Sant tukaram information in marathi: आपल्या महाराष्ट्राला पुरातन काळापासूनच संताची परंपरा लाभलेली आहे. संतामुळे महाराष्ट्रातील मराठी भाषेला वाडं:मयचा मोठा वारसा मिळाला आहे.म्हणून महाराष्ट्राच्या भूमी ला संताची भूमी म्हणून ओळखले जाते. या संतानी संत तुकाराम महाराजांनी त्याच्या अभंगतून पर्यावरणासंबधी,समाजातील जातिभेद,अंध श्रद्धा दूर करण्याचे संदेश आपल्याला दिलेले आहे. तर अश्या थोर संत तुकाराम महाराजविषयी आज आपण माहिती लिहणार आहोत.
श्री संत तुकाराम महाराज | Sant tukaram information in marathi
श्री संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायिक मधील एक प्रमुख थोर संत होते. त्यांचा जन्म 22 जानेवारी 1608 साली पुणे जिल्ह्यातील एका देहु या गावात झाला. तुकाराम महाराजांच्या आईचे नाव कनकाई होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा होते. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. . त्यांचा जन्म अत्यंत गरीब घरात झाला त्यामुळे त्यांना बऱ्याच सकंटाना समोरे जावे लागले. त्यांच्यावरच घराची सर्व जबाबदरी होती. संत तुकाराम महाराज व त्यांचे संपूर्ण कुटुंब हे विठ्ठलाचे भक्त होते आणि हेच त्याचे आराध्य दैवत. पंढरपूरच्या वारी ला जाणाची परंपरा चालत होती.
Tukaram maharaj mahiti marathi

तुकारामांचे पहिले लग्न हे वयाच्या 18 व्या वर्षी रुख्मिणीबाईशी झाले. रुख्मिणीबाई ही एक साधी,सरळ, धार्मिक होती. त्यांच्या सासंरीक जीवनात त्यांना खूप अडचणी आल्या. तुकाराम महाराज यांना खूप हालाकीचे जीवन काढावे लागले. कमी वयातच त्याचे आई वडील स्वर्गवासी झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर अजूनच वाईट वेळ आली होती. अकाली आलेल्या दुष्काळात त्यांच्या पत्नीचा आणि मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा संसार संपून गेला होता. ते पूर्ण पणे उदास झाले होते.
त्यानंतर त्यांच्या परिवाराने त्यांनी दुसरे लग्न करावे असा आग्रह केला.आणि मग जिजाईबाईशी (आवली) यांच्याशी दुसरे लग्न केले. आवलीबाई एक साध्वी आणि गुणी होत्या. त्यांनी तुकारामांच्या आध्यात्मिक प्रवासाला संपूर्ण साथ दिली.आणि तिथून त्यांनी अध्यात्माचा मार्ग पत्कारला आणि विठ्ठलाची भक्ति करू लागले. त्यांची उपासना करण्यासाठी महाराज भंडारा डोंगर गडावर गेले. तिथे त्यांना एक दिवस साक्षात परमेश्वर विठ्ठल यांनी दर्शन दिले.
Sant tukaram chi mahiti

