सर्वसामान्य नागरिकांना 5 हजार मिळणार | Atal Pension Yojana 2024

Atal Pension Yojana ( APY Scheme ) : जीवन जगात असताना सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक परिस्थिती सुधारण्य साठी खूप कष्ट व मेहनत घ्यावी लागते. परंतु काहीच नागरिक हे यात सफल होतात. आयुष्यभर कष्ट करून त्यांना त्याच्या वृद्ध अवस्थेत हि मेहनत व कष्ट करावे लागते. परंतु त्या वयामध्ये त्यांची तेवढी कष्ट व मेहनत घेण्याची कुवत नसते. त्या अवस्थेत त्यांना भरपूर शाररीक व्याधी जडलेल्या असतात, त्यामुळे त्यांना वृद्ध पणातील जीवन व्यतीत करणे खुप अवघड असते.

त्यातच काही लोकांचे अपघात होऊन ते अपंग हि होतात, मग अश्या वेळेस त्याना जीवन जगणे खूप जड जाते. आताच्या पिढीत खूप असे लोक आहेत कि ते त्यांच्या वृद्ध पालकांचा सांभाळ करत नाहीत. यांसारख्या परिस्थितीस केंद्र स्थानी ठेवून भारत सरकारने अटल पेन्शन योजना राबविली आहे. ज्याच्या माध्यामातून देशातील अश्या सर्व नागरिकांना त्यांच्या वयाच्या 60 व्या वर्ष्या पासून त्यांना प्रत्येक महिन्याला रुपये 1000/- ते रुपये 5000/- पर्यंत पेन्शन मिळणार आहे.

Atal Pension Yojana Scheme
Atal Pension Yojana

Atal Pension Yojana नेच्या माध्यामातून नागरिकांना कश्या प्रकारे लाभ मिळू शकतो हे आपण या ठिकाणी अत्यंत सविस्तर पणे माहिती देणार आहोत. त्यामध्ये अटल पेन्शन योजना म्हणजे काय, या योजने पाठीमागची सरकारची धोरणे व उदिष्टे काय आहेत, योजनेच्या माध्यमातून मिळणारे फायदे कोणकोणते आहेत, योजनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना कोणकोणते पात्रता निकष पाळावे लागतील, योनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोण कोणती आहेत. योजनेचा अर्ज कुठे व कसा करावा यांसारखे सर्व महत्वाचे घाटक या योजनेविषयी सविस्तर पणे पाहणार आहोत .

प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना 2024 बद्दल संशिप्त माहिती तक्ता

योजनेचे नाव – अटल पेन्शन योजना APY )
योजना सुरु झाल्याची तारीख – 9 मे 2015 रोजी
योजना कोणी सुरु केली – केंद्र सरकार ( पं. मा. नरेंद्र मोदीजी )
योजनेची पात्रता – 18 ते 40 वयोगटातील सर्व नागरिक
पेन्शन रक्कम लाभ – 1000/- रुपया पासून ते 5000/- रुपया पर्यंत
लाभ मिळण्याचे वर्ष – वय वर्ष 60 पूर्ण झाल्यानंतर
अर्ज करण्याची वेबसाईट – Apply Here

Atal Pension Yojana (APY) ने मागील उद्देश व वैशिष्टे

  • अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार हे नागरिकांचे म्हातारपणातील जीवन सुरक्षित करणे हा मुख्य उद्देश व धोरण आहे.
  • पेन्शनच्या मिळणाऱ्या आर्थिक लाभातून नागरिक त्यांच्या वृद्ध पणाच्या काळात कोणावर निर्भर राहू नये.
  • नागरिकांना त्यांच्या 60 वय वर्ष्या नंतर प्रत्येक महिन्याला 1000/- रुपया पासून ते 5000/- रुपयापर्यंत पेन्शन दिली जाते. याच्या माद्यमातून ते त्यांचे उपचार करू शकतात.
  • वृद्धावस्थेत त्यांना APYच्या माद्यमातून भक्कम आधार त्यांना मिळतो.
  • नागरिकांना त्यांच्या कमवत्या काळात प्रती महिन्याला केलेली गुंतवणुकीवर त्यांना त्यांच्या वयाच्या साठी नंतर त्याचा फायदा होणार.
  • अटल पेन्शन योजनेच्या माद्यमातून देशातील आर्थिक अडचणी मुळे त्रस्त असणार्या तसेच त्यांना त्यांची मुले त्यांचा सांभाळ निट करत नाहीत अश्या नागरिकांनचे प्रमाण कमी करणे.

तर हि वरील सर्व या अटल पेन्शन योजनेच्या पाठीमागील उद्देश व वैशिष्टे आहेत.

