OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये शिष्यवृत्ती । असा अर्ज करा । Savitribai Phule Aadhaar Yojana

Savitribai Phule Aadhaar Yojana : आपल्या ओबीसी समाजातील होतकरू व गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी खूप आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत एक भक्कम अशी शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य सरकार देणार आहे महाराष्ट्र राज्य सरकार देणार आहे ओबीसी समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार ही शिष्यवृत्ती वरदान ठरणार आहे तर मित्रांनो या शिष्यवृत्तीबद्दल आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे माहिती घेऊयात.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दिनांक 19/10/2023 या तारखेला झालेल्या सर्व मंत्रिमंडळ बैठकीमध्ये समाजातील जे मागासवर्गीय वगळलेले जाती जमाती भटक्या जमाती तसेच इतर विशेष प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींकरता Savitribai Phule Aadhaar Yojana सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार शिष्यवृत्ती योजना

महाराष्ट्र राज्यातील जे बहुतांश प्रमाणात ओबीसी बांधव आहेत तसेच इतर जाती जमातीतील बांधव आहेत त्यांच्या आर्थिक कमतरतेमुळे त्यांच्या पाल्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक भविष्यासाठी ते व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाहीत कारण त्यांच्यापुढे आर्थिक अडचणींचा मोठा प्रश्न असतो. तसेच इतर सर्व समाजातील जे मागासवर्गीय घटक आहेत त्यांचीही सारखेच परिस्थिती असते.

त्यामुळे त्यांच्या पाल्यांचे भवितव्य हे धोक्यात येते तर हा प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग शासनाने या योजनेच्या माध्यमातून या सर्व समाजातील घटकांच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी करिता या Savitribai Phule Aadhaar Yojana योजनेअंतर्गत त्यांना शिष्यवृत्ती तसेच मोफत वसतिगृहे जे विद्यार्थी वस्तीगृहामध्ये प्रवेश घेऊन शिकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांना उदरनिर्वाह भत्ता तसेच स्वाधार व स्वयं यांसारख्या योजना त्यांना दिल्या जाणार आहेत.

या योजनेमध्ये ज्या भटक्या जमातीसाठी आहेत जे क वर्गामध्ये मोडतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना ही Savitribai Phule Aadhaar Yojana ही शिष्यवृत्ती लागू करण्यात आली आहे. यामध्ये पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना रुपये 60 हजार इतकी आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच या Savitribai Phule Aadhaar Yojana योजनेमध्ये एकूणच 21 हजार 600 विद्यार्थ्यांसाठी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यासाठी मराठी शासनाने मान्यता दिली आहे यामध्ये महत्त्वाचे असेही या योजनेमध्ये तसेच यश शिष्यवृत्तीसाठी मागास प्रवर्गातील प्रत्येक जिल्ह्यातील फक्त सहाशे विद्यार्थी पात्र असणार आहेत.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार शिष्यवृत्ती योजना या योजने मध्ये विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती देण्यात येणार

Savitribai Phule Aadhaar Yojana या योजनेमध्ये सर्व पात्र विद्यार्थ्यांना भोजनासाठी निवासासाठी व निर्वाहासाठी असे तीन प्रकारचे व ते त्यांना मिळणार आहेत तर ते भत्ते कोणत्या क्षेत्रामध्ये किती दिले जाणार होत असेच त्याची रक्कम तालुका जिल्हा व विभागीय ठिकाणी किती असणार आहे याबद्दलचे सर्व विस्तृत माहिती खालील प्रमाणे आहे.

यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यास हा अंदाजित खर्च 60000/- हजार रुपये इतका येणार आहे तर यामध्ये आपण पाहूयात जे विद्यार्थी शहरी भागांमध्ये आहेत जसे की मुंबई शहर, मुंबई उपनगर, किंवा ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी भोजन हप्ता हा रुपये 32000/- हजार इतका असणार आहे तसेच या शहरी ठिकाणी असणाऱ्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा निवासी खर्च हा 20000/- हजार रुपये इतका असणार आहे तसेच त्यांचा उदरनिर्वाह भत्ता हा रुपये 8000/- हजार इतका असणार आहे तर हे वरील सर्व भत्ते हे जे शहरी भागाच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार आहेत.


