Pradhan Mantri Fasal Bima Yojana In Marathi
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : प्रत्येक वर्षी भरपूर शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान हे होत असते त्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात, जसे की अवेळी येणारा पाऊस भटकी जनावरे किंवा जंगली जनावरे गारपीट वादळी वारे दुष्काळ तयांसारख्या नैसर्गिक व अनैसर्गिक प्रकारच्या पद्धतीने शेतीवर होणारे नुकसान या बाबी लक्षात घेऊनच महाराष्ट्र/केंद्र शासनाच्या अंतर्गत पिक विमा योजना ही सुरू केली गेली होती.
यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की पीक नुकसान झाल्यावर ती शेतकऱ्याने काय करावे त्यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रिया अर्ज हा कुठे करावा पीक नुकसान झाल्यावर ती ज्या कंपन्या आपल्याला पिक विमा हा पुरवत असाल त्यांच्यासोबत आपण कसा संपर्क साधायचा पिकाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया व त्याचा अहवाल ॲप द्वारे कसा नोंदवावा या संदर्भात आपणास आवश्यक ती कागदपत्रे पंचनामा व सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याचे शुल्क या सर्व बाबींवरती आपण विस्तृत पद्धतीने माहिती या लेखांमध्ये घेणार आहोत.
पिक विमा म्हणजे काय | Pradhan Mantri Fasal Bima Yojana
सर्वात प्रथम आपण केंद्र व महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या पिक विमा योजनेबद्दल माहिती घेऊयात या योजनेमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील शिवारातील पिकाचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई म्हणजेच पिक विमा देऊन त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत किंवा आर्थिक पाठबळ देणे हे प्रमुख महाराष्ट्र शासनाचे ध्येय आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकाचे उत्पन्न वाढवणे तसेच त्यांना येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असतील किंवा अनैसर्गिक आपत्ती असतील त्यांच्यापासून त्यांना संरक्षण देणे त्यांना आर्थिक पाठबळ देणे तर हा उद्देश या पिक विमा नुकसान भरपाई योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे यावरील सर्व बाबीस लक्षात घेऊन हा Pradhan Mantri Fasal Bima Yojana किंवा ही योजना केंद्र सरकार व राज्य शासनांतर्गत राबवली जात आहे.
पिक नुकसान का होते व पिक नुकसानीचे प्रकार कोणते
यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पिकाचे नुकसानीचे प्रकार असतात हे आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पिकाचे नुकसान होण्याची बरीचशी कारणे असतात जसे की जसे की आपणाला माहीतच आहे, शेतकऱ्याच्या शिवारात जे पीक असते त्यावरती बऱ्याच कारणास्तव म्हणजे नैसर्गिक अनैसर्गिक रित्या हे नुकसान होत असते तर त्या होणाऱ्या नुकसानापासून या पिकांना कशाप्रकारे सुरक्षित करता येईल हा या योजनेमागचा हेतू आहे.
तसेच या योजनेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या पिकांना हा पिक विमा मिळू शकतो. व कोणकोणती पिके यासाठी पात्र आहेत तसेच पिक विमा द्वारे संरक्षित पीक नुकसानीचे प्रकार देखील आहेत. यामध्ये आपण नुकसान होणाऱ्या पिकांचे प्रकार पाहणार आहोत प्रामुख्याने यामध्ये अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान, पीक काढण्या अगोदर होणारे नुकसान वन्यजीवांमुळे पिकांचे होणारे नुकसान तरी या पद्धतीचे पीक नुकसानाचे प्रकार आहेत
यामध्ये पाहूयात आपण की प्रत्येक प्रकारामध्ये भरपाई प्रक्रिया किती आहे तर यामध्ये जो काही अवकाळी पाऊस येतो त्यामध्ये जर पिकाचे नुकसान झाले तर त्या परिस्थितीमध्ये नुकसान भरपाईची प्रक्रिया कशी प्रकारे असू शकते? तर यामध्ये काही पिके आपण खाली प्रमाणामध्ये उदाहरणार्थ पाहूया यामध्ये गहू ज्वारी मका सोयाबीन या पद्धतीची तसेच इतर पिके तर या पिकांचे नुकसान हे अवकाळी पावसामध्ये बहुतांश प्रमाणात होते.