Atal Pension Yojana (APY) Scheme च्या माध्यमातून मिळणारे फायदे

  • पीएम अटल योजनेच्या माध्यमातून नागरिकांना साठ वर्षाच्या नंतर प्रत्येक महिन्याला 5000/- हजार रुपये पेन्शन मिळते त्यामध्ये त्यांनी त्यांच्या वयाच्या 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत दरमहा त्यांच्या कुवतीनुसार एक ठराविक रक्कम महिन्याला जमा करून ते 1000/- पासून ते पाच हजार रुपये पर्यंत पेन्शन साठ वर्षानंतर मिळू शकतात.
  • नागरिकांनी लवकरात लवकर या योजनेचा गुंतवणूक केल्यास त्यांना लवकरात लवकर या योजनेचा फायदा होतो.
  • समजा एखाद्या नागरिकाने त्याच्या वयाच्या 40 वर्षापर्यंत गुंतवणूक केली व त्यानंतर त्याचा अचानक मृत्यू झाला तरी त्याच्या वारसाला या योजनेचा लाभ मिळतो.
  • अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम तुमच्या सोयीनुसार तुम्ही गुंतवू शकता.
  • जे नागरिक दिव्यांग आहेत किवा ज्या नागरिकांना अपघात मध्ये ज्यांनी एखादा अवयव गमावलेला आहे अशा सर्व नागरिकांना या योजनेचा अत्यंत पुरेपूर फायदा घेता येणार आहे.
  • ज्यांनी एखादा अवयव गमावलेला आहे अशा सर्व नागरिकांना या योजनेचा अत्यंत पुरेपूर फायदा घेता येणार आहे.
  • वृद्ध वयामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम व कष्ट करण्याची गरज नाही ते त्यांच्या मिळणाऱ्या पेन्शनच्या माध्यमातून त्यांचे दैनंदिन जीवनात लागणारे सर्व गरजा ते भागू शकतात.
  • वय वर्ष 18 ते 40 या दरम्यान तुम्ही या योजनेत महिन्याला तुमच्या पद्धतीने रक्कम गुंतवू शकता व जेवढे तुम्ही रक्कम गुंतवाल त्या पटीत तुम्हाला 1000/-, 2000/-, 3000/-, 4000/-, व 5000/- या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमच्या वयाच्या साठाव्या वर्षानंतर हे हप्ते तुम्हाला पेन्शन स्वरूपात मिळते.

तर हे सर्व फायदे अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या साठाव्या वर्षानंतर प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत Net worth.

अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी लागणारे पात्रता निकष

अटल पेन्शन योजनेमध्ये ज्या नागरिकांना सहभागी व्हायचे आहे त्या नागरिकांनी कोणकोणते पात्रता निकष व्यवस्थितरित्या पूर्ण करणे गरजेचे आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया,

  • अटल पेन्शन योजनेमध्ये नागरिकांनी वीस वर्षे साठी गुंतवणूक केली पाहिजे.
  • नागरिकाचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत जोडलेले असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारे नागरिकाचे वय वर्ष हे 18 ते 40 या दरम्यानचे असावे
  • अर्ज करणारा नागरिक हा भारत देशाचा रहिवासी असावा.

तर हे वरील सर्व मी कशामध्ये नागरिक बसत असतील तर तीच नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

अटल पेन्शन Scheme चा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

अटल पेन्शन योजनेसाठी ज्या नागरिकांना अर्ज करायचा आहे अशा नागरिकांना कोण कोणती महत्त्वाची कागदपत्रे अर्ज भरण्यासाठी लागणार आहेत ती सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे दिले आहेत,

  • अर्ज करणाऱ्या नागरिकांचे आधार कार्ड.
  • अर्ज करणाऱ्या नागरिकाकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे महत्त्वाचे आहे.
  • अर्ज करणारे नागरिकाचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे गरजेचे आहे.
  • नागरिकाकडे स्वतःचा ईमेल आयडी असावा.
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • स्वताचा मोबाईल क्रमांक.

तर ही वरील सर्व कागदपत्रे अर्ज करणाऱ्या नागरिकाकडे असणे महत्त्वाचे आहे यातील कोणती कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.

प्रधान मंत्री अटल पेन्शन योजनेचा अर्ज कोठे व कसा करावा

अटल पेन्शन योजनासाठी नागरीक हे ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात व योजनेचे खाते उघडू शकतात यामध्ये आपण या दोन्हीही पद्धतीने अर्ज कसे करता येणार आहेत हे व्यवस्थितरित्या जाणून घेऊ.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया –

  • सर्वप्रथम आपण ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. तर समजा अर्ज करणाऱ्या नागरिकांकडे त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकांचे नेट बँकिंग व बँकेचे एप्लीकेशन वापरत असतील तर त्यामध्ये अटल पेन्शन योजनेचा ऑप्शन दिसतो त्यावरती जाऊन तुम्ही खाते काढू शकता, तर ते कसे काढता येते. तर सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या बँकेच्या एप्लीकेशन वरती किंवा वेबसाईट वरती लॉगिन करून घ्यावे.
  • लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट या ऑप्शनमध्ये APY Scheme असा ऑप्शन दिसेल तर त्यावर ती जाऊन तुम्ही तुमचे अटल पेन्शन योजनेचे अकाउंट ओपन करू शकता. त्यामध्ये तुम्ही महिन्याला किती रक्कम या योजनेमध्ये गुंतवणार आहात ते त्या ठिकाणी भरावे यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला आपोआप पैसे त्या योजनेमध्ये ट्रान्सफर व्हावे यासाठी तुम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या ऑटो डेबिट हा पर्याय चालू करावा त्यानंतर तुमचे प्रत्येक महिन्याला आपोआप महिन्याची गुंतवणूक योजनेच्या खात्यामध्ये गुंतवली जाईल.
  • ऑनलाईन पद्धत फक्त ज्या बँकांचे नेट बँकिंग ची सुविधा तसेच बँकेचे ॲप्लिकेशन असेल तरच करता येईल.तर ही होती ऑनलाईन पद्धतीने अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज व खाते उघडण्याची पद्धत या पद्धतीने तुम्ही सर्व अर्जाची प्रक्रिया करू शकता.

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया –

  • ऑफलाइन पद्धतीने भरणार असाल तर तुम्हाला अगोदर तुमच्या बँकेचे खाते ज्या खात्यामध्ये आहे त्या बँकेत तुम्हाला जावयाचे आहे, किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये ही एखादी काढू शकता सर्वप्रथम तुम्हाला पदर त्या ठिकाणी जायचे आहे.पोस्ट ऑफिस का बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अतुल पेन्शन योजनेचा फॉर्म मिळेल तो फॉर्म तुम्हाला योग्यरीत्या सर्व बाबी व्यवस्थित रित्या भरून तो फॉर्म तुम्हाला तुमच्या सोयीनुसार बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सबमिट करणे गरजेचे आहे.
  • सोबतच वर दिलेली सर्व डॉक्युमेंट ची झेरॉक्स कॉपी त्या फॉर्म सोबत जोडणे महत्त्वाचे आहे तसेच तुमचे फोटो त्या अर्जावर चिटकवणे गरजेचे आहे. सर्व फॉर्म योग्य पद्धतीने भरून झाल्यानंतर तुम्ही तो पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये जमा करावा. बँकेतील पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी तुम्हाला अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची पावती तुम्हाला देतील.
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज हा मंजूर करण्यात येईल त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ओटीसह प्रामाणिक करून ते कर्मचारी घेतील. त्यानंतर तुमचे खाते व्यवस्थितपणे त्या बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये हे उघडले जाईल.

अशा तऱ्हेने तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून अटल पेन्शन येण्यासाठी खाते उघडू शकता.

प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना निष्कर्ष

अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या वृद्ध अवस्थेमध्ये एक भक्कम असा आधार या अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून देण्यात येतो यामध्ये नागरिकांना 18 ते 40 या वयोगटांमध्ये त्यांनी केलेला गुंतवणुकी वरती त्यांना त्यांच्या साठ वर्षांनंतर एक हजार रुपये ते पाच हजार रुपये पर्यंत ही मासिक पेन्शन त्यांना मिळते व त्याच्या आधारे ते त्यांचे जीवन योग्य पद्धतीने जगू शकतात.


आधिक वाचा – व्यावसायिक बांधवांसाठी 10 लाखा पर्यंत लोन उपलब्ध होणार | PM Mudra loan Yojana

आधिक वाचा – मुलीचं शिक्षण व लग्नाची काळजीचं सोडा । Sukanya Samriddhi Yojana Maharashtra

आधिक वाचा – तुमच्या व्यवसायसाठी सरकार आर्थिक मदत देणार, PM Vishwakarma Yojana Apply


FAQ’s

1). प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करावा?

उत्तर– नागरिक बँकेच्या ऑनलाईन एप्लीकेशन वरून किंवा बँकेमध्ये जाऊन या पेन्शन साठी अर्ज करून खाते उघडू शकतात.

2).अटल पेन्शन योजना कधीपासून सुरू सुरू झाली?

उत्तर- अटल पेन्शन योजनेची सुरुवात ही नऊ एप्रिल 2015 पासून सुरू झाली.

3).अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता काय आहे?

उत्तर– या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी नागरिका 18 ते 40 वयोगटातील असावा तसेच तो भारतीय नागरिक असावा ही पात्रता या योजनेसाठी अर्ज करताना पाळली पाहिजे.

4).अटल पेन्शन योजनेमध्ये सरकारकडून किती टक्के रक्कम आपल्याला मिळते?

उत्तर- अटल पेन्शन योजनेमध्ये सरकारकडून 50 टक्के रक्कम ही या पेन्शन योजनेअंतर्गत आपल्याला दिली जाते.

5).अटल पेन्शन योजनेच्या खाते कोण उघडू शकते?

उत्तर- 18 ते 40 वयोगटातील सर्व नागरिक या योजनेसाठी खाते उघडू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top