व्यावसायिक बांधवांसाठी 10 लाखा पर्यंत लोन उपलब्ध होणार | PM Mudra loan Yojana

PM Mudra loan Yojana : भारतातील बऱ्याच खेड्यापाड्यात छोट छोटे बरेच व्यवसाय हे व्यावसायिक करत असतात. त्यामधील बरेच व्यवसायिक हे त्यांच्याकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढवू शकत नाही व त्यांना त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध होत नाहीत तसेच व्यवसायामध्ये लागणारी वेगवेगळी यंत्रसामुग्री किंवा इतर काही साहित्य उपलब्ध होत नसते त्यामुळे त्यांच्या व्यवसाय वाढीमध्ये मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते त्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवता येत नाही व तसेच त्यांच्या व्यवसायातून तयार होणारे प्रॉडक्ट त्यांना बाहेर आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचवता येत नाही.

कारण त्यांच्याकडे तेवढी आर्थिक कुवत नसते त्यामुळे त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती करू शकत नाही तर हीच समस्या केंद्र सरकारने लक्षात घेऊन अशा सर्व छोट्या-मोठ्या उद्योगधंदे व व्यवसायांना पाठबळ मिळावे व त्या व्यवसायिकांचा व्यवसाय वाढवा किंवा ज्या व्यवसायिकांना त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करून त्यांना तो व्यवसाय वाढवायचा आहे अशा सर्व व्यवसायिकांना या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत जवळजवळ दहा लाखापर्यंत कमी व्याजदर मध्ये केंद्र सरकारकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून त्या सर्व छोट्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे तसेच त्यांचे उद्योगधंदेही भरभराटीस येण्यास मदत होणार आहे.

Mudra loan Yojana
प्रधानमंत्री Mudra loan Yojana

Mudra loan Yojana या योजनेच्या माध्यमातून तळागाळातील सर्व व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी या मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत मोठा फायदा होणार आहे. तसेच जे नवीन तरुण व्यवसायिक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत अशाही सर्व व्यावसायिकांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. त्यांनाही नवीन व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध होणार आहे. जे तरुण नवीन व्यवसाय करू इच्छित आहेत अशा तरुणांकडे त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक भांडवल नसते, त्यामुळे ते नवीन व्यवसाय करण्याकडे जास्त वळत नाहीत. त्या अशा सर्व नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असणाऱ्यांना या योजनेअंतर्गत त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुवर्णसंधी आहे.

मुद्रा कर्ज योजनेसाठी आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना होणारे फायदे तसेच या योजनेत पाठीमागची वैशिष्ट्ये उद्दिष्टे व सरकारच्या असणारे धोरणे तसेच या योजनेसाठी नागरिक अर्ज कसे करू शकतात या योजनेच्या पात्रता अटी निकष काय लागणार आहेत. या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

PM Mudra loan Yojana ठळक माहिती

योजनेचे नाव –प्रधान मंत्री मुद्रा योजना ( PMMY )
योजना राबिणाऱ्या शासनाचे नाव –केंद्र सरकार
योजनेची सुरुवात वर्ष –8 एप्रिल 2015 पासून झाली
लाभ कोणत्या नागरिकांना भेटणार –सर्व छोटे व्यावसायिक
कर्जाची रक्कम –50,000 हजार पासून ते 100,0000 लाख पर्यंत
योजनेची अधिकृत वेबसाईट –वेबसाईट

प्रधान मंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या पाठीमागील केंद्र सरकार ची धोरणे व उद्दिष्टे

  • केंद्र सरकारच्या माध्यामातून तळागाळातील सर्व व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य ती आर्थिक मदत या मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून वितरित करणे.
  • तरुण व नवीन उद्योजकांना या योजनेच्या मार्फत व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करणे.
  • वेगवेगळी उत्पादने तयार करणाऱ्या उद्योजकांना मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत आर्थिक मदत देऊन त्यांचे उत्पादने मोठमोठ्या बाजारपेठामध्ये त्यांना पोहोचवता येतील.
  • कोणत्याही प्रकारच्या सर्व छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना पाठबळ देणे.
  • मुद्रा लोन च्या माध्यमातून त्यांना कमी व्याजदरावरती कर्ज उपलब्ध करून देणे.
  • छोट्या व्यवसायिकांना 50 हजार रुपये पासून ते दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे.
  • देशामध्ये नवनवीन उद्योजक घडवणे व त्यांना व्यवसाय करण्यात रस निर्माण करून देणे.

