PM Kisan FPO Yojana : तर शेतकरी बांधवांनो आज आपण पीएम किसान एफ पी ओ योजना या योजनेबद्दल या ब्लॉगमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला माहीतच आहे केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन अत्यंत फायद्याच्या योजना राबवत असतं ज्यामुळे देशातील शेतकरी हा सुखकर व्हावा व त्याला शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे व त्याच्या उत्पन्नामध्ये वृद्धी व्हावी. तसेच आपला देश हा कृषिप्रधान असल्यामुळे या देशातील लोकसंख्येचा 70 ते 80 टक्के भाग हा शेती करतो. त्यामुळे केंद्र सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये उपयुक्त असे योजना व निर्णय देत असते तर यामधीलच एक योजना म्हणजे पीएम किसान FPO Yojana योजना तर आज आपण यामध्ये पीएम किसान उपयोजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
PM Kisan FPO Yojana काय आहे ?
तर मित्रांनो केंद्र सरकारने ही पीएम किसान एफ पी ओ योजना ही शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन काढण्यास किंवा पैसे मिळवण्यास मदत करण्यासाठी बनवली आहे. जसे की आपण पाहतच आहोत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन रेशीम उद्योग दूध उद्योग यासारखे शेतीला पूरक असणारे व्यवसाय करत असतात तर या पी एम किसान एफ पी ओ योजने अंतर्गत शेतकऱ्यांना यासारखे शेतीपूरक असणारे जोडधंदे करण्यासाठी केंद्र सरकार हे आर्थिक मदत देते यामध्ये शेतकऱ्यांना शेतीपूरक व शेतीला जोडधंदा किंवा नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी रुपये 15 लाख इतके देत आहे.
पीएम किसान एफ. पी. ओ. योजनेत पात्र होण्यासाठी लागणारे निकष व अटी
तर या पी एम किसान एफ पी ओ योजने मध्ये पात्र होण्यासाठी शेतकरी बांधवांना कोणकोणते निकष पाळावे लागतील व त्याच्या अटी नियम काय असतील ते आपण जाणून घेऊयात.केंद्र सरकारने शेतकऱ्याना आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी ही पी एम किसान एफ पी ओ योजना राबवली आहे. यामध्ये योजनेमध्ये पात्र होण्यासाठी शेतकरी बांधवांना कोणकोणते निकष पाळावे लागतील हे पाहू तर यात 11 शेतकऱ्यांच्या गटाने एकत्रित येऊन एक संघ किंवा संघटना तयार करावी लागेल.
तरच त्यानंतर त्या शेतकरी उत्पादक संघटनेस केंद्र सरकार शेती पूरक व्यवसाय करण्यास सरकार मदत करेल. त्यानंतर त्यांच्या संघटनेची किंवा कंपनीची योग्या पद्धतीने नोंदणी होईल. एकदा नोदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यांतर त्यांना शेती उत्पादकते ची कामे दिली केली जातात. ज्यामध्ये शेतकरी बांधवांना शेती साठी लागणारे औषधे, बि-बियाणे, शेती साठी लागणारी यंत्र सामग्री हे त्यांना देणं सोईस्कर होऊन जाते.
PM किसान एफ पी ओ योजना व त्यामागचे धोरणे
भारतात एकूण लोकसंख्येच्या 60-70 टक्के लोक शेती करतात, म्हणजे शेतीवर अवलंबून आहेत. तस पाहिलं तर शेती हे खूप शारीरिक कष्टाचे काम असते त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतीतून पाहिजे तसे उत्पन्न ते काढू शकत नाहीत. या गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारने केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कष्टाच्या वाटा सुखकर करण्यासाठी 2023 यावर्षी पासून पीएम किसान योजना केंद्र सरकारने अकरा शेतकऱ्यांच्या गटास रुपये 15 लाख एवढी आर्थिक मदत केंद्र सरकार देते.
