PM Kisan Yojana : तुम्हाला माहीतच आहे, केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हितासाठी नेहमीच उपक्रमशील असते. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व त्यांना पाठबळ देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून “किसान मानधन योजना” सुरु केली गेली, तर आपण आज या योजनेबद्दल सर्व माहिती अगदी योग्य पद्धतीने घेणार आहोत. तर शेतकरी मानधन योजना, हि योजना केंद्र सरकार ने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केली आहे. या योजने मध्ये त्या सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे कडे कमीप्रमाणात शेत जमीन आहे व त्यांना त्यांच्या वयोमानानुसार त्यांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक हप्ता रक्कम भरणे आवश्यक आहे आपल्या भारतामध्ये जवळ जवळ 60 ते 70 टक्के लोक शेती करतात. त्यामुळे आपल्या देशाला कृषिप्रधान देश समबोधलं जाते. तर या 60 ते 70 टक्के शेतकयांमध्ये बहुतांश शेतकरी हे आर्थिक रित्या मागास किंवा आर्थिक अडचणी मध्ये आहेत .
तर त्यांची उपजीविका हि पूर्णपणे शेती वरती अवलंबून असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या वृध्दापकाळामध्ये शारीरिक कष्ट करता येऊ शकत नाही. त्यामुळे हा हेतू समोर ठेऊन केंद्र सरकार ने त्यांना वृद्धावस्तेत आर्थिक मदतीचा आधार मिळावा यासाठी हि योजना आहे. हेच केंद्रस्थानी ठेऊन सरकारने मानधन योजना सुरु केली आहे.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्ध पणात निवृत्ती वेतन देणे ज्यामुळे ते स्वतःला व त्यांच्या कुटुंबाला एक आधार देऊ शकतील. ते त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा ते भागवू शकतील आणि त्याना इतर कोणत्या गोष्टींवरती आवलंबून न राहता ते आपले वृद्ध पानातील जीवन आरामदायी व व्यवस्थित पद्धतीने जगू शकतील .
प्रति महिना शेतकऱ्यांना 3000/- रु देण्याचे आवाहन | PM Kisan Yojana
पी एम किसान मानधन योजना हि केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्याचा विचार करून हि योजना राबवली आहे या योजने मध्ये 60 वयापेक्षा जास्त असणाऱ्या आर्थिक पाठबळ पुरवते. अर्थात जे शेतकरी बांधव त्यांच्या वृद्धपकाळात ते काम नाहीत करू शकत त्या कला मध्ये ते शाररिक व्याधी मुळे किंवा इतर शाररिक अडचणींना मुळे शेती काम करू नाहीत शकत. तर हे केंद्र स्थानी ठेवून शासनाने मानधन योजना सुरू केली. तर हि योजना 12सप्टेंबर 2011 मध्ये भारत सरकार ने सुरु केली होती.
ज्याचा मुख्य उद्दिष्ट हे कि ज्या शेतकऱ्यांना लहान शेत जमीन आहे म्हणजेच जे अल्पभूधारक आहेत. अशाच शेतकऱ्यांना मानधनाच्या स्वरूपात त्यांना त्यांचे वृद्ध पानातील जीवन सुरक्षित व सुखकर व्हावे हे आहे. शेतकरी मानधन योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति महिना रु 3000/- म्हणजेच वर्ष्याला 36000/- या पद्धतीने पैसे दिले जातात. तसेच लाभार्थी शेतकऱ्याची काही जीवितहानी झाली म्हणजे दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीस दरमहा 1500/- रु दिले जातात.
किसान मानधन योजनेमध्ये पात्र होण्याचे निकष ते पाहू
- अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- शेतकरी लहान किंवा अल्पभूधारक शेतकरी असने गरजेचे आहे.
- शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर म्हणजेच 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन नसावी.
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वय हे 18 ते 40 च्या दरम्यान असले पाहिजे.
- या मानधन योजने अंतर्गत देण्यात येणारे मानधन केवळ लाभार्थी शेतकरी व त्यांचा पत्नीस प्राप्त होईल.
- दुर्दैवाने जर शेतकरीच्या जीवाचं बर वाईट झालं, तर पती किंवा पत्नीस मानधनाच्या ५०% रक्कम मिळेल.
