व्यवसायासाठी पाहिजे कर्ज तर असा करा अर्ज Annasaheb Patil Yojana 2024

Annasaheb Patil Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये जर वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये तरुण व तरुणींचा वर्ग हा शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असतो. तर त्यातील काही तरुणांना नोकरी लागते व बाकी राहिलेले काही तरुण किंवा तरुणी हे व्यवसायाकडे वळतात परंतु व्यवसाय उभा करण्याकरता किंवा ज्या तरुणांकडे अगोदर पासून व्यवसाय आहे तो व्यवसाय वाढवण्याकरिता त्यांच्याकडे पुरेशी असे भांडवल उपलब्ध नसते. जे तरुण नवीन आहेत व त्यांना व्यवसाय व त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे परंतु व्यवसाय करण्याच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये बँकांकडून वेगवेगळ्या संस्थांकडून कर्ज मिळणे कठीण असते.

त्यामुळे बहुतांश करून हे हाताश होऊन बसतात स्वतःकडे व्यवसाय करण्याचे कौशल्य असूनही त्यांना भांडवल अभावी व्यवसाय करणे शक्य होत नाही. दरवर्षी असे भरपूर तरुण असे असतात. या समस्येवरती मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली होती. त्या अण्णासाहेब पाटील त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अंतर्गत जे नवीन तरुण उद्योजक स्वतःचा उद्योग व्यवसाय चालू करणार आहेत अशा सर्व तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत दहा लाख रुपयांपासून ते पंधरा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्याच्या माध्यमातून नवीन तरुण उद्योजक त्यांच्या उद्योगाला नव्या उंची वरती घेऊन जाऊ शकतात.

अण्णासाहेब पाटील योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगारी व व्यावसायिक असंख्य तरुण-तरुणींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर या योजनेचा अर्ज कशा पद्धतीने भरायचा या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत योजनेविषयीचे फायदे तसेच आवश्यक ती लागणारी कागदपत्रे या सर्व अण्णासाहेब पाटील योजने संबंधित महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत.

annasaheb patil loan
Annasaheb Patil Loan Yojana

अण्णासाहेब पाटील योजना ठळक मुद्दे व माहिती | Annasaheb Patil Karj Yojana Information

योजनेचे नाव – अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 / Annasaheb Patil Yojana
योजनेची सुरुवात – 27 नोव्हेंबर 1998 पासून
सुरवात कोणी केली –महाराष्ट्र शासनाद्वारे ( अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत )
कर्ज लाभ रक्कम – 10 लाखांपासून ते 15 लाखापर्यंत
लाभ कोणाला मिळणार – बेरोजगारीत व व्यावसायिक तरुण तरुणी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ( Apply Here )
Annasaheb Patil Karj Yojana 2024

अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत समाजातील वेगवेगळ्या घटकातील तरुण-तरुणींसाठी तसेच विशेषता मराठा समाजातील तरुण-तरुणींना उद्योगधंदे उभारणीसाठी तसेच आहे तोच व्यवसाय नवीन जोमाने व वेगवेगळ्या पद्धतीने वाढवण्यासाठी लागणारे भांडवल या योजनेच्या माध्यमातून तरुण युवा वर्गास दिले जाते. अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना ची सुरुवात ही 27 नोव्हेंबर 1998 रोजी झाली होती या योजनेअंतर्गत विशेष म्हणजे मराठा समाजातील तरुणांना या योजनेसाठी सर्वात अगोदर प्राधान्य दिले जाते.

Annasaheb Patil Yojana योजनेच्या माध्यमातून युवा वर्गास उद्योग उभारणीसाठी दहा ते पंधरा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते त्याच्या मदतीने ते उद्योग धंदा करू शकतात तसेच या योजनेसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अण्णासाहेब महामंडळ योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती लाभ घेणाऱ्या घरून-तरुणींना त्या ठिकाणी अर्ज करता येईल सविस्तर माहिती साठी तुम्ही खाली दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचा.

