Post Office Scheme : पोस्ट ऑफिस म्हटलं की आपल्याला फक्त पत्र पाठवणे किंवा पत्र येणे एवढ्याच गोष्टी माहिती असतात, पण मागच्या काही काळापासून भारतीय पोस्टद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या हितासाठी भारत सरकारने नवनवीन योजना ह्या राबविल्या आहेत.या योजनेअंतर्गत नागरिक हे पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करून एक ठराविक रक्कम ते महिन्याला कमवू शकतात यामध्ये व्याजदर हे चांगल्या प्रमाणात मिळते तसेच ही योजना पोस्ट ऑफिस द्वारे व भारत सरकार यांच्या द्वारे चालवली जात असून ही पोस्ट ऑफिस मध्ये केली जाणारी गुंतवणूक एकदम सुरक्षित आहे.
त्यामुळे प्रत्येक नागरिक हे पोस्ट ऑफिस या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घेऊ शकतात. यामध्ये नागरिकांना फक्त एक वेळेस गुंतवणूक करून ते प्रत्येक महिन्याला त्यांचे मासिक उत्पन्न हे पोस्ट ऑफिस मधून घेऊ शकतात तर ही योजना तुम्ही अगदी हजार रुपयांपासून ही सुरू करू शकता तसेच या योजनेचा कालावधी हा पाच वर्षांसाठी आहे.
हा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अजून तिथून पुढेही या योजनेचा कालावधी वाढवून घेऊ शकता व तुमचे मासिक उत्पन्न हे प्रत्येक महिन्याला तुम्ही घेऊ शकता यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जे वयस्कर लोक आहेत किंवा जे प्रशासकीय सेवेतून व इतर खाजगी सेवेतून सेवानिवृत्त झालेले नागरिक असतील त्यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा फायदा होऊ शकतो या योजनेमध्ये दहा वर्षाच्या पुढील सर्व जणांना या योजनेसाठी त्यांचे खाते उघडता येते व ते यामध्ये गुंतवणूक करू शकतात व प्रत्येक महिन्याला ते आपले मासिक वेतन घेऊ शकतात.

आपण या ब्लॉगमध्ये पोस्ट ऑफिस या योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत, यामध्ये किती रक्कम मारल्यावर किती टक्के आपल्याला मासिक वेतन मिळणार आहे. तसेच आपल्याला किती पासून किती पर्यंत ही ठराविक रक्कम अगोदर पोस्टामध्ये जमा करावी लागणार आहे. म्हणजेच गुंतवणूक करावी लागणार आहे त्या रकमेवर ती किती प्रमाणामध्ये व्याज मिळणार आहे या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण व्यवस्थित रित्या पाहणार आहोत, त्यामुळे ही माहिती संपूर्ण वाचा.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेबद्दल माहिती । Monthly Income Post Office Scheme
भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत हि योजना नागरिकांनसाठी खरोखरच उपयोगाची व लाभदायक ठरणार आहे. या योजने द्वारे भारतातील सर्व नागरिकांना प्रत्येक महिन्याला मासिक उत्पन्न मिळणार आहे. या मध्ये जे नागरिक गुंतवणूक करणार आहेत. त्यांना त्या केलेल्या गुंतवणुकी वरती दरमहा उत्पन्न हे मिळणार आहे. जे नागरिक या योजनेत गुंतवणूक करतील त्यांना फक्त एकदाच गुंतवणूक करावयाची आहेत.
तुम्ही भारतीय पोस्ट च्या या Indian Post Website ला भेट देऊ शकता
त्या नंतर त्याचा त्यांना प्रत्येक महिन्यला फायदा मिळणार आहे. या योजने द्वारे ते पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही 1लाख, 9 लाख, 15 लाखा पर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेसाठी 10 वर्ष वयाचा मुलांपासून नागरिक मासिक उत्पन्न योजनेचे खाते काढून आपली गुंतवणूक अगदी योग्य पद्धतीने करू शकतात. हि योजनेचा कार्यकाल हा 5 वर्षांसाठीचा असतो. या नंतरही तुम्ही तो पुढे वाढवू शकता व लाभ घेऊ शकता.