वरील प्रमाणे सर्व धोरणे व उद्दिष्टे ही केंद्र सरकारची Mudra loan Yojana च्या पाठीमागील आहे.

PM मुद्रा कर्ज योजनेच्या माध्यामातून मिळणारे फायदे

पीएम मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य सर्व छोट्या मोठ्या व्यवसायिकांना कोणकोणत्या प्रकारचे फायदे मिळतात हे आपण पुढील प्रमाणे पाहूयात,

  • लहान शहरांमध्ये व गावांमध्ये जे लहान व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसाय हा छोटा आहे अशा सर्व व्यावसायिकांना या योजनेच्या अंतर्गत त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
  • छोट्या व्यावसायिकांना मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत पन्नास हजार रुपयांपासून ते दहा लाखापर्यंत कमी व्याजावरती कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
  • पीएम मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून कर्ज देताना कर्ज घेणाऱ्या त्या छोट्या व्यावसायिकास कोणत्याही प्रकारचे तारण व कोणत्याही प्रकारची गोष्ट त्यांना बँकेकडे तारण न ठेवता त्यांना हे कर्ज अत्यंत सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येते.
  • पीएम मुद्रा लोन योजनेमध्ये लोन देण्यासाठी मुख्यतः तीन प्रकार आहेत.
  1. शिशु श्रेणी कर्ज प्रकार – शिशु श्रेणीतील सर्वव व्यावसायिकांना 50,000/- हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते.
  2. किशोर श्रेणी कर्ज प्रकार – किशोर श्रेणीतील सर्व व्यावसायिकांना 50,000/- पासून ते 500,000/- लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते.
  3. तरुण श्रेणी कर्ज प्रकार – तरुण श्रेणीतील सर्व व्यावसायिकांना 500,000/- लाखापासून ते 100,0000/- लाखापर्यंत कर्ज पीएम मुद्रा लोन या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येते.
  • मुद्रा लोन काढण्यासाठी व्यावसायिकास कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणीच्या प्रक्रियेस न सामोर जाता त्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने या मुद्रा लोन साठी अर्ज करता येतो.
  • पीएम मुद्रा लोन योजनेत सहभागी होण्यासाठी व्यावसायिकाना कोणतेही शुल्क आकारले जात नाही त्यांना मोफत अर्ज करता येतो.
  • व्यावसायिक हे कर्ज कोणत्याही प्रकारच्या व्यवसाया साठी घेऊ शकतात.
  • मुद्रा लोन सुविधेमध्ये कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकास अत्यंत कमी व्याजावर मिळते.

तर हे वरील सर्व फायदे Mudra loan कर्ज काढणाऱ्या व्यावसायिकाना मिळणार आहेत.

प्रधान मंत्री मुद्रा कर्ज योजनेनत सहभागी होण्यासाठी लागणारे पात्रता निकष

  • अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यावसायिकाचे वय वर्ष हे 18 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • पीएम मुद्रा लोन साठी अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यवसायिकाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी.
  • मुद्रा लोन योजनेमध्ये सादर केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे कारण तुम्हाला नंतर कर्जफेड करते वेळेस ते महत्त्वाचे असणार आहे.
  • मुद्रा लोन साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अगोदर कोणते बँक लोन काढले असेल तर ते व्यवस्थित परतफेड केलेले असावे असे नसेल तर त्याला मुद्रा लोन साठी खूप अडचणी येऊ शकतात.
  • मुद्रा लोन साठी अर्ज करणाऱ्या नागरिकाकडे स्वतःचा व्यवसाय असणे आवश्यक आहे त्यामध्ये तो लघुउद्योग, व्यापार, शेती आधारित व्यवसाय असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणारे व्यावसायिकाचे त्याच्या बँकेतील आर्थिक व्यवहार हे व्यवस्थित असणे गरजेचे आहे.
  • मुद्रा लोन साठी सर्व प्रकारचे छोटे व्यावसायिक पात्र असणार आहेत.

