Free Ration Yojana 2024: महाराष्ट्र राज्यातील रेशन धारक नागरिकांसाठी एक खुशखबर आहे देशामध्ये येणाऱ्या पुढील काळात पाच वर्षासाठी राशन मोफत मिळणार आहे. जे नागरिक दारिद्र रेषेखालील आहेत म्हणजेच त्यांच्याकडे रेशन कार्ड उपलब्ध आहे ते कोणत्याही प्रकारचा असले तरी चालेल म्हणजेच की त्यामध्ये केशरी पिवळे यांसारखे रेशन कार्ड असते या सर्व रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने येत्या पुढील पाच वर्षाच्या काळामध्ये नागरिकांकरिता मोफत रेशन देण्याचे आयोजन केले आहे.
यामध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून रेशन कार्ड धारक नागरिकांना मोफत रेशन सुविधा देण्यात येणार आहे. देशामध्ये निवडणुकीचे वातावरण रंग धरू लागले आहे. पूर्ण देशभरातील निवडणुका ह्या एकूण सात टप्प्यांमध्ये घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे नवं नवीन योजनांचा वर्षाव हा नागरिकांवर होणार आहे.
यामध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा हा सत्तेतला दुसरा पंचवार्षिक कालावधी पूर्ण होत असून केंद्र सरकारने या निवडणुकीचा व पुढील बाबी लक्षात घेऊन त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या हिताच्या योजना देशांमध्ये सुरू केले आहेत, ज्यामध्ये असंख्य अशा नागरिकांना व देशातील सर्व रहिवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे त्यामधीलच ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी सरकार हे मोफत अन्न पुरवणार आहे.

आगामी काळामध्ये देशातील 81 कोटी लोकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे यातील या सर्व 81 कोटी लोकांना येणाऱ्या 2018 या वर्षापर्यंत मोफत अन्नधान्य या योजनेअंतर्गत मिळणार आहे. मागील वर्षी म्हणजेच नोव्हेंबर 2023 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला केंद्र सरकारने अजून जास्त काळ ठेवण्याची व नागरिकांना फायदा देण्याचे मान्य केले होते या योजनेसाठी लागणारा 11.8 लाख कोटी रुपये इतका खर्च हा सर्व सरकार द्वारे केला जाणार आहे.
मोफत रेशन या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात देशातील गरीब जनतेला येणाऱ्या पुढील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अन्नधान्य आहे रेशन कार्डद्वारे मुबलक प्रमाणात तसेच मोफत मिळणार असून याचा लाभ त्यांना घेता येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मध्ये बहुतांशदा जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्यामुळेही या योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांना या योजनेअंतर्गत अन्नधान्य मिळण्यास व त्यांचे दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यास या योजनेचा फायदा होणार आहे.
या योजनेबद्दल थोडक्यात माहिती | Free Ration Yojana 2024
आपल्या भारत देशामध्ये गरिबीचे प्रमाण हे जास्त असल्यामुळे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार हे नेहमीच गोरगरीब लोकांसाठी महत्त्वकांशी व त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ते सुक्कर होण्यासाठी व त्यांची प्रगती होण्यासाठी नवीन नवीन योजना आणत असते त्यातलीच म्हणजे ही एक योजना या योजनेअंतर्गत देशातील 81 कोटी गरजू व गरीब लोकांना फ्री Ration Yojana या योजनेअंतर्गत जीवन जगण्यासाठी हातभार लागणार आहे.
या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना या योजनेचा कार्यकाल हा 1 जानेवारी 2024 पासून येणाऱ्या पुढील पाच वर्षांत करिता विस्तारित करण्यात आला आहे म्हणजेच वाढवण्यात आला आहे भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याद्वारे मंगळवारी घेतल्या गेलेल्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात या योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे असे केंद्राचे आरोग्य मंत्री आदरणीय अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी याबद्दल सविस्तर सांगितले.
फ्री Ration Yojana या योजनेद्वारे जे गरीब व गरजू देशातील नागरिक आहेत व त्यांच्याकडे रेशन कार्ड असल्यास त्यांना महिन्याला पाच किलो तांदूळ हे विना पैसे घेता मोफत वाटप केले जातात. कोरोना काळामध्ये ज्या नागरिकांना व गरजू लोकांना त्यांच्या आर्थिक जीवनावरती मोठा परिणाम झाला होता.
