Pradhanmantri Jandhan Yojana : सर्वसामान्य नागरिक हे फक्त बँक पैसे काढणे , पैसे भरणे तसेच इतर काही बँकेच्या सुविधांबद्दलच फक्त त्यांना माहिती असते. परंतु बँका ह्या त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना व उपक्रम राबवित असते. तसेच त्यातील काही योजना ह्या केंद्र सरकार हि नागरिकांच्यासाठी बँकांमार्फत राबवित असते. त्यातलीच हि एक सुविधा किंवा योजना म्हणजे पंतप्रधान जनधन योजना या योजनेअंतर्गत भारत देशातील प्रत्येक नागरिक हा बँकेसोबत जोडला जावा तसेच प्रत्येक नागरिकाचे बँकेमध्ये खाते असावे, जर त्यांचे बँकेत खाते असेल तर ज्या पण काही सरकारी योजनांचे आर्थिक लाभ आहेत, ते सरकारला त्या नागरिकांना त्यांच्या खात्यात जमा करता येतील. तसेच या योजनेअंतर्गत सर्व सामान्य नागरिकांना मोट्या प्रमाणात फायदे होणार आहेत.
या योजेनेअंतर्गत जे नागरिक बँकेत जनधन योजना उघडतील त्यांना या योजनेच्या माध्यमातून नागरिक हे कोणतीही ठराविक रक्कम ठेवण्याची गरज नाही, म्हणजे ते अगदी 0 रुपयात ते खाते उघडू शकतात. त्याना बँकेत खत्यावरती कोणत्याही पद्धतीची ठराविक रक्कम ठेवावी लागणार नाही. जसे कि आता सद्याच्या काळात जे सामान्य बँक खाते उघडताना कमीत कमी 1000/- रुपये ठेवावे लागतात. तसे या योजनेअंतर्गत एकही रुपया न भरता खाते काढता येणार आहे. तसेच नागरिकांना बँक पासबुक , ATM कार्ड, अपघाती विमा, आरोग्य विमा यांसारख्या योजनांचा फायदा घेता येणार आहे. तसेच महत्वाचा फायदा म्हणजे नागरिकांच्या खात्यात जर पैसे नसले तरीही त्यांना बँक ओव्हरड्राफ्ट या माध्यमातून नागरिकांना त्यांचा गरजेच्या वेळी त्यांना दिले जाणार आहेत.

Jandhan Yojana खात्यातील ओव्हरड्राफ्ट या बद्दलची माहिती
ज्या नागरिकांना जर त्यांच्या बँक खात्यामध्ये काही रक्कम नसेल तरीही त्यांना त्यांच्या बँक द्वारे दहा हजार रुपये हे बँकेकडून देण्यात येणार आहेत याच प्रक्रियेस ओव्हरड्राफ्ट असे बोलले जाते. ओव्हर ड्राफ्ट व्यवस्थेमध्ये नागरिकांना हे एका ठराविक कालावधीसाठी फिक्स रक्कम रुपये दहा हजार एवढे बँक देणार आहे तर ती रक्कम नागरिकांना ठरलेल्या प्रमाणे त्यांच्या वेळेच्या अगोदर बँकेमध्ये जमा करणे गरजेचे आहे.
यामध्ये नागरिकांना त्या रकमेवर जेवढे दिवस पैसे दिले आहेत तेवढा व्याजदर हा बँकेमध्ये भरावा लागणार आहे. या ओव्हरड्राफ्ट व्यवस्थेमध्ये नागरिकांनी जेवढे वेळ पैसे नेले आहेत म्हणजे जेवढे दिवसांसाठी त्यांनी ते पैसे दिले आहेत तेवढ्या दिवसांमध्ये त्या पैशावर बँकेने ठरविल्याप्रमाणे जेवढे व्याज असणार आहे ते व्याज नागरिकांना परत बँकेमध्ये जमा करावे लागणार आहे ही ओव्हरड्राफ्ट योजना एखाद्या कर्जाच्या योजनेसारखी कार्य करते.
