Mukhyamantri Solar Pump Yojana Maharashtra : शेती करायचं म्हटलं कि वीज आणि पाणी हे खूप महत्वाचे घटक समोर येतात. शेती करत असताना शेतकऱ्याला नवनवीन अडचणींना सामोरे जावे लागते. दुष्काळ, अतिवृष्टी, वादळीवारे, अनियमित होणारा वीज पुरवठा यांसारखी मोठ मोठी संकटे त्यांचा पुढे असतात. यातील च एक म्हणजे अनियमित होणारा वीज पुरवठा या वरती उपाययोजना म्हणून राज्य सरकारने शेतकरी बधवांसाठी हि मुख्यमंत्री सोलर पंप योजना राबिवली आहे.
या योजनेच्या माध्यामातून शेतकरी बंधूना महाराष्ट्र सरकार द्वारे नागरिकांना 95% ते 90% अनुदान देते. कारण सध्याच्या काळात सौर पंप घेणे शेतकर्यांना स्वखर्चाने सौर पंप घेणे शक्य होत नाही.त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना अनुदान देते. व त्याच्या माध्यमातून ते सोलार पंप विकत घेऊ शकतात या अनुदानामध्ये अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना फक्त 5% टक्के रक्कम तसेच जनरल किंवा सर्वसाधारण जमातीतील लोकांसाठी फक्त 10% टक्के रक्कम भरावी लागेल बाकी राहिलेली 90% ते 95% टक्के रक्कम ही सरकार अनुदानामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करते.
राज्यामध्ये कमी पडणारा पाऊस यामुळे शेतकरी नेहमीच त्रस्त असतो. परंतु महाराष्ट्रातील काही भागात भरपूर प्रमाणात पाणी पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांना पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसते किंवा विद्युतभार नियमन म्हणजेच लोड शेडिंग असल्याकारणाने त्यांना पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे चणे नाहीत तर दात आहेत आणि दात आहेत तर चणे नाहीत अशी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे त्यांना शेतीतून योग्य ते उत्पादन मिळत नाही.
हि समस्या लक्षात घेऊन सरकार सौर पंपासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान शेतकऱ्यांना देत आहे. या सौर पंपाच्या माध्यमातून शेतकरी दिवसा केव्हाही शेतीस पाणी देऊ शकतो. एकदा शेतामध्ये सौर पंप बसवला तर वीज बिलासाठी होणारी शेतकऱ्यांची आर्थिक फरपट थांबू शकते. व पिकांना योग्य पद्धतीने पाणी मिळाल्यामुळे पीकही जोमात येते. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने या सोलार पंप उपक्रमासाठी योग्य पाऊल उचलले आहे.
या ठिकाणी आपण या Mukhyamantri Solar Pump Yojana Maharashtra विषयी सविस्तर माहिती जाणून घेत आहोत यामध्ये आपण या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणारे फायदे तसेच या योजने पाठीमागची धोरणे व वैशिष्ट्ये या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा तसेच सौर पंप अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक ती लागणारी कागदपत्रे कोणती आहेत, कोणते शेतकरी किंवा नागरिकांना सहभागी होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे ही सर्व माहिती या ठिकाणी पाहणार आहोत.

मुख्यमंत्री सौर पंप योजना थोडक्यात माहिती
योजनेचे नाव – | मुख्यमंत्री सौर पंप योजना |
सुरुवात वर्ष – | 1 जानेवारी 2019 रोजी |
सुरुवात कोणी केली – | महाराष्ट्र शासन अंतर्गत |
अनुदान – | 95% पासून ते 90% टक्के पर्यंत |
कोणाला लाभ मिळणार – | कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गास |
अर्ज करण्याची पद्धत – | ऑनलाइन ( Apply Here ) |
Mukhyamantri Solar Pump Yojana विषयी धोरणे व वैशिष्ट्ये
महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री सौर पंप योजने पाठीमागील कोणती ध्येय धोरणे किंवा वैशिष्ट्य आणि उद्दिष्टे आहेत हे आपण खालील प्रमाणे,
- राज्य सरकार मुख्यमंत्री सोलार पंप योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांच्या शेतासाठी लागणाऱ्या विजेचा प्रश्न सोडवणार आहे.