- शेतकऱ्यांच्या मृत्यू नंतर त्याच्या अपत्यांना या मानधन योजनेचे लाभ मिळणार नाहीत.
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड
- आधारसोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक
- बँक पासबुक
- उत्पन्न दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मतदान ओळखपत्र
- वयाचा दाखला
PM Kisan Yojana या योजनेमुळे मिळणारे लाभ आणि फायदे
या योजने मुळे शेतकऱ्याच्या सर्वात मोट्या प्रमाणात होणाऱ्या आर्थिक अडचणीच्या त्रासातून आता कायमची मुक्तता मिळणार आहे. या जगाच्या पोशिंद्याला आता कोणावरती अवलंबून रहावं लागणार नाही. या योजनेच्या अंतर्गत 55 ते 60 वर्ष्याच्या वरील शेतकऱ्यांना या मानधन योजना या योजनेतुन दरमहा 3000/- रु म्हणजेच वर्ष्याला 36,000/- रु मानधन प्राप्त होणार आहे. यातील 50 टक्के रक्कम हि केंद्र शासन देत आहे.
तर हे दरमहा मिळणारे मानधन हे त्याना आयुष्यभरासाठी देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यातील जोडीदाराचा दुर्दैवी मुत्यू झाला तर त्या पतीला किंवा पत्नीला रुपये १५००/- दरमहा देण्यात येणार आहेत. त्या हे दिले जाणारे दरमहा मानधन कमीत कमी श्रमात देऊन त्यांचे भविष्य त्यांना सुरक्षित करता येईल. योजनेची लाभ पात्रता हि फक्त ज्या शेतकऱ्यांना २ हेक्टर शेतजमीन आहे म्हणजेच ५ एकर क्षेत्र आहे किंवा त्या परीक्षा कमी आहे ( अल्पभूधारक ) त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
2 हेक्टर पेक्षा जास्त शेत जमीन असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र होणार नाहीत.तर या योजने साठी 18 ते 40 या वयोगटातील शेतकरी या मानधन योजने साठी अर्ज व नाव नोंदणी करू शकतात. तर त्यांना दर महिन्याला रु 55 इतकि रक्कम भरावी लागणार आहे. जे शेतकरी या योजने साठी नोंदणी करतील त्यांनी दरमहा एक ५५ ते 200 या प्रमाणे हप्ते भरले तर त्यांना त्यांच्या 60 वर्षा नंतर महिन्याला रुपये 3000/- हे मिळतील. तर ते मिळनारे मानधन ते त्यांच्या दैनंदिन गरज व इतर गरज पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणू शकतील.
दरमहा भरावे लागणार फक्त 55 रुपये 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेत नाव नोंदवू शकतात. यामध्ये प्रत्येक शेजारी बांधावयास प्रति महिना रुपये 55 व 200 एवढी हप्ता रक्कम त्यांना द्यावे लागणार आहेत. याचा नंतर त्या शेतकरी व्यक्तीचे 60 वय पूर्ण झाल्यावरती त्यांना प्रतिमहा रुपये 3000/- हजार एवढी रक्कम त्यांना पेंशन स्वरूपात मिळणार आहेत. या रक्कमेचा उपयोग ते त्यांच्या गरज पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ते करू शकतात
येथे आपण तुमच्या अधिक माहिती करीता शेतकऱ्याचे वय व त्यांनी भरायचा हप्ता ( प्रिमिअम ) असा तक्ता देत आहोत तो पाहून तुम्ही तुमचा देयक हप्ता तुमच्या वयोमर्यादे नुसार निवडू शकता.