योजनेच्या आधिक माहितीसाठी MAHADBT पोर्टल

या ठिकाणी जे विद्यार्थी जी महानगरपालिका क्षेत्र आहे. तसेच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी क वर्ग प्रवर्गातील किंवा इतर महसूल विभागीय क्षेत्रातील जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत, त्या सर्वांसाठी या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत त्यांना भोजन भत्ता रुपये 28000/- हजार इतका मिळणार आहे तसेच त्यांचा निवास भत्ता रुपये 15000/- हजार इतका असणार आहे. तसेच त्यांचा निर्वाह भत्ता हा रुपये 8000/- हजार असणार आहे. तसेच यांना या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या एकूण प्रत्येक विद्यार्थ्यास अंदाजेच रुपये 51000/- हजार इतका प्रति विद्यार्थी खर्च येणार आहे

या सर्व प्रकरणातील जे विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत त्या सर्वांना या योजनेअंतर्गत भोजन भत्ता हा 25000/- हजार रुपये तसेच निवास भत्ता 12000/- हजार रुपये व उदरनिर्वाह भत्ता 6000/- हजार रुपये असे एकूण त्यांना 43000/- हजार रुपये हे त्यांना या शिष्यवृत्ती मध्ये देण्यात येणार आहेत.

जे विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत आहेत, यासारख्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची मिळणारी रक्कम ही भोजनासाठी 23000/- हजार रुपये निवासासाठी दहा हजार रुपये व निर्वाहासाठी 5000/- हजार रुपये असे एकंदरीत त्यांना रुपये 38000/- हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेमध्ये लागणारी आवश्यक ती पात्रता

जे विद्यार्थी या योजनेअंतर्गत शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी सर्व पात्रते विषय क निकष अत्यंत काटेकोरपणे पूर्ण करणे गरजेचे आहे यामध्ये जे मागासवर्गीय व इतर प्रवर्गातील जसे की वगळलेल्या भटक्या विमुक्त जाती जमाती अशा विशेष प्रवर्गामधील विद्यार्थ्यांकडे प्राधिकरणाने जे विशेष जात प्रमाणपत्र त्यांना दिलेले असते ते त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे.

तसेच जे विद्यार्थी यासाठी अर्ज करणार आहेत ते महाराष्ट्र शासनाचे मूळचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे जर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तो विद्यार्थी या ठिकाणी पात्र होणार नाही.

जे विद्यार्थी या योजनेसाठी लाभ घेणार आहेत ते जर अपंग असतील तर ते 40% पेक्षा जास्त अपंग आहेत याचा पुरावा त्यांना जिल्हा ठिकाणी असणाऱ्या शैल्य चिकित्सक यांच्याकडून तसे प्रमाणपत्र घेणे व ते सादर करणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Documents

जे मागासवर्गीय किंवा ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू इच्छित आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते खालील प्रमाणे,

  1. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड.
  2. जो विद्यार्थी ज्या कॅटेगरीज आहे त्या कॅटेगिरीचे जातीचे कास्ट प्रमाणपत्र.
  3. विद्यार्थ्याच्या पालकाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
  4. विद्यार्थ्यांचे व पालकाचे बँक खाते पासबुक.
  5. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची 10 वी व 12वी चे गुणपत्रक
  6. तसेच इतर कॉलेजची प्रवेश घेतेवेळी तसेच प्रवेश घेतल्यानंतर ची सर्व कागदपत्रे


चे विद्यार्थी या Savitribai Phule Aadhaar Yojana योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी ते सध्या ज्या ठिकाणी भाडेतत्त्वावरती राहत आहेत, तसेच ते त्या ठिकाणी कायमचे रहिवासी नसल्याची नोटरी सोबत शपथपत्र त्यांनी वकिलामार्फत तयार करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही जे सरकारी वस्तीगृह असणार आहेत, त्यांच्यासाठी हे शपथपत्र लागते या ठिकाणी ते स्वीकारले जाते. जे विद्यार्थी भाड्याने राहत आहेत त्यांना त्यांच्या भाडेकरार प्रत आवश्यक आहे. तसेच त्यांना त्यांच्या कॉलेजची प्रवेशाची जी असणारी कागदपत्रे आहेत.