वरील सर्व पात्रता विषयक गोष्टी उमेदवाराने काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे, जे या निकषांमध्ये बसणार नाहीत त्यांना योजनेसाठी अर्ज करता येणार नाही हे या ठिकाणी त्यांनी समजून घ्यावे.

प्रधान मंत्री Mudra loan Yojana चा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

प्रधान मंत्री मुद्रा कर्ज योजनेसाठी व्यवसाय अर्ज करणार आहेत त्या व्यवसायांकडे आवश्यक ती कागदपत्रे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर ती महत्त्वाची कागदपत्रे कोणकोणते आहेत त्या संदर्भात आपण खालील प्रमाणे,

  • अर्ज करणाऱ्या व्यावसायिकाचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या व्यावसायिकाचा रहिवाशी दाखला.
  • व्यावसायिकाचे पॅन कार्ड.
  • व्यावसायिकचे दोन पासपोर्ट साईज फोटो.
  • व्यवसायिकाचा व्यवसायाच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा पत्ता.
  • अर्जदाराचे पाठीमागील सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट.
  • अर्ज करणारा व्यावसायिक इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे.

वरील सर्व कागदपत्रे ही अर्ज करणारे व्यावसायिकाने Mudra loan Yojana अर्ज भरतेवेळी त्याच्याजवळ असणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रधान मंत्री Mudra loan Yojana चा अर्ज कोठे व कसा करावा

व्यवसायिक नागरिकांना प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज करायचा आहे अशा सर्व नागरिकांनी त्यांच्या गावातील किंवा जवळील CSC कार्यालयामध्ये जाऊन हा मुद्रा लोन चा अर्ज ते भरू शकतात. व्यवसायिक योजनेसाठी ऑनलाईन देखील अर्ज करू शकतात परंतु ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही अत्यंत किचकट आहे त्यामुळे ऑनलाइन चे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे तरच त्या व्यवसायिकास ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल. परंतु आम्ही तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन या योजनेचा अर्ज भरावासाठी सुचित करतो कारण तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने अर्ज भरून दिला जाईल.

 Mudra loan Yojana
मुद्रा कर्ज योजना (Image Source – PM Mudra loan portal)

परंतु तुम्ही जर स्वतः अर्ज भरू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सर्व प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पद्धतीने खालील प्रमाणे दिले आहे त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन मुद्रा लोन साठी अर्ज करू शकता.

सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना या केंद्र सरकारच्या वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये असणाऱ्या लॉगिन फॉर मुद्रा लोन या बटणावर क्लिक करून तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला मुद्रा लोन साठी अर्ज करण्याचा पर्याय त्या ठिकाणी दिसेल त्यानंतर तुम्ही तो पर्याय निवडून खाली दिलेल्या तुम्ही कोणत्या प्रकारचा उद्योजक आहे ते त्या ठिकाणी दिसेल त्यामध्ये तुम्ही नवीन उद्योजक आहात तर नवीन उद्योजक हा पर्याय सिलेक्ट करा किंवा स्वयंरोजगारीत व्यवसायिक असाल तर तुम्ही तो स्वयंरोजगारीत व्यवसायिकाचा पर्याय क्लिक करा त्यानंतर तुम्ही तुमचे वैयक्तिक सर्व माहिती जसे की नाव मोबाईल नंबर ईमेल हे सर्व माहिती भरून तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती ओटीपी पाठवण्यात येईल. तो मिळालेला ओटीपी त्या ठिकाणी टाईप करून तुमचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्या.