तसेच या जनधन खाते अंतर्गत च्या सोयी सुविधा नागरिकांना दिल्या जातात त्यामधील ओव्हर ड्राफ्ट ही सुविधा आहे ही सुविधा वेगवेगळ्या कार्यकाल व वेगवेगळ्या रकमेवरती आधारित असतात तुम्हाला तुमच्या सोयीनुसार ही ओव्हरड्राफ्ट सुविधा निवडून तुम्ही बँके मधून ठराविक दिवसांसाठी हे पैसे घेऊ शकता.
Jandhan Yojana खाते व नागरिकांना होणारे फायदे
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेची सुरुवात 28 ऑगस्ट 2014 मध्ये सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सुरु केली . या योजनेच्या अंतर्गत नागरिकांना कोण कोणते फायदी होणार आहेत ते खालील प्रमाणे आहेत.
- सर्वसामान्य नागरिकांना कोणतेही रक्कम न भरता हे जनधन खाते उघडता येणार आहे.
- जनधन योजनेत ओव्हर ड्राफ्ट या सुविधेमधून त्यांना बँक खात्यात 1 हि रुपया नसताना रुपये 10,000/- मिळणार आहेत.
- अवेळी तुम्हाला जर पैशांची आवश्यकता असेल तर तुम्ही डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन या ओव्हर ड्राफ्ट या सुविधा द्वारे तुम्ही बँकेतून रुपये दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढू शकता.
- नागरिक ज्यावेळेस जनधन खाते बँक मध्ये ओपन करतील खाते ओपन झाल्यानंतर लगेचच त्या खातेधारकास दोन हजार रुपयांचा कर्ज हे मिळू शकत.
- ओव्हरड्राफ्ट सुविधा सोबतच तुम्ही बँकेतून तुमचा आरोग्याचा विमा उतरवू शकता तसेच तुमचा अपघाती विमा ही या ठिकाणी तुम्हाला काढता येतो.
- जनधन खाते हे नागरिकांचे वय वर्ष 18 ते 60 या वयोगटातील सर्व नागरिक हे जनधन खाते काढू शकतात.
- नागरिकांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे त्यांना बँकेच्या नियमानुसार खाते सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही पद्धतीची विशिष्ट रक्कम बँक खात्यामध्ये ठेवली जाणार नाही व त्यावरती कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही.
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत वरील प्रमाणे दिलेले सर्व प्रकारचे सर्व फायदे सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहेत. जर तुम्हाला जनधन खाते काढावयाचे असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन या Jandhan Yojana खाते योजनेची माहिती घेऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जनधन खाते हे उघडू शकता.
Jandhan Yojana योजनेअंतर्गत बँकेद्वारे तुम्हाला 10 हजार कशा पद्धतीने मिळणार
जर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन जनधन योजनेअंतर्गत खाते काढणार असाल तर तुम्हाला या बँकेच्या ओव्हर ड्राफ्ट या सुविधेविषयी माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या योजनेअंतर्गतच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये एकही रुपया ठेवीमध्ये शिल्लक नसला तरीही बँक तुम्हाला या ओव्हरड्राफ्ट सुविधा नुसार रुपये दहा हजार एका ठराविक कालावधीसाठी तुम्हाला ते पैसे वापरण्यास देते नंतर बँकेने ठरवून दिलेल्या जो ही काही कालावधी असेल त्या कालावधीच्या आत मध्ये तुम्हाला ते दहा हजार रुपये व त्या दहा हजारावरील जे काही लागणारे व्याज आहे ते व्याजासकट पूर्ण दहा हजार रुपये बँकेमध्ये त्यांच्या ठरवून दिलेल्या कालावधीच्या आत मध्ये जमा करणे महत्त्वाचे आहे यामध्ये बँकेने ज्या काही अटी व नियम तुम्हाला या संदर्भात सांगितलेले असतील त्या तुम्ही पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी केंद्र सरकारच्या Pradhanmantri Jandhan Yojana वेबसाइट ला भेट द्या