अधिक वाचा – पी एम सूर्य घर योजना या केंद्र सरकारच्या योजनेमुळे आता मिळणार मोफत वीज
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे किंवा तो खरेदी केला आहे ते त्यांच्या पिकांच्या नुकसानीची तक्रार त्या विमा कंपन्यांकडे करू शकतात व त्याबद्दल ते दावा देखील करू शकतात. यामध्ये Pradhan Mantri Fasal Bima Yojana व या योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेले शेतकरी क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन या मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर करून 72 तासांच्या आत मध्ये तुम्ही तुमच्या झालेल्या नुकसाना संदर्भात त्या ठिकाणी तुमचा अहवाल नोंदवू शकता व तक्रारही दाखल करू शकता.
तक्रार दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा एक आयडी प्राप्त होतो आणि ते त्यांनी केलेल्या नोंदणी अर्जाची स्थिती ऑनलाईन पाहू शकतात एकदा शेतकऱ्यांनी दावा दाखल केल्यानंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी असतात ते शेतावरती जाऊन झालेल्या पिकांचे सर्वोच्च करून एक रिपोर्ट तयार करतात आणि तो रिपोर्ट सबमिट केल्यानंतर नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करतात.
पिक विमा काढणी बचत झालेले नुकसान तर या प्रकारामध्ये नुकसान भरपाईची प्रक्रिया जाणून घेऊया तर यामध्ये शेतकऱ्यांच्या या शिवारातील पीक काढणीनंतर पिकांचे शेतामध्ये खळ करतो म्हणजेच एका ठिकाणी गोळा करतो कारण काही अशी पिके आहेत ती पिके काढल्यानंतर शेतामध्ये वाळवणी करण्यासाठी ठेवली जातात.
तर त्या कालावधीमध्ये शेतामध्ये नैसर्गिक आपत्ती म्हणजेच गारपीट चक्र वादळ अवकाळी पाऊस वादळी वारा यामुळे त्या पिकावरती नुकसान होते त्यामध्ये पीक काळे पडणे खराब होणे सडणे कुजणे असे ऊन पिकांचे पूर्णपणे नुकसान होते तर हे नुकसान झाल्यानंतर त्या ठिकाणी प्राथमिक स्तरावर ती पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक नुकसानाची भरपाई त्वरित मिळून जाते.

वन्यजीवांमुळे होणारे पिकांचे नुकसान व त्यांची नुकसान भरपाई प्रक्रिया कशी असते तर शेतकरी शेती करत असताना आपल्या पिकाची उत्तम प्रकारे काळजी घेत असतात, कारण त्यांची उपजीविका ही पूर्ण शेती वरती अवलंबून असते त्यांचे संपूर्ण घर हे त्या शेतीवरती चालत असते आणि त्यामध्ये पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्याची निगा अत्यंत चोख राखत असतो.
लागवडी ते पीक काढणीच्या दरम्यान रानावनामध्ये फिरणारे वन्यजीव म्हणजेच रानडुक्कर, हरिण,वनगाई, गवे इत्यादी प्राणी त्यांच्या शेतामध्ये घुसून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात तर या नुकसानीसाठी केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते, आणि प्रधान मंत्री पिक विमा योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करणे महत्त्वाचे असते असे केल्यामुळे त्यांना संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसान झालेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण करून त्याचा अर्ज करणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे त्या वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईची भरपाई किती देण्यात येणार हे सरकार ठरवते.
शिवारात पिकांचे नुकसान झाल्याचे जवळील वनविभागाच्या वनरक्षकास किंवा वनपालास किंवा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे 72 तासांच्या आत म्हणजेच तीन दिवसांच्या आत मध्ये नुकसानाची तक्रार नोंदवायची आहे.शिवारातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर गावचे सरपंच ग्रामसेवक तलाठी यांना समितीमार्फत येत्या दहा दिवसाच्या आत मध्ये नुकसानांची तक्रार करावी.
