असा करा अर्ज, 4 लाख रुपये अनुदान मिळणार । Vihir Anudan Yojana 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vihir Anudan Yojana Maharastra 2024 : शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पाणी त्याचं पूर्ण आयुष्य हे शेती वरती अवलंबून असते. त्यामुळे पाणी हा शेतकऱ्याच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे.शेतकरी बांधव या विहिरीच्या मदतीने पिकांना व त्यांच्या शेतीस पाणी देण्यासाठी वापरत असतो पूर्वीच्या काळामध्ये पाच ते दहा जणांच्या मध्ये एक विहीर असायचे व ते सर्व शेतकरी त्या विहिरीतून त्यांच्या शेताला पाणी द्यायचे पण आता लोकसंख्या वाढल्यामुळे शेतीचे विभाजन भरपूर प्रमाणामध्ये झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची सेपरेट त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची विहीर उपलब्ध होत नाही तसेच राज्यातील कमी प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे तसेच भरपूर प्रमाणामध्ये पडणाऱ्या दुष्काळामुळे पिकांना पाणी देण्यासाठी पाणी मिळत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते व त्यांच्या आर्थिक परिस्थिती वरती मोठ्या प्रमाणात आघात होतो त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत म्हणजेच विहीर असणे गरजेचे असते त्या विहिरीतील पाण्याच्या मदतीनेच शेतकरी त्याचे अन्नधान्य वेगवेगळी पिके पिकवत असतो तर सर्वसामान्य शेतकऱ्याला त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात हा खर्च होतो आणि तेवढा होणारा खर्च हे शेतकरी करू शकत नाही त्यामुळे त्याला पाण्याअभावी शेतीमध्ये पीक पिकवता येत नाही.

तरी याच मोठ्या समस्येवरती उपाय योजना म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकरी बांधवांना विहीर खोदकामासाठी व त्यांच्या पिकांसाठी पाण्याचे व्यवस्थापन करण्याकरिता ही विहीर अनुदान योजना अमलात आणली आहे अंतर्गत माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना त्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये विहीर खोदकाम करण्यासाठी तसेच विहिरीच्या बांधणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून भरघोस प्रमाणामध्ये अनुदान उपलब्ध करून दिले जाते व त्या अनुदानाचा उपयोग करून शेतकरी बांधव हे विहीर बांधणी करू शकतात यामध्ये आपण या विहीर अनुदान योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत.

Vihir Anudan Yojana
Vihir Anudan Yojana 2024

विहीर अनुदान योजना बद्दल धोरणे व उद्दिष्टये । Vihir Anudan Yojana

या विहीर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी तसेच शेतीला चालना मिळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेती करण्याकरता प्रोत्साहित करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक पार्श्वभूमी बळकट करण्यासाठी या योजने मागची ही प्रमुख तत्वे आहेत.

शेतकऱ्याच्या शेतीस मोठ्या प्रमाणामध्ये पीक पिकवण्यासाठी व्यवस्थित पाणी तसेच सिंचनासाठी नैसर्गिक पाणी पुरवठा स्त्रोत उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांच्या हातात बळकटी देणे त्यांचे आर्थिक जीवन सुधारण्यासाठी मदत करणे कोणत्याही सावकार किंवा बँकांचे कर्ज न घेता त्याला विहीर बांधण्यासाठी योग्य ती आर्थिक मदत पुरवणे.

तसेच राज्यात वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे व जे शेतकरी आर्थिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना शेती करण्याकरता यांसारख्या योजना अंतर्गत वेगवेगळ्या उपाय योजनेची मदत करणे.शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे पाण्याअभावी होणारे नुकसान टाळण्याकरता या विहीर अनुदान योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक मदत देणे.

Vihir Anudan Yojana या योजनेअंतर्गत कोणकोणत्या शेतकरी बांधवांना विहीर अनुदान देण्यात येणार

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे त्यांच्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी स्थिर असा पाण्याचा स्त्रोत नाही त्यामुळे या योजने अंतर्गत कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे ते पाहू.

