Sukanya Samriddhi Yojana Maharashtra 2024 : मुलगी म्हटलं कि तिच्या भविष्याबद्दलचा विचार हा कुटुंबातील पालकांना चिंतित करत असतो, कारण मुलीच्या लग्नासाठी भविष्यामध्ये होणारा खर्च तसेच तिच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च या सर्व बाबी मुळे कुटुंबातील सदस्यांना काळजी असते. तसेच समाजात पाहिलं तर मुलींबद्दल चे समाजामध्ये वेगवेगळे गैरसमज आहेत मुलगी म्हटलं की प्रत्येकाला ते ओझं वाटतं कारण मुलगी ही लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच्या घरी जाणार असते. त्यामुळे समाजामध्ये मुलींना हा कुटुंबावरील असणाऱ्या ओझे समजले जाते.
यामुळेच देशांमध्ये भरपूर प्रमाणात मुलींचे गर्भपात केले जातात म्हणजेच की स्त्रीभ्रूणहत्या केली जाते त्यामुळे देशातील मुलींची संख्या आहे भरपूर प्रमाणामध्ये कमी होताना आपल्या सर्वांना दिसून येत आहे. समाजामध्ये मुलींबद्दल यांसारखे नकारात्मक विचार केले जातात परंतु मुलगी ही दोन्ही घरांमध्ये लक्ष देऊन त्यांना जोडण्याचं काम करत असते. म्हणूनच केंद्र सरकारच्या अंतर्गत मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना/Sukanya Samriddhi Yojana या मार्फत मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी एक भक्कम असे आर्थिक पाठबळ व आर्थिक मदत म्हणून ही अत्यंत कल्याणकारी तसेच महत्वकांक्षी योजना राबवली आहे या योजनेमध्ये मुलगी दहा वर्षाच्या आत मध्ये असेल तर त्या कुटुंबातील सदस्यांना मुलीच्या नावे महिन्याला पैसे गुंतवून त्यावरती ते मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी आर्थिक लाभ मिळू शकतात.
नागरिक 2024 – 2025 या आर्थिक वर्षामध्ये या Sukanya Samriddhi Yojana साठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात तसेच या योजनेबद्दलची सर्व माहिती जसे की या योजनेमध्ये व्याजदर किती प्रमाणामध्ये मिळतो, महिन्याला किती रक्कम गुंतवायची, योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणकोणते पात्रता व निकष असतील, तसेच खाते कुठे काढायचे कोणत्या बँकांमध्ये काढायचे यासाठी लागणारी योग्य ती कागदपत्रे कोणती आहेत या सर्व गोष्टींबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
Sukanya Samriddhi Yojana विषयक ममहत्वाचे घटक
योजनेचे नाव | सुकन्या समृद्धी योजना |
पात्रता | वय वर्ष 10 च्या आतील सर्व मुली |
कमाल गुंतवणूक रक्कम मर्यादा | 1,50,000/- लाख रुपये ( वार्षिक ) |
किमान गुंतवणूक रक्कम मर्यादा | 250/- रुपये |
ठेवीवर मिळणारा व्याजदर | 8.2% टक्के ( 2024-2025 वार्षिक व्याजदर ) |
परतावा मिळण्याचा कालावधी | मुलीचे खाते काढल्या पासून 15 वर्षापर्यंत |
योजनेचा परिपक्व होण्याचा कालावधी ( वयोमर्यादा ) | मुलीचे वय किमान 18 किंवा 21 वर्ष तिचे लग्न होईपर्यंत |
सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूक पद्धती | Sukanya Samriddhi Yojana Investment
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करताना प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या आर्थिक कुवतीचा अंदाज घेऊन किंवा त्यांना जमेल तेवढीच रक्कम या योजनेमध्ये गुंतवली तरी चालते किमान या योजनेमध्ये नागरिक 250/- रुपये व तसेच जास्तीत जास्त एका वर्षामध्ये 1,50,000/- लाख रुपये गुंतवू शकतात. प्रत्येक वर्षाला प्रत्येक नागरिक फक्त 1,50,000/- रुपये एवढीच गुंतवणूक करू शकतो. या गुंतवलेल्या रकमेवरती नागरिकांना 8.2% वार्षिक व्याजदर मिळते.
