MSRTC Holidays Pass Scheme: मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी बस च्या या अप्रतिम योजनेबद्दल तुम्हाला माहित आहे का ? लालपरी म्हणजेच आपली एसटी बस ही महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे. आज प्रवासाचे अनेक साधन उपलब्ध आहेत तरीपण सर्वसामान्य माणसाची पहिली पसंती परी ने असते. लाल परी ने प्रवास करण्याची स्वस्त आणि मस्त प्रवास एसटी बसच्या माध्यमातून करता येतो म्हणून प्रवासी लाल परीला इतकं महत्त्व देतात प्रवाशांची संख्या आणि लाल परीचे महत्त्व बघता एसटी महामंडळ (MSRTC ) प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी नवीन योजनांची घोषणा करत असते.
या योजनेचे म्हणजे नाव कुठेही मनसोक्त प्रवास योजना प्रवाशांन सोबत मैत्रीपूर्ण जिव्हळ्याचे नाते निर्माण व्हावी हे प्रवाशांना कमी खर्चामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसे की पर्यटन स्थळ धार्मिक स्थळ फिरता यावं, यासाठी महामंडळाने प्रवाशांसाठी कुठेही मनसोक्त प्रवास योजना ही योजना सुरू केली होती. MSRTC Holidays Pass ची हि कुठे ही मनसोक्त प्रवास योजना 1988 साला पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आजही उत्तम पद्धतीने चालवत आहे. आता या योजनेमध्ये काय सुविधा प्रवाशांना मिळतात, आणि किती रुपयांमध्ये प्रवाशांना या योजनेचा पास काढता येतो, कोणकोणत्या प्रकारच्या ST बस या मध्ये असणार आहेत, यांबद्दल ची सर्व विस्तृत माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
MSRTC Holidays Pass Scheme पासेस व बसेस संदर्भातील माहिती
या योजनेमध्ये प्रवाशांना सात (7) दिवस किंवा चार (4) दिवस याप्रमाणे दोन वेगवेगळ्या पासेस देण्यात येतात. या पासेसमध्ये दोन प्रकारचे पासेस प्रवाशांना घेता येतात साध्या बस सेवीच्या पास मध्ये प्रवाश्याना सर्व प्रकारच्या साध्या बसेस साठी म्हणजेच साधी एसटी बस, जलद एसटी बस, रातराणी शहरी आणि यशवंती बस मध्ये प्रवास करता येतो याशिवाय राज्य आणि आंतरराज्य मार्गावर सुद्धा हा पास वापरला जाऊ शकतो.
निमआराम बस सेवेसाठी स्वतंत्रदर निश्चित करण्यात आले नसले तरी शिवशाही बस सेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बस सेवेसोबतच साधी एसटी बस, निमआराम बस, नॉन एसी बस, स्लीपिंग आणि चेअर या सर्व बसेस मध्ये शिवशाहीचा हि पास प्रवाशांना वापरता येतो विशेष म्हणजे शिवशाहीचा पास सुद्धा राज्यांत तसेच इतर राज्य मार्गावर वापरला जाऊ शकतो. कुठेही मनसोक्त प्रवास या योजनेअंतर्गत चार दिवसाच्या आणि सात दिवसाच्या पास साठी वर्षातून दोन फेऱ्या म्हणजेच दोन वेळा निश्चित करण्यात आले येतात.
यामध्ये 15 ऑक्टोबर ते 24 जून हा गर्दीचा काळ असतो तर 15 जून ते 14 ऑक्टोबर हा कमी गर्दीचा काळ असतो त्यामुळे दोन्ही हंगामामधील पासच्या किमती मध्ये फरक असू शकतो. असं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चे म्हणणं आहे. या योजनेमध्ये देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदर प्रवाशांना घेता येतात या पासची व्हॅलिडीटी पहिल्या दिवशी रात्रीचे बारा वाजल्यापासून शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत असते आंतरराज्य प्रवास आणि महाराष्ट्र मधला प्रवास याची व्हॅलिडीटी सारखीच असते.
या MSRTC Holidays Pass योजनेचा प्रवास पास कुठे व कसा काढायचा
ज्या प्रवाशांना या Holidays Pass योजना संदर्भात पास काढायचा आहे त्यांनी आपल्या गावच्या किंवा आपल्या जवळच्या एसटी बस स्थानकामध्ये म्हणजेच आगारा मध्ये जाऊन त्या ठिकाणी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसोबत त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील कर्मचारी तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये पास बनवून देतात त्यामुळे पास काढायचा असल्यास जवळच्या एसटी स्थानकामध्ये जाऊन संपर्क साधावा.किंवा तुम्ही त्यांच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
येथे पास काढा
MSRTC Holidays Pass साठी लागणारी कागदपत्रे
पास काढण्यासाठी नागरिकांना कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात ते आपण खालील प्रमाणे पाहूया,
- पास करणाऱ्या नागरिकाचे कार्ड.
- पास काढणाऱ्या व्यक्तीच पॅन कार्ड.
- मोबाईल नंबर.
तर वरील दिलेली कागदपत्रे पास काढणाऱ्या नागरिकाकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. वरील कागदपत्रे नसतील तर त्यांना पाच मिळू शकणार नाही.