शेतकरी पिक नुकसानाची माहिती कशी व कोणाला कळवणार
केंद्र सरकार अंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना/Pradhan Mantri Fasal Bima Yojana यामध्ये पात्र असलेले शेतकरी त्यांनी पीक नुकसानाची माहिती आपल्या जवळील मोबाईल ॲप द्वारे किंवा केंद्र सरकारने दिलेल्या टोल फ्री नंबर 1800 419 5004 वर कॉल करून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाची तक्रार पिक विमा कंपनीला तीन दिवसांच्या आत मध्ये म्हणजेच 72 तासांच्या आत करू शकता त्याचप्रमाणे पीक नुकसानीचा लेखी फॉर्म सादर करून बँकेमध्ये किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देऊ शकता केंद्र सरकारच्या या पिक विमा योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी द्यावी. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये नुकसान ज्यावेळी दिवशी झाले त्या दिवशीची तारीख वेळ नुकसान झालेली रक्कम तसेच सर्वे नंबर पिक विमा कंपनी पिक विमा यांचा समावेश असावा.
पिक विमा देणाऱ्या कंपन्यांसोबत संपर्क कशाप्रकारे साधावा
तर शेतकरी बंधूंनो जर तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही Pradhan Mantri Fasal Bima Yojana या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा विमा कंपनीशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला पीएम फसल विमा योजना या त्यांच्या अधिकृत वेबसाईट द्वारे विमा कंपनीशी कशाप्रकारे संपर्क साधवयाचा याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. सर्वप्रथम या ठिकाणी दिलेल्या पंतप्रधान पिक विमा योजना या वेबसाईट च्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला वेबसाईट ओपन करायची आहे.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana – अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या वेबसाईटचे पेज उघडल्यानंतर खालील प्रमाणे काही माहिती भरावी लागेल
- तुम्हाला तिथे हंगाम पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे त्यानंतर तेथे तुम्हाला हंगामांची निवड करायची आहे, त्यामध्ये तुम्ही रब्बी किंवा खरीप पिक तुमच्या सोयीनुसार निवड करा.
- त्यानंतर दुसऱ्या नंबरच्या पर्यायावर ती वर्ष दिसेल त्यावरती क्लिक करून तुमच्या पिकाचे वर्ष निवडू शकता.
- त्यानंतर तेथे प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजना यांसारखे दोन पर्याय त्या ठिकाणी दिसतील त्यातील एक निवडावा.
- पर्याय निवडल्यावर ती खाली चार नंबरच्या पर्यावरती क्लिक करून आपले महाराष्ट्र राज्य निवडावे. त्यानंतर आपण राहत असलेला जिल्हा निवडावा त्यानंतर आपले तहसील कार्यालय म्हणजेच आपला तालुका निवडावा त्यानंतर आपल्या गावाची वगैरे माहिती पिन कोड हे त्या ठिकाणी भरून घ्यावे ही सर्व माहिती त्या ठिकाणी व्यवस्थित रित्या भरून झाल्यानंतर खाली दिलेल्या सर्च बटनावरती तुम्ही क्लिक करा.
- त्या ठिकाणी सर्च ची प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला खालच्या पानावरती शेतकऱ्याचे नाव मोबाईल नंबर पिक विमा कंपनीचा असणारा जिल्हा आणि तालुक्याची वेबसाईट दिसेल त्या ठिकाणी तुम्ही पिक विमा कंपनीशी संपर्क करू शकता आणि तुमच्या पिक नुकसाना बाबतची माहिती देऊ शकता.
- तर वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस करून पिक विमा कंपनीशी संपर्क करू शकता.
मोबाईल एप्लीकेशन द्वारे पीक नुकसानाची माहिती कशी द्याल
तर या ठिकाणी मित्रांनो तुमच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यानंतर त्याची तक्रार तुम्हाला करण्यासाठी तुमच्या मोबाईल वरील प्ले स्टोअर मधून क्रॉप इन्शुरन्स ॲप व्यवस्थित रित्या तुमच्या मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे ॲप उघडल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाईप करायचा आहे. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तो मोबाईल नंबर तुम्ही पिक विमा योजनेचा अर्ज करताना दिला होता तोच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही टाईप करून या ॲप वरती तुमच्या पिकाच्या नुकसानीची योग्यरीत्या तक्रार करू शकता.
विमा कंपन्याचे प्रतिनिधी शुल्क किती घेतात का ?