- शेतकऱ्याला प्रत्येक दिवशी सौर पंपाच्या मदतीने शेतीसाठी व्यवस्थितपणे पाणी देता येणार आहे तसेच त्यांचे शेती क्षेत्र हे विना पाण्याशिवाय राहणार नाही.
- सौर पंपाच्या मदतीने शेतीतील सर्व प्रकारच्या सिंचन पद्धती जसे की ठिबक सिंचन तुषार सिंचन किंवा पाटाने पाणी देणं यांसारख्या सिंचन पद्धतीद्वारे शेतीस पाणी देणे शक्य होणार आहे.
- सौर पंपाच्या मदतीने शेतकऱ्यास महाराष्ट्र वीज बोर्डाच्या विजेवरती अवलंबून राहता त्यांच्या सौर पंपाच्या द्वारे ते शेतीस पुरेपूर पाणी देऊ शकतात.
- एम एस ई बी म्हणजेच महाराष्ट्र वीज मंडळाच्या विजेवरती शेतकऱ्यांना आजपर्यंत अवलंबून राहावे लागत होते ते इथून पुढे राहावे लागणार नाही.
- शेतामध्ये एकदा सौर पंप बसवल्यास त्याला कोणत्याही प्रकारचा व्यतिरिक्त खर्च होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक अडचणीं किंवा वीज वीज बिलांची समस्या उद्भवणार नाही.
- शेतकरी हवे तेव्हा त्यांच्या शेतास पाणी देऊ शकतात व भरगोस उत्पादन काढू शकतात.
- महाराष्ट्र राज्यात सातत्याने होणाऱ्या लोड शेडिंग च्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी पेट्रोल डिझेल इंजिन वर चालणाऱ्या मोटारींचा वापर पाणी देण्यासाठी करत होते त्यामुळे शेतकऱ्यांवरती बराच आर्थिक भार वाढत होता त्यामुळे त्यांची आर्थिक पातळी खालावत होती परंतु या मुख्यमंत्री सौर पंप योजनेमुळे या समस्यांवर पूर्णपणे मात करता येणार आहे.
- लोड शेडिंग च्या काळात पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पिके करपून जायची व शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन लागत नसायचे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागायचे परंतु सौर पंपाच्या मुळे ते बंद होणार आहे.
- सौर पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतीस पाणी द्यायला जावे लागणार नाही ते दिवसभरात केव्हाही शेती स पाणी देऊ शकतात.
वरील ही सर्व ध्येयधोरणे व या योजनेची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे या योजनेत पाठीमागील आहेत.

सौर पंप योजना 2024
सोलार पंप योजनेच्या अंतर्गत शेतकरी बंधूंना होणारे फायदे | Mukhyamantri Saur Pump Yojana Benefits
सरकारच्या सोलार पंप योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतील याबद्दल,
- सौर पंप योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की शेतकऱ्यास कमी रक्कम भरून सोलार पंप चा सेट मिळणार आहे यामध्ये फक्त शेतकऱ्यास पाच ते दहा टक्के रक्कम भरून हा सौर पंप त्यांच्या शेतामध्ये बसू शकतात.
- राज्य शासनाकडून मुख्यमंत्री सौर पंप योजनेसाठी प्रत्येक शेतकऱ्यास त्यांच्या कॅटेगरी प्रमाणे जसे की सर्वसाधारण जाती-जमातीतील शेतकऱ्यांना 90% टक्के अनुदान दिले जाते. तसेच जे शेतकरी अनुसूचित जाती जमाती मध्ये मोडतात असे शेतकऱ्यांना 95% टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे घालवण्याची गरज नाही.
- शेतकरी बांधवांकडे जर दहा टक्के व पाच टक्के रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्यास ते ती रक्कम कर्जाच्या स्वरूपात बँकेकडून घेऊन या योजनेसाठी भरू शकतात व त्यावरती व्याजही कमी प्रमाणात शेतकऱ्यांकडून आकारले जाते.
- संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी बंधूंना ठराविक कालावधी मध्ये अंतर ठेवून एक लाख सोलार पंपाचे वितरण हे अनुदानावरती करण्यात येणार आहे.
- राज्यात जे छोटे शेतकरी आहेत किंवा ज्यांचा आर्थिक परिस्थिती सौर पंप घेण्याची नाही अशाही सर्व शेतकऱ्यांना पैशाची चिंता न करता अत्यंत अल्प पैशांमधून सोलार पंप बसवता येतो.
