माझी आजी मराठी निबंध लेखन | Mazi Aaji Nibandh In Marathi

Mazi aaji marathi nibandh

Mazi Aaji Nibandh In Marathi: आजी म्हणजे आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील सगळ्यात सुंदर पान, जिथे आपले सगळे गुन्हे माफ होतात. आणि जिथे फक्त आणि फक्त आपले लाड होतात ती म्हणजे आजी. आपला आई-वडिलांच्या नंतर आपल्या वरती कोण नितांत प्रेम करत असेल ती म्हणजे आजी, आज माझ्या आजी साठी का लिहून काय नको कारण तिच्या मायेची सुरुवातच कुठून करावी हेच मला समजत नाहीये.आपण कितीही खोडकरपणा केला तरी, सगळे गुन्हे आपल्या पोटात घेऊन आपल्या अंगावर मायेची शाल पांघरणारी आपली आजी असते. जन्माला आल्यानंतर आणि मोठे झाल्यानंतर ही आपल्याला काही त्रास झाला तर आपल्या वरती मीठ मोहरी उतरून टाकणारी आपली आजी किती मायाळू आणि प्रेमळ असते.

Mazi Aaji Nibandh In Marathi

माझी आजी निबंध मराठी | Mazi Aaji Nibandh In Marathi

     आपण जन्माला यायच्या अगोदर पासूनच घरामध्ये जी आतुरतेने वाट बघते ती आपली आजी आपण मोठे झाल्यानंतर आपल्याला  मायेने आपल्या थरथरत्या हातून आपल्या पाकिटातील पैसे काढून द्यायला सगळ्यात पुढे असते. आपल्या नातवांच्या आवडीनिवडी सांगायची सुद्धा तिला गरज नाही . शाळेतून आलो की आपल्या आवडीचा खाऊ जेव्हा हातामध्ये भेटतो, तेव्हा समजून जायचं आज आपल्या आजीने आपल्या मायपोटी आपल्याला खूप सारा खाऊ करून ठेवला आहे. 

जेव्हा तिचं नातवंडे जन्माला येतं ,तिचे हात थरथरत असतात पण आपल्या नातवंडांना पहिली अंघोळ घालणारी आपली आजीच तर असते. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा अख्ख्या जगभर कांगावा करून सांगणारी की माझं नातवंडे जन्माला आलेला आहे तेव्हा तिला किती आनंद होतो हे आपण समजू शकत नाही.

Mazi Aaji Nibandh In Marathi

       आपण आयुष्यात किती मोठे होऊ देत. पण जेव्हा आपली आजी मायने आपल्याला कुशीत घेते तेव्हा मात्र साऱ्या जगाचे तिच्या कुशीमध्ये भेटतं. जेव्हा तिचा तो थरथरता आहात आपल्या डोक्यावरून फिरतो तेव्हा या जगात याच्यासारखं सुखाची माया कुठेच नाही याची जाणीव मात्र नक्कीच देऊन जाते.

माझी आई मला सांगायची की जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा सगळ्यात जास्त आनंद माझ्या आजीला झाला होता. मला आजही आठवतं मी शाळेतून यायच्या वेळेवरती माझी आजी घराच्या अंगणामध्येच माझी वाट बघत बसते. थोडासा जरी वेळ इकडे तिकडे झाला. तरी ती कावरी बावरी होऊन जाते. आणि मी घरी जायच्या रस्त्यावरती दिसलो की मनात हजार प्रश्न घेऊन माझ्यासमोर उभी ठाकाते किती ते निरागस तिचे आयुष्यभर आपल्या मुलांसाठी जगायचं आणि आपली नातवंड आली की मग आपलं उरलेलं सगळं आयुष्य त्यांच्यासाठी बहाल करायचं.

अंगभर लुगडं, हात भरून हिरव्या काचेच्या बांगड्या, कपाळाला शोभेल अशी मोठी टिकली, दोन्ही हातावरती गोंदण भरलेले, पायामध्ये  भरगच्च अश्या  मोठ्या मासोळ्या, आणि तिचा डोक्यावरून कधीच न खाली येणारा पदर, आणि मुखामध्ये तिच्या कायमच गोडवा अशी ही माझी आजी.

Majhe Ajoba essay in Marathi

Mazi Aaji Nibandh In Marathi

माझी आजी माझ्यासोबतच लहान होऊन जाते. माझ्यासोबत कोणी खेळायला जरी नसले तरी माझी आजी माझ्यासोबत प्रत्येक खेळ खेळाते. आम्ही लपंडाव खेळत असतो तिला माहीत असायचं की मी कुठे लपून बसलो आहे पण माझ्या आनंदासाठी ती मुद्दाम इकडे तिकडे मला शोधायची. तिच्यासोबत खेळ खेळण्यात एक वेगळीच मजा आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिच्या सोबत शेतामध्ये जाऊन फिरण्याची मला आणि माझ्या आजीला मोठी हौस. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिच्या हाताचे आंब्याचे लोणचे म्हणजे अमृतच.

