Shetatale Anudan Yojana: महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यातर्फे भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या शेतीसाठी अदितीय योजना महाराष्ट्र सरकार राबवत असते. यामध्ये शेतकऱ्यांच्या संपूर्ण गोष्टीचा विचार या योजनेच्या पाठीमागे असतो तसेच आजची योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक विशेष अनुदान योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकरी बांधवांना शेतामध्ये शेततळे बांधणीसाठी हे अनुदान दिले जाणार आहे या योजनेमध्ये पाठीमागच्या वेळेस जे कोणी शेतकरी अर्ज न करू शकल्यामुळे किंवा त्यांना पात्रते संदर्भात भरपूर अडचणी आल्यामुळे ते शेतकरी पाठीमागच्या वेळेस अनुदानासाठी व्यवस्थितरित्या अर्ज करू शकले नव्हते तसेच काही शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्जही करता आला नव्हता तर यावर्षी 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने या शेततळे अनुदान योजने ची ची अर्ज प्रक्रिया सुरू केले आहे.
यामध्ये या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीसाठी वैयक्तिकरित्या शेततळे बांधायचे आहे परंतु त्यांना आर्थिक सहाय्य तसेच आर्थिक अडचण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भासते त्यामुळे त्यांना उन्हाळ्याच्या वेळेस किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जलदुर्ग आहे अशा ठिकाणी त्यांना व्यवस्थित रित्या शेती करता येत नाही दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये भास होत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पिकासाठी व्यवस्थित सिंचन पद्धती राबवण्यात ते कमी पडतात तसेच त्यांना पुरेपूर पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. सध्या परिस्थिती पाहता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हे दुष्काळाचे सावट आहे अशा प्रकारच्या दुष्काळांच्या आपत्ती पासून शेतकरी बांधवांना एक मदतीचा हात म्हणून किंवा ही सर्व अडचण शासनाने लक्षात घेऊन शेतकरी बांधवांसाठी शेतकऱ्यांना थेट शेततळा मान्यसाठी उभारणीसाठी महाराष्ट्र शासन हे अनुदान पुरवत आहे.
यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या अंतर्गत शेततळ्यांना अनुदान दिले ही Shetatale Anudan Yojana योजना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगाची ठरणार आहे कारण दुष्काळाच्या वेळेस शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भरपूर प्रमाणामध्ये भेडसावते तसेच जलसाठ्यांचे जलस्तर हे मोठ्या प्रमाणामध्ये खालावले जातात तर ह्या बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने ही शेततळे योजना शेतकऱ्यांसाठी अस्तित्वात आणले आहे. तरीही शेततळे योजना म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेच्या अंतर्गत या शेततळे उभारणीसाठी उभारणीसाठी शासनाकडून शेतकरी बांधवांना शेततळ्याच्या उभारणी बांधणीसाठी 2023 24 या वर्षांमध्ये राज्य सरकारने कृषी विभागाला 79 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्या अंतर्गत शेतकरी जे वैयक्तिक शेततळे बांधण्यासाठी या योजनेअंतर्गत त्यांना अनुदान मिळणार आहे या पाठीमागच्या वर्षांमध्ये जी योजना शेततळ्यासाठी राबवली गेली होती ती त्या योजनेअंतर्गतच या योजनेमध्ये अनुदान तर शेततळे उभारणी व बांधणीसाठी तसेच शेततळे खोदकाम प्लास्टिक ताडपत्री व इतर कामांसाठी हे अनुदान महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आपले बांधव आहेत त्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घ्यावा तसेच या अनुदाना अंतर्गत आपले शेततळे हे व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्यावे Shetatale Anudan Yojana या योजनेसाठी महाराष्ट्रातील शेतकरी बांधव हे मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज करू शकतात तसेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
सध्याची राज्याची स्थिती पाहता राज्यातील 48 जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात कमी आहे तसेच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे हे पावसाच्या पाण्यावरती निर्भर असतात व त्यांच्या शेतीच्या सिंचनासाठी लागणारे जलसाठे आहेत त्यांचे पडणाऱ्या पावसामुळे जल पातळीचे प्रमाण हे ठरत असते परंतु पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे जे नैसर्गिक जल स्त्रोत आहेत जसे की नालेवडे असतील किंवा विहिरी असतील बोरवेल असतील यांना कमी प्रमाणामध्ये पाणी आहे या कमी प्रमाणातील पाण्यावरती शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आहे कमी प्रमाणामध्ये निघते तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली जाते या शेतकरी बांधवांसाठी ही शेततळे योजना वरदान ठरणार आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकरी शेततळ्यामध्ये पाणी साठवून यावेळेस त्यांना गरजेचे आहे त्यावेळेस ते पाणी ते पिकांसाठी वापरू शकतात किंवा तसेच असणाऱ्या नैसर्गिक जल स्त्रोतातील कमी प्रमाणामध्ये निघणारे पाणी ते शेततळ्यामध्ये साठवून तेथून व्यवस्थित व स्थिर असा पाण्याचा पुरवठा त्यांच्या पिकासाठी करू शकतात व पीक व्यवस्थित आणू शकतात. त्यामुळेच या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे शेतकरी बांधव हे शेततळे हे वैयक्तिकरित्या उभारू शकतात.