MSRTC Holidays Pass Scheme पास बद्दल काही अटी व नियम
या योजनेमध्ये काही अटी सुद्धा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ निश्चित केले आहेत.
- पास हरवला तर त्या ऐवजी दुसरा पास मिळू शकत नाही.
- हरवलेला पासचा कोणताही परतावा दिला जात नाही.
- हा पाच दुसऱ्या कोणालाही देता येणार नाही.
- पासचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त सुद्धा होऊ शकतो.
- संप किंवा काम बंद आंदोलन यामुळे प्रवासी प्रवास करून न शकल्यास प्रवास न केलेल्या दिवसाचा परतावा किंवा मुदतवाढ प्रवाशाला तीन महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये देण्यात येते.
MSRTC Holidays Pass Scheme पाससाठी येणारा खर्च
आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पाससाठी येणारा खर्च,
- साध्या बस पास साठी सात दिवसाचा खर्च आहे मोठ्या लोकांसाठी 2040/- रुपये तर बारा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी 1025/- रुपये इतका आहे.
- .शिवशाही बसच्या पास साठी हा खर्च हा मोठ्या लोकांसाठी आहे 3330/- रुपये आणि बारा वर्षापर्यंतच्या मुलांना 1520/- रुपये इतका आहे.
चार दिवसाच्या पासचा विचार करायचा झाला, तर
- साध्या बस सेवेसाठी मोठ्या लोकांचा खर्च आहे 1170/- रुपये आणि बारा वर्षापर्यंतच्या मुलांचा आहे 585/- रुपये एवढा आहे.
- शिवशाही पास साठी हाच खर्च मोठ्या लोकांसाठी 1520/- रुपये आणि बारा वर्षापर्यंतच्या मुलांना 765/- रुपये इतका आहे.
तर वरील पद्धतीने कोणत्या बससाठी किती प्रवास खर्च त्या पास साठी येणार आहे ते आपण या ठिकाणी दिलेले आहे यामध्ये समजा तुम्ही व तुमचे कुटुंब जर जात असाल तर तुमच्या कुटुंबामध्ये असणारे लहान मुलं व तुम्ही मोठी मंडळी यांच्यासाठी किती प्रमाणामध्ये खर्च येऊ शकतो वरील दिलेल्या रकमेचा आकडा लक्षात घेऊन तुमच्या कुटुंबाचे बजेट तुम्ही काढू शकता.
MSRTC Holidays Pass Scheme निष्कर्ष
महाराष्ट्र परिवहन मंडळांनी राज्यातील सर्व नागरिकांसाठी MSRTC Holidays Pass योजना राबवली आहे, यामध्ये नागरिकांना कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त प्रवास करता यावा यासाठी ही योजना राबवली आहे. या योजनेमध्ये दोन पास सुविधा उपलब्ध आहे यामध्ये 2040/- रुपये सात दिवसांसाठी व तसेच चार दिवसांसाठी 1170/- रुपये असे दोन पद्धतीचे पास महाराष्ट्र परिवहन मंडळाने या योजनेच्या माध्यमातून नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. ज्या त्या पासच्या नियमांद्वारे सात दिवस किंवा चार दिवस पाहिजे त्या ठिकाणी फिरू शकतात ही योजना नागरिकांचे पैसे वाचून त्यांना जास्तीत जास्त ठिकाणी फिरता यावे यासाठी आहे.
अधिक वाचा – PM Kisan FPO Yojana शेतकऱ्यांना १५ लाखाचा लाभ मिळणार
अधिक वाचा – पिक विमा खात्यांवरती कधी जमा होणार । Pradhan Mantri Fasal Bima Yojana
अधिक वाचा – आधार कार्डच्या माध्यामातून 50 हजारचं बिनव्याजी कर्ज मिळणार | PM Svanidhi Yojana 2024-25
FAQ’s
1). MSRTC Holidays Pass कोठे काढावा?
उत्तर- तुमच्या शहरातील किंवा गावातील बस डेपो मध्ये पास काढता येतील.
2). लहान मुलांसाठी पास गरजेचा आहे का?
उत्तर- बारा वर्षाच्या आतील मुलांना पास गरजेचा नाही परंतु बारा वर्षाच्या पुढील मुलांना पास असणे अनिवार्य आहे.
3).पास हरवल्यास दुसरा पास मिळू शकतो का?
उत्तर- एकदा पास हरवल्यानंतर तुम्हाला दुसरा पास मिळू शकणार नाही त्याच्या बदल्यात तुम्हाला नवीन पास काढावा लागेल.
4). प्रौढ व्यक्तींसाठी शिवशाही बस चा पास काढण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल?
उत्तर- प्रौढ व्यक्तींसाठी शिवशाही बसचा काढताना त्यांना सात दिवसांसाठी 3330/- रुपये व चार दिवसांसाठी 1520/- रुपये एवढी रक्कम भरावी लागेल.
5).MSRTC Holidays Pass योजना काय आहे?
उत्तर- MSRTC Holidays Pass योजनेअंतर्गत नागरिकांना कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त फिरता यावे यासाठी परिवहन मंडळाने ही योजना राबवली आहे.
3 thoughts on “आता फक्त 1200 रुपये भरा आणि कुठेही मनसोक्त फिरा , MSRTC Holidays Pass Scheme”