पीएम किसान एफ. पी. ओ. योजनेचा मागचा प्रमुख हेतू हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे होय, या पोचली मागचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच शेतकऱ्यांची शेती सुधारणे त्यांना आर्थिक पाठबळ देणे तसेच त्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी मदत पुरवणे ही आहेत.पूर्वीपासून शेतकरी हे फक्त पिकं पिकवणे इतकेच काम करत होते.
पण आता या योजनेच्या माध्यमातून ते व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांची शेतीतील येणारे उत्पन्न हे योग्य किमती ते विकू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना सरकार हे आर्थिक मदत देत असते त्यामुळे त्यांना आता शेतकरी व व्यापारी यांच्यामधील दलालांचा या ठिकाणी संबंध राहत नाही ताईच्या काळामध्ये सरकार शेतकऱ्यांना हे पैसे देणार आहे या पीएम किसान एफ. पी. ओ. योजनेवरती एकंदरीत 6885 कोटी रुपये इतका खर्च केंद्र सरकार करणार आहे.
PM Kisan FPO Yojana योजनेचे शेतकऱ्यांना होणारे लाभ
- या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत मिळणार आहे.
- दुर्गम व डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना मोट्या प्रमाणात लाभ होणार .
- मिळणाऱ्या धनलाभापासून शेतकरी त्याची शेती उत्तम प्रकारे व्यवस्थापित करू शकणार आहे.
- शेतकरी थेट व्यापाऱ्यांना शेतमाल विकू शकणार.
- शेतीचा विकास व यांत्रिकी करणं करता येणार .
- शेतकरी व व्यापारी यांच्या दोघांतील मध्यस्थी दलालांवर निर्बंध येणार
- शेतीसाठी औषधे यंत्रसामग्री बी बियाणे यांसारख्या गोष्टी विकत घेण्यासाठी मदत होणार आहे
एफ. पी. ओ. योजनेमध्ये पात्र होण्यासाठीचे निकष
- या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी शेतकऱ्याला भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
- तसेच तो शेतकरी व त्याच्याकडे शेती जमीन असणे बंधनकारक व महत्त्वाचे आहे.
- तसेच तो या योजनेमध्ये शेतकरी उत्पादक संघटनेचा (FPO) सदस्य असणे आवश्यक आहे.
- शेतकरी उत्पादक संघ म्हणजेच एपीओ मध्ये किमान 11 शेतकरी असणे आवश्यक आहे.
पीएम किसान एफ. पी. ओ. योजनेला अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- जमिनीची कागदपत्रे/ सातबारा उतारा
- बँक खाते
- पत्ता व पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट साईज चे फोटो
- आधार कार्ड
- शेतकरी वापरत असलेला मोबाईल क्रमांक
तर वरती दिल्या प्रमाणे सर्व कागदपत्रे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे.
किसान एफ. पी. ओ. योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी करायची ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना सर्वप्रथम FPO (Farmer Producer Organization) म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना संघटना स्थापन करणे गरजेचे आहे तरीही FPO संघटना स्थापन करण्याची कागदपत्रे खालील प्रमाणे दिलेली आहेत ती कागदपत्रे असणे आवश्यक आहे
- सभासद होणाऱ्या शेतकऱ्यांची यादी– या योजनेमध्ये एका गटामध्ये किमान 11 शेतकरी असणे आवश्यक आहे प्रत्येक शेतकऱ्याचे नाव पत्ता आधार क्रमांक शेत जमीन याची सर्व माहिती असणे आवश्यक आहे वरील कागदपत्रांमध्ये आपण ही माहिती दिलेली आहे.
- शेतकरी उत्पादक संघ नोंदणी फार्म- त्यामध्ये संघटनेची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर नोंदणी फार्म भरावा लागेल या फॉर्ममध्ये शेतकरी उत्पादक संघाची माहिती तसेच सदस्यांची संपूर्ण माहिती आणि आणि संघटनेच्या ध्येय उद्दिष्टांची माहिती असणे आवश्यक आहे.