अशा लोकांना एक मदतीचा हात म्हणून ही योजना केंद्र सरकारने त्यावेळेस राबवली होती तर तीच योजना येणाऱ्या पुढील पाच वर्षासाठी आहे तशीच ठेवण्यात येणार आहे याबद्दलचे सविस्तर माहिती ही अलीकडे झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती यामध्ये त्यांनी सांगितले होते की ही योजना येत्या पुढील पाच वर्षा च्या कालावधीपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर 2028 पर्यंत त्या मोफत रेशन योजनेचा कार्यकाल वाढवण्यात आला आहे.
हे मोफत रेशन योजना कोणासाठी असणार आहे व त्याची पात्रता काय असणार
सर्वप्रथम या योजनेचा लाभ हा त्याच कुटुंबाला मिळणार आहे. त्यांच्याकडे अत्योदय अन्न योजना आणि तसेच प्राधान्य घरगुती श्रेणी या अंतर्गत येणाऱ्या सर्व गोरगरीब व गरजू कुटुंबे या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी ज्या घालून दिलेल्या निकषांवर आधारित जे काही सर्व कुटुंबे असतील ती या योजनेसाठी निश्चित करता येतील तसेच राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ची कुटुंबे असणार आहेत त्यांनाही केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या निकषांच्या आधारे त्यांनाही निश्चित करून त्याही सर्व कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनेमध्ये जे तुम्ही दुवा अपंग व्यक्ती आजारी व्यक्ती किंवा ज्यांचे वय साठ वर्ष व त्यापेक्षा हून अधिक आहे ज्या नागरिकांकडे सुरक्षित किंवा स्थिर असा कोणत्याही प्रकारचा उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध नाही किंवा त्यांना कोणताही व्यक्तिगत व सामाजिक आजार नाही अशा सर्व कुटुंबांचा फ्री रेशन स्किम योजनेमध्ये सहभाग व समावेश असणार आहे तसेच यानंतर ज्यामध्ये जे गरजू गरीब अपंग व्यक्ती किंवा साठ वर्षाच्या पेक्षा जास्त असणारे अविवाहित महिला पुरुष ज्या कुटुंबांना सामाजिक आधार नाहीये व त्यांच्याकडे असा कोणताही भक्कम आधार नाही या प्रकारच्या सर्व कुटुंब व व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
महाराष्ट्र शासन योजनांसाठी इथे फॉर्म भरा – Website
तसेच जे कुटुंब शेतामध्ये काम करतात किंवा मजुरी करता ज्यांच्याकडे अल्पभूधारक आहेत तसेच ज्यामध्ये समाजाचे वेगवेगळे घटक आहेत जसे की कुंभार लोहार सुतार काम करणारे गवंडी दुसऱ्याच्या शेतामध्ये मोल मजुरी करणारे तसेच हमाल रिक्षा चालक ज्यांच्या हातावर पोट आहे असे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील कामगारांना तसेच छोटे-मोठे रस्त्याच्या कडेला उदरनिर्वाहासाठी उद्योगधंदे करणारे लोक या सर्वांना Free Ration Yojana या योजनेचा लाभ होणार आहे.
Free Ration Yojana या योजनेअंतर्गत नागरिकांसाठी कोणत्या गोष्टी मोफत मिळणार
या योजनेअंतर्गत जे कोणी नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यांनागरिकांना प्रत्येक महिन्याला मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे ज्याप्रकारे कोरोना काळामध्ये सुरुवातीच्या काळात दुकाने तीन महिन्यासाठी बंद असताना नागरिकांना हे अन्न पुरवण्याची योजना सुरू करण्यात आली होती. त्या योजना अंतर्गतच हे मोफत अन्नधान्य सर्व गरजू वगैरे कुटुंबांना देण्यात येणार आहे.
यामध्ये पाच किलो तांदूळ तसेच पाच किलो गहू तसेच डाळी व इतर काही गोष्टी हे सर्व विनाशुल्क पद्धतीने सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांना देण्यात येणार आहे जे कोणी ग्राहक या जे कोणी रेशन कार्ड धारक या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत त्यांनी त्यांच्या जवळच्या रास्त धान्य दुकानांमध्ये म्हणजेच राशन दुकान मध्ये जाऊन त्यांचा राशन कार्ड क्रमांक आधार कार्ड हे सर्व माहिती रेशन कार्ड दुकानदाराला द्यावी तसेच त्यांचे आधार कार्ड द्वारे पडताळणी करून त्या ठिकाणी केली जाणार आहे.