शेततळे अनुदान व पात्रता निकष व बाबी
या योजनेमध्ये शेततळे व बांधणी व उभारणीसाठी सरकारी अनुदान किती येणार आहे किंवा शेततळ्याच्या आकारमान व त्याच्या आकारमानावरती शेततळ्याचे अनुदान कसे असेल हे या ठिकाणी पाहू.
तर शेतकरी बंधुनो, यामध्ये महाराष्ट्र शासन मागेल त्याला शेततळे (Shetatale Anudan Yojana ) तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या अंतर्गत महाराष्ट्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे उभारणीसाठी रुपये 75000/- हजार इतके अनुदान देण्यात येणार आहे तसेच यामध्ये संपूर्ण शेततळे बांधणी जी काम संपूर्ण प्रमाणामध्ये पूर्ण झाल्या नंतर त्याला 75000/- हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. यामध्ये बांधणी अगोदर व बांधणीनंतर या दोन्ही टप्प्यात शेतकऱ्यांना हे अनुदानाचे हप्ते दिले जातात. सध्या महाराष्ट्र राज्यातील एकूणच 1665 शेतकऱ्यांना अनुदान देण्याची अंमलबजावणी हे राज्य सरकारच्या कृषी विभाग मंडळातर्फे करण्यात येत आहे.
यामध्ये जो कोणी शेतकरी या Shetatale Anudan Yojana योजनेसाठी अर्ज करणार आहे, त्याच्या मालकीची किंवा त्याच्या नावावर किमान किमान 0.60 हेक्टर शेतजमीन असणे गरजेचे आहे 0.60 म्हणजेच एकरामध्ये सांगायचं झाल्यास किमान 1/5 (दीड एकर) एवढं शेती क्षेत्र त्या अर्जदार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरती असायला हवे तरच त्यांना या अर्जासाठी अर्ज भरणी करता येईल तसेच हे अनुदान घेण्याच्या अगोदर शेतकऱ्यांनी कोणत्याही पद्धतीचे सरकारी अनुदान हे शेततळे बांधणी व उभारणीसाठी घेतलेले नसावे याची या ठिकाणी शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी तसेच कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत ज्या निवड केलेल्या शेती क्षेत्र व शेतीची संपूर्ण कामे हे व्यवस्थित रित्या पूर्ण करणे गरजेचे आहे.
ज्यावेळेस शेतकरी बांधवांना शेततळे अनुदान मंजुरी पत्र मंजूर झाल्यापासून येणाऱ्या पुढील काळातील तीन महिन्यांच्या आत मध्येच संपूर्ण शेतीची कामे तसेच इतर शेती वजा कामे देखील योग्यरीत्या पूर्ण करणे गरजेचे आहे यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या किंवा तुमच्या तालुका व जिल्हा ठिकाणी असणाऱ्या कृषी क्षेत्राच्या निगडित व इतर अधिकाऱ्यांशी यासंदर्भात सविस्तरपणे चर्चा करू शकता किंवा तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या या अनुदानासाठी उपलब्ध असणाऱ्या वेबसाईट वरती जाऊन पाहणी करावी. किंवा तुमच्या तालुक्यात किंवा गावच्या पातळीवरील कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांसारख्या सरकारी कृषी मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्याकडून या अनुदाना विषयाची सविस्तर व योग्यरीत्या माहिती करून घ्यावी.
शेततळे आकारमान व त्या नुसार येणारे अनुदान
अ.क्र | शेततळे आकारमान ( मी.) | इनलेट/आउटलेट खाणकाम व ट्रॅप्स सोबत येणारे शेततळे ( सरकारी अनुदान रक्मम (रु.) ) (बाजूचा उतार १:१) | इनलेट/आउटलेट खाणकाम व ट्रॅप्स सोबत न येणारे शेततळे ( सरकारी अनुदान रक्मम (रु.) ) (बाजूचा उतार १:१) |
1. | 15X15X3 | 23,881/- | 18,621/- |
2. | 20X15X3 | 32,034/- | 26,774/- |
3. | 20X20X3 | 43,678/- | 38,417/- |
4. | 25X20X3 | 55,321/- | 50,061/- |
5. | 25X25X3 | 70,455/- | 65,194/- |
6. | 30X25X3 | 75,000/- | 75,000/- |
7. | 30X30X3 | 75,000/- | 75,000/- |
8. | 34X34X3 | 75,000/- | 75,000/- |
Shetatale Anudan योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
या योजनेसाठी शेतकरी अर्जदारास कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत. त्या संदर्भात या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे माहिती पाहू,
- तर सर्वप्रथम अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड.
