आता वीज बिलाची चिंता संपणार, Smart Meter

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smart Meter 2024 :आज आपण केंद्र सरकार राबवत असलेल्या स्मार्ट मीटर या धोरणाबद्दल या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये घरामध्ये व शेतीसाठी व तसेच इतर ठिकाणी विज ही दैनंदिन जीवनामध्ये वापरत असता. माणसाची जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा याप्रमाणेच विज ही पण एक मूलभूत गरज होऊन गेले आहे विजय शिवाय बरीच कामे ही अपूर्ण आहेत. तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये येणारी जी वीज आहे किंवा तुमच्या व्यवसायासाठी शेतीसाठी जी वीज तुम्ही वापरता त्या विजेसाठीच तुम्हाला येणाऱ्या पुढील काही काळामध्ये वेळच्यावेळी त्या विजेच्या बिलाचे पैसे भरावयाचे आहेत.

केंद्र सरकारचे हे Meter बसवण्या पाठीमागे बरीचशी कारणे आहेत यामध्ये तुम्हाला माहीतच आहे तुम्ही राहत असलेल्या आजूबाजूला बहुतांश त्या ठिकाणी वीज चोरी होत असते तर या विज चोरीला आळा घालण्यासाठी तसेच भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी असतील जे उद्योगधंदे करणारे तसेच झिरोच्या जीवनामध्ये विज वापरणारे म्हणजेच घरासाठी वीज वापरणारे तर हे काय करतात तर वेळच्यावेळी वीज बिल हे भरत नाहीत त्यामुळे वीज वितरण कंपन्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

Smart Meter
Smart Meter 2024

तसेच सरकारच्याही तिजोरी वरती याचा खूप मोठा प्रभाव होत आहे त्यामुळे सरकारने हे स्मार्ट मीटर येत्या पुढील काही महिन्याच्या कालावधीमध्ये हे महाराष्ट्र व इतर राज्यातील सर्व कमर्शियल नॉन कमर्शियल शेती या ठिकाणी हा आधुनिक मीटर बसवण्यात येणार आहेत तसेच या आधुनिक मीटर च्या पाठीमागे भरपूर प्रमाणामध्ये वीज ग्राहकांना अनेक फायदे होणार आहेत फायदे जसे की आपण जे रेगुलर वीज मीटर वापरतो.

त्यामध्ये भरपूर प्रमाणात बऱ्याचशा अडचणी होत्या तो आता येणार जो मीटर आहे तो स्मार्ट असल्याकारणाने यामध्ये ग्राहकाची वीज वाचणार आहे म्हणजे ग्राहक आपल्या मोबाईल फोन द्वारे त्या मीटरला नियंत्रित करू शकतात यामध्ये तुम्ही जेवढी वीज वापराल तेवढेच पैसे तुम्हाला मोबाईलच्या मीटर च्या असणाऱ्या एप्लीकेशन द्वारे पेड करायचे आहेत म्हणजेच विज बिल भरायचे आहे.

स्मार्ट मीटर ही संकल्पना काय आहे ?

आपण स्मार्ट मीटर कसा काम करतो वगैरे व इतर विषयी संपूर्ण माहिती घेऊ.
जे काही मीटर हे महावितरण येत्या काही काळामध्ये म्हणजेच एक ते दोन महिन्यांमध्ये बसवण्याचे काम पूर्ण करेल, यामध्ये घरामध्ये वापरली जाणारी उद्योगधंद्यांमध्ये वापरली जाणारी तसेच इतर ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणी हे आधुनिक मीटर मोफत बसवण्याचे काम हे MSEB म्हणजेच Maharashtra State Electricity Board हे पूर्ण करत आहे यामध्ये ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार व नियोजनानुसार व त्यांच्या गरजेनुसार त्यांना त्यांच्या विजेचे नियंत्रण करण्याचे या मीटर द्वारे उपयोगाचे ठरणार आहे.

सध्या तुम्ही जे तुमच्या घरामध्ये वर्तमान स्थितीत मीटर वापरत आहात भरपूर प्रमाणामध्ये शासनाचे नुकसान होत आहे व त्या मीटरद्वारे जे वीज वापरणारे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल वेळेत पोहोचविण्यासाठी खूप अडचणीचे ठरत आहे व त्याची प्रोसेस ही खूप लांब आहे त्यामुळे नागरिकांना वेळच्यावेळी ही वीज बिले प्राप्त होत नाहीत त्यामुळे विज बिल भरण्यास मोठ्या प्रमाणामध्ये कालावधी जातो आणि तसेच काही ग्राहक वीज बिल वेळेत न मिळाल्यामुळे ते भरण्याची टाळाटाळ करतात त्यामुळे वापरलेल्या विजेच्या बिलाचा परतावा हा वीज वितरण कंपन्यांना व्यवस्थितरित्या व योग्यरित्या मिळत नाही.

त्यामुळे वीज वितरण कंपन्या व तसेच शासनाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे तसेच या मीटर द्वारे वीज बिल बनवण्याची प्रोसेस ही खूप लांब असल्यामुळे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेळ वाया जातो जसे की तुमच्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला वीज वितरण कंपनीचा एक प्रतिनिधी येऊन तुमच्या मीटरचे फोटो काढून घेऊन जातो यामध्ये जर तुम्ही घरी नसाल किंवा तुम्ही कुठे बाहेरगावी गेला असाल तर त्यावेळी तुमच्या घराच्या मीटरचा फोटो काढावयाचा राहून जातो.

तसेच तुमच्या मीटर मध्ये बिघाड झाल्यास तर तिथून पुढची तुमचे वापरलेले वीज बिल बनवण्याची प्रक्रियेत मोठ्या प्रमाणामध्ये वेळ जातो मग अशा मध्ये तुम्ही त्या काळात वीज न भरल्यामुळे तुमचे वीज कनेक्शन बंद करण्यात येते या अशा प्रकारच्या सर्व समस्यांना आळावस होण्यासाठी हे आपल्या शासनाने नवीन मीटर संकल्पनेची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे.

यामध्ये हा Smart Meter प्रीपेड म्हणजेच जसे की तुम्ही मोबाईल फोन वापरता त्या पद्धतीनेच हा मीटर ही काम करणार आहे तुम्ही या मीटर मध्ये रिचार्ज करून तुम्हाला पाहिजे तेवढी वीस तुम्ही वापरू शकता आणि तुमचा रिचार्ज संपल्यानंतर तुमच्या घराची ऑटोमॅटिक बंद होणार आणि तुम्ही रिचार्ज केल्यानंतर तुमच्या घराची वीज ऑटोमॅटिक चालू होणार तर ह्या मीटर तंत्रज्ञानामुळे या सर्व लाईट बिलामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या दूर होण्यास मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळणार आहे.

हे येणारे मीटर हे IOT तंत्रज्ञानावरती आधारित असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण केले गेले आहे यामध्ये ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोन द्वारे त्यांनी केलेल्या वीज वापराची माहिती वेळोवेळी त्यांना दिले जाणार आहे व ती माहिती ते कुठूनही जगातून पाहू शकतात किंवा त्यांच्या घराच्या मीटरचे रिचार्ज करू शकतात त्यामुळे त्यांचे वीज वापरावरती हे नियंत्रण व्यवस्थित रित्या होणार आहे व तसेच विजेच्या होणाऱ्या अपव्या वरती विनाकारण जळणाऱ्या विजेवरती कायमचा तोडगा निघणार आहे तर या संकल्पनेद्वारे राज्यातील सर्व औद्योगिक घरगुती असतील किंवा व्यवसाय सर्व प्रकारच्या ठेकांची वीज ही त्या त्या नागरिकांना त्या त्या ग्राहकांना स्वतःच्या मोबाईल फोन वरती नियंत्रित करण्याची क्षमता या स्मार्ट वीज मीटर द्वारे मिळणार आहे.