- योजनेमधील नियम आणि तरतुदी- तुम्हाला या किसान एफ. पी. ओ. योजनेचे नियमाने प्रकृती माहिती असणे व त्यामध्ये लिहिणे आवश्यक आहे या नियमांमध्ये संघटनेचे कार्य त्याची व्यवस्थापना प्रत्येक सदस्यांकडे दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या याची सर्व माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे
वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही पीएम किसान एफ. पी. ओ. योजना म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी अर्ज करावयाचा आहे. त्याची सर्व माहिती इथे खाली आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने दिली आहे. त्या पद्धतीने जाऊन तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन अगदी योग्य पद्धतीने करू शकाल त्यामुळे खालील माहिती व्यवस्थित वाचा.
अर्ज कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेबसाईट वरती करायचा
हा अर्ज तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये भरावा जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. ज्यांना स्वतःहून अर्ज करायचा आहे त्यांनी आम्ही दिलेली प्रोसेस फॉलो करू शकता.
वेबसाईट | PM Kisan FPO Yojana Portal |
- यामध्ये तुम्ही PM Kisan FPO Yojana योजना च्या अधिकृत वेबसाईटला ओपन करून तिथे राईट साईडला अपलाईन या बटणावर क्लिक करावे
- त्यानंतर तुमचा आधार नंबर व मोबाईल नंबर त्या ठिकाणच्या रकान्यात टाकावा.
- हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन ओटीपी वरती येईल तो तिथेच मला त्या ठिकाणी टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व माहिती त्या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे एफ पी ओ जे काही नियम अटी तरतुदी असतील त्या ठिकाणी भरून घ्यायच्या आहेत.
- ही सर्व प्रोसेस कंपनी झाल्यानंतर तुम्ही सबमिट वाटणार वर क्लिक करून तुमचे अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
निष्कर्ष
पी एम किसान FPO योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकरी उत्पादक गटास केंद्र सरकारच्या माध्यमातून 15 लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते त्यामध्ये शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन शेती सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे उभा करून स्वतःचा आर्थिक दर्जा उंचवू शकतील. शेतकऱ्याच्या जीवनाला आकार देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होते.
अधिक वाचा – पिक विमा खात्यांवरती कधी जमा होणार । Pradhan Mantri Fasal Bima Yojana
अधिक वाचा – कांदा निर्यात बंदी 31 मार्च पर्यंत राहणार
अधिक वाचा – पी एम किसान मानधन योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार प्रति वर्षी 36000 रुपये
FAQ’s
1). पीएम किसान एफ पी ओ योजना काय आहे?
उत्तर- पीएम किसान एफपीओ योजनेच्या माध्यामातून शेतकर्यांच्या गटास सरकार कडून आर्थिक सहाय्य दिले जाते.
2). FPO योजनेच्या अंतर्गत शेतकर्यांना किती रक्कम दिली जाते ?
उत्तर– FPO च्या माध्यामातून शेतकर्याच्या उत्पादक गटास केंद्र सरकार च्या द्वारे 15 लाख रुपये दिले जातात.
3). शेतकरी उत्पादक संस्थेच्या गटात कमीत कमी किती शेतकरी असणे आवश्यक आहे ?
उत्तर- 11 शेतकर्यांच्या शेतकरी उत्पादक गटात समावेश असणे गरजेचे आहे.
4). स्वतंत्र शेतकर्यास या योजनेसाठी अर्ज करता येतो का ?
उत्तर- नाही स्वतंत्र शेतकर्यास या योजनेसाठी अर्ज करता येत नाही.
5).पीएम किसान एफपीओ योजनेसाठी अर्ज कोठे करावा ?
उत्तर- योजनेसाठी अर्ज हा पीएम किसान एफपीओ योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती किवा जवळच्या CSC केंद्रात करावा.
3 thoughts on “शेतकऱ्यांना 15 लाखाचा लाभ मिळणार | PM Kisan FPO Yojana ”