या योजनेअंतर्गत जे शेतकरी त्यांना अडीच एकरापर्यंत शेत जमीन आहे तसेच ज्या कुटुंबामध्ये महिला या कुटुंब प्रमुख आहेत त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच त्यांच्या कुटुंबातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या वारसदारास या योजनेचा लाभ घेता येणार आहे, तसेच शारीरिक दृष्ट्या दारिद्र्यरेषेखालील तसेच कमी जमीन असणारे व इतर सर्व मागासवर्गीय शेतकरी आहेत.

अशा सर्व शेतकरी बांधवांना विहीर अनुदान या योजनेअंतर्गत लाभ होणार आहे या विरोधात योजना अंतर्गत व मागील त्याला विहीर या योजनेअंतर्गत या सर्व वरील शेतकऱ्यांना रुपये चार लाखांची भक्कम अशी आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये प्रमुख गोष्टही के शेतामध्ये विहीर तयार करण्यासाठी त्यांना योग्य ती मदत उपलब्ध करून देणे व त्यांच्या पिकांच्या सर्व शेतीचे क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे या विहीर अनुदान योजना 2024 अंतर्गत या लाभार्थ्यांना दिली जाणार आहे.

हे अनुदान हे DBT अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये जमा करण्यात येणार आहे. तसेच हा लाभ त्यांना त्यांच्या गावातील जे ग्रामसेवक असतात त्यांच्याकडून या सिंचन योजना व अनुदान योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची अर्ज व बाकीची सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.


महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळा भेट द्या


अनुदान योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे पात्रता निकष व अटी । Vihir Anudan Yojana

जे शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करणार आहेत, त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेण्याच्या अगोदर इतर दुसऱ्या कोणत्याही योजनेचा फायदा घेतलेला नसावा म्हणजेच त्यांनी मागेल त्याला शेततळे अनुदान योजना तसेच इतर यांसारख्या योजनांचा त्यांनी भूतकाळामध्ये लाभ घेतलेला नसावा, असे असे भूतकाळामध्ये लाभ घेतलेला नसावा, जर त्यांनी या अगोदर योजने चा लाभ घेतला असेल तर त्यांना सदर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या योजनेला अर्ज करते शेतकरी आहेत त्यांच्याकडे किमान 0.40 हेक्टर शेत जमीन असणे गरजेचे आहे व तसेच जे त्या ठिकाणी विहीर खोदणार आहे त्या विहिरीच्या 500 मीटर परिसरामध्ये जर कोणतीही वीर नसणे आवश्यक आहे.
असं करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्या वरती कोणतीही विहीर नसावी शेतकऱ्याकडे जमिनीचे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. सदर विहीर अनुदान चा लाभ एकत्रीपणे शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो.

या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हेच घेऊ शकणार आहेत. महाराष्ट्र सोडून इतर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही जे या महाराष्ट्रातील स्थानिक नागरिक आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे जे शेतकरी यासाठी अर्ज करणार आहेत त्यांची जिरायती शेतीची नोंद असणे आवश्यक आहे. या याबरोबरच अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये हाती असणे गरजेचे आहे या सर्व वरील पात्रता विषयीचे निकष शेतकऱ्यांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे तरच ते या योजनेसाठी योग्यरित्या पात्र होऊ शकतात.

Vihir Anudan Yojana मिळविण्यासाठी लागणारे आवश्यक ती कागदपत्रे

हे विहीर अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचे स्वतःचे आधार कार्ड कुटुंबाचे रेशन कार्ड, राहत असलेल्या गावचा रहिवासी दाखला, स्वतःचा मोबाईल नंबर, तसेच त्याचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला, सोबतच राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, जमिनीचे सर्व कागदपत्रे जसे की सात बारा उतारा तसेच आठ अ उतारा ही सर्व कागदपत्रे, तसेच शेतकऱ्याचे दोन फोटो आवश्यक आहे.