तर मित्रांनो केंद्र सरकारने RDSS हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे ज्यामध्ये संपूर्ण भारत देशातील जे तुमचे पारंपारिक पद्धतीचे वीज मीटर आहेत ते बदलून त्या ठिकाणी मीटर बसवण्याचे या उपक्रमामध्ये त्यांनी राबविले आहे . यामध्ये देशातील वीज वितरण कंपन्या व त्यांच्या नियंत्रणात असलेले सर्व वीज ग्राहक या सर्वांचे पारंपारिक वीज मीटर बदलण्याचे काम त्यांनी त्यांच्या पातळीवरती हे खूप आधीपासून सुरू केले आहे यामध्ये केंद्र सरकार हे ज्या वीज वितरण करणाऱ्या कंपन्या आहेत म्हणजेच एमएसईबी डाटा अडाणी यांना अनुदान देणार आहे येत्या वर्षामध्ये म्हणजेच 2025 मध्ये देशभरातील जवळजवळ सर्व पारंपारिक मीटरच्या जागी हे नवीन Smart Meter बसवण्याचे काम हे पूर्ण होईल.

हे स्मार्ट मीटर केव्हापासून दैनंदिन वापरात येणार

यामध्ये नवीन स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे पैसे आकारले जाणार नाहीत हा Smart Meter विनामूल्य पद्धतीने सर्व ग्राहकांना दिला जाईल त्यानंतर ते या मीटरचा रिचार्ज करून त्यांना पाहिजे तशी वीज ते वापरू शकतात यामुळे नागरिकांना त्यांचा विज वापर तसेच त्यांचा विजेवरती होणारा खर्च हा त्यांना नियंत्रित करता येईल तसेच विजेचा होणारा वायफळ उपयोग त्यांना त्यावरती प्रबंध घालता येईल मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे होणारे आर्थिक नुकसान हे ते टाळू शकतील यामध्ये तुम्ही तुमच्या फोन पे वगैरे या ॲपवरून त्या मीटर चा रिचार्ज करू शकाल त्याचप्रमाणे तुम्हाला वेळोवेळी तुमच्या रिचार्ज चे तसेच वीज बिल भरण्याचे अलर्टस सर्व गोष्टी तुम्हाला मोबाईल वरती मिळणार आहेत.


अधिक वाचा – केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर योजना या योजनेमुळे आता मिळणार मोफत वीज


या स्मार्ट मीटर च्या वर्किंग विषयी जाणून घेऊया

तर मित्रांनो, हे मीटर IOT तंत्रज्ञाना वरती आधारित असल्यामुळे यामध्ये बऱ्याच प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल फोन द्वारे तुम्ही या मीटर चा रिचार्ज करू शकता जसा तुम्ही आत्ताच्या काळामध्ये तुमचा मोबाईल फोन वापरण्यासाठी महिन्याचा तीन महिन्याचा किंवा वर्षाचा रिचार्ज करता,त्याचप्रमाणे या मीटरचा आहे रिचार्ज तुम्हाला करता येणार आहे.

म्हणजेच की समजा तुम्ही एक महिन्यासाठी वीज वापरणार असाल, तर तुम्ही त्या महिन्यासाठीचा विजेचा रिचार्ज त्या मीटर ला करायचा आहे. जर समजा तुमचे वीज वापरण्याचे प्रमाण हे वाढत गेले सर तुमच्या रिचार्ज लागणारी रक्कम ही कमी कमी होणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या घराची वीज नियंत्रनात ठेवता येईल. म्हणजेच समजा तुम्ही आज किंवा या महिन्यामध्ये किती प्रमाणामध्ये वीज वापरले आहे हे तुम्हाला त्या Smart Meter च्या मोबाईल ॲप्लिकेशन वरती सर्व माहिती दिसणार आहे.

त्यामध्ये तुम्ही किती युनिट्स वापरले वगैरे यासारखी सर्व माहिती तुम्हाला तुमच्या त्या Meter च्या ॲप्लिकेशन इंटरफेस वरती दिसून येईल तसेच जर समजा तुमचा मीटरचा रिचार्ज संपला तर ऑटोमॅटिक पद्धतीने तुमच्या घरातील विजेचा पुरवठा हा बंद होईल त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशन वरती हा मीटर अलर्ट सेंड करेल तुमचा रिचार्ज संपणार आहे वीज खंडित होण्यापासून थांबण्यासाठी तुम्ही त्वरित रिचार्ज करा अशा प्रकारच्या सूचना तुम्हाला आधुनिक Meter देईल त्यामुळे तुम्हाला वेळच्या वेळी वीज बिल भरण्याचे सोयीस्कर होऊन जाईल त्यामुळे वीज बंद होण्याच्या त्रासापासून तुम्हाला मुक्तता मिळेल.


