झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध | Zade lava zade jagva nibandh in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Zade lava zade jagva nibandh in marathi : झाडे लावा झाडे जगवा ही एक छोटीशी उक्ती आणि छोटीशी कृती जरीज्ञ असली तरी त्याचा पर्यावरणावरती किती मोठा आणि सखोल फरक पडतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण वर्षानुवर्षे एकच गोष्ट ऐकत आहोत. झाडे लावा झाडे जगवा कारण झाडांचा आपल्या पर्यावरणावरती खूप परिणाम होतो पूर्वीच्या काळी जर आपण बघितले तर कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाचा आणि प्रदूषणाचा कोणताही ऱ्हास आपल्याला दिसून येत नाही. कारण पूर्वीच्या काळी घनदाट जंगल होती लोकसंख्या कमी होती, त्यामुळे आपल्या पृथ्वीवरील बहुतांश भाग हा झाडांनी व्यापला होता आज काल वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे ही घनदाट जंगले तोडली जात आहेत त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, दुष्काळ यासारख्या समस्यांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे.

सर्व समस्या सोडविण्यासाठी आता एकच आपल्याकडे उपाय आहे तो म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा झाडामुळे जमिनीतील पाणी टिकून राहण्यास मदत होते आणि वेळोवेळी पाऊस पडण्यास ही मदत होते. माणसाची जीवन हे पूर्णपणे झाडे आणि पाणी यावरतीच तर अवलंबून आहे माणसाचे अन्न  आणि पाणी या मूलभूत गरजांसाठी आपल्याला झाडांची आवश्यकता आहे. एका छोट्या रोपट्यापासून आणि छोट्या वेलीपासून ते मोठ्या वृक्षापर्यंत सगळ्यात झाडांमध्ये काही ना काही औषधी  गुणधर्म सापडतात.आपली भारतीय संस्कृती तर पूर्ण जगामध्ये या औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे ते फक्त आपल्या भारताला मिळालेल्या निसर्गसौंदर्यामुळेच म्हणजेच झाडांमुळे अन्न आणि पाण्या प्रमाणेच दररोजच्या वापरातील जसे की कापड ,घराचे फर्निचर, औषधे, रबर , दररोजच्या वापरातील जळण्याचे लाकूड यासारख्या मूलभूत गरजा झाडांच्या मुळे तर पूर्ण होतात.

झाडे लावा झाडे जगवा | Zade lava zade jagva nibandh in marathi

Zade lava zade jagva nibandh in marathi
Zade lava zade jagva nibandh in marathi

झाडामुळे जमिनीतील पाणी तग धरून राहते. दिवसेंदिवस केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीमुळे जंगलातील वन्य प्राणी यांची प्राण्यांच्या वस्तीकडे वाटचाल चालू आहे. वन्य प्राण्यांचे तर संपूर्ण कालचक्र झाडावरती अवलंबून आहे. केवळ जंगलतोडी मुळेच पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही. महानगरे आणि कारखाने या दुरावस्थेला हातभार लावत आहेत गावातल्या नद्यांमध्ये कचरा आणि सांडपाणी सोडले जाते उसाच्या मळीमुळे शेती निकामी होत आहेत पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहे अशी अनेक संकटे आपल्यासमोर उभी आहेत. प्रचंड वृक्षतोडीमुळे पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाण्याचीच नाही तर अन्नाची सुद्धा कमतरता जाणवेल. कारण झाडे असतील तरच पाऊस येईल आणि पाऊस येईल तरच अन्न पिकेल हे सारे एक निसर्गचक्र आहे. सगळ्या गोष्टी या एकमेकांवर अवलंबून आहेत आणि यामध्ये जर झाडे हा मुख्य घटकच नसेल तर सगळेच निसर्गचक्र बदलून जाईल. 

  या साऱ्या गोष्टींवर एकच प्रतिबंधात्मक उपाय तो म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा. प्राण्यांच्या संवर्धनासाठी जंगले अतिशय महत्त्वाची आहेत.  जंगलतोडीमुळे खूप साऱ्या जंगली प्राण्यांचा ऱ्हास आतापर्यंत झालेला आहे प्राण्यांबरोबरच काही झाडांच्या प्रजाती काळाच्या पडद्यामागे लुप्त झाले आहेत , अनेक औषधी वनस्पती तर आपल्याला आजकाल बघायला सुद्धा भेटत नाहीत पूर्वीच्या काळी जेव्हा हॉस्पिटल नव्हते तेव्हा सगळ्या वैद्यकीय गोष्टी मध्ये  औषधी वनस्पतींचा खूप मोठा वाटा होता सगळे आजार औषधी वनस्पतींच्या जोरावर तर  कमी केले जायचे , आणि त्यामुळे लोकांना त्याचा कोणता वाईट दुष्परिणाम सुद्धा होत नव्हता. त्यामुळे आपल्याला जंगलातील प्रत्येक झाड तोडण्याआधी विचार करायला हवा.