आई किंवा बाबांनी मला कुठल्या गोष्टींसाठी रागावले तर त्यांच्या ओरडण्यापासून वाचवणारी माझी आजीच आहे. माझ्या आजीकडे ज्ञानाचे इतके मोठे भांडार आहेत की काही असो माझ्या आजीला विचारले की लगेच मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळते. कुठलाही शाळेमध्ये माझी आजी शिकली नाही. पण तिच्या ज्ञानाचे कुतूहल कायमच मला वाटते.‌ माझी आजी अडाणी असली तरी बदलत्या जगाबरोबर आणि विचारसरणी बरोबर ती सुद्धा बदलत आलेली आहे. मग ते जात्यावर ती बसून ओवी म्हणत धान्य दळणे ते मोबाईल वरती व्हाट्सअप चालवणे या सगळ्या गोष्टी माझ्या आजीला येतात.

 

Mazi Aaji Nibandh In Marathi

 

माझी आजी घरामध्ये खळखळून असली की घरामध्ये साऱे ऐश्वर्य नांदल्यासारखे वाटते. लहानपणापासून मी बघत आहे की तुळशीला पाणी घालण्याचा तिचा नियम आजपर्यंत कधीच चुकला नाही. अंगणातल्या तुळशीचं आणि माझ्या आजीचं असं काही नातं आहे की जणू त्या सख्या जिवाभावाच्या मैत्रिणीच. म्हणूनच की काय माझ्या दाराच्या अंगणातील तुळस वर्षानुवर्षे आनंदाने फुलत आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर अंगणामध्ये रांगोळीचा सडा टाकल्याशिवाय आणि आमच्या घराच्या मंदिरातील  देवांना फुलांनी सजवल्याशिवाय तिचा दिवस सुरू होत नाही.

माझ्या आजीच्या हाताची भाकरी च्या चवीला जगातील कुठल्याच पंचपकवानांची सर नाही. दररोज रात्री झोपताना तिच्या तोंडून गोष्टी ऐकल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. माझ्या आजीसारखा निस्वार्थ प्रेमाची सावली देणारा वटवृक्ष या जगात कुठेच नाही. म्हणूनच माझी आजी घरात असली की आमचं सगळं घर भरल्यासारखं वाटतं. माझी आजी म्हणजे माझ्या संस्कारांचा पाया. आणि मला खात्री आहे की तिच्या या संस्कारांच्या गाठोड्या बरोबर आणि तिने दिलेल्या आयुष्यातील अनुभवांच्या गोष्टींबरोबर आम्ही पुढे गेलो तर आम्ही आयुष्यात खूप मोठे होऊ. मोठ वाढलेलं झाड जसं अधिक सावली देतं अगदी तसंच आहे माझ्या आजीचं.

माझ्या आजीने मला सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि एक गोष्ट कायमच सांगत आली आपण किती जरी मोठे झालो ,किती जरी शिकलो, तरी आपण आपली जी संस्कृती आहे तिला कधीच विसरायचे नाही. आपल्या डोक्यावरचा पदर म्हणजे अडाणीपणाचे लक्षण नव्हे तर ते एक सुसंस्कृत संस्कारांचे, विचारांचे आणि समोरच्या व्यक्तीच्या प्रति आदर आहे हे मला माझ्या आजीने समजून दिले आहे.

 

Mazi Aaji Nibandh In Marathi

 

जर कोणी आजी म्हणजे काय असं जर मला विचारलं तर मी नक्की सांगेन आजी म्हणजे मार आणि माया या दोन्हींचा मिलाप . आजी म्हणजे माझ्या खाऊ चा डब्बा, माझी आजी म्हणते ऐकत रहावी अशी सुंदर अभंग वाणी. राम कृष्णाच्या गोष्टी म्हणजे माझी आजी, संस्कारांचं गाठोड म्हणजे माझी आजी आणि    रखरखत्या उन्हात मायेचा गारवा म्हणजे माझी आजी.

प्रेमाच्या चार गोष्टी म्हणजे आजी, प्रेमाचा खळखळता वाहता झरा म्हणजेच माझी आजी. मऊ लोण्याचा गोळा , मायेचं साजूक तूप म्हणजे माझी आजी. चांदण्यातल्या गोष्टी म्हणजे माझी आजी, जिथे जगातले सगळे गुन्हे माफ हे ठिकाण म्हणजे आजी. आजीची माया म्हणजे गोड मुरांबा, आजी म्हणजे कधी न संपणारी माया, अशी ही माझी आजी जिला या आयुष्यात कशाचीच तोड नाही. आजी तुला खूप सारे प्रेम.


असेच नावीन्यपूर्ण निबंध पुढे वाचा


Aakriti Deshmukh

नमस्कार मित्रांनो, मी आकृति देशमुख, मी B.SC IT केली असून पुण्यामधील एका प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करते. लहानपणासूनचच मला वाचनाची आवड होती आणि कॉलेज ला गेल्यापासून मला लिहायची आवड निर्माण झाली आणि त्यातूनच मी marathideliynews.com या वेबसाइट ची सुरुवात केली आहे, मी मला माहिती असलेल्या टॉपिक वर सखोल माहिती घेऊन माझ्या या ब्लॉग वर लेख लिहिते.

3 thoughts on “माझी आजी मराठी निबंध लेखन | Mazi Aaji Nibandh In Marathi”

  1. some months back i lost my AAJJI. after reading this i’m in my tears. whenever i rea anything related to ajji i get too emotional. just i miss her too much.

    Reply

Leave a Comment