आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये, मुख्यमंत्री वयोश्री योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री वयोश्री योजना : माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या नेहमीच राज्यातील जनतेच्या विकासासाठी नवनवीन योजना व संकल्पना राबवत असतात यामधलीच एक संकल्पना अर्थातच योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना आह. या योजनेवर आज आपण या ठिकाणी सविस्तर अशी विस्तृत माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे प्रत्येकाच्या घरामध्ये वयस्कर वडीलधारे व्यक्ती असतात.

तर जे वृद्ध व वयस्कर व्यक्ती असतील तर ते या वयोश्री योजना योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, किंवा या योजनेचा लाभ त्यांना कसा मिळू शकतो, या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी महत्त्वाचे निकष काय व कोणते आहेत, यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत. हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना
मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना का व कशासाठी ?

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 65 वर्ष व त्या अधिक वयाची लोकसंख्येच्या 10 ते 12 टक्के इतके आहे, तर या लोकांना राज्य सरकार द्वारे त्यांच्या एका ठराविक वयाच्या नंतर म्हणजेच 65 वर्षाच्या नंतर आर्थिक मदत केली जाणार आहे, या वयोश्री योजना योजनेअंतर्गत त्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये द्या जीवनावश्यक वस्तू लागतात व त्याचप्रमाणे ते जास्त वयामुळे भरपूर विकारांनी त्रस्त असतात. त्यांना त्या वयामध्ये भरपूर शारीरिक व्याधी उद्भवलेल्या असतात.


अधिक वाचा – 75 टक्के अनुदान । kadaba kutti machine yojana


तर त्यांचे आरोग्य हे उत्तम प्रकारचे रहावे त्यांना एक आर्थिक पाठबळ मिळावे, एक आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत या सर्व 65 वर्षे व त्या पेक्षा जास्त सर्वच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे. तरीही योजना वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना सशक्त करण्यासाठी व त्यांच्या फायद्यासाठी राबवली गेलेली आहे. तरी या योजनेचा फायदा हे फक्त 65 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या दृष्टी नागरिकांना होणार आहे.

या संबंधित नुकताच महाराष्ट्र शासनाने जीआर काढला असून त्यामध्ये त्यांनी या योजनेबद्दल ची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की जे आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये 65 वर्षापेक्षा जास्त असणारे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही आवश्यक अशी उपकरणे लागत असतील म्हणजे चेष्मा, वोकर, व्हाईलचेअर किंवा काही गोष्टी लागत असतील तर त्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठीच ही मुख्यमंत्री वयोश्री योजना ही सुरू करण्यात आली.

अधिक माहितीसाठी – Website महाराष्ट्र शासन

तसेच यामध्ये मानसिक आरोग्य उपचार केंद्र तसेच कुटुंब कल्याणसाठी लागणारा इतर उपाययोजनांचा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे, या मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये महाराष्ट्र शासन हे वय वर्ष 65 व त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लागणारी साधनसामग्री तसेच उपचारासाठी लागणारी औषधे जर कोणी एखादा वयोवृद्ध अपंग असेल तर त्यासाठी लागणारे साहित्य हे सर्व त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. ज्याच्या अनुषंगाने ते त्यांचे जीवन हे व्यवस्थित रित्या जगू शकतील. त्यांना कोणत्याही प्रकारच्या शारीरिक त्रास होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जाता जावं लागणार नाही. त्यांना जीवन जाण्यासाठी तत्परतेने मदत या योजना अंतर्गत केली जाणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये पात्रतेचे निकष व नियम

या योजना या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणकोणते निकष असतील याबद्दल आपण पाहूयात,

  1. जर जे कोणी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असतील ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी व नागरिक असावे, व त्यांना ते डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असावी ज्या नागरिकांचे वय 65 वर्षे व त्यावरून जास्त आहे त्यांच्याकडे तुमचे आधार कार्ड असायला हवे जर त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल व दुसरे कोणतेही त्यांच्या ओळखीच्या पुराव्याचे कागदपत्रे असतील तर ती या ठिकाणी स्वीकारली जातील.
  2. त्याचबरोबर जे नागरिक या योजनेसाठी अर्ज करणार आहेत किंवा या योजनेसाठी त्यांना पात्र व्हायचं आहे अशा नागरिकांकडे जिल्हा प्राधिकरणाकडून त्यांची पात्रता सिद्ध करू शकतात किंवा त्यांचे रेशन कार्ड व इतर योजना बद्दलचे निवृत्तीवेतन असल्याचा किंवा मिळवण्याचा पुरावा देऊ शकतात.
  3. यामध्ये या योजनेसाठी म्हणजेच वयोश्री योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे रुपये दोन लाख याच्या आत मध्येच असावे त्याबद्दल सविस्तर उत्पन्नाचा दाखला व त्याबद्दल सविस्तर उत्पन्नाचा दाखला व स्वतःचे वचना पत्र सादर करणे आवश्यक आहे.
  4. जे नागरिक या योजनेसाठी पात्र होतील, त्यांनी त्यांचे वैयक्तिक आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या सेविंग अकाउंटला जोडलेले असावे कारण त्यामध्ये योजनेचे रुपये तीन हजार डीबीटी प्रणाली द्वारे डायरेक्ट वितरित केल्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकांनी येणाऱ्या तीन दिवसांच्या आत मध्ये ज्या कोणत्याही मानसी आरोग्य केंद्रातून जी कोणती उपकरण खरेदी केलेली आहेत आणि त्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे जमा करणे आवश्यक आहे., तसेच हे सर्व दस्तावेज समाज कल्याण साहित्य यांनी प्रमाण किती केलेले असायला हवेत जेष्ठ नागरिकांनी सर्व कागदपत्रे पुढील 30 दिवसांच्या आत मध्ये संस्थेच्या वेबसाईट वरती अपलोड करणे अनिवार्य आहे अन्यथा त्यांच्या बँक अकाउंट मधून पैसे वजा केले जातील.
  5. जो काही ज्येष्ठ नागरिकाचा जिल्हा असेल त्या जिल्ह्यात 30 टक्के लाभार्थी हे महिला असतील

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

या योजनेमध्ये जे नागरिक अर्ज करू इच्छित आहेत. अशा नागरिकांना कोणकोणते आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत याची यादी आपण खालील प्रमाणे दिली आहे. ती सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट साईज चे फोटो दोन
  • स्वयंघोषणापत्र
  • ओळखपत्र पटविण्यासाठी असणारी अन्य कागदपत्रे

वयोश्री योजनेसाठी अर्ज कुठे व करायचा ?

या योजनेबद्दलचा जीआर हा महाराष्ट्र शासनाने नुकताच प्रकाशित केला असून या योजनेविषयीची स्वतंत्र एक अधिकृत वेबसाईट महाराष्ट्र शासनाकडून तयार करण्यात येणार आह. ज्यावेळेस ती वेबसाईट लाईव्ह होईल व या योजना संदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू होईल तेव्हा आम्ही त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आपल्या ब्लॉग वरती देणार आहोत.


या योजना शिबिरासाठी जे कोणी अधिकारी नियुक्त केले गेले असतील ते जे कोणी पात्र झालेले ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची सर्व कागदपत्रांची व्यवस्थितरित्या पