्षण होई पर्यंत आर्थिक मदत दिली जाते,
3).लेक लाडकी योजना मधून किती आर्थिक लाभ मिळतो ?
उत्तर – लेक लाडकी योजनेतुन मुलीस एकूण 101000/- एवढी आर्थिक मदत केली जाते.
4). लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ?
उत्तर – तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही अर्ज करू शकता.
5).लेक लाडकी योजनेतून 18 वय वर्ष पूर्ण झाल्यावरती किती रक्कम दिली जाते ?
उत्तर – रुपये हजार एवढी आर्थिक मदत मुलीचे वयवर्ष 18 पूर्ण झाल्यावरती दिली जाते.
पहिली मुलगी
[email protected]
Tanishka