- शेतकऱ्याकडे दोन हेक्टर म्हणजेच पाच एकर शेतजमीन असेल तर त्या शेतकऱ्यास 3HP चा सौर पंप त्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी दिला जातो. व ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन दोन हेक्टर पेक्षा अधिक आहे अशा शेतकरी बांधवांना 5HP चा सौर पंप शेती सिंचनासाठी दिला जातो.
- सौर पंप योजना च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हजारो लाखो रुपयांचे वीज बिलावरती होणारा खर्च बंद होणार आहे. व तो पैसा ते शेतीमध्ये इतर कामांसाठी वापरू शकतात.
- राज्यामध्ये भरपूर प्रमाणात औष्णिक ऊर्जा केंद्र किंवा जलविद्युत केंद्र आहेत अशा ठिकाणाहून प्रत्येक शेतकऱ्यास वीज पुरवठा करणे अशक्य होत होते त्यामुळे लोड शेडिंगचे प्रमाण भरपूर प्रमाणात असायचे पण सौर पंप योजनेच्या माध्यमातून यावरती पूर्णपणे तोडगा निघालेला आहे.
- शेतकरी बांधवांना आता रात्री अपरात्री शेतामध्ये जाऊन शेतात दारे धरणे किंवा शेताला पाणी सोडणे, मोटार पंप चालू बंद करणे यांसारख्या कामांसाठी त्यांना जावे लागत असायचे तर ते आता बंद होणार आहे कारण सौर पंपाच्या माध्यमातून शेतकरी दिवसभरात त्यांच्या विकास योग्य त्या प्रमाणात आणि योग्य तेवढेच पाणी देऊन भरघोस उत्पन्न काढू शकतात.
- राज्यात होणाऱ्या विद्युतभार नियमनाच्या समस्येवरती कायमचा तोडगा या मुख्यमंत्री सोलार पंप योजनेच्या माध्यमातून होतो यामध्ये शेतकरी पंपाबरोबरच त्यांच्या घरालाही पुरेल इतकी वीज ते या सौर पंप यंत्राद्वारे साठवून वापरू शकणार आहेत.
- सौर उर्जेवर चालणारा हा सोलार पंप बाहेरील कोणत्याही विजेशिवाय चालतो त्याला अगोदर प्रमाणे महाराष्ट्र विज मंडळाच्या विजेवरती अवलंबून न राहता सूर्याच्या मदतीने तयार होणाऱ्या विजेवरती त्याचे काम चालते त्यामुळे लोड शेडिंग असेल किंवा विजेमध्ये पडणारा खंड असेल यासारख्या समस्यांवरती कायमचा परिपूर्ण असा पर्याय म्हणजे सौर पंप आहे आणि याचा खूप लाभ शेतकरी बांधवांना होणार आहे.
तर वरील हे सर्व फायदे शेतकरी बांधवांना या मुख्यमंत्री सौर पंप योजनेच्या अंतर्गत होणार आहेत.

Mukhyamantri Solar Pump Yojana Maharashtra
मुख्यमंत्री सोलार पंप योजना पात्रता व निकष | Mukhyamantri Saur Pump Yojana Eligibility Criteria
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सोलार योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते पात्रता व निकष पाळणे गरजेचे आहे ते पुढील प्रमाणे,
- सोलार पंप योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- शेतकरी बांधवांकडे शेतजमीन आहे अशाच शेतकरी बांधवांना या सौर कृषी पंपाचा अर्ज करता येणार आहे.
- शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये महाराष्ट्र वीज बोर्डाचे वीज कनेक्शन आहे व त्याच्यावरती त्यांची विद्युत मोटार सुरू असते अशाही शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
- शेतकऱ्यास योजनेचा लाभ देते वेळेस त्या शेतकऱ्याकडे स्वतःचे विहीर बोरवेल शेततळे किंवा इतर पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असणे गरजेचे आहे तरच त्यांना या सौर पंप योजनेचा लाभ घेता येईल.
- शेतकरी जर या मुख्यमंत्री सौर पंप योजना चा लाभ घेणार असेल तर त्याने अर्ज करते वेळेस त्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन असल्याचा पुरावा अर्जासोबत जोडणे महत्त्वाचे आहे.
