Silai Xerox Machine: आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा परिषद तसेच समाज कल्याण विभागाच्या तर्फे शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन यावरती 100% अनुदान देण्यात येत आहे. तर चालू वर्षी म्हणजेच 2024 या वर्षामध्ये या योजनेची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे ही योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येते यामध्ये जे पात्र होणारे नागरिक असतील.
त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणारे झेरॉक्स मशीन व कपडे शिलाई मशीन याच्यावरती शंभर टक्के अनुदान म्हणजेच मोफत मिळणार आहेत. राज्य म्हणजे दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यांना नवनवीन व्यवसायाच्या संधी तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत प्रत्येक वर्षी लाभार्थी नागरिकांसाठी शंभर टक्के अनुदानावरती ह्या झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन नागरिकांना देण्यात येते.
या योजनेअंतर्गत जे पात्र होणारे नागरिक असतील त्यांना या शिलाई व झेरॉक्स मशीनच्या द्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद यांसारखी उपक्रम राबवत असते यामध्ये ते या मिळणाऱ्या उपकरणांचा म्हणजेच शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चा उपयोग करून ते त्यांचा स्वतःचा नवीन असा व्यवसाय सुरू करू शकतात. या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे हाच की बेरोजगार नागरिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे आहे व त्यांना आर्थिक पाठबळ तसेच मदतीचा हात देणे हा आहे तर महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागातर्फे ही योजना अमलात आणली जाते.

शिलाई Xerox Machine Scheme या योजनेचा ज्या ज्या व्यक्तींना लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीने लवकरात लवकर या योजनेचा अर्ज भरून तो अर्ज जिल्हा परिषद बालकल्याण विभागाकडे सबमिट करावा. यामध्ये या योजनेची शेवटची तारीख की 31 मार्च 2024 इथपर्यंत आहे या तारखेपर्यंत जे कोणी इच्छुक आगरी असतील त्यांनी या मशीन मिळवण्यासाठी व्यवस्थितरित्या अर्ज करणे गरजेचे आहे.
त्यांनी त्यांचे अर्ज व्यवस्थित कागदपत्रे व इतर सर्व बाबी आणि लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करून हा अर्ज योग्य त्या ठिकाणी म्हणजे समाज कल्याण व जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी देणे महत्त्वाचे आहे त्यानंतरच सर्व प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर या योजनेचा लाभ त्यांना घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी MAHADBT वेबसाइट ला भेट दया
शिलाई व झेरॉक्स मशीन योजना जालना जिल्ह्याच्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे समाजातील मागासवर्गीय तसेच अपंग असणाऱ्या नागरिकांसाठी यांसारख्या विविध कल्याणकारी योजना ह्या राबवण्यात येत आहेत याच अंतर्गत त्यामधीलच ही योजना म्हणजे झेरॉक्स व शिलाई मशीन साठी ते शंभर टक्के अनुदानावरती पात्र नागरिकांना त्यांचे डॉक्युमेंट कम्प्लीट असल्यानंतर व ते पात्र असल्यानंतर त्यांना देण्यात येतात.
ज्या कोणी नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी अंतिम अर्ज करण्याची दिनांक ही 31 मार्च 2024 ही आहे तर या योजनेत लाभ घेण्यासाठी त्यांनी या तारखेच्या आत मध्येच त्यांच्या लागणाऱ्या विशिष्ट कागदपत्रांसोबत या योजनेचा अर्ज भरणे गरजेचे आहे या तारखेनंतर त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण कागदपत्रे सोबत ठेवून अर्ज करावा
Silai Xerox Machine योजनेसाठी लागणारे पात्रता व निकष
आपल्या समाजामध्ये असणारे ही मागासवर्गीय नागरिक असतील किंवा दिव्यांग म्हणजेच अपंग असतील असे सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागातर्फे या मिळणाऱ्या झेरॉक्स व शिलाई मशीन यावरती 100% अनुदान घेण्यासाठी Silai Xerox Machine Scheme या योजनेसाठी जे ठराविक पात्रतेचे निकष ठरवले आहेत. त्याची पूर्तता करणे नागरिकांनी आवश्यक आहे जे कोणी नागरिक या योजनेचा सर्व निकष पात्रता योग्यरित्या पूर्ण करतील अशांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे.
तुम्ही जो अर्ज करणार आहे त्यामध्ये तुमची योग्य ती प्रमाणपत्रे कागदपत्रे दाखले असणे गरजेचे आहे यामध्ये काही कृपया आढळल्यास त्या अर्जदार नागरिकास या योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही किंवा पात्र ठरवले जाणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना फक्त आणि फक्त समाजातील मागासवर्गीय घटक तसेच अपंग दिव्यांग व्यक्तींसाठी असणार आहे अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 60 या दरम्यान असणे गरजेचे आहे.
या योजनेत पात्र होण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त एक लाख असावे एक लाखाच्या वरील उत्पन्न असणाऱ्यांना ही योजना लागू होणार नाही एक लाखाच्या आत मध्येच असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच यामध्ये तो अर्ज करणारा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. समाजातील मागासवर्गीय घटकांना त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी ही योजना जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागामार्फत आयोजित केली जाते.