ती सर्व कागदपत्रे जसे की त्यामध्ये तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत आहात त्या कॉलेजचा आयडी प्रूफ बोनाफाईट व तसेच इतर सर्व आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी लागणार आहेत. यामध्ये ते सर्व विद्यार्थी पात्र होणार नाहीत ज्यांनी या अगोदर कोणत्याही पदवी क्षेत्रासाठी या योजनेचा वापर केला आहे, ते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार नाही जे की सध्या दुसरी एखादी वेगळी पदवी अभ्यासक्रमामध्ये शिकत आहेत.

जो कोणी विद्यार्थी व विद्यार्थिनी या Savitribai Phule Aadhaar Yojana साठी अर्ज करणार आहे, त्या विद्यार्थ्यांनी आपली कॉलेजमध्ये असणारी दैनंदिन उपस्थिती ही किमान 75 टक्के उपस्थिती त्यांनी ठेवलेले असावे. जे कोणी विद्यार्थी या उपस्थिती 75 टक्के ठेवणार नाहीत अशा विद्यार्थ्यांवरती जे संबंधित सहाय्यक संचालक असतील ते या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे व त्याच्या नोंदणीची तपासणी व पडताळणी करतील.

योजनेसाठी अर्ज कसा करायचा व त्याची प्रक्रिया | How to apply Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

तर मित्रांनो या योजनेची घोषणा ही वर्ष 2023 मध्ये झाली होती परंतु सरकारने याबद्दलचे सविस्तर वृत्त अधिकृतपणे जाहीर केलेले नसून ते जाहीर केल्यानंतरच या योजनेसंदर्भात असणारे अर्ज हे उपलब्ध होतील या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या शिष्यवृत्ती संदर्भात अजून अर्ज कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती कुठेही उपलब्ध नाही.

ज्यावेळेस सरकार व मागासवर्गीय बहुजन समाज मंडळाकडून या योजनेची अधिकृतपणे अंमलबजावणी झाल्यानंतर त्या त्या बहुजन विकास मंडळाच्या कार्यालयामध्ये हे फॉर्म मिळू शकतात अद्याबाजूनी सविस्तर माहिती उपलब्ध नसल्यामुळे निश्चितपणे सांगता येणार नाही परंतु याबद्दलच्या सर्व अपडेट आम्ही वेळेच्या वेळी आपल्या ब्लॉग वरती टाकणार आहोत.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana निष्कर्ष

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत समाजातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना सरकारकडून स्कॉलरशिप दिली जाते यामध्ये सर्व ओबीसी व इतर जाती जमातीतील सर्व विद्यार्थ्यांना राहण्यासाठी खाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते यामध्ये प्रत्येक वर्षी 7000 रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते एकूण या योजनेमध्ये राज्यातील 21 हजार 600 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ओबीसी व इतर जाती जमातीतील विद्यार्थ्यांकडे उच्च शिक्षणासाठी पुरेशी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेणे कठीण जाते त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत या सर्व ओबीसी व इतर जाती जमातीतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.


अधिक वाचा – शिलाई व झेरॉक्स मशीन ह्या 100 टक्के अनुदानावर भेटणार । Silai Xerox Machine Scheme

अधिक वाचा – 30 वस्तूंचा मोफत भांडी संच, bandhakam kamgar yojana 2024


FAQ’s

1). ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना म्हणजे काय?
उत्तर-
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत ओबीसी व इतर मागासवर्गीय जाती जमातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती प्रदान केली जाते त्या योजनेस सावित्रीबाई फुले योजना असे म्हटले आहे.

2).सावित्रीबाई फुले योजनेसाठी कोणकोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात?
उत्तर-
सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील वी जयंती एसबीसी एससी तसेच ओबीसी समाजातील आर्थिक दृष्ट्या मागे असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

3). Savitribai Phule Aadhaar Yojana शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत किती शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाते?
उत्तर-
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रति वर्ष साठ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

4). सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत कोणकोणत्या गोष्टींना शिष्यवृत्ती दिली जाते?
उत्तर-
सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना राहण्यासाठी तसेच जेवणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.

5). सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज भरण्यासाठी पात्रता काय आहे?
उत्तर-
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावे तरच त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

10 thoughts on “OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये शिष्यवृत्ती । असा अर्ज करा । Savitribai Phule Aadhaar Yojana”

  1. १०वी , १२ वी . मध्ये टक्केवारीची मर्यादा आहे काय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top