पंढरीची वारी मराठी निबंध | Pandharichi Vari Nibandh in Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pandharichi Vari Nibandh in Marathi: शनिवारचा दिवस होता शाळा सुटली होती, आणि आम्ही सारेजण घरी जाण्यासाठी निघालो घरी जाताना वाटेमध्ये बघितलं, दरवर्षीप्रमाणे पंढरपूरच्या वारीला लोक निघाले होते. लोकांची प्रचंड गर्दी बघून आम्ही थक्कच झालो. मनामध्ये थोड्या वेळासाठी विचारू घोळू लागले. अरे किती ते त्या पांडुरंगा विषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम, निष्ठा किती ती दर्शनाची आस, इतकं निस्वार्थ प्रेम की सर्व माणसे आपला संसार सोडून कशाची काळजी न करता आपल्या देवासाठी भेटायला आपल्या शरीराची  ना पावसाची ना उन्हाची कशाचीही पर्वा न करता‌ आपल्या पायाने  इतके सारे अंतर पार करतात. इतकं काय पांडुरंगाच्या प्रेमात  ही सारी मंडळी इतकी अखंड बुडाली आहे की त्यांना कशाचेच पर्वा उरत नाही. किती तो अट्टाहास की आपल्या शरीराची सुद्धा  ही पंढरीची वारी करताना देहभान विसरून जाणे.

कधी उन्हामध्ये थोडसं जरी काम केलं तरी आपल्या अंगाची लाही लाही होते आणि ही माणसे दरवर्षी हजार किलोमीटर आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी हे अंतर हसत हसत   पार करतात . आणि दरवर्षी कधी एकदा ते पंढरीची वारी परत अनुभवायला भेटेल याची वर्षभर वाट बघतात. विचार करू लागलो आणि सारे नवलेच वाटत वाटत गेले. माझ्या मनात मात्र त्या प्रश्नांचा कल्लोळ जो चालू झाला तो मात्र काही थांबलाच नाही. मग मी विचार केला काय आहे या पंढरीच्या वारीमध्ये इतकी सारी मंडळी आपलं देहभान विसरून गेलेत की यांना कशाचेच पर्वा उरली नाही. मग मी पण विचार केला या प्रश्नांची उत्तरे आपण शोधून काढायची आणि आपण पण या वर्षी पंढरीची वारी करायची आणि बघायचं काय आहे या पंढरीच्या वारीमध्ये इतकी जादू?

Pandharichi Vari Nibandh in Marathi
Pandharichi Vari Nibandh in Marathi

पंढरीची वारी निबंध |Pandharichi Vari Nibandh in Marathi

आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी  ही पायी यात्रा चालू होते दरवर्षी हजारो पांडुरंगाचे भक्त म्हणजेच वैष्णव चालत पंढरपूरला जातात. दरवर्षी हजारो वारकरी या पायी वारीमध्ये सामील होतात. ही पंढरपूरची वारी मराठी महिन्यातील आषाढ आणि कार्तिक महिन्यात शुद्ध एकादशीला होत असते. देहू मधून संत तुकाराम महाराजांच्या पादुका आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका तसेच शेगाव वरून संत गजानन महाराज यांची पालखी, त्रंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पालखी, ऐदलाबाद येथून संत मुक्ताबाईंची, पैठण हून एकनाथांची तसेच उत्तर भारतातून संत कबीर यांची पालखी पंढरपूरला प्रतिष्ठान करतात. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे संबोधतात. अशी समजूत आहे की या दिवशी भगवान विष्णू वैश्वीक महासागरामध्ये शेषनागावर निद्रस्थ अवस्थेमध्ये असतात. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपवास आणि उपासना केली जाते.

वारकरी लोक गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात असे म्हटले जाते ही वारकरी होण्यासाठी ही माळ गळ्यामध्ये घालावी लागते आणि नित्यनियमाने हरिनाम हरिपाठ याचे स्मरण करावे. संतांच्या ग्रंथांचे पठण केले जाते. आषाढी एकादशी या पवित्र दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि महाराष्ट्रातील वारकरी दांम्पत्याला पूजेचा मान मिळतो. निश्चितच प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये पूजेच्या मान मिळवण्यासाठी ओढ लागलेली असते. आणि त्यासाठी वारकरी लोक रात्रंदिवस दर्शनासाठी उभे राहतात. पंढरपूरची वारी ही युगाननुगे चालत आलेली आपली संस्कृती आहे. असा अभ्यास आहे ही जवळपास ७०० वर्षांपासून ही परंपरा अखंड चालू आहे. तिला कुठेही आपल्या वारकऱ्यांनी खंड पडू दिला नाही.

Pandharichi Vari Nibandh in Marathi

आणि चालू झाली माझी पंढरीची वारी पायी चालत पंढरीच्या वारीला सुरुवात केली. आणि त्या वारकऱ्यां मध्ये सामावून गेलो. त्यांच्याशी बोलत त्यांचा गजर ऐकत पुढे पुढे चालत राहीलो. आणि कधी माझ्या पायांनी इतकं सारं अंतर पार केलं याचा माझा माझ्यावरच विश्वास बसला नाही. इतकं भारावून गेलो तर प्रत्येक गजरामध्ये, विठूचा नामामध्ये की बाकीच्या गोष्टींचे काही भान राहिले नाही.  जेव्हा पंढरीची वारी केली तेव्हा समजलं यामध्ये श्रीमंत आहे ना गरीब , ना लहान आहे ना मोठा, ना कोणी उच्च शिक्षित ना कोणी अडाणी कोणताच भेदभाव इथे नसतो . आहे तो फक्त एकच विश्वास तो म्हणजे प्रत्येक गोष्टींमध्ये त्या पांडुरंगाचं अस्तित्व टाळ मृदुंगाच्या तोलावरती सारे वारकरी झिम्मा ,फुगडी खेळत होते यामध्ये कुठलाच  जातीभेद दिसत नव्हत.