अधिक माहितीसाठी – Maharashtra State Electricity Board

कोणत्या कंपन्या महाराष्ट्रात हे स्मार्ट मीटर बसवणार आहेत

महाराष्ट्र मध्ये हे मीटर प्रत्येक ग्राहकांच्या व्यवसायाच्या ठिकाणी घरगुती वापराचे ठिकाणी तसेच औद्योगिक वापराच्या ठिकाणी बसवण्याचे काम देशातील नामांकित वीज वितरण कंपन्यांना देण्यात आले आहे यामध्ये नामांकित असणारी कंपनी म्हणजे अदानी ग्रुप, MSEB, एनसीसी ग्रुप यांसारख्या कंपन्यांना हे Smart Meter बसवण्याचे काम सोपविले आहे.

स्मार्ट मीटर बद्दल थोडक्यात | Smart Meter निष्कर्ष

या मीटर बद्दल अजून सांगायचं झालं तर यामध्ये वापरले गेलेल्या IOT तंत्रज्ञानाद्वारे Smart Meter व ग्राहकाचा मोबाईल हे आपापसात कनेक्टेड राहतील व याद्वारे ग्राहकांना वेळच्यावेळी वापर होणारी विजेची माहिती वेळच्यावेळी मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या विजेच्या बिलात व तसेच विजेचेही फक्त प्रमाणामध्ये बचत होणार आहे.

या मीटर द्वारे तुमच्या घरात वापरल्या जाणाऱ्या विजेवरती या आधुनिक मीटरची नजर राहणार आहे तुम्ही जेवढी विज वापरणार आहात तेवढेच पैसे तुमचे रिचार्ज मधून कापले जातील. म्हणजे जेवढी वीज तेवढे पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत. यामध्ये समजा तुमचा जर मध्यरात्री रिचार्ज संपला तर तुमचा वीजपुरवठा थांबवला जाणार नाही.

तर तुमच्या नंतरच्या रिचार्ज मधून पाठीमागच्या वापरल्या गेलेल्या विजेची रक्कम ही वजा केली जाईल. त्यामुळे रात्री अचानक मीटरचा रिचार्ज संपला तर वीज खंडित होणार नाहीअशाप्रकारे चे सर्व फायदे या नवीन अत्याधुनिक असणाऱ्या मीटर द्वारे ग्राहकांना मिळणार आहेत.


अधिक वाचा – आधार कार्डच्या माध्यामातून 50 हजारचं बिनव्याजी कर्ज मिळणार | PM Svanidhi Yojana 2024-25

अधिक वाचा – व्यावसायिक बांधवांसाठी 10 लाखा पर्यंत लोन उपलब्ध होणार | PM Mudra loan Yojana

अधिक वाचा – मुलीचं शिक्षण व लग्नाची काळजीचं सोडा । Sukanya Samriddhi Yojana Maharashtra 2024


FAQ’s

1). स्मार्ट मीटर म्हणजे काय?

उत्तर – हा मीटर हा आपोआप तुमचे विजेचे रिचार्ज संपल्यानंतर विजेचे कनेक्शन बंद करतो व रिचार्ज टाकल्यानंतर विजेचे कनेक्शन सुरू करतो.

2). स्मार्ट मीटर ला रिचार्ज कसा करतात?

उत्तर – आपण जसे आपल्या मोबाईलला एक महिन्याचा रिचार्ज टाकतो त्याच पद्धतीने मीटरला देखील रिचार्ज असणार आहे.

3). स्मार्ट मीटर हा स्मार्टफोनला कनेक्ट होतो का?

उत्तर – मीटर हा मोबाईल ला कनेक्ट होतो व तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून स्मार्ट मित्र चे रिचार्ज करू शकता.

4).स्मार्ट मीटर वापरल्यामुळे विजेच्या वापरामध्ये बचत होते का?

उत्तर –हो हा मीटर वापरल्यामुळे विजेच्या वापरामध्ये बचत होते.

5).आपण किती वीज वापरली आहे हे आपल्या मोबाईल वरती समजू शकते का?

उत्तर – मीटर बसल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मी वापरलेल्या विजय बद्दलचे सर्व अलर्ट मिळतील.

येथून शेअर करा

1 thought on “आता वीज बिलाची चिंता संपणार, Smart Meter”

Leave a Comment