त्यानंतरच तुम्हाला बँक पुढील काळामध्ये दहा हजारापेक्षा जास्त रक्कम या ओवरड्राफ्ट सुविद्या अंतर्गत देईल त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस या योजनेअंतर्गत बँकेतून दहा हजार रुपये घेणार आहेत ती रक्कम व त्या रकमेवरील त्या कालावधीमध्ये जे काही व्याज लागेल ते व्याज व ती रक्कम तुम्ही बँकेत वेळेच्या आत मध्ये भरून घ्यावी.या ओव्हर ड्राफ्ट सुविधाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना बँकेने काही नियम घालून दिलेले असतात ते नियम बँक खातेदाराने पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
या नियमांमध्ये जे काही जनधन खाते काढले आहेत ते खाते जवळजवळ सहा महिने तरी काढून वेळ झालेला असावा म्हणजे ते खाते सामान्य जुने एवढे असावे यामध्ये खातेधारक नागरिकाचे आधार कार्ड आहे त्या बँकेच्या खात्याशी जोडलेले असावे ज्या व्यक्तीने जनधन खाते काढले आहे त्या व्यक्तीचे इतर बँकांमध्ये कोणत्याही प्रकारचे खाते नसावे हे रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या सूचनेमध्ये दिलेले आहे तरी या सूचनेचे पालन खातेधारक नागरिकाने करावे तर यांसारखे काही नियम जनधन खाते धारक नागरिकाने पाळणे बंधनकारक असते तसेच अधिक नियमांच्या माहितीबद्दल तुम्ही तुमच्या बँकेतील कर्मचाऱ्यांसोबत बोलून या नियमानबद्दल जाणून घेऊ शकता.
कोणत्याही बँकेत जनधन खाते उघडण्यासाठी आवश्यक ती लागणारी कागदपत्रे
तर मित्रांनो, तुम्हाला जर या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत तुमच्याजवळ कोणत्याही बँकेमध्ये जनधन खाते उघडायचे असेल तर त्यासाठी कोण कोणती आवश्यक ती कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
सर्वप्रथम तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे लागणार आहे तसेच या आधार कार्ड बरोबरच तुम्हाला तुमचे पॅन कार्ड असणेही आवश्यक आहे, व पॅन कार्ड आणि आधार कार्ड आपापसात जोडलेले असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच तुमचे स्वतःचे दोन पासपोर्ट साईट चे फोटो व इतर तुमची सर्व वैयक्तिक माहिती तसेच मोबाईल क्रमांक व खाते काढणारा नागरिक स्वतः बँकेमध्ये हजर असणे गरजेचे आहे. हे खाते पाच मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या बँकेच्या कार्यालयामध्ये उघडता येईल.
तुम्ही जनधन योजना खाते कुठे व कसे काढणार
कोणत्याही नागरिकाला जनधन खाते काढायचे असल्यास त्यांनी त्यांच्या गावांमधील कोणत्याही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी जनधन खात्याबद्दल बँक कर्मचाऱ्यांसोबत चौकशी करावी. त्यानंतर त्या बँकेमध्ये जनधन खाते काढले जाते का याबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी व त्या माहितीबद्दल कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे अटी निकष आहेत ते त्या बँकेतील कर्मचारी असतो मी व्यवस्थितपणे विचारून घ्यावे तसेच आपण तुम्हाला जनधन खाते काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते दिलेले आहे .
त्याप्रमाणे तुम्ही सर्व कागदपत्रे तुमचे खाते काढतेवेळी सोबत ठेवणे तसेच त्यांच्या झेरॉक्स कॉपी सोबत ठेवणे गरजेचे आहे. बँकेत गेल्यावरती तुम्ही जनधन खाते उघडण्यासाठी जो फॉर्म लागतो तो फॉर्म बँके मधून घेऊन तो व्यवस्थितपणे पूर्ण भरून घ्यावा काही अडल्यास तेथील कर्मचाऱ्यास फॉर्म भरण्याबद्दल विचारून घ्यावे व व्यवस्थित रित्या फॉर्म संपूर्ण भरावा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही त्यासोबत त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सर्व ती आवश्यक कागदपत्रे व त्याच्या झेरॉक्स कॉपीज त्या फॉर्म सोबत जोडून त्या सर्व तुमच्या स्वयं स्वाक्षरी करून तो फॉर्म कर्मचाऱ्याकडून तपासून घेऊन बँकेमध्ये जमा करावा.
