आधार कार्डच्या माध्यामातून 50 हजारचं बिनव्याजी कर्ज मिळणार | PM Svanidhi Yojana 2024-25

PM Svanidhi Yojana Maharashtra 2024: भारताची अर्थ व्यवस्था हि जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहेत. पाठीमागच्या 10 ते 15 वर्षात भारतात वाढणारी अर्थव्यवस्था आहे देशात असणाऱ्या उद्योजकांवरती अवलंबून आहे. पाठीमागील काही वर्षातच 15 नंबरला असणारी आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था आहे. आता 2024 मध्ये पहिल्या पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या देशामध्ये वाढणारे उद्योगधंदे आहेत त्याचबरोबर त्यामध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिकांचाही मोठ्या प्रमाणामध्ये वाटा असतो.

भारताच्या अर्थव्यवस्थेला उंचीवर नेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील जे नागरिक छोटा मोठा व्यवसाय करतात त्यांचे खूप मोलाचं योगदान या अर्थव्यवस्थेला उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी होत आहे. तर या गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या स्वनिधी योजनेच्या माध्यमातून भारतात असणाऱ्या छोट्या छोट्या उद्योग धंद्यांना बळकट करणे व त्यांच्या वाढीसाठी सरकारकडून आर्थिक मदत ही कसल्याही व्याजाशिवाय उद्योग करणाऱ्या व्यावसायिक बांधवांना दिली जाते यामध्ये त्या सर्व व्यावसायिक बांधवांना रुपये 10 हजार पासून ते 50 हजारापर्यंत कोणतेही व्याज न घेता तसेच कोणत्याही प्रकारचे तारण न ठेवता त्यांना हे कर्ज दिले जाते. त्याच्या माध्यमातून ते त्यांच्या व्यवसायाला उंचीवर घेऊन जाऊ शकतात.


PM Svanidhi Yojana च्या माध्यमातून नागरिकांना कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात तसेच या योजनेसाठी अशा प्रकारे अर्ज करायचा या योजनेला लागणारे पात्रता निकष कोणकोणते आहेत तसेच या योजनेसाठी अर्ज करताना लागणारे आवश्यकता कागदपत्रे कोणती आहेत अर्ज कुठे व कसा करायचा याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

PM Svanidhi Yojana 2024

 

प्रधानमंत्री स्वनिधी योजना मुख्य मुद्दे तक्ता | PM Svanidhi Yojana Information

योजनेचे नाव – प्रधानमंत्री स्व:निधी योजना
योजनेची सुरुवात वर्ष – 1 जून 2020 रोजी
सुरुवात कोणी केली – भारत सरकार द्वारे
पात्रता – छोटे व्यावसायिक
कर्ज रक्कम – 50,000/- हजार रुपयांपर्यंत
कर्ज परतफेड कालावधी – कर्ज घेतल्या पासून 1 वर्ष
अधिकृत वेबसाईट – Apply Here
प्रधानमंत्री स्वनिधी योजना मुख्य मुद्दे तक्ता

प्रधानमंत्री स्वनिधी योजना विषयी ची वैशिष्ट्ये

  • देशातील तरुणांना स्वावलंबी बनवून त्यांना व्यवसायाच्या संधी साठी प्रोत्साहित करणे.
  • किचकट प्रक्रियेमध्ये न अडकता त्यांना एकदम सोप्या पद्धतीने किंवा निधी अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणे.
  • कर्जाची परतफेड की एक वर्षांमध्ये करता येते.
  • स्व:निधीच्या माध्यमातून ज्यांना कर्ज देण्यात येणार आहे त्यांना व्याजावरती सबसिडी देण्यात येते.
  • नागरिकांनी स्वनिधी योजनेतून कर्ज घेतल्यानंतर त्याने एका वर्षाच्या आत व्यवस्थितरित्या कर्जाची परतफेड केल्यानंतर त्याला नंतरच्या वेळेस जास्त रकमेमध्ये अर्ज वाढवून मिळते.
  • व्यावसायिकाने स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेणार आहे त्यांना सर्वप्रथम दहा हजार रुपये कर्ज दिले जाईल ते कर्ज त्याने वेळेपूर्व परत केले तर त्याला नंतरच्या वेळेस वीस हजार रुपये कर्जाची रक्कम दिली जाईल. म्हणजेच की नागरिकांनी वेळेच्या अगोदर कर्ज रक्कम परतफेड केल्यास त्याला पुढच्या वेळेस वाढवून कर्ज दिले जाईल ते पन्नास हजार इथपर्यंत असेल.

तर हि होती काही प्रधानमंत्री स्व:निधी योजनेबद्दल ची काही वैशिष्ट्ये.

स्वनिधी च्या माध्यामातून मिळणारे फायदे | PM Svanidhi Yojana Benefits

पीएम स्वनिधी योजनेमधून देशातील जे नागरिक स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करत आहे त्यांच्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे फायदे या अंतर्गत होणार आहेत हे पुढील प्रमाणे,

  • पीएम स्व निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारद्वारे सर्व छोट्या व्यावसायिकांसाठी दहा हजारापासून ते पन्नास हजारापर्यंत बिनव्याजी कर्ज देते.
  • एखाद्या नागरिकाने कर्ज घेतल्यास व त्याने ते कर्ज एका वर्षाच्या आत मध्ये फेडल्यास तर त्या नागरिकास पुढील कर्ज देते वेळेस कर्जाची रक्कम ही वाढवून दिली जाते.
  • स्वनिधीच्या माध्यमातून जे नागरिक व व्यावसायिक कर्ज घेतील त्यांनी जर वेळेच्या अगोदर कर्जाची परतफेड केल्यास त्यांना केंद्र सरकारच्या अंतर्गत सात टक्के व्याज हे त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाते.
  • देशातील 50 लाखहून अधिक छोट्या व्यावसायिकांना पीएम स्व:निधी योजना अंतर्गत फायदा होणार आहे.
  • जे व्यवसायिक शहरांमध्ये रस्त्याच्या आजूबाजूला हातगाडी लावून व्यवसाय करतात अशा व्यवसायिकांना दहा हजारापर्यंत भांडवल पद्धतीच्या कर्ज उपलब्ध करून दिले जाते व ते कर्ज पडण्यासाठी त्यांना एक वर्षाचा कालावधी दिला जातो. त्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मोलाच हातभार लागतो.

वरील हे सर्व फायदे देशातील सर्व व्यावसायिक उद्योजकांना होणार आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होऊन ती वाढ होण्यास मदत होणार आहे, तसेच छोटे मोठे व्यावसायिकांनाही आजचा व्यवसाय बळकट करण्यासाठी हातभार लावणार आहे.

प्रधान मंत्री स्वनिधी योजनेसाठी पात्रता व निकष | PM Svanidhi Yojana eligibility criteria

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठीजे व्यवसायिक अर्ज करणार आहेत त्यांना कोण कोणते पात्रता निकष किंवा अटी शर्ती पाळल्या पाहिजे व कोणाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो याबद्दलची माहिती पुढील प्रमाणे,

  • सर्वप्रथम नागरिका व्यावसायिक करत असणारा पाहिजे त्याच्याकडे त्याच्या स्वतःचा व्यवसाय असावा किंवा तो नवीन एखादा व्यवसाय चालू करत असणारा असावा अशा नागरिकास या योजनेच्या माध्यमातून कर्जही दिले जाते.
  • देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जे फेरीवाले असतात तसेच रस्त्याच्या आजूबाजूने दुकाने लावून किंवा हातगाडीच्या माध्यमातून जे फळ विक्री किंवा खेळणी विक्री करणारे व्यवसायिक असतात ते सर्व व्यावसायिक या स्वनिधी योजनेसाठी पात्र आहेत.
  • नागरिकांचे व्यवसाय हे कोरोना काळामध्ये बंद झाले आहेत व भांडवल नसल्यामुळे त्यांना नवीन व्यवसाय सुरू करणे शक्य नसल्यामुळे ते देखील या योजनेसाठी पात्र आहेत.
  • व्यवसाय आहे असे व्यवसाय किंवा नवीन व्यवसाय सुरू करणारे नागरिक अशा सर्वांना कोणतेही तारण न ठेवता त्यांना या योजनेमध्ये पात्र असतील.
  • लहान व्यवसायिकांना सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच की प्रथम कर्ज घेतेवेळी त्यांना दहा हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते व यासाठी सर्व लहान व्यवसायिक पात्र असतील.
  • स्वनिधी अंतर्गत कर्ज घेणारा नागरिक व व्यावसायिक हा भारत देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे good morning images.

तर हे होते या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसंबंधी असणाऱ्या अटी शर्ती व पात्रता विषयक माहिती तर ही वरील सर्व माहिती लाभ घेणाऱ्या नागरिकांना असणे आवश्यक आहे.

PM Svanidhi Yojana

प्रधानमंत्री स्व:निधी योजना

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | PM Svanidhi Yojana Documents Required

केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी अर्ज करताना महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे आवश्यक ती लागणारी सर्व कागदपत्रे तर या स्वनिधी योजनेसाठी कोणकोणती आवश्यक ती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहूया,

  • अर्ज करताना नागरिकाकडे स्वतःची आधार कार्ड असणे महत्त्वाचे आहे.
  • नागरिक ज्या व्यवसायासाठी अर्ज करत आहे त्या संदर्भातील माहिती असावी.
  • अर्ज करणारे व्यावसायिकाचे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज करणाऱ्या नागरिक व नवीन अर्ज करणाऱ्या व्यावसायिक व नवीन व्यवसाय व्यावसायिक व नवीन सुरू करणाऱ्या व्यावसायिकाकडे बँक खाते असणे गरजेचे आहे, ते नसेल तर त्यांना ते बँक खाते राष्ट्रीयकृत बँकांमध्ये काढून घ्यावे लागेल.
  • सध्या परिस्थितीमध्ये अर्ज करणारे व्यवसायिकाचा उत्पन्न स्त्रोत कोणता आहे या संदर्भातील सर्व माहिती असायला हवी.
  • अर्ज करणाऱ्या नागरिकाचे रेशन कार्ड असावे.