ज्या शेतकऱ्यांची सामायिक जमीन आहे, व ती 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असेल तर त्याचा पंचनामा करणे आवश्यक आहे व विहीर पाडल्यानंतर त्या सर्व सामायिक शेतकऱ्यांचे सामायिक पद्धतीने पाणी वापरण्याचे करारपत्र असणे आवश्यक आहे. तर अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनकळे वरील सर्व कागदपत्रे योग्य ती ओरिजनल कागदपत्रे असणे आवश्यक आहे ही कागदपत्रे तुम्हाला अर्ज करतेवेळी महत्त्वाची असणार आहे.

विहीर अनुदानासाठी अर्ज कशा पद्धतीने करावा

जे शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. त्यांनी त्यांच्या गावातील ग्रामसचिवालयामध्ये असणाऱ्या ग्रामसेवकांकडे या अर्जा संबंधित मागणी करावी व त्यांना तेथून या योजनेचा अर्ज मिळणार आहे किंवा गावच्या ग्रामपंचायत मध्ये हा अर्ज न मिळाल्यास ते शेतकरी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी या योजनेच्या संदर्भातील फॉर्म मिळवण्यासाठी जाऊ शकतात. हा अर्ज मिळाल्यानंतर त्यांनी तो योग्य प्रकारे भरून घ्यावा वरील सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून हा अर्ज व्यवस्थित रित्या पूर्ण करून तो योग्यरित्या सबमिट करणे आवश्यक आहे.

Vihir Anudan Yojana निष्कर्ष

विहीर अनुदान योजनेच्या अंतर्गत राज्यातील दुष्काळ जन्माला भागामध्ये सातत्याने पडणाऱ्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी झगडावे लागत आहे या गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन अंतर्गत विहीर अनुदान योजना राबवली गेली आहे यामध्ये शासनाकडून विहीर खोदकामासाठी रुपये चार लाख इतके शासकीय अनुदान शेतकऱ्यांना वितरित केले जाते याच्यामध्ये अजून ते त्यांची विहीर बांधून शेतात व्यवस्थितपणे सिंचन करू शकतील.


हे हि वाचा – पुढील 5 वर्ष रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य मिळणार । Free Ration Yojana 2024

हे हि वाचा – OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये शिष्यवृत्ती । असा अर्ज करा । Savitribai Phule Aadhaar Yojana


अश्याच प्रकारच्या सर्व शेतकरी हिताच्या योजनेची माहिती येथे देत असतो. जर तुम्हाला Vihir Anudan Yojana हि माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहचवा.

FAQ’s

1).विहीर अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कुठे करावा?

उत्तर- विहीर अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याने त्यांच्या गावातील ग्रामसचिवालयामध्ये असणाऱ्या ग्रामसेवक अधिकाऱ्याकडे अर्ज करावा

2). विहीर योजना पात्र होण्यासाठी शेतकऱ्यावर किती शेतजमीन असणे गरजेचे आहेत?

उत्तर- विहीर अनुदान योजना अर्ज करताना त्याच्याकडे 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.

3). विहीर अनुदान देण्याचा लाभ कोणास मिळू शकतो?

उत्तर- विहीर अनुदान योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेऊ शकतात.

4). विहिरीच्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यास कसे मिळतात?

उत्तर- विहीर अनुदानाचे पैसे शेतकऱ्यास तर त्याच्या बँक खात्यामध्ये मिळतात.

5). विहीर अनुदान योजनेचा लाभ घेते वेळेस शेतकऱ्यांना कोणते पात्रता पाळणे गरजेचे आहे?

उत्तर- शेतकऱ्याकडे जिरायती शेतीची नोंद असणे गरजेचे आहे तसेच त्याच्याकडे 0.40 हेक्टर एवढी शेतकऱ्याची आहे.

येथून शेअर करा

5 thoughts on “असा करा अर्ज, 4 लाख रुपये अनुदान मिळणार । Vihir Anudan Yojana 2024”

Leave a Comment