जेव्हा पहिल्यांदा अश्व रिंगण समोरून बघितले, तेव्हा समजले की मानव जातीच्या आयुष्यामध्येच देवाचे जितके अस्तित्व आहे , इतकेच प्राणिमात्रांमध्ये त्या पांडुरंग विषयी आत्मीयता आहे. ना कोणती जात होती नाही कुठला पंथ. फक्त पांडुरंगाचे  वैष्णव त्या चंद्रभागेच्या तीरावरती एकच आस घेऊन बसले होती. ते म्हणजे पांडुरंगाचे दर्शन कधी होणार याची. त्या पंढरीच्या वारीमध्ये गेल्यानंतर मला या वारीचं खरं अस्तित्व समजलं, इतक्या लांबून पायी वारी करून आल्यानंतर ती जी विठ्ठलाची दर्शनाची आस असते, ती अधिकच प्रकर्षाने जाणवत होती.

Pandharichi Vari Nibandh in Marathi
Pandharichi Vari Nibandh in Marathi

पंढरीची वारी म्हणजे एक आनंदयात्राचं. पंढरीची वारी ही आपला महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी यात्रा समजली जाते हे फक्त मी ऐकून होतो. पण खरंच देवाच्या अंगणामध्ये स्वतःचा देहभान विसरून असं देवारूप होऊन जावं हे जर प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी अनुभवायचा असेल तर खरंच या पंढरीच्या वारीला यावं लागेल हे मात्र मला कळालं होतं. विठू माऊलीच्या पंढरीमध्ये पोहोचल्यानंतर सगळीकडे एकच जयघोष होता तो म्हणजे त्या विठू माऊलीचा. चंद्रभागेमध्ये स्नान करून जेव्हा देवाच्या भेटीसाठी मार्गस्थ झालो.

तेव्हा त्याला भेटण्याची ओढ अधिकच प्रकर्षाने वाढत होती. जशी जशी पावली त्या माऊलीच्या दर्शनासाठी पुढे जात होती इतके अधिकच देहभान विसरून जात होतो. आणि जेंव्हा त्या माऊलीची मूर्ती डोळ्यांसमोर आली तेंव्हा मात्र माझ्या डोळ्यातून कधी आनंदाश्रू वाहू लागले याचे देहभान राहिले नाही. फक्त इतकेच वाटत होते की त्या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये आपलं सारं आयुष्य हरवून जावं. ना कुठला लोभ , ना कोणती अपेक्षा, नाही संसार मनामध्ये एकच भावना होती ती म्हणजे आपलं सारं आयुष्य पांडुरंगाच्या सेवेसाठी अर्पण करावं. आई रुक्मिणीचे दर्शन घेतले तेव्हा समजले की ही रुक्मिणी माऊली आपल्या विठू माऊलीच्या पाठीशी खंबीरपणे कमरेवरती हात घेऊन उभी आहे. आई रुक्मिणीचे ते तेजस रूप डोळ्यासमोरून जातच नव्हते. इथे आले की आपल्या संसार रुपी आयुष्यातील सगळ्या पीडा माणूस विसरून जातो.

Pandharichi Vari Nibandh in Marathi

खरंच ति वीट किती भाग्यवंत असेल जिच्यावरती हा पांडुरंग युगानुयुगे अखंड उभा आहे. किती मोठे पुण्य असेल तिचे. आणि असेच एका वारकऱ्याचे आयुष्य या पांडुरंगाच्या सेवेसाठी अर्पण झाले तर आयुष्य आनंदमय, सुखमय होईल आणि या विठू माऊलीच्या सेवेसाठी आपला आयुष्य अर्पण झालं तर याच्यापेक्षा भाग्यवंत गोष्ट कुठलीच नाही. जेव्हा पंढरीची वारी केली तेव्हा समजले की ही आनंद यात्रा काय असते. देवाचा अस्तित्व चराचरामध्ये किती भरून आहे गरज आहे ती फक्त आपण जाणण्याची, माणसांमध्ये देव शोधण्याची, प्राणीमात्र्यावर भूतदया दाखवण्याची आणि असह्यांना मदत करण्याची.

पंढरीची वारी केल्यानंतर मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून गेली. खरा संसार काय आणि या आयुष्यात येऊन आपण काय परत घेऊन जातो याची सगळी उत्तरे इथे येऊन मिळतात, आणि पंढरीची वारी करून परत परतीची वाट धरली मनामध्ये आस धरून की परत पुढच्या वर्षी कधी एकदा हा आनंद अनुभवाला मिळेल. आणि वर्षानुवर्षे मला ही वारी करायला भेटेल.

Pandharichi Vari Nibandh in Marathi
Pandharichi Vari Nibandh in Marathi


असेच अप्रतिम निबंध वाचा


येथून शेअर करा

Leave a Comment