Post Office Scheme या योजने मध्ये नागरिकांनी केलेल्या गुंतवणुकीवर 7.4% या प्रमाणे वार्षिक व्याजदर मिळतो. उदारणार्थ एखाद्या नागरिकाने 100000/- लाखाची गुंतवणूक केली तर त्याला दर त्या महिन्याला त्या व्यक्तीस रुपये 616.67/- एवढी रक्कम त्यांना मिळणार आहे, व 7.4% प्रमाणे प्रति वर्षी रुपये 37000/- हजार त्या नागरीकाला मिळणार आहेत. तर या पद्धतीचे लाभ हे या योजनेमध्ये असणार आहेत.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजने विषयीची प्रमुख वैशिष्ट्ये
- या पोस्ट ऑफिस च्या योजने अंतर्गत योजनेत सहभागी होणाऱ्या नागरिकास वेळच्या वेळी त्यांना त्यांचे उत्पन्न अगदी योग्यरित्या मिळते.
- योजनेतील सर्व कारभार हा पारदर्शक असल्याने नागरिकांसाठी अत्यंत सुरक्षित आहे.
- या योजनेत एकदा नागरिक सहभागी झाला कि त्याला पुढील पाच वर्षापर्यंत गुंतवणूक करून आपले मासिक उत्पन्न मिळवता येते.
- या योजनेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो तो पूर्ण पणे पार पडल्यावरतीतेथून पुढे हि तो त्यांना वाढवून घेता येतो.
- या योजनेमध्ये नागरीकास बँके पेक्षा जास्त वार्षिक व्याजदर मिळतो.
- यामध्ये प्रत्येक व्यक्तीस जास्तीत जास्त 9,00,000 लाख रुपयांपर्यंत पैसे या योजनेत गुंतवता येतात.
- ज्या नागरिकांना त्यांचा कुटुंबातील सदस्य सोबत जोडलेले खाते काढता येते. या त्यामध्ये ते जास्तीत जास्त 15,00,000 लाख रुपये गुंतवणूक करू शकतात.
तर या प्रमाणत Post Office Scheme या योजने बद्दलची वैशिष्ट्ये आहेत तसेच तुम्हाला जर कधी हि पैशाची गरज पडल्यास लगेच तुम्ही खात्यातुन काढू शकता.
पोस्ट ऑफिस योजनेमार्फत तुम्हाला जर 9350/- एवढे मासिक रुपये मिळण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागणार
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न या योजनेतून नागरिकांना जर रुपये 9250/- एवढे उत्पन्न मिळवायचे असेल तर त्या किती रक्कम या योजेने अंतर्गत गुंतवावी लागणार ते पहा,
सर्वप्रथम या योजनेचे नवीन खाते पोस्टात उघडताना त्यानां कुटुंबातील व इतर व्यक्तीसोबत जोडलेले म्हणजेच जॉईंट खाते हे काढावे लागेल. व त्यामध्ये त्यांना रुपये 15,00,000/- लाख एवढी गुंतवणूक करावी लागणार आहे. व या गुंतवणूक केलेल्या रक्कमेवरती त्यांना वार्षिक व्याजदर 7.4% या प्रमाणे रुपये 5,55,000/- लाख एवढे व मासिक 9250/- रुपये एवढे मासिक उत्पन्न हे नागरिकांना मिळणार आहे.
हे लक्षात घ्यावे. तसेच 100,000/- लाख गुंतवणुकी वरती वार्षिक 37,000/- रुपये व मासिक 616.67/- रुपये उत्पन्न मिळेल. तसेच 900,000/- लाख गुंतवणुकी वरती वार्षिक उत्पन्न हे 66,600/- रुपये एवढे तर मासिक उत्पन्न हे 5,550/- रुपये एवढे मिळणार आहे.
तर या अशा प्रकारे हि योजना काम करते. तुम्ही तुमच्या आर्थिक गुंतवणुकीच्या नियोजनानुसार या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.
पोस्ट ऑफिस योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता व निकष काय असतील
यामध्ये तुम्हाला सहभागी होण्यासाठी पात्रता व निकष काय असतील ते पुढील प्रमाणे पाहूया,
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी खाते काढणारा नागरिक हा भारत देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे, त्यानंतर त्याच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड त्याचे फोटोज व तसेच इतर गोष्टी असणे आवश्यक आहे. या योजनेत वय वर्ष १० पासून पुढचे सर्व जण सहभागी होऊ शकतात.