Silai Xerox Machine Scheme साठी लागणारी कागदपत्रे
जे नागरिक शिलाई व झेरॉक्स मशीन योजना या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांना कोणकोणती कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहेत हे खालील प्रमाणे दिले आहे.
- अर्ज करणाऱ्या नागरिकाचा जातीचा दाखला.
- दिव्यांग व अपंग असल्याचे प्रमाणपत्र.
- अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅनकार्ड.
- रहिवासी दाखला.
- गावातील ग्रामसभेचा ठराव.
- अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला.
- तसेच इतर लागणारी आवश्यक कागदपत्रे.
तर वरील ही सर्व कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणार आहेत. यातील सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेसाठी योग्य पद्धतीने अर्ज करू शकता, यातील कोणतेही एक कागदपत्रं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू नाही शकणार व तुम्ही या योजनेत अपात्र ठरणार त्यामुळे नागरिकांनी वरील सर्व कागदपत्रे व त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेसाठी व्यवस्थित रित्या अर्ज करू शकाल.
झेरॉक्स व शिलाई मशीन साठी किती टक्के अनुदान मिळणार आहे?
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत व समाज कल्याण विभागातर्फे Silai Xerox Machine Scheme या योजनेसाठी 100% म्हणजेच संपूर्ण अनुदान या दोन्ही मशीन खरेदी करण्यासाठी मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला शंभरच्या शंभर टक्के हे अनुदान दिले जाणार आहे 100% म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क देणे गरजेचे नाही.
झेरॉक्स व शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज हा कुठे आणि कसा करावा । How to apply for Silai Xerox Machine Scheme
सर्वप्रथम या योजनेसाठी लागणारा जो अर्ज आहे, तो तुम्हाला तुमच्या जवळच्या ठिकाणी असणाऱ्या समाज कल्याण विभागांमध्ये मिळेल.या ठिकाणाहून अर्ज घेऊन तुम्ही तो अर्ज व्यवस्थित रित्या भरून व त्यासोबत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसोबत दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत या अंतिम तारखेच्या अगोदर हे अर्ज जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे.
तर तुम्ही Silai Xerox Machine Scheme या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही या उपक्रमांचा वापर करून एक व्यवसाय सुरू करू शकता व त्यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून तुम्ही तुमचे भविष्य सुखकर करण्यासाठी करू शकता हाच मुख्य उद्देश या योजने पाठीमागचा आहे.
Silai Xerox Machine योजना निष्कर्ष
शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन साठी महाराष्ट्र शासना अंतर्गत जिल्हा परिषदांच्या द्वारे अनुसूचित जाती जमाती व तसेच मागासवर्गीय कुटुंबातील नागरिकांना शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन शंभर टक्के अनुदानावरती दिली जाते त्याच्या माध्यमातून ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये उदरनिर्वाह करू शकतात. शिलाई व झेरॉक्स मशीनच्या माध्यमातून ते नागरिक स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्याच्यावरती चांगला नफा कमवू शकतात व तसेच त्यांना या व्यवसायामध्ये मिळणाऱ्या नफ्यातून त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट बनवू शकतात.
अधिक वाचा – आता फक्त 1200 रुपये भरा आणि कुठेही मनसोक्त फिरा , MSRTC Holidays Pass Scheme
अधिक वाचा – 75 हजार अनुदान, मागेल त्याला शेततळे योजना 2024 | Shetatale Anudan Yojana
अधिक वाचा – आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये, मुख्यमंत्री वयोश्री योजना
ही सर्व उपयोगाची माहिती तुम्ही तुमच्या परिचयातील सर्व मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून तुमच्या सोबत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
FAQ’s
1). शिलाई व झेरॉक्स मशीन किती टक्के अनुदानावरती मिळते?
उत्तर- शिलाई व झेरॉक्स मशीन हे जिल्हा परिषदांच्या माध्यमातून नागरिकांना शंभर टक्के अनुदानावरती मिळते.
2). शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन साठी पैसे भरावे लागतात का?
उत्तर- नाही शिलाई मशीन वर झेरॉक्स मशीन अनुदान मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा शुल्क घेतली जात नाही.
3). समाजातील कोणत्या नागरिकांना या शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन अनुदानाचा फायदा होतो
उत्तर- समाजातील मागासवर्गीय नागरिक तसेच दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना या योजने अंतर्गत शिलाई मशीन मिळते.
4). शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन अनुदान मिळवण्यासाठी नागरिकांचे वार्षिक उत्पन्न किती असावे?
उत्तर- शिलाई मशीन वर झेरॉक्स मशीन मिळवण्यासाठी नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखाच्या आतील असावे.
5). शिलाई मशीन वर झेरॉक्स मशीन योजनेचा अर्ज भरण्यासाठी नागरिकाचे वय किती असावे?
उत्तर- शिलाई मशीन झेरॉक्स मशीन चा घेण्याचा अर्ज भरण्यासाठी नागरिकाचे वय हे 18 ते 60 या दरम्यान असावे.
6). झेरॉक्स मशीन वर शिलाई मशीन अनुदान मिळवण्यासाठी कोठे अर्ज करावा?
उत्तर- झेरॉक्स व शिलाई मशीन मिळवण्यासाठी तुमच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये अर्ज करावा.