पी एम सूर्य घर योजना: भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पीएम सूर्य घर योजना ही सर्वसामान्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदे होणार आहेत तर ते फायदे कसे होणार आहेत आपण पाहणार आहोत. या योजनेबद्दल एक थोडक्यात सांगायचे झालं तर यामध्ये आदरणीय नरेंद्र साहेब मोदी यांनी भारतातील एक कोटी घरांवरती या पीएम सूर्यग्रहण योजनेअंतर्गत सोलार पॅनल चे इन्स्टॉलेशन करण्याचे ठरविले आहे.
त्या मार्फत सर्व नागरिकांना ही मोफत वीज मिळणार आहे तसेच ते नागरिक ती वीज इतर उद्योगधंद्यांसाठीही विकू शकतात. किंवा घर कामांसाठीही ते वापरू शकतात त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये या पी एम सूर्य घर योजनेचा फायदाच फायदा होणार आहे तर तो फायदा कशाप्रकारे होणार आहे काय होणार आहे ते आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
केंद्र सरकार मार्फत दिल्या जाणाऱ्या पी एम सूर्य घर मोफत वीज योजना या विषयी विस्तृत माहिती
यामध्ये PM सूर्य घर मोफत वीज योजना काय आहे? या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते व कोणाला मिळू शकतो? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणती कागद पत्रे लागतात, अर्ज कुठे करायचा,या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणते नियम व अटी आहे , याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये देण्यात आली आहे. या वर्षी 2024 च्या अर्थ संकल्पा मध्ये या संदर्भात पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या कडून या सौर ऊर्जा योजनेविषयी घोषणा करण्यात आली होती. या घोषणेने मध्ये त्यांनी देशातील 1 कोटी घरांवरती सोलर पॅनल बसविण्याचा त्यांचा संकल्प आहे.
या योजनेत नागरिक पात्र झाल्यानंतर या घरावरील सौर प्रकल्पातून मिळणाऱ्या विजेची विक्री करुन वार्षिक सरासरी 18000 ते 20,000 हजार रुपयांचा नफा ते घेऊ शकतात. तर ही योजना कशी व काय आहे व अर्ज कसा करणार ही सर्व माहिती अगदी व्यवस्थित जाणून घेऊयात.
पी एम सूर्य घर योजना । PM Surya Ghar Yojana
दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी. केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतरामन यांनी अर्थसंकल्पा मध्ये सौर ऊर्जा योजनेविषयी घोषणा केली, ती योजना म्हणजेच पी एम सूर्योदय योजना त्यालाच पी एम सूर्य घर योजना असेही समजले जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांच्या घराच्या छतवरती सोलार पॅनल लावल्यास 300 युनिट्स वीज मोफत मिळणार आहे. त्या मिळणाऱ्या वीज विक्रीतून वार्षिक 18 हजार रुपयांचा फायदा हा नागरिकांना होणार आहे. आदरणीय नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा ही 22 जानेवारी रोजी केली होती.
पी एम सूर्य घर योजने मुळे होणारे फायदे
PM Surya Ghar योजेनेअंतर्गत सरकार द्वारे एक कोटी घरांवर सोलार एनर्जी पॅनल लावले जाणार आहेत. अशी माहिती ही अर्थ संकल्पा मध्ये देण्यात आली होती. या योजेनेअंतर्गत सोलार पॅनल च्या मदतीने मोफत वीज मिळणार आहे. ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांच्या कुटुंबियांना या योजनेमध्ये सहभागी केले जाणार आहे. ही योजना समाजातील माध्यम वर्गीय तसेच गरीब व ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1.50 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
PM सूर्य घर योजना ची वैशिष्टे व संकल्पना
- 1.घरगुती वीजबिलात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
- 1 ते 3 किलोवॉट पर्यंत 40% टक्के अनुदान मिळणार आहे.
- 3 ते 4 किलोवॉट पेक्षा जास्त ते 10 किलोवॉट पर्यंत 20% टक्के अनुदान मिळणार आहे.
PM Surya Ghar योजनेसाठी अर्ज कोण करु शकतो
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- स्वतःचे घर असावे आणि घराच्या छातवरती मोकळी जागा असावी.
- अर्जदाराकडे अधिकृत वीज कनेक्शन असावे.
- अर्जदर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1.50 लाखा पेक्षा कमी असावे.
- अर्ज करणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा.
- बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक केलेले असावे.