तुम्हाला 5,000/- रुपये गुंतवून 27,00,000/- लाखाचा परतावा कसा मिळू शकतो याबद्दल आपण सविस्तर पणे माहिती पाहू,
उदाहरणार्थ एखाद्या नागरिकांनी प्रत्येक महिन्याला त्याच्या मुलीच्या नावे रुपये 5,000/- इतकी रक्कम गुंतवली तर एका वर्षामध्ये एकूण 60,000/- एवढी वार्षिक गुंतवणूक होते. तरी या वार्षिक गुंतवणुकी वरती त्यांना 2024-25 या वार्षिक वर्षांमध्ये असणाऱ्या व्याजदरानुसार त्यांना ही योजना परिपक्व झाल्यानंतर 27,00,000/- लाख रुपये एवढी रक्कम त्यांना मिळू शकते तर समजा तुम्ही ही योजना 2024 पासून सुरू करणार असाल व तुमच्या मुलीचे वय हे 5 वर्ष असेल तर तुम्हाला 2045 या वर्षांमध्ये या योजनेची परिपक्वता पूर्ण झाल्यानंतर 27,00,000/- लाख मिळू शकतात.
SSY Calculator
जर समजा तुम्हाला तुमच्या गुंतवणुकी वरती किती परतावा मिळू शकेल याची तपासणी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी खाली दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमच्या गुंतवणुकी वरती किती व्याज मिळवू शकता, त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन तुमची वार्षिक गुंतवणूक तसेच तुमच्या मुलीचे वय वर्ष व तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होण्याचे वर्ष हे टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकी वरती किती लाभ मिळेल यासंदर्भात सर्व माहिती मिळेल तुम्ही या ठिकाणी जाऊन चेक करू शकता.
येथे तुमच्या गुंतवणुकी वर किती लाभ मिळेल हे या SSY Calculator वर तपासून पहा.
सुकन्या समृद्धी योजना च्या माध्यमातून मुलींना मिळणारे फायदे | Benefits of Sukanya Samriddhi Yojana
सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या मुलीस मिळणारे फायदे,
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये इतर योजनांच्या तुलनेमध्ये असणारा व्याजदर हा सर्वाधिक आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या मुलीस वार्षिक व्याजदर हा 8. 2% टक्के एवढा मिळतो जो की बाकीच्या कोणत्याही योजना किंवा बँक ठेवीन वरती एवढा व्याजदर देत नाहीत.
- मुलगी जोपर्यंत अठरा वर्षाची होते तेव्हा तिच्या उच्च शिक्षणासाठी तिला किंवा लग्नकार्यास या योजनेअंतर्गत जी रक्कम ठेवीच्या स्वरूपात ठेवलेली असते त्या रकमेच्या 50% रक्कम ही ते काढू शकतात.
- मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर ही योजना परिपक्व होते व त्यावेळेस मिळणारा परतावा हा एका मोठ्या रकमेमध्ये मिळतो ते त्याचा उपयोग करू शकता.
- सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाते त्यामुळेही अत्यंत सुरक्षित मानली जाते, यामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होत नाहीत, या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक कुटुंबातील मुलीस या योजनेचा फायदा होतो.
- सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून नागरिक हे अत्यंत कमी म्हणजेच रुपये 250/- पासून गुंतवणूक सुरु करू शकतात, यामध्ये कमीत कमी नागरिकांना 250/- रुपये पासून ते 1,50,000/- रुपये इथपर्यंत ते गुंतवणूक करू शकतात व त्यावरती चांगला परतावा मिळवू शकतात.
- इतर योजनांच्या तुलनेमध्ये ही योजना जास्तीत जास्त व्याज देणारी योजना आहे, यामध्ये मुलीच्या कुटुंबियांना खाते काढल्यापासून पुढील 15 वर्ष या खात्यामध्ये त्यांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे प्रमाणे ते पैसे भरू शकतात, त्यानंतर त्यांना या खात्यामध्ये कोणतेही पैसे भरण्याची गरज नसते यामध्ये 35.27% टक्के एवढी गुंतवणूक ही त्या नागरिकाची असते व बाकीचे राहिलेले 64.73% हे गुंतवणूक केलेल्या रकमेच्या व्याजावरती त्या मुलीस दिले जातात.
सुकन्या समृद्धी योजने मध्ये सहभागी होण्यासाठी लागणारे पात्रता निकष
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये ज्या नागरिकांना आपल्या मुलीचा अर्ज करायचा आहे, त्यांनी काही पात्रता व निकष पूर्ण करणे गरजेचे आहे ते पात्रता निकष हे खालील प्रमाणे दिले आहेत.
- समृद्धी सुकन्या योजना मार्फत प्रत्येक कुटुंबामध्ये दोन मुलींसाठी खाती उघडता येतील.
- अर्ज करणाऱ्या पालकांच्या मुलीचे वय हे दहा वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे मुलीचे वय वर्ष दहा वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना अर्ज करता येणार नाही.
- एका मुलीसाठी केवळ एकदाच व एकच खाते मंजूर केले जाते.
- सुकन्या समृद्धी योजनेसाठी फक्त त्या मुलीचे कायदेशीर पालकच खाते उघडू शकतात.
वरील दिलेले सर्व निकष हे मुलीच्या पालकांनी पाळणे आवश्यक आहे.
सुकन्या समृद्धी योजेनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Sukanya Samriddhi Yojana Documents
योजनेचा अर्ज करते वेळी मुलीच्या कुटुंबियांनी कोणकोणती कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे ते पुढील प्रमाणे,
- मुलीच्या जन्माचा दाखला.
- पालकाचे आधार कार्ड.
- पालकाचे पॅन कार्ड.
- पालकाचा रहिवासी दाखला.
- अर्ज करणाऱ्या पालकाचा कायदेशीर पालक असल्याचा पुरावा.
- पालकाचा मूळ रहिवासी दाखला.
- मोबाईल क्रमांक.
हे सर्व कागदपत्रे अर्ज करणाऱ्या मुलीच्या पालकांनी अर्ज करतेवेळी जवळ ठेवणे महत्त्वाचे आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज कुठे व कसा कराल | How to apply Sukanya Samriddhi Yojana
सुकन्या समृद्धी योजनेसाठी नागरिक हे ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. आपण या ठिकाणी तुम्ही दोन्ही पद्धतीमध्ये कशाप्रकारे या योजनेस अर्ज करू शकता ती संपूर्ण माहिती पाहूया.
सर्वात अगोदर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या इंडियन पोस्ट या वेबसाईटवरून किंवा रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईटवरून सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज डाऊनलोड करून घ्यावयाचा आहे. त्या अर्जामध्ये दिलेल्या सर्व महत्वाची माहिती अर्ज करणाऱ्या पालकांनी अत्यंत काळजीपूर्वक वाचून ती योग्यरीत्या भरणे गरजेचे आहे, यामध्ये सर्वप्रथम ज्या मुलीच्या साठी तुम्ही अर्ज करणार आहेत त्या मुलीचे नाव तसेच मुलीच्या कायदेशीर पालकाचे नाव प्रारंभिक ठेव रक्कम तसेच त्यानंतर डीडी क्रमांक व तुम्ही ज्या दिवशी ठेवेचा प्रारंभ करणार आहात त्या दिवशीची तारीख मुलीचे जन्म प्रमाणपत्र व त्यावरील असणारी मुलीची जन्मतारीख ही व्यवस्थित रित्या लिहा.
पालक किंवा कायदेशीर पालक असण्याचा पुरावा त्यासोबत जोडणे महत्त्वाचे आहे त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड किंवा ओळखपत्र पॅन कार्ड जोडू शकता तसेच सध्याचा पत्ता व इतर केवायसी केलेल्याचे तपशील त्यासोबतच पॅन कार्ड आधार कार्ड ओळखपत्र यांसारख्या सर्व कागदपत्रांची त्यासोबतच पॅन कार्ड आधार कार्ड ओळखपत्र यांसारख्या सर्व कागदपत्रांची प्रत त्या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी ऑफलाइन खाते कसे काढावे
सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही निवडलेल्या बँकेच्या शाखेत किंवा तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा या योजनेचे खाते उघडू शकता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा सोयीनुसार बँकांमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता
तुम्हाला ज्या ठिकाणी खाते उघडायचे आहे त्या ठिकाणी म्हणजेच बँकेत किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही भरलेला अर्ज व त्या संदर्भातील सर्व आवश्यक ती कागदपत्रांची प्रत त्या अर्जासोबत जोडून ती कागदपत्रे बँकेत किंवा तुम्ही ज्या पोस्ट ऑफिसमध्ये उघडणार आहात त्या ठिकाणी जमा करा.
त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जेवढी रक्कम गुंतवणार आहात एवढी रक्कम त्या ठिकाणी जमा करणे गरजेचे आहे यामध्ये तुम्ही 250/- रुपये पासून ते 1,50,000 लाखापर्यंत रक्कम गुंतवू शकता तुमच्या आर्थिक वतीनुसार तुम्ही ती ठेव रक्कम त्या ठिकाणी जमा करावे. त्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया व तसेच तुमचे धनादेश किंवा ठेवीची प्रक्रिया पोस्ट ऑफिस व बँकेद्वारे पूर्ण केली जाईल त्यानंतर तुमचे कन्या समृद्धी योजनेचे खाते हे सुरू केले जाईल त्यानंतर तुम्हाला बँक केव्हा पोस्ट ऑफिस तर्फे या योजने संदर्भातील जे पासबुक असते ते तुम्हाला दिले जाईल.
या पद्धतीने तुम्ही ऑफलाइन पद्धतीने खाते बँकांमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुमच्या सोयीनुसार उघडू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने खाते कसे काढावे
मुलीच्या कुटुंबातील पालकांना जर मोबाईल फोन व्यवस्थित हाताळता येत असेल तर त्यांनी सर्वप्रथम मोबाईल फोन मध्ये प्ले स्टोअर मध्ये जाऊन आयपीपी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे त्यानंतर त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही थेट या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता.या IPPB एप्लीकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यातून थेट या योजनेसाठी गुंतवणूक रक्कम भरू शकता.
IPPB एप्लीकेशन ओपन केल्यानंतर त्यामध्ये DOP व्यापाऱ्यावरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजना हा पर्याय निवडावा त्यानंतर तुम्ही तुमचा सुकन्या समृद्धी योजनेचा असणारा खाते क्रमांक व तुमचा डीओपी नंबर त्या ठिकाणी टाईप करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार यामध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी निवडता येतो त्या कालावधीमध्ये तुम्हाला समृद्धी सुकन्या योजनेचे हप्ते त्या त्यावेळी देता येतील.
एकदा तुम्ही ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची सुकन्या समृद्धी योजने च्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया व्यवस्थितरित्या पूर्ण होईल. तुमच्या समृद्धी सुकन्या योजनेच्या प्रत्येक हप्त्याच्या वेळेस हे IPPB एप्लीकेशन तुमच्या खात्यावरून हप्त्याची रक्कम ही योजनेच्या खात्यामध्ये पाठवेल व त्याची सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित रित्या मिळेल.
तर या पद्धतीने पालक स्मार्टफोनच्या मदतीने देखील समृद्धी सुकन्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.
समृद्धी सुकन्या योजनेची सुविधा कोणकोणत्या बँकांमध्ये उपलब्ध आहे
समृद्धी सुकन्या योजनेसाठी तुम्ही तुमच्या गावातील पोस्ट ऑफिस मध्ये किंवा खालील दिलेल्या कोणत्याही बँक मध्ये तुम्ही खाते उघडू शकता ज्या बँकांमध्ये समृद्धी सुकन्या योजना गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध आहे त्या बँकांची यादी खालील प्रमाणे आहे.
- एचडीएफसी बँक
- ॲक्सिस बँक
- पंजाब नॅशनल बँक
- कॅनरा बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- आयसीआयसीआय बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- आयडीबी बँक
- बँक ऑफ महाराष्ट्र
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- इंडियन बँक
- पंजाब सिंध बँक
- इंडियन ओव्हरसीज बँक
- इको बँक
- बँक ऑफ बडोदा
- बँक ऑफ इंडिया
सर वरील या सर्व बँकांमध्ये तुम्ही तुमचे सुकन्या योजनेचे खाते उघडू शकता व लाभ मिळू शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेचा निष्कर्ष
समृद्धी सुकन्या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व मुलींना त्यांचे भविष्य सुरक्षित व सुखकर करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून समृद्धी सुकन्या योजना हे राबवली जाते यामध्ये दहा वर्षाच्या आतील सर्व मुलींना कर्ज करता येतो यामध्ये मुलीचे पालक हे तुमच्या नावाने खाते उघडून या खात्यामध्ये 250/- रुपयांपासून ते एक लाख 50,000/- हजार रुपयांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करून मुलीच्या 18 व 21 वर्षानंतर तिच्या शिक्षणासाठी व विवाहासाठी लागणारे आर्थिक सहाय्य या सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून त्यांना दिले जाते.
अधिक वाचा – तुमच्या व्यवसायसाठी सरकार आर्थिक मदत देणार, PM Vishwakarma Yojana Apply 2024
अधिक वाचा – लेक लाडकी योजना 2024 | आता मुलीच्या भवितव्यासाठी सरकार देणार 1 लाख रुपये
FAQ’s
1). सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे वय किती असावे ?
उत्तर– सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मुलीचे वय हे दहा वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
2).समृद्धी सुकन्या योजनेसाठी अर्ज कोण करू शकते ?
उत्तर– सुकन्या समृद्धी योजनेसाठी दहा वर्षाखालील सर्व मुलींना लाभ घेता येतो.
3).सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कमीत कमी किती पैसे गुंतवता येतात ?
उत्तर– सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कमीत कमी 250/- ते जास्तीत जास्त 1,50,000/- रुपये प्रत्येक वर्षी गुंतवता येतात.
4).आपण सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून मुदत पूर्ण होण्याच्या अगोदर पैसे काढू शकतो का ?
उत्तर – मुलगी हे 18 वर्षाची झाल्यानंतर खात्यावरील ठेव रकमेच्या 50% रक्कम काढता येते.
5).सुकन्या समृद्धी योजनेमध्ये वार्षिक व्याजदर किती टक्के मिळतो ?
उत्तर – या सुकन्या योजनेत मध्ये वार्षिक व्याजदर हा आर्थिक वर्ष 2024 व 2025 मध्ये 8. 2% एवढा व्याजदर मिळतो.
1 thought on “मुलीचं शिक्षण व लग्नाची काळजीचं सोडा । Sukanya Samriddhi Yojana Maharashtra 2024”