वरील सर्व रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नंतर योजनेचा अर्ज भरायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती तुमच्या व्यवसाय संदर्भातील सर्व व्यवसायाची माहिती निवडून त्यानंतर तुम्हाला कोणत्या श्रेणीतील अर्ज करायचा आहे तिसऱ्यानी निवडायचे आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन श्रेणी असणार आहे त्यामध्ये मुद्रा श्रेणी मुद्रा किशोर श्रेणी व मुद्रात तरुण श्रेणी यासारख्या श्रेण्या त्या ठिकाणी असणार आहेत जो तुम्ही ज्या श्रेणीसाठी अर्ज करणार आहात ती श्रेणी त्या ठिकाणी निवडायची आहे.

त्यानंतर तुमच्या संपूर्ण व्यवसायाची माहिती भरायची आहे त्यामध्ये तुमच्या व्यवसायाचे जे काही असणारे नाव तसेच व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे कोणत्या पद्धतीच्या सेवा किंवा उत्पादने त्या त्या व्यवसाय मार्फत दिल्या जातात हे सर्व त्या ठिकाणी भरणे गरजेचे आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर त्या ठिकाणी खाली तो मला तुमचे वैयक्तिक सर्व माहिती भरायचे आहे त्यामध्ये तुमची बँक कोणते आहे बँकेचे पासबुक, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड व आधार कार्डचा नंबर पॅन कार्ड पॅन कार्ड चा नंबर तुमची सही तुमचा ओळखीचा पुरावा असणारे प्रमाणपत्र ही सर्व माहिती तुम्ही त्या व्यवस्थित पद्धतीने भरून घ्यायचे आहे.

स्वतःची व व्यवसायाची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरून झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज सबमिट करून घेऊ शकता एकदा का अर्ज कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या अर्जाचा एक सिरीयल नंबर तयार होतो तो तुम्ही जपून ठेवण्यात अत्यंत गरजेचे आहे कारण पुढील प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्या अर्जाचा नंबर हा आवश्यक असतो.


तर अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री प्रधान मंत्री मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकता.

प्रधान मंत्री Mudra loan Yojana निष्कर्ष

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व छोट्या उद्योजकांना कमी व्याजदरावरती कर्ज उपलब्ध करून देणे. या मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून छोटे व्यवसायिक व उद्योजक हे त्यांच्या व्यवसायासाठी जसे की व्यापार, दुकाने, शेती संदर्भातील उद्योग, सेवा क्षेत्रातील उद्योग यासारख्या इतर सर्व उद्योगांसाठी केंद्र सरकारमार्फत मुद्रा लोन योजनेअंतर्गत या सर्व व्यावसायिकांसाठी 50,000/- पासून ते 100,00000/- लाख रुपयांपर्यंत सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध मिळते


अधिक वाचा – सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana

अधिक वाचा – प्रधान मंत्री विश्व कर्मा योजना | PM Vishwakarma Yojana 


FAQ’s

1). पीएम मुद्रा लोन म्हणजे का?

उत्तर – पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत देशातील छोट्या व्यवसायिकांसाठी कर्ज मिळते.

2). Mudra लोन मिळण्यासाठी किती कालावधी लागतो?

उत्तर – दहा ते पंधरा दिवसात तुम्हाला मुद्रा लोन मिळते.

3). मुद्रा कर्ज मिळवण्यासाठी काही तारण ठेवावे लागते का?

उत्तर – मुद्रा कर्ज घेणाऱ्या नागरिकास कोणत्याही प्रकारचे तारण ठेवावे लागत नाही.

4). मुद्रा कर्ज योजनेची पात्रता काय आहे?

उत्तर – मुद्रा कर्ज योजनेसाठी सर्व छोटे व्यावसायिक पात्र असणार आहेत.

5). मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कमीत कमी किती कर्ज मिळू शकते?

उत्तर – मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कमीत कमी 50 हजार रुपये ते जास्तीत जास्त दहा लाख रुपये एवढे कर्ज मिळू शकते.

7 thoughts on “व्यावसायिक बांधवांसाठी 10 लाखा पर्यंत लोन उपलब्ध होणार | PM Mudra loan Yojana”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top