अर्ज भरावयासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- मूळ पत्ता
- पत्याचा पुरावा
- लाईट बिल
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणार आहेत तुम्हाला जर पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आम्ही या ठिकाणी खाली तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करू शकता ही सर्व माहिती स्टेप बाय स्टेप खाली दिलेली आहे तसेच अर्ज करण्याची वेबसाईट ही खाली दिलेली आहे
अर्ज कुठे करायचा व कसा करायचा
तर पीएम सूर्यघर योजना या योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही www.pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही आपले रजिस्ट्रेशन करू शकता. त्या त्या संकेतस्थळाची लिंक आम्ही या ठिकाणी खाली देत आहोत तर तिथे जाऊन तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट करायचे आहे.
पी एम सूर्य घर योजना या योजनेचा अर्ज भरण्याकरिता वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- वेबसाईट ओपन झाल्यावरती आपलाय फोर रूफ ऑफ सोलार या पर्यायावर क्लिक करा.
- त्यामध्ये रजिस्टर हेअर या पर्यायावर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
- त्या ठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती त्याचबरोबर वीज दिलाची माहिती तसेच अत्यावश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व डॉक्युमेंट व सर्व डिटेल्स अपलोड करून झाल्यानंतर फॉर्म एकदा चेक करून सबमिट बटणावर क्लिक करा.
- ही सर्व प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होईल.
तर वरील सर्व सांगितल्याप्रमाणे तुम्ही तर प्रोसेस योग्यरीत्या पूर्ण पूर्ण केली तर तुम्ही नक्कीच या प्रधानमंत्री सूर्य घर योजना या योजनेसाठी पात्र ठराल.
पी एम सूर्य घर योजना निष्कर्ष
पी एम सूर्य घर या योजने अंतर्गत ज्या नागरिकांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये त्यांना एक ते तीन किलो वॅट पर्यंत सोलार पॅनल त्यांच्या घरावरती लावण्यासाठी चाळीस टक्के अनुदान मिळणार आहे तसेच तीन ते चार किलो वॅट पेक्षा जास्त सोलर पॅनल त्यांना लावायचे असल्यास 20 टक्के अनुदान हे सरकारकडून देण्यात येणार आहे यातूनच ते त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विजेची पूर्तता करून शिल्लक राहिलेली वीज ही इतरांना विकू शकतात व त्यातून चांगला नफा कमवू शकतात.
अधिक वाचा – इथे वाचा – Oppo चा नवा स्मार्टफोन 80W सुपरफास्ट फ्लॅश चार्जर 32Mp सेल्फी कॅमेरा
अधिक वाचा – 30 वस्तूंचा मोफत भांडी संच, bandhakam kamgar yojana 2024
अधिक वाचा – 75 टक्के अनुदान । kadaba kutti machine yojana 2024
तर तुम्हाला अशाच केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या ज्या येणाऱ्या योजना असतील तर त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती या प्रकारे तुम्हाला अशीच मिळत राहील तरी ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना सोशल मीडिया वरती शेअर करू शकता.
FAQ’s
1). पी एम सूर्यघर योजना म्हणजे काय ?
उत्तर – पी एम सूर्यघर योजना म्हणजे सोलार पॅनल च्या माध्यमातून नागरिकांना मोफत वीज देणे होय.
2).पीएम सूर्यग्रहण योजनेचे फायदे काय आहेत ?
उत्तर – नागरिकांना मोफत वीज मिळते व ते वीज विकू शकतात व नफा कमवू शकतात.
3).पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
उत्तर – योजनेसाठी अर्ज हा पीएम सूर्य घर योजना या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन करू शकता
4).सूर्यघर योजनेमधून मोफत वीज कशी मिळू शकते ?
उत्तर – घरावरती बसवलेल्या सोलार पॅनलच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण घरासाठी मोफत विज तुम्हाला मिळते.
5). रूफ टॉप सोलार पॅनल म्हणजे काय ?
उत्तर – सोलार रूफ टॉप म्हणजे नागरिकाच्या घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवले जाणार त्याला रूफ टॉप असे म्हटले जाते.
6). पी एम सूर्या घर योजनेसाठी शुल्क आकारले जाते का ?
उत्तर – शुल्क आकारले जात नाही परंतु तुम्हाला शासनाकडून या सोलार रूफ टॉप बसवण्यासाठी 40% टक्के अनुदान दिले जाते.
4 thoughts on “पी एम सूर्य घर योजना या केंद्र सरकारच्या योजनेमुळे आता मिळणार मोफत वीज”