या योजनेचा लाभ कसा घ्यावा | Free Ration Yojana 2024
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकाकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. कारण रेशन कार्ड असेल तरच या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे त्यांच्याकडे रेशन कार्ड नसल्यास ते त्यांच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या अन्न विभाग कार्यालयांमध्ये संपर्क साधून हे कार्ड तयार करून घ्यावे लागेल या विज्ञान अंतर्गत शासन गोरगरीब नागरिकांसाठी अन्नसुरक्षा मदत देते.
तुम्हाला राशन घेण्यासाठी तुमच्या गावच्या किंवा तुम्ही राहत असणारे ठिकाणी जे रेशन दुकान आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचे रेशन घ्यावयाचे आहे ही योजना गोरगरीब गरजू लोकांना अन्नधान्य मोफत पुरवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने 2020 मध्ये कोरोना काळामध्ये सुरू केली गेली होती. या योजनेचा समावेश हा अन्नसुरक्षा कायदा यामध्ये करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.
भारताच्या बहुतांश ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गरजू व गरीब लोक राहतात. तसेच त्याचे प्रमाण पाहता शहरी भावाच्या तुलनेमध्ये कमी आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये 75 टक्के व शहरी भागामध्ये 50 टक्के रेशन कार्ड धारक असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे.
Free Ration Yojana निष्कर्ष
केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या काळात जनसामान्यांसाठी मोफत रेशन देण्यात येत होते. परंतु आत्ता याची मर्यादा केंद्र सरकारने पुढील पाच वर्षांसाठी वाढवली आहे यामध्ये नागरिकांना डाळ, गहू, तेल, तांदूळ यांसारखे सर्व रेशन हे 2028 पर्यंत मोफत मिळणार आहे. यामध्ये पिवळ्या रंगाच्या तसेच केसरी रंगाच्या रेशन कार्ड धारकांना या मोफत रेशन योजनेचा लाभ घेता येईल. तसेच ज्या कुटुंबामध्ये अपंग व्यक्ती किंवा एखादा आजारी व्यक्ती असेल व त्यांच्या कुटुंबांमध्ये कोणत्याही प्रकारचा उत्पन्नाचे स्त्रोत नसतील किंवा ज्या व्यक्तींचे वय वर्ष हे साठ वर्षाच्या पुढे आहे अशा सर्व नागरिकांना या योजनेच्या मार्फत मोफत रेशन देण्यात येणार आहे.
अधिक वाचा – OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये शिष्यवृत्ती । असा अर्ज करा । Savitribai Phule Aadhaar Yojana
अधिक वाचा – शिलाई व झेरॉक्स मशीन ह्या 100 टक्के अनुदानावर भेटणार । Silai Xerox Machine Scheme
FAQ’s
1). मोफत रेशन योजनेअंतर्गत किती वर्षांपर्यंत मोफत रेशन मिळेल?
उत्तर- Free रेशन Yojana मधून पुढील पाच वर्ष म्हणजेच 2018 पर्यंत रेशन मोफत मिळणार आहे.
2). मोफत रेशन योजनेच्या माध्यमातून कोण कोणती धान्य नागरिकांना मिळणार आहेत?
उत्तर- मोफत रेशन योजनेतून नागरिकांना गहू, डाळी,तेल, तांदूळ यांसारखे धान्य व इतर सामग्री नागरिकांना मोफत मिळणार आहे.
3). कोणत्या रेशन कार्ड धारकांना हे मोफत राशन मिळणार आहे?
उत्तर- पिवळ्या रंगाच्या तसेच केसरी रंगाच्या रेशन कार्ड धारकांना हे मोफत रेशन योजनेत मधून राशन मिळणार आहे.
4). राज्यातील कोणत्या नागरिकांना या मोफत रेशन योजने मधून राशन मिळणार आहे?
उत्तर- फ्री Ration Yojana अंतर्गत ज्याच्या कडे पिवळे व केशरी रंगाचे रेशन कार्ड आहे तसेच जे व्यक्ती दिव्यांग आहेत किंवा ज्यांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे व त्यांच्याकडे कोणताही उत्पन्नाचा स्रोत नाही अशा सर्व नागरिकांना मोफत रेशन मिळणार आहे.
5). मोफत रेशन योजनेचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे?
उत्तर- मोफत रेशन योजनेचा मुख्य फायदा हा समाजातील गोरगरीब नागरिकांना अपंग व्यक्तींना ज्यांच्याकडे कोणताही उत्पादनाचा पर्याय उपलब्ध नाही अशा कुटुंबांना वयोवृद्ध असणारे नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे.