माझे आजोबा निबंध मराठी । Majhe Ajoba essay in Marathi

माझे आजोबा निबंध मराठी । Majhe Ajoba essay in Marathi

मित्रांनो तुम्हाला सुद्धा माझे आजोबा(majhe ajoba marathi nibandh) या टॉपिक वर मराठी निबंध लिहायचे असेल, आणि तुम्हाला निबंधाची सुरुवात कुठून करायची हे कळत नसेल तर तुम्ही योग्य वेबसाईट वर आला आहात. मित्रांनो आजोबांचे महत्त्व आपल्या आयुष्यात पटवून देण्यासाठी मी हा सुंदर असा निबंध तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे.

Majhe ajoba marathi nibandh

माझे आजोबा आम्हा सर्व नातवंडासाठी सायंकाळी रोज एक तास राखून ठेवतात. संस्काराच्या अनेक गोष्टी सांगतात, नवनवीन गमती जमती सांगतात. म्हणूनच  मला ते माझ्या आई-बाबांशी खूप जास्त आवडतात.

माझे आजोबा सातवी शिकलेले आहेत. पूर्वी सातवीपर्यंत शिक्षण घेतले की शिक्षक होता येत असे, असे माझे आजोबा सांगतात. त्यांचे अनेक वर्गमित्त शिक्षक झाले. पण माझ्या आजोबांनी मात्र शेतकरी होणे पसंत केले. का? ते मात्र आजही माझ्या बालमनाला उमगले नाही. खरं तर आजोबांकडील ज्ञान पाहता, ते शिक्षकांचेही शिक्षक शोभतील असेच आहे.

माझ्या आजोबांचा दिवस सकाळी पाच वाजता सुरु होतो. सकाळी सकाळी थंड पाण्याने आंघोळ करून ते गावातील सर्व देवळांत जावून येतात. जवळ-जवळ चार किलो-मीटरचा पायी फेरा पूर्ण होतो. सकाळी सात वाजता देवपूजा करून ते आमच्याजवळ येऊन बसतात. आम्ही त्यावेळी अभ्यास करत असतो. आम्हाला अभ्यासात ते मदत करतात.

Mazi Aaji Nibandh In Marathi

एखाद गणित येत नसेल तर आम्ही आजोबांना विचारतो. ते उत्तर सांगत नाहीत. फक्त उत्तरापर्यंत जायचा मार्ग दाखवतात. एखादी गोष्ट उदाहरण देवून पटवून देतात. दहा वाजता आमच्याबरोबर ते आमच्या शाळेपर्यंत येतात. आम्ही जातो शाळेत, आणि आजोबा जातात शेतात. आजोबा शेताकडे फिरून घरी जातात. आजोबांनी घरी दोन-दोन वृत्तपत्रे, वेगवेगळ्या प्रकारची मासिके सूरु केली आहेत. वाचन हा त्यांचा आवडता छंद. आजोबा दुपारी हे सर्व वाचत असतात. कधी कधी आम्हालाही ते वाचायला लावतात.

रविवारी आम्हाला ने शेतात घेऊन जातात. सर्व प्रकारची पिके, त्यांची वाढ, खते, शेतातील अवजारे यांची नावे आम्हांला आजोबांमुळेच माहित झाली आहेत. माझ्या वर्गातील मुलांना जे ने माहित नाही, ते सर्व मला माहित आहे. ते केवळ आजोबांमुळेच. माझे आजोबा माझ्यासाठी ‘मिनी ग्रंथालय’ आहेत. माझ्या बाल जगातील ते ‘ इंटरनेट’ आहेत. माझ्या गोष्टींचा खजिना असणारी ती एक ‘अलिबाबाची गुहाच’ आहे. माझे आजोबा म्हणजे चालते बोलते विदयापीठच आहेत.

माझे आजोबा शिक्षक होते त्यामुळे त्यांना दर महिन्याला पेन्शन भेटते ज्या दिवशी त्यांना पेन्शन भेटते त्या दिवशी ते घरामध्ये सर्वांसाठी मिठाई किंवा फळ घेऊन येतात माझे आजोबा आम्हा दोन भावंडांचा खूप लाड करतात आमचे बाबा आमच्यावर रागवतात तेव्हा आमच्या आजोबाच आमच्याजवळ येऊन आम्हाला समजतात. मला रात्री माझ्या आजोबांसोबत झोपायला भरपूर आवडतं.

आजोबांचा उत्साह आज ७५ व्या वर्षीही कायम आहे. आमच्याशी अंगणात खेळताना तर ते बारा वर्षाच्या मुला-प्रमाणे खेळतात. मला त्यांच्याशिवाय जराही करमत नाही. वाटते सर्वांनाच माझ्यासारखे आजी-आजोबा असावेत. आणि वर्षानुवर्ष माझ्यासोबत असेच राहू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना.

” मीच आहे खरा भाग्यवान,

लाभले मला आजोबा छान!”

माझे आजोबा १० ओळी मराठी निबंध । Maze Aajoba 10 Oli Marathi Nibandh

  1. माझ्या आजोबांचं नाव नरहरी देशमुख असे आहे.
  2. माझ्या आजोबांचं वय हे 75 वर्षे आहे.
  3. माझे आजोबा सकाळी पाच वाजता उठतात आणि उठून व्यायाम करतात.
  4. माझे आजोबा घरातील सर्वात मोठे आणि प्रमुख सदस्य आहेत.
  5. आजोबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट घरातील सगळे लोक मान्य करतात.
  6. माझ्या आजोबांना वाचनाचा छंद आहे.
  7. माझ्या आजोबांना न्यूज पेपर आणि इतिहासा संबंधित पुस्तके वाचायला खूप आवडतं.
  8. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझे आजोबा माझ्यासोबत भरपूर वेळ व्यतीत करतात.
  9. सुट्टी असली की माझ्या आजोबा माझ्यासोबत लुडो, लपाछपी, सापशिडी असे खेळ खेळतात.
  10. मला सायकल चालवायला सुद्धा माझ्या आजोबांनी मला शिकवलं. 

मला आशा आहे तुम्हाला Majhe Ajoba essay in Marathi या टॉपिक वर लिहिलेला आमचा हा निबंध आवडला असेल. तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.

Aakriti Deshmukh

नमस्कार मित्रांनो, मी आकृति देशमुख, मी B.SC IT केली असून पुण्यामधील एका प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करते. लहानपणासूनचच मला वाचनाची आवड होती आणि कॉलेज ला गेल्यापासून मला लिहायची आवड निर्माण झाली आणि त्यातूनच मी marathideliynews.com या वेबसाइट ची सुरुवात केली आहे, मी मला माहिती असलेल्या टॉपिक वर सखोल माहिती घेऊन माझ्या या ब्लॉग वर लेख लिहिते.

Leave a Comment