त्यानंतर तुमचे जनधन खाते हे पाच ते दहा मिनिटांमध्ये निघेल त्यानंतर तुम्हाला एक आठवड्याच्या कालावधीनंतर बँकेचे पासबुक व एटीएम कार्ड मिळेल. अशाप्रकारे तुम्ही बँकेमध्ये तुमच्या जनधन खाते सुरू करू शकता व त्याच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता.
जनधन योजना निष्कर्ष
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत नागरिकांना बँकांमध्ये जनधन खाते उघडून त्यामधील ओव्हरड्राफ्ट या सुविधे अंतर्गत खात्यामध्ये एकही रुपया नसताना त्यांना बँकेमार्फत दहा हजार रुपयांची रक्कम दिली जाते. ही ओव्हरड्राफ्ट सुविधा फक्त जनधन खाते असेल तरच मिळते. अडीअडचणीच्या काळामध्ये नागरिकांना या ओव्हरड्राफ्ट सुविधे मार्फत चांगलीच मदत होते. दिलेल्या दहा हजार रुपये रकमेवरती बँक कोणत्याही प्रकारचे व्याज आकारत नाही परंतु एका ठराविक वेळेनंतर ती रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक असते. या जनधन खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधा मधून नागरिकांना मदत होते. तसेच नागरिकास जनधन खाते काढावयाचे असल्यास कोणताही एक रुपया न भरता ते जनधन योजनेअंतर्गत जनधन खाते प्रत्येक बँकेमध्ये काढू शकतात.
अधिक वाचा – नागरिकांना दरमहा मिळणार 9,250 हजार रुपये | Post Office Scheme
अधिक वाचा – महिला भगिनींसाठी 5 लाख बिनाव्याजी कर्ज,Lakhpati Didi Yojana
अधिक वाचा – पुढील 5 वर्ष रेशनकार्ड धारक नागरिकांना मोफत धान्य मिळणार
तुम्हाला Jandhan Yojana खाते योजना विषयीची माहिती आवडली असेल व तुम्हाला उपयोग पडले असेल तर तुम्हीही माहिती तुमच्या मित्र परिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये शेअर करू शकता व त्यांनाही या योजनेबद्दल माहिती देऊन त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सांगू शकता.
FAQ’s
1).प्रधानमंत्री जनधन योजना खाते म्हणजे काय?
उत्तर- प्रधानमंत्री जनधन खात्याच्या माध्यमातून नागरिकांना एक रुपयाही न भरता बँकांमध्ये खाते काढता येते त्यास प्रधानमंत्री जनधन खाते असे म्हटले जाते.
2). खात्यामध्ये एकही रुपया नसताना दहा हजार कसे मिळणार?
उत्तर- खात्यामध्ये एकही रुपया नसताना जनधन खात्याच्या माध्यमातून ओव्हर ड्राफ्ट या सुविधेमधून नागरिकांना बँकेत एकही रुपया नसताना दहा हजार रुपये मिळतात.
3). जनधन खाते काढण्यासाठी नागरिकाचे वय वर्ष किती असावे?
उत्तर- जनधन योजनेचे खाते काढण्यासाठी नागरिकाचे वय वर्ष आहे 18 ते 60 वर्ष या दरम्यान असावे.
4). जनधन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याचा विमा उतरवता येऊ शकतो का?
उत्तर- जनधन खाते योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याचा विमा उतरवता येतो.
5). जनधन योजना खात्याच्या माध्यमातून मिळणारे दहा हजार रुपये हे किती दिवसांसाठी नागरिकांना दिले जातात?
उत्तर- जनधन खात्यातील ओव्हरड्राफ्ट या सुविधेमधून नागरिकांना दहा हजार रुपये हे बँकेच्या नियमानुसार ठराविक वेळेसाठी दिले जातात.