शेतकरी वयोगट | हप्ता ( प्रीमियम ) |
१८ | ५५ |
१९ | ५८ |
२० | ६१ |
२१ | ६४ |
२२ | ६८ |
२३ | ७२ |
२४ | ७६ |
२५ | ८० |
२६ | ८५ |
२७ | ९० |
२८ | ९५ |
२९ | १०० |
३० | १०५ |
३१ | ११० |
३२ | १२० |
३३ | १३० |
३४ | १४० |
३५ | १५० |
३६ | १६० |
३७ | १७० |
३८ | १८० |
३९ | १९० |
४० | २०० |
PM Kisan Yojana या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा
जे शेतकरी पी एम किसान मानधन योजना या योजनेत नावनोंदणी करण्यास इच्छुक त्यांनी त्यांच्या जवळच्या सेतू कार्यालयाला म्हणजेच इ सेवा केंद्रात भेट द्या. वरती नमूद केलेली सर्व कागदपत्रे सोबत न्यावी. तेथे गेल्यानंतर व्यक्ती तुम्हाला किसान मानधन योजनेचा अर्ज व नोंदणी करून घेतील व पोर्टलवरती तो तुमचा अर्ज सबमिट करतील. फक्त तेथे जाताना तुम्ही वरील दिलेली सर्व ओरिजिनल कागदपत्रे घेऊन जावीत.
जेव्हा ते तुमचा अर्ज सम्पूर्ण भरतील तेव्हा ते तुम्हाला भरावयाच्या हप्त्या बद्दल व त्याच्या रकमेबद्दल ते तुम्हाला व्यवस्थित माहिती देतील.
फॉर्म भरायची प्रोसेस जेव्हा सर्व कम्प्लीट होईल तेव्हा ते तुम्हाला त्या फॉर्मची एक झेरॉक्स कॉपी देतील. फक्त तुम्हाला अर्ज करते वेळेस आपण जी सांगितलेली डॉक्युमेंट आहेत जसे की शेतकऱ्याचे आधार कार्ड तुमचा आधार सोबत लिंक केलेला मोबाईल नंबर तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक तुमचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला तसेच पासपोर्ट साईज म्हणजेच तुमच्या फोटोकॉपीज तुमचे मतदान ओळखपत्र तुमचा वयाचा दाखला म्हणजेच तुमचे बर्थ सर्टिफिकेट ही सर्व कागदपत्रे तुम्ही अर्ज भरायच्या वेळेस महा-ई-सेवा केंद्र म्हणजेच सीएससी केंद्रामध्ये जाताना आपल्याबरोबर घेऊन जावीत.
एक महत्त्वाची नोंद – पी एम किसान मानधन योजनेसाठी 18 ते 40 या वयोगटातील शेतकरी पात्र आहेत तुम्हाला नोंदणी केल्यानंतर जो काही हप्ता व प्रीमियम असेल तो तुमच्या साठ वर्षापर्यंत भरावयाचा आहे साठ वर्षानंतर तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये असे वर्षाचे 36 हजार रुपये येणार आहेत.
अधिक वाचा – पी एम सूर्य घर योजना या केंद्र सरकारच्या योजनेमुळे आता मिळणार मोफत वीज
अधिक वाचा – 75 टक्के अनुदान । kadaba kutti machine yojana
अधिक वाचा – 30 वस्तूंचा मोफत भांडी संच, bandhakam kamgar yojana 2024
FAQ’s
1). Pmsym साठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करावा ?
उत्तर- पी एम किसान मानधन योजना या योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती जाऊन तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
2). पी एम किसान मानधन योजनेसाठी पात्रता निकष काय आहे ?
उत्तर – शेतकरी अल्पभूधारक असणे व त्याच्याकडे पाच एकराच्या आत मध्ये शेत जमीन व तसेच त्याचे वय 18 ते 40 च्या दरम्यान असायला पाहिजे.
3). पी एम किसान योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र नाहीत ?
उत्तर – ज्यांचे वय 18 ते 40 पेक्षा जास्त आहे व त्यांच्या कडे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल व ते अल्पभूधारक नसतील तर ते या योजनेत पात्र होणार नाहीत.
4). प्रधानमंत्री किसान योजनेचे फायदे काय आहेत ?
उत्तर – शेतकरी ज्यावेळेस पासून ते या योजनेसाठी प्रवीण हप्ते पासून ते या योजनेसाठी प्रीमियम चे हप्ते भरतील त्यांना त्यांच्या वयाच्या साठ वर्षानंतर प्रत्येक महिन्याला रुपये तीन हजार एवढी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत.
5). महिन्याला 3000 केव्हापासून मिळणार आहेत ?
उत्तर – शेतकऱ्याचे वय वर्ष साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये जमा होणार आहेत.
2 thoughts on “पी एम किसान मानधन योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार प्रति वर्षी 36000 रुपये l PM Kisan Yojana”