अण्णासाहेब पाटील योजनेची उद्दिष्टे

अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या पाठीमागील महाराष्ट्र शासनाची कोणकोणती उद्दिष्टे आहेत पुढील प्रमाणे,

  • महाराष्ट्र राज्यातील वाढत्या बेरोजगारी वरती मात करून शिक्षित असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी व्यवसाय उभा करणार करिता आर्थिक भांडवल कमी व्याजारावरती उपलब्ध करून देणे.
  • सुशिक्षित तरुण-तरुणींनी नोकरीच्या पाठीमागे न धावता त्यांनी स्वतःचा व्यवसाय करून स्वयंरोजगारीत व्हावे.
  • राज्यातील तरुण वर्गाने त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा करून इतर नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे.
  • राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन उद्योगधंदे उभारणीसाठी व त्यांना चालना देण्यासाठी या योजनेतून मदत पुरवणे.
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या माध्यमातून दिलेल्या कर्जावरती कोणत्याही प्रकारचे व्याज न आकारता ते कर्ज नागरिकांना देणे त्यासाठी कोणतेही प्रकारचे तारण न ठेवता कर्ज उपलब्ध करून देणे त्याच्या माध्यमातून युवकांना कोणत्याही बँक व इतर संस्थांवरती अवलंबून राहावे लागणार नाही.
  • सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देऊन नवीन नवीन उद्योगधंद्यांसाठी चालना देणे.
  • राज्यातील युवा वर्गास बेरोजगाराच्या संकटातून मुक्त करून त्यांच्या हातात बळकटी देणे व आर्थिकरित्या सक्षम बनवणे.
  • मागासवर्गीय जाती जमातीतील युवा वर्गातील तरुण-तरुणींना ही अण्णासाहेब पाटील या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय तसेच उद्योगधंदे उभारता येणार व कुटुंबाची व स्वतःची आर्थिक अडचण दूर करता येते.

Annasaheb Patil Karj Yojana वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार किंवा जे तरुण अगोदर पासून व्यवसाय करीत आहेत अशा तरुणांसाठी भक्कम आर्थिक पाठबळ या योजनेमधून त्यांना मिळणार आहे.
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी व साध्या पद्धतीची ठेवले आहे जेणेकरून कोणत्याही गरजू युवा उद्योजकास व व्यावसायिकास योजनेसाठी अर्ज करताना कोणतेही अडचण येणार नाही.
  • कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम ही त्या अर्ज केलेल्या व्यावसायिकाच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
  • महाराष्ट्र राज्यातील तरुण व तरुणींकडे व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक भांडवल पुरेसे नाही अशा व जे तरुण-तरुणी अनुसूचित जाती जमाती तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या परिस्थितीत आहेत अशांनाअण्णासाहेब पाटील या योजनेचा सर्वात अगोदर लाभ मिळतो.
  • राज्यातील तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न धावता उद्योग धंदा करून स्वतः आर्थिक बलवान व्हावे व इतर समाजातील बांधवांना व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधी या योजनेच्या माध्यमातून मिळतील.
  • अर्ज करणारा व्यावसायिक उमेदवार या योजनेसाठी कोणतेही अनावश्यक शुल्क न देता स्वतःच्या मोबाईल फोनवरती या योजनेचा अर्ज तो भरू शकतो.
  • राज्यातील जे व्यवसाय लघुउद्योग किंवा सूक्ष्म उद्योग अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय चालू करणार असतील तर अशांना जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत कर्ज योजनेअंतर्गत मिळते.

तर वरील ही काही वैशिष्ट्ये या अण्णासाहेब पाटील योजने बद्दलची आहेत.

Annasaheb Patil Yojana

Annasaheb patil karj yojana / Annasaheb patil loan yojana 2024

Annasaheb Patil Karj Yojana च्या माध्यामातून होणारे फायदे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कोणकोणत्या प्रकारचे फायदे हे लाभ घेणाऱ्या तरुणांसाठी मिळणार आहेत त्या पुढील प्रमाणे,

  • लाभार्थ्याला मिळालेल्या कर्जावरती जे व्याज आकारले जाते ते व्याज हे महामंडळाकडून फेडले जाते त्यामुळे लाभार्थी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे त्यावरती व्याज भरावे लागणार नाही.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या माध्यमातून सगळ्यात मोठा फायदा म्हणजे व्यावसायिक करीत असलेल्या नव्यान व्यवसायात भरणाऱ्या व्यावसायिकांसाठी कर्ज उपलब्ध होते.
  • वैयक्तिक ज्या व्यावसायिकाला कर्ज काढायचे आहे अशा व्यवसायिकाला दहा लाखापर्यंत वयक्तिक रित्या कर्ज मिळू शकते.
  • अण्णासाहेब पाटील योजनेच्या माध्यमातून ज्या व्यावसायिक यांच्या गटात सर्वांमध्ये मिळून कर्ज काढायचे असेल तर त्यांना 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोयीस्कर व सोप्या पद्धतीची असल्यामुळे राज्यातील असंख्य तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • एखाद्या तरुणास व्यवसाय करायचा असेल तर त्याला इतर कोणत्याही संस्था किंवा अन्य बाबींवरती निर्भर न राहता स्वकर्तुत्वावर तो उभारू शकतो.
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमध्ये मिळालेल्या कर्जाची परतफेड कार्यकाल हा साधारणपणे पाच वर्षाचा असतो यामध्ये घेतलेले सर्व कर्ज पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वांना परत करायचे असते हा सर्वात मोठा फायदा या अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा आहे.

तर हे वरील सर्व लाभ या अण्णासाहेब पाटील योजनाच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व तरुण वर्गास मिळतील.

Annasaheb Patil Loan Yojana चा लाभ घेण्यासाठी लागणारे पात्रता व निकष

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना कोणकोणत्या पात्रता व निकषांच्या पायऱ्या लागतील ते आपण पाहूया,

  • सर्वप्रथम अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे अत्यावश्यक आहे.
  • कर्ज योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार पुरुषाचे वय हे जास्तीत जास्त 50 वर्ष तर महिलांसाठी जास्तीत जास्त 55 वर्ष असायला हवे. व अर्ज करण्यासाठी किमान वय हे 18 वर्षे पूर्ण असावे.
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा अर्ज भरतेवेळी त्या उमेदवाराने या अगोदर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कोणत्याही Annasaheb Patil Yojana साठी अर्ज केला नसावा किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • व्यावसायिक उमेदवार अर्ज करणार असेल तर त्याच्याकडे उद्योग आधार व शॉप ॲक्ट यासारखे व्यवसाय बद्दलची सर्व आवश्यकता कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे.
  • एका कुटुंबातील फक्त एकच सदस्य हा एका वेळीच या अण्णासाहेब पाटील योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • व्यावसायिक नागरिक जे गटा गटाच्या माध्यमातून अर्ज करणार असतील अशा उमेदवारांची शिक्षण हे किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • कर्ज योजनेचा अर्ज करण्याच्या अगोदर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कोणत्याही बँकेमध्ये लोन काढलेले नसावे किंवा लोन काढलेले असेल व त्याचे हप्ते भरलेले असतील असे यामध्ये चालणार नाही सर्व हप्ते व लोन त्यांनी व्यवस्थित पूर्ण करणे गरजेचे आहे.

तर हे वरील सर्व पात्रता निकष किंवा अटी नागरिकांनी अर्ज करताना लक्षात घेणे व पाळणे अत्यंत गरजेचे आहे तरच त्यांना अण्णासाहेब पाटील या योजनेअंतर्गत कर्ज लवकरात लवकर मिळू शकेल.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 / Annasaheb Patil Yojana

Annasaheb Patil Loan Yojana साठी अर्ज करताना लागणारी आवश्यकता कागदपत्रे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोणकोणते आवश्यक ती कागदपत्रे उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया,

  • सर्वप्रथम अर्ज करणाऱ्या व्यावसायिक उमेदवाराकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे पॅन कार्ड व रेशन कार्ड असणे गरजेचे आहे ही तीन कार्ड त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारा उमेदवार ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणचा रहिवासी दाखला तसेच त्या उमेदवाराचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला व उमेदवार अनुसूचित जाती जमातीतील असेल तर त्याचे जात प्रमाणपत्र म्हणजेच जातीचा दाखला व जातीचा पुरावा असणे गरजेचे आहे हे तीन चार दाखले त्याच्याकडे असणे महत्त्वाचे आहेत.
  • उमेदवार ज्या व्यवसायासाठी किंवा उमेदवार ज्या व्यवसायासाठी व उद्योगधंद्यासाठी अर्ज करत आहे त्या व्यवसायाचा व उद्योगधंद्याचा संपूर्ण सविस्तर माहिती असणारा अहवाल त्याच्याकडे असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराकडे वयाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणाऱ्या खात्याचे सर्व तपशील तसेच उमेदवाराचा ईमेल आयडी मोबाईल नंबर व शपथ प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे अत्यावश्यक आहे.

वरील सर्व कागदपत्रे ही अर्ज करणाऱ्या व्यावसायिक उमेदवाराकडे असणे खूप गरजेचे आहे तरच ते या कर्जाच्या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.अन्यथा त्यांना अण्णासाहेब पाटील या कर्जाच्या योजनेस अर्ज करता येणार नाही त्यामुळे अर्ज करताना जातेवेळेस वरील सर्व दिलेली कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.

अण्णासाहेब पाटील योजनेसाठी अर्ज कसा करावा | Annasaheb Patil Loan Apply Online

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी उमेदवाराला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे त्याची थोडक्यात माहिती आपण खालील प्रमाणे पाहूया,

  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेला अर्ज करण्याच्या सर्वात अगोदर उमेदवाराला वरील दिलेल्या महास्वयम या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन होमपेज वरती असणाऱ्या नोंदणी या पर्यावरणातील क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल ते पेज उघडल्यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराला त्याची सर्व वयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे वैयक्तिक माहिती भरून घेतल्यानंतर त्याला ती व्यवस्थित रित्या सबमिट करून पुढील बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • वैयक्तिक माहिती भरून पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी उमेदवाराचा युजर आयडी व पासवर्ड जनरेट होईल तो उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्व एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे किंवा सेव करून ठेवला तरी चालेल.
Annasaheb Patil Yojana Website
Image Source – udyog.mahaswayam.gov.in website
  • यूजर आयडी व पासवर्ड जनरेट झाल्यानंतर त्याला नंतर होमपेजवर जाऊन युजर आयडी व पासवर्ड च्या मदतीने स्वतःचे खाते लॉगिन करायचे आहे.
  • खाते लॉगिन झाल्यानंतर समोर तीन कर्ज योजना त्या उमेदवारास दिसणार आहेत त्यामध्ये उमेदवार कोणत्या कर्जासाठी अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी तो पर्याय त्या उमेदवाराने निवडावा. पर्याय निवडल्यावर ती नवीन पेज ओपन होईल.
  • नवीन पेज ओपन झाल्यावरती उमेदवारास त्या ठिकाणी स्वतःची वैयक्तिक माहिती व्यवस्थितरित्या भरायचे आहे त्यानंतर जर उमेदवार गटागटामध्ये या कर्जास अर्ज करणार असतील तर त्या ठिकाणी तसे नमूद करायचे आहे सर्व माहिती भरून भरून झाल्यावरती भरून झाल्यावरती सबमिट्या बटणावरती क्लिक करून सबमिट करायचे आहे.
  • सबमिट झाल्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून त्याच्या पीडीएफ फाईल त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर सर्व व्यवस्थित कागदपत्रे अपलोड प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर सबमिट या बटणावरती क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायचे आहे.

तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता जर समजा तुम्हाला ही अर्ज प्रक्रिया खूपच अवघड किंवा हे अडचणीची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन Annasaheb Patil Yojana या योजनेसाठी अर्ज करू शकता.

अण्णासाहेब पाटील योजना निष्कर्ष

अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यातील सुशिक्षित व बेरोजगार तरुण तरुणींसाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना राबवली आहे यामध्ये त्या तरुणांना विनव्याजी 10 लाखापासून ते 50 लाखापर्यंत व्यवसायासाठी व इतर उद्योगधंदे उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते यामध्ये पाच वर्षाच्या कालावधीत तरुण व्यवसायिकांना या कर्जाची परतफेड करावयाची आहे. योजनेच्या माध्यमातून ते स्वतःचे व्यवसाय व उद्योगधंदे नवीन सुरू करू शकतात व तसेच आहे तेच उद्योगधंदे ते वाढवू शकतात व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकतात तसेच ते आत्मनिर्भर बनवून नवनवीन रोजगाराच्या संधी इतर तरुणांसाठी ते उपलब्ध करू शकतात.


अधिक वाचा – शेळी पालन योजनेविषयी माहिती

अधिक वाचा – सोलर पंप योजनेची सविस्तर माहिती वाचा

अधिक वाचा – आधार कार्डच्या माध्यामातून कर्ज मिळणार


FAQ’s

1). अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेच्या अंतर्गत किती रक्कम कर्ज स्वरूपात मिळू शकते?

उत्तर – अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक व्यक्तीस दहा लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.

2). अण्णासाहेब पाटील कर्ज योजने साठी अर्ज कुठे करायचा?

उत्तर –अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे त्यामध्ये महास्वयम या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

3). अनुसूचित जाती जमातीतील नागरिक अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकतात का?

उत्तर –अनुसूचित जाती जमाती येथील व सर्वसाधारण जातीतील सर्व नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

4). अण्णासाहेब पाटील कर्ज योजना म्हणजे काय?

उत्तर –अण्णासाहेब पाटील कर्ज योजना म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी व्यवसाय करण्याकरता त्यांना विना व्याज कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्या योजनेस अण्णासाहेब पाटील कर्ज योजना असे म्हटले जाते.

5). अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे व्याजदर किती आहे?

उत्तर – अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून विना व्याजी कर्ज दिले जाते. त्याला कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही.

6 thoughts on “व्यवसायासाठी पाहिजे कर्ज तर असा करा अर्ज Annasaheb Patil Yojana 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top