- राज्य सरकारकडून सर्वसाधारण शेतकरी बांधवांना 90% व अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी बांधवांना 95% अनुदान दिले जाईल. उर्वरित पाच व दहा टक्के रक्कम हे शेतकऱ्यांना स्वतः भरायची आहे.
- सौर पंप शेतामध्ये बसवल्यानंतर त्याची देखभाल करणे किंवा काही बिघाड झाल्यास त्याचे दुरुस्ती करणे हे शेतकऱ्यावरती अवलंबून राहणार आहे त्यासाठी सरकार द्वारे कोणत्याही प्रकारची मदत केली जाणार नाही.
- प्रत्येक शेतकऱ्याला फक्त एकच सौर पंप शासनाद्वारे अनुदाना अंतर्गत वितरित केला जाईल दोन किंवा जास्त पंप या योजनेमध्ये दिले जाणार नाही. केवळ एका शेतकऱ्यास एकच पंप या योजनेतून मिळतो.
- मुख्यमंत्री सोलार पंप अनुदान हे फक्त केवळ शेतकरी बांधवांसाठीच मिळणार आहे.
सौर पंपा बद्दलचे हे सर्व वरील पात्रता व निकष शेतकऱ्याने पाळणे गरजेचे आहे तरच त्यांना या मुख्यमंत्री सोलार पंप योजनेसाठी अर्ज करता येईल.
सोलार पंप योजनेसाठी अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे | Mukhyamantri Solar Pump Yojana Documents
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री सोलार पंप योजनेसाठी अर्ज करायचा आहे अशा नागरिकांना अर्ज करताना कोणकोणती आवश्यक ती कागदपत्रे लागणार आहेत ते पुढील प्रमाणे,
- सर्वप्रथम अर्जदार शेतकऱ्याचा रहिवाशी दाखला
- शेतकऱ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर व पासपोर्ट साईजचे फोटो
- अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते माहिती व बँक पासबुक
- शेतकऱ्याच्या नावे असणाऱ्या शेत जमिनीचा 7/12 तसेच 8 अ उतारा
वरील सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांनी अर्ज करतेवेळी सोबत नेणे गरजेचे आहे ही सर्व कागदपत्रे शेतकऱ्यास अर्ज करतेवेळी लागतील.
मुख्यमंत्री सोलार पंप योजनेस अर्ज कसा करावा | Mukhyamantri Solar Pump Yojana Online Application
मुख्यमंत्री सोलार पंप योजना महाराष्ट्र 2024 या योजनेसाठी शेतकरी कशाप्रकारे अर्ज करू शकतो व कुठे करू शकतो याची माहिती पुढील प्रमाणे,
सौर पंप योजनेसाठी शेतकरी अर्ज हा त्यांच्या गावामध्ये असणाऱ्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन करू शकतो. किंवा शेतकऱ्यास स्वतः त्यांच्या मोबाईल फोन द्वारे मुख्यमंत्री सौर पंप योजना वेबसाईट वरती जाऊन अर्ज करता येतो.

सर्वप्रथम अर्ज करणारे शेतकऱ्यास वरील दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी वेबसाईट ओपन झाल्यावरती होम या पेजवरती त्यांना त्यांच्या शेतीचे क्षेत्र लक्षात घेऊन कोणत्या प्रकारचा पंप पाहिजे आहे ते त्या ठिकाणी निवडावे पंपाची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री सौर पंप योजनेचा फॉर्म ओपन होईल त्या ठिकाणी अर्ज करणारे शेतकऱ्यांनी व्यवस्थित रित्या स्वतःची माहिती अचूक पद्धतीने भरून घ्यावी.
त्यानंतर आपण वरील प्रमाणे जी कागदपत्रे तुम्हाला त्यानंतर वरील प्रमाणे जी कागदपत्रे दिली आहेत ती सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी अर्ज पूर्ण भरल्यानंतर अपलोड करावीत व एकदा तुमची सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्यवस्थित भरली आहे का याची खात्री करून फॉर्म सबमिट करावा फॉर्म सबमिट करण्यासाठी त्या ठिकाणी सबमिट असा पर्याय दिलेला असतो त्यावरती जाऊन तुम्ही तो फॉर्म सबमिट करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचामुख्यमंत्री सौर पंप योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया संपते.

अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची स्थिती पहायची असल्यास त्या ठिकाणी अर्जाची स्थिती या पर्यावरण क्लिक करून तुम्ही भरलेल्या अर्जाचा क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे अर्ज क्रमांक तुम्ही त्या ठिकाणी टाकल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे पेज ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्ही भरलेल्या अर्जाची स्थिती काय आहे हे तुम्हाला समजेल.
तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
अर्जाची स्थिती तपासून झाल्यानंतर त्याच्याच कडेला असणाऱ्या देयक रक्कम परतावा असा पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून तो पर्याय ओपन करायचा आहे. त्या ठिकाणी नवीन पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचा क्रमांक टाकायचा आहे. अर्ज क्रमांक टाकल्यानंतर शोध या बटणावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जी काही देयक रक्कम भरायची आहे ती रक्कम त्या ठिकाणी दाखवली जाईल व ती रक्कम तुम्हाला भरायची आहे. तर अशाप्रकारे तुम्ही तुमची पाच किंवा दहा टक्के जी काही रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे.

तुम्ही त्या ठिकाणी देयक रक्कम भरल्यानंतर त्या देयक रक्कम या पर्याय शेजारी दुसरा पर्याय पुरवठादार यादी असा असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून पेज ओपन करायचे आहे पेज ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेती क्षेत्राबद्दल तसेच जिल्हा पंप प्रकार व महसूल विभाग आणि पंप क्षमता यांसारखी माहिती भरून शोध या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये सौर पंप पुरवठादारांची यादी दिसेल तेथून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता

या पद्धतीने शेतकरी बांधव या मुख्यमंत्री सौर पंप योजनेसाठी अर्ज करू शकता.
जर अर्ज करणारे शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा अडचण आल्यास त्यांनी त्यांच्या गावातील किंवा त्यांच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन या योजनेचा फॉर्म ते शेतकरी भरू शकतात.
Mukhyamantri Solar Pump Yojana निष्कर्ष
मुख्यमंत्री सोलार पंप योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सरकारकडून 90% व 95% टक्के अनुदान दिले जाते. यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90% तसेच अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 95% टक्के हे अनुदान सोलार पंप घेण्यासाठी दिले जाते. यामध्ये शेतकऱ्यांना फक्त पाच ते दहा टक्के रक्कम भरून या योजनेचा लाभ घेता येतो. या Mukhyamantri Solar Pump Yojana च्या मदतीने शेतकऱ्यांना होणाऱ्या विजेच्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे व ते त्यांच्या शेतीला व्यवस्थित प्रकारे पाणी देऊन पीक चांगल्या प्रकारे आणू शकतात.
अधिक वाचा – सर्वसामान्य नागरिकांना 5 हजार मिळणार
अधिक वाचा – शेळी पालन करण्यासाठी 75% अनुदान मिळणार
अधिक वाचा – आधार कार्डच्या माध्यामातून 50 हजारचं बिनव्याजी कर्ज
FAQ’s
1). महाराष्ट्र राज्यामध्ये सौर पंप योजना काय आहे?
उत्तर- महाराष्ट्र राज्यामध्ये सौर पंप योजना म्हणजे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सौर पंप घेण्यासाठी 95 टक्के अनुदान दिले जाते त्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के रक्कम भरून या सोलार पंप योजनेचा लाभ घेता येतो.
2). सोलार च्या मदतीने पंप चालवता येतो का?
उत्तर- सोलारच्या साह्याने शेतामध्ये 1HP पासून ते 5HP पर्यंतचा पंप चालवता येतो.
3). 5HP चा पंप चालविण्यासाठी किती सोलर पॅनल लागतात?
उत्तर- सर्वसाधारणपणे 5HP चा सोलर पंप चालवण्यासाठी 15 ते 20 100Watt चे सोलर पॅनल लागतील.
4). सोलार पंप हा बोरवेल मधील पाणी काढण्यासाठी वापरला जाऊ शकतो का?
उत्तर- हो शेतकरी बांधव हे सोलार पंप बोरवेल मधील पाणी काढण्यासाठी वापरू शकतात.
5). पाच एकर शेत जमिनीस पाणी देण्यासाठी किती HP चा सोलार पंप लागू शकतो?
उत्तर- पाच एकर शेती क्षेत्रास पाणी देण्यासाठी 3HP चा सोलार पंप लागू शकतो.
6). मुख्यमंत्री सोलार पंप योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
उत्तर- मुख्यमंत्री सोलार पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर पंप योजना या वेबसाईट वरती करावा.