तुकाराम महाराज आणि आवलीबाई यांच्यावर बरीच संकटे आली, तरीही त्यांनी हार न मानत महाराजांसोबत नेहमीच सोबत होत्या. जेव्हा तुकाराम महाराज आध्यात्मिक साधनेत असायचे तेव्हा अनेक वेळा काही विकृत विचारांच्या लोकांमुळे त्यांच्या वर अनेक अडथळे आली, पण आवलीबाईंनी त्या लोकांचा सामना केला. त्यानी महाराजांच्या साधतेत व भक्तीत कोणतेही अचूक होऊ दिले नाही अश्या प्रकारे आवली बाईचे त्यांच्या पतीसाठी सहकार्य केले. व महाराजांच्या साधनेत खंड पडु दिला नाही.
देहू गावात मंबाजी नावाचा बुवा होता. तो तुकाराम महाराजांना खूप त्रास देत असायचा एके दिवशी तुकाराम महाराजांच्या पत्नीने त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण तो तिथून पळून गेला. कालातंराने त्यानेही तुकारामांचे अध्यात्म ओळखले आणि त्याने शिष्य बनून राहायचे ठरवले. सतं तुकाराम हे संसारी असून सुद्धा त्यांनी परमेश्वराकडे पाठ फिरवली नाही. हळहळू त्यांनी संसाराचा त्याग केला आणि जगकल्याणाचा विचार केला.
समाजाला त्यांच्या अभंगातून मार्गदर्शन दिले, त्यांचे अभंग म्हणजे लोकांना समजणार अश्या भाषेतून त्यांचे विचार लोकापर्यंत पोहचविले या अभंगातूनच त्यांनी विठ्ठल भक्तीचे संदेश दिले. संताजी जगनाडे तुकारामांचे बालमित्र होते. आणि तेच हे तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेत असायचे. पण तिथे काही असे अनेक अवैचारीक लोक होते ज्यांना महाराजांचे विचार पटत नव्हते.त्या लोकांनी महाराजांना खूप त्रास दिला,त्यांना वेडा ठरवले होते तरी सुद्धा महाराजांनी हार मानली नाही.
Sant tukaram information in marathi in short

महाराजांनी त्यांच्या अभंगातून आपल्या समाजात चालत आलेल्या अंधश्रद्धा, जातीभेद, आणि सामाजिक अन्यायावर कडाडून टीका केली. त्यांनी प्रत्येक समाजातील लोकांना एक सारखे समजले. त्यांच्या परंपरेचा इत्यादि गोष्टीचा महाराजांनी आदर केला महिलांचे अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी त्यांना शिक्षणा मार्गदर्शन दिले. प्रत्येक भजन आणि कीर्तनाच्या शेवटी पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष केला जातो.कारण तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून लोकांना भक्तीचे मार्ग दाखवले आहे. त्यांनी त्यांच्या साहित्यातून व कीर्तनातून समाजात चांगले परिवर्तन घडविले आहे समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम महाराजांनी केलेले आहे.
संत तुकारामांचे अभंग हे वाणी कीर्तनातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे महत्त्वपूर्ण संत ठरले होते. त्यांनी बहुजन समाजाला जागृत केले. आणि देव व धर्म यामधील फरक समजविण्याचा प्रयत्न केला. संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना त्यांची गाथा ही नदीच्या प्रवाहात सोडून दिली होती . कारण काही लोकांनी त्याच्या अभंग आणि साहित्य यावर टीका केली होती त्यांच्यावर आरोप लावले गेले होते. म्हणून उत्तर देण्यासाठी महाराजांनी हे पाऊल उचलले होते.तरी सुद्धा त्यांनी पाण्यात सोडलेले सर्व अभंग आणि साहित्य काही दिवसांनी नदीच्या काठी सापडले.त्यामुळे लोकांच्या मनात श्रद्धेचे निर्मूलन झाले.
त्यांनी लिहलेली गाथा ही हिंदू धर्माची गीता आहे. तुकाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यात सुमारे 4500 अभंग रचले. या अभंगातून विठोबा भक्तीचे महत्त्व, समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, आणि अन्याय यांवर कठोर टीका केलेली आहे. त्यांच्या अभंगांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची साधी आणि सरळ भाषा,जी सामान्य लोकांना सहज समजून घेता येते. तुकाराम महाराजांचे समाधी स्थळ पुण्यातील देहू येथे आहे.
Sant tukaram yanchi mahiti

1649 साली महाराजांनी देहू येथे समाधी घेतली. समाधी घेण्याआधीच आपल्या अनुयायांना, कुटुंबीयांना आणि भक्तांना निरोप दिला होता आणि विठ्ठलाच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण केले.महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी शेवटच्या प्रवचनात आपल्या भक्तांना भक्तीचा मार्ग चालू ठेवण्याची आणि विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन राहण्याची प्रेरणा दिली होती. विठ्ठल भक्ति,समाजसेवा, शांती आणि अहिंसा या मुद्यांना प्रवचनातून समजावून सांगितले. त्यांच्या अभंगांचे वाचन, गायन आणि मनन केल्याने आपल्याला जीवनात सकारात्मकता येते आणि शांती व भक्तीचा मार्ग सापडतो.