मासिक उत्पन्न योजनेचे खाते कोठे व कसे काढावे । How to open Post Office Scheme account
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या गावामध्ये असणाऱ्या त्यांच्या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये भेट द्यावी व तेथील पोस्ट मास्टर व पोस्टातील आधिकार्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्याकडून या योजनेचा फॉर्म घ्यावा व तो व्यवस्थित रित्या भरून सर्व कागदपत्रांच्या पूर्तता करून तो फॉर्म त्यांच्याकडे जमा करावा.
त्यानंतर तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड फोटोज तुमची स्वाक्षरी या संबंधित सर्व बाबी तुम्हाला तुमचे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते काढण्यासाठी या सर्व गोष्टी लागणार आहेत या सर्व गोष्टींची पूर्तता करून तुम्ही तुमचे या योजनेचे अकाउंट हे पोस्ट ऑफिस मध्ये काढू शकता त्यानंतर खाते ओपन झाल्यानंतर तुमच्या आर्थिक नियोजनानुसार तुम्ही योग्य ती रक्कम पोस्टमध्ये या योजनेत गुंतवा त्यानंतर इथून पुढे तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुम्ही गुंतवलेल्या रकमेवरती तुम्हाला मासिक उत्पन्न हे दर महिन्याला मिळेल.
पोस्त ऑफिस मासिक उत्पन्न निष्कर्ष
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेमधून नागरिकांना प्रत्येक वर्षाला त्यांच्या गुंतवणुकी वरती 7.4% व्याजदर मिळतो. व प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याचा व्याजदर हा नागरिकांना खात्यातून काढता येतो. एक ठराविक रक्कम भरून नागरिकांना ही गुंतवणूक पोस्ट ऑफिस मध्ये करता येते. बँकेपेक्षा जास्त प्रमाणात व्याज हे नागरिकांना पोस्ट ऑफिसमध्ये मिळू शकते. यामध्ये नागरिक ठराविक वर्षाचा कार्यकाल निवडून त्यामध्ये त्यांच्या सोयीनुसार प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये वय वर्ष 10 असणाऱ्या मुलांपासून गुंतवणूक करता येत. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीस जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवणूक करता येते तसेच कम्बाईन खाते असल्यास ही गुंतवणुक पंधरा लाखांपर्यंत नागरिक करू शकतात. व मासिक उत्पन्न कमवू शकतात.
अधिक वाचा – विहीर खोदण्यासाठी आता 4 लाख रुपये अनुदान । Vihir Anudan Yojana
अधिक वाचा – महिला भगिनींसाठी 5 लाख बिनाव्याजी कर्ज,Lakhpati Didi Yojana
अधिक वाचा – 5 वर्ष रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य । Free Ration Yojana
Post Office Scheme ही योजना विषयी ची माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करू शकता व त्यांना या योजनेबद्दल माहिती सांगू शकता.
FAQ’s
1). पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त किती पैसे गुंतवता येतात?
उत्तर- नागरिकांना जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवता येतात.
2). पोस्ट ऑफिस उत्पन्न योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारास वार्षिक किती टक्के व्याजदर मिळते.
उत्तर- मासिक उत्पन्न योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारास गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक 7.4% व्याजदर मिळते.
3). पोस्ट ऑफिस मासिक योजनेचे खाते उघडण्यासाठी नागरिकाचे वय वर्ष किती असावे लागते?
उत्तर- पोस्ट ऑफिस मासिक योजनेचे उघडण्यासाठी लहान वय वर्ष 10 असणाऱ्या मुलांपासून खाते नागरिक उघडू शकतात.
4). पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा गुंतवणूक कार्यकाल किती वर्षांचा असतो?
उत्तर- योजनेचा गुंतवणूक कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो.
5). पोस्ट ऑफिस उत्पन्न योजनेचे खाते कोठे व कसे काढावे?
उत्तर- Post Office Scheme उत्पन्न योजनेसाठी खाते हे तुमच्या गावातील किंवा शहरातील पोस्ट ऑफिस मध्ये काढता येते व त्याचा अर्ज ही पोस्ट ऑफिस मध्ये मिळतो.