तर प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा अर्ज करताना अर्जदार नागरिक व व्यावसायिकाकडे वरील सर्व कागदपत्रे असणे बंधनकारक आहे तरच या योजनेसाठी ते अर्ज करू शकतात.

प्रधान मंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा करावा | PM Svanidhi Yojana Online Apply

प्रधानमंत्री स्व निधी योजनेचा अर्ज हा नागरिक ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. ज्या व्यावसायिक नागरिकांना स्वनिधी योजनेचा अर्ज करायचा आहे. अशा नागरिकांनी त्यांच्या जवळील CSC केंद्रामध्ये जाऊन हा अर्ज भरू शकतात किंवा मग ते ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने कसा अर्ज करायचा या संदर्भात आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया,

  • सर्वप्रथम तुम्हाला वरील दिलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे.
  • वेबसाईटच्या होम पेज वरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला किती रक्कमेच्या कर्जासाठी अर्ज करायचा आहे ते त्या ठिकाणी निवडायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला Apply to Loan 10k, Apply to Loan 20k, Apply to Loan 50k असे ऑप्शन दिसतील तो तुम्हाला निवडायचा आहे.
  • निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर द्वारे रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यायचे आहे तुमच्या रजिस्ट्रेशन पूर्ण करतेवेळी तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती टेक्स्ट SMS च्याद्वारे OTP येईल. आलेला ओटीपी त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे. एकदा तुम्ही ओटीपी व्हेरिफिकेशन पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी योजनेचा अर्ज ओपन होईल. तो फॉर्म तुम्ही डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या त्यावरील सर्व तपशील भरून तो फॉर्म नंतर स्कॅन करून अपलोड करायचा आहे तसेच बाकी लागणारी सर्व ती आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्म सोबत स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहे.
  • सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्ही तो फॉर्म व्यवस्थित रित्या सबमिट करायचा आहे.
  • झेरॉक्स व आवश्यक ती कागदपत्रे त्यासोबत जोडून तर फॉर्म आहे तुमच्या जवळच्या स्वनिधी केंद्रावरती जाऊन तेथील कर्मचाऱ्यां कडे जमा करायचा आहे.
  • काही दिवसात तुमचा अर्ज पडताळणी झाल्यानंतर तुमची निवडलेली कर्जाची रक्कम ही तुमच्या खात्यामध्ये जमा होईल.

तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज करायचा आहे. तुम्हाला जर ही अर्ज करण्याची पद्धत अवघड वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जवळील CSC केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता.

प्रधानमंत्री स्व:निधी योजना निष्कर्ष

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व छोट्या व्यावसायिकांना पाठबळ देऊन त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी व ज्या व्यावसायिक नागरिकांचे कोरोना काळामध्ये व्यवसाय बंद पडले होते, अशा सर्व नागरिकांना व्यवसाय नव्याने चालू करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वनिधी योजनेच्या माध्यमातून 10 हजारापासून ते 50 हजार पर्यंत त्यांना विनाकारण व विनाव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते यामध्ये त्यांना ते कर्ज एक वर्षाच्या कालावधीमध्ये परतफेड करायचे आहे, या कर्जाचा वापर करून ते त्यांचा व्यवसाय वाढवू शकतात.


अधिक वाचा – व्यावसायिक बांधवांसाठी 10 लाखा पर्यंत लोन उपलब्ध होणार | PM Mudra loan Yojana

अधिक वाचा – सर्वसामान्य नागरिकांना 5 हजार मिळणार 

अधिक वाचा – लेक लाडकी योजना 2024 | आता मुलीच्या भवितव्यासाठी सरकार देणार 1 लाख रुपये


FAQ’s

1).पी एम स्वनिधी योजनेसाठी अर्ज कोण करू शकते?
उत्तर –
सर्व छोटे व्यावसायिक जसे की हातगाडीवाले फेरीवाले फळभाज्या विक्री करणारे यांसारखी व्यावसायिक पीएम स्व निधी योजनेसाठी अर्ज करू शकतात.


2).पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती रक्कम कर्जाच्या स्वरूपात मिळते?
उत्तर –
दहा हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम मिळते.


3).पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जाची परतफेड किती दिवसात करावी लागेल?
उत्तर –
मिळालेल्या कर्जाची परतफेड ही एक वर्षाच्या आत मध्ये व्यावसायिकाने करावी.


4).पी एम स्वनिधी योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
उत्तर –
एम स्वनिधी योजनेसाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती व जवळील CSC केंद्रामध्ये नागरिक अर्ज करू शकतात.


5).पी एम स्वनिधी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता काय लागते?
उत्तर –
सर्व छोटे व्यावसायिक पीएम स्वनिधी योजनेस पात्र आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top