तर या ठिकाणी मित्रांनो जो काही तुमच्या शेतावर पाहणी करता येणारा विमा कंपनीचा प्रतिनिधी असेल तो शेतावरती येऊन तुमच्या पिकाची व्यवस्थित रित्या पहाणी करेल आणि महत्त्वाचं म्हणजे की त्या प्रतिनिधीला कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाह. जर असे काही झाल्यास तुम्ही त्वरित टोल फ्री नंबर 18004195004 वरती कॉल करून त्या प्रतिनिधी बद्दल माहिती सांगू शकता. तसेच त्या कंपनीशी तुम्ही [email protected] या ईमेल द्वारे संपर्क करू शकता.
त्या किंवा पिक विमा कंपन्यांच्या ज्या जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ऑफिसला तुम्ही संपर्क करू शकता, व त्या प्रतिनिधी बद्दल माहिती देऊ शकता आणि लक्षात ठेवा पिक पाहणी करण्यासाठी येणारा अधिकारी हा किंवा प्रतिनिधी हा कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही त्यामुळे तुम्हीही कोणत्या प्रकारचे शुल्क त्यांना देऊ नका असे काही झाल्यास तुम्ही डायरेक्ट कंपनी कार्यालयाशी संपर्क करू शकता किंवा वरील दिलेल्या टोल फ्री नंबर किंवा ईमेल वरती संपर्क करू शकता.
पिकची नुकसानी का होत याबद्दल थोडीशी माहिती घेऊया
शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये पीक घेतो तर त्या ठिकाणी त्यावेळेस जे काही हवामान व वातावरणाच्या बदलानुसार काही नैसर्गिक आपत्ती या पिकावर ती मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव करतात त्यामुळे पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये बाधा पोचते व पीक हे खराब होऊन जाते किंवा त्या पिकाचा काहीही उपयोग राहत नाही. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किडी असतील किंवा नैसर्गिक संकट असे वादळी वारे गारपीट अवकाळी पाऊस यांसारख्या परिस्थितीमध्ये पिकांचे हे अतोनात प्रमाणात नुकसान होते, व शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक हानी सोसावी लागते तरीही आर्थिक हानी होताना शेतकऱ्याचे प्रचंड हाल होतात. तयालाच मोठ्या प्रमाणामध्ये होणारी पिकांची नुकसानी असेही म्हटले जाते यामुळे बळीराजाचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान होते.
अधिक वाचा – विहीर खोदण्यासाठी आता 4 लाख रुपये अनुदान । Vihir Anudan Yojana 2024
अधिक वाचा – 75 हजार अनुदान, मागेल त्याला शेततळे योजना 2024 | Shetatale Anudan Yojana
तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा या माहितीचा तुम्हाला फायदा होत असेल तर ही माहिती तुम्ही तुमच्या शेतकरी मित्र परिवारामध्ये सोशल मीडियाद्वारे शेअर करू शकता व त्यांनाही या माहितीचा लाभ घेण्यासाठी सांगू शकता आम्ही अशाच प्रकारची नवीन नवीन शेतकरी योजना व शेतकरी आम्ही अशाच प्रकारची नवीन नवीन शेतकरी योजना व शेतीविषयक तसेच सरकारी योजना विषयक माहिती या ठिकाणी पोस्ट करत असतो त्यामुळे आमचा बळीराजास सरकारकडून येणाऱ्या योग्य योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू असतो.
FAQ’s
1). पीक विमा योजना म्हणजे काय ?
उत्तर – पीक विमा म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीपासून होणारे नुकसान टाळणे.
2). शेतकऱ्यास पीक विमा हेक्टरी किती मिळतो ?
उत्तर – शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास त्यांना हेक्टरी 57,760 रुपये मिळतो.
3). प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो ?
उत्तर – सर्व शेतकरी ज्यांच्या कडे त्यांची स्व मालकीची जमीन आहे.
4). पीक विम्यात कोण कोणती पिके समाविष्ट आहेत ?
उत्तर – ज्वारी, मका, गहू , मका , कांदा , तूर, मूग , भात, कापूस व सर्व फळबागा यांसाठी पीकविमा लागू होतो.
5). पीक विमा काढणे का गरजेचे आहे ?
उत्तर – नैसर्गिक धोक्यांपासून जसे कि गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीटक व रोगांची साथ , हवामनातील बदल यांच्या पासून पिकाचे संरक्षण करणे या द्वारे शेतकऱ्यांना आर्थिक रक्कम होते.