Zade lava zade jagva nibandh in marathi
Zade lava zade jagva nibandh in marathi

निसर्गामध्ये इतकी ताकद आहे की जर आपण त्याचा नियमाप्रमाणे वापर करून घेतला तरच आपले चक्र व्यवस्थित चालू राहील नाहीतर इतका निसर्गाचा ऱ्हास होऊन जाईल की ते निसर्गाचे कालखंड परत नियमित करण्यासाठी आपण पूर्णपणे बांधील होऊन जाऊ. झाडामुळे  निश्चितच प्रदूषण रोखले जाते झाडांच्या मुळामुळे माती घट्ट पकडून ठेवली जाते त्यामुळे जमिनीची धूप थांबली जाते. ग्लोबल वॉर्मिंगचा दिवसेंदिवस वाढता पारा जर आपल्याला थांबवायचा असेल तर झाडे लावणे एकच उपाय आपल्याकडे आहे दरवर्ष दिवसेंदिवस उन्हाची नाही इतकी वाढत आहे किती आपल्याला सहन ही होत नाहीये. त्याचे कारण म्हणजे फक्त वृक्षतोड त्यामुळे जर आपण पुढील दहा वर्षांचा विचार केला आणि जर अशीच वृक्षतोड होत राहिली तर आपल्याला या उन्हाची तीव्रता सहनही होणार नाही.

यासाठी आपल्याला आत्तापासूनच एक जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने एक झाड जरी लावले तरी किती फरक पडेल याचा आपण विचारही करू शकत नाही. दरवर्षी पावसाळ्यामध्ये एक झाड लावून त्याचा व्यवस्थित रित्या सांभाळ करून जर ते झाड वाढवले तर आपले येणारे पिढी , दिवसेंदिवस होणाऱ्या प्रदूषणापासून वाचू शकेल. झाडामुळे सूर्यापासून येणारे अतिनील किरण रोखण्यास मदत होते ज्या भागांमध्ये झाडांचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते तेथे हवेतील ओझोन वायूचा स्तर चांगल्या प्रकारे दिसून येतो.

Zade lava zade jagva nibandh in marathi
Zade lava zade jagva nibandh in marathi

वृक्षतोडीमुळे सुनामी, भूकंप ,भूस्खलन ,हिमनग वितळणे जागतिक तापमान वाढ यासारख्या गंभीर समस्यांना दरवर्षी आपल्याला सामोरे जावे लागते. भुसख्खलनाच्या बातम्या तर आपण सर्रास दरवर्ष ऐकतो. छोटेसे झाड एवढ्या सगळ्या मोठ्या समस्यांना तोंड देत असेल तर मोठ्या प्रमाणात प्रत्येक माणसाने झाडे लावा झाडे जगवा ही जर उक्ती प्रत्यक्षात अंमलात आणली तर या मोठ्या समस्यांना लवकरच लढा देऊ शकतो. अलीकडे भरपूर प्रमाणात वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात आणि वृक्षारोपणाची जी  संकल्पना आहे ती  दृढ पण होत चाललेली आहे. पण फक्त झाडे लावणे इतकेच महत्त्वाचे नाही तर त्यांचे संगोपन करणे आणि त्यांना मोठे करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.. कारण आपण झाडे लावतो मात्र खरे पण निष्काळजी मुळे कित्येक झाडे जगण्या अगोदरच मरून जातात.

लग्न समारंभ वाढदिवस समारंभ अशा निमित्ताने आपण प्रत्येकाला पुष्पगुच्छ देतो पण त्याच ऐवजी आपण जर एक छोटे झाडाचे रोपटे दिले. आणि त्याच्या संगोपन करण्यास सांगितले तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी खुप फरक पडेल . शहरातील राखीव जागेवर मोठ्या इमारती उभारण्याऐवजी  आपण रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडे लावू शकतो. निसर्गाचे जे चक्र आहे ते खंडित करण्याचा आपल्या मानव जातीला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही त्यामुळे जे निसर्गाचे चक्र आहे ते तसेच चालू द्यावे. यातच आपल्या सगळ्यांचे हित आहे. म्हणूनच आज जर आपण एक झाड लावले आणि ते झाड जगवले तर आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य नक्कीच उज्वल होईल.

Zade lava zade jagva nibandh in marathi
Zade lava zade jagva nibandh in marathi

हे वृक्ष , वेली अनेक  महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला देतात. उदात्तता भव्यता निर्मलता ही तर त्यांचीच ठेव आहे पण सर्वांशी समान वागणूक हा त्यांच्या जीवनातील मिळणारा संदेश आहे. हा संदेश आपणही समजून घेऊन सामाजिक जागृती केली पाहिजे, आणि प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा आणि त्यांना आयुष्यभर जोपासा हे तत्व आपण अंगी स्वीकारले पाहिजेत. कारण झाडे आहेत तरच आपला श्वास आहे. म्हणूनच झाडे लावा आणि झाडे जगवा.


नवनवीन निबंध पुढे वाचा


येथून शेअर करा

Leave a Comment