- तसेच पॅनकार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक.
- राहात असलेल्या गावचा रहिवाशी दाखला.
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- तसेच त्याच्या नावे असणारा सातबारा व आठ अ हा उतारा.
- शेतकयांच्या जात प्रमाणपत्र.
- पासपोर्ट साईचे दोन फोटो.
- शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक.
तरी वरील सर्व कागदपत्रे त्यामध्ये दाखले, पॅनकार्ड, तसेच ओळखीचे प्रमाणपत्र यांसारख्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी स्वतःकडे असल्याची खात्री करूनच अर्ज भरण्यासाठी CSE केंद्रास भेट द्यावी.
या योजनेकरिता अर्ज करण्याचे मार्गदर्शन, Shetatale Anudan Yojana
या ठिकाणी शेतकरी बांधवास त्याने स्वतः अर्ज भरावयाचा असल्यास किंवा तो भरू इच्छित असल्यास त्याने सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच महाडीबीटी या वेबसाईटला त्यांनी त्यांच्या मोबाईल फोन किंवा लॅपटॉप वरती ओपन करून सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे.
MAHADBT WEBSITE | येथे अर्ज करा |
त्यानंतर या शेततळे Shetatale Anudan Yojana योजना म्हणजेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी या अर्जासाठी लागणारी सर्व प्रकारची माहिती त्यांनी त्यांच्या जवळच्या मंडलातील कृषी सहाय्यक किंवा त्या कृषी क्षेत्रातला प्रशासकीय अधिकारी यांच्याशी वैयक्तिकरित्या भेटून घ्यावी.
या शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप किचकट आहे. किंवा खूप अवघड आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना शक्य असेल तर त्यांनी स्वतः भरला तरी चालेल परंतु आम्ही तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्र या ठिकाणी जाऊनच अर्ज करावा असे आग्रह करेल.
कारण हा फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी ह्या ऑनलाइन अपडेट करणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचा सातबारा आहे तर व एकरानुसार फॉर्ममध्ये भरणे आवश्यक असते. त्यामुळे हा फॉर्म एकदम बारीक लक्ष देऊन भरावा लागणार आहे यामध्ये कोणते प्रकारची चूक होणार नाही याचीही दक्षता शेतकरी बांधवांनी घ्यावी. त्यामुळे शक्यतो जवळच्या सीएससी केंद्र या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरणे सोयीस्कर ठरेल.
Shetatale Anudan Yojana निष्कर्ष
राज्यामध्ये प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या भागात दुष्काळ पडत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता बसत असते त्यामुळे त्यांना त्यांच्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांची विकी पाणी अभावी जुळून जातात. शेतकऱ्यांनी स्पष्ट केलेल्या सर्व पिकावरती आघात होतो त्यामुळे शेतकरी आत्महत्या व इतर चुकीचे पाऊल उचलतात त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून शेततळे उभा करण्यासाठी शेतकऱ्यास 75000 अनुदान दिले जाते त्या अनुदानातून ते शेततळे बांधून त्यांच्या शेताला व्यवस्थित रित्या पाणी देऊ शकतात.
अधिक वाचा – 75 टक्के अनुदान । kadaba kutti machine yojana 2024
अधिक वाचा –30 वस्तूंचा मोफत भांडी संच, bandhakam kamgar yojana 2024
अधिक वाचा – आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये, मुख्यमंत्री वयोश्री योजना
आपल्या ब्लॉग वरती असेच शेती संदर्भात योजना व इतर सरकारी योजना यांचे दररोज अपडेट येत राहते. वरील तुम्हाला सर्व माहिती आवडली असल्यास व तुमच्या उपयोगी पडले असल्यास तुम्ही निश्चितपणे तुमच्या शेतकरी मित्र परिवारामध्ये शेअर करू शकता. व त्यांनाही या Shetatale Anudan Yojana योजनेच्या लाभाबद्दल सांगू शकता.
FAQ’s
1).शेततळे अनुदान योजनेतून किती अनुदान शेततळे बांधण्यासाठी केली जाते?
उत्तर – शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी सरकारकडून 75 हजार इतके अनुदान दिले जाते.
2).75 हजार अनुदान हे शेततळ्याच्या किती आकारमानासाठी दिले जाते?
उत्तर – 75 हजार अनुदान हे शेततळ्याचे 34X34X3 या आकारमानासाठी दिले जाते
3).शेततळे योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
उत्तर – शेततळे अनुदानासाठी शेतकरी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरती ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4).शेततळे अनुदान अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची शेत जमीन असणे गरजेचे आहे का?
उत्तर – शेततळे अनुदान अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची दीड एकर जमीन असणे गरजेचे आहे.
5).शेतकऱ्यांना किती टप्प्यात अनुदानाची संपूर्ण रक्कम मिळते?
उत्तर – शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये अनुदानाचा संपूर्ण रक्कम दिली जाते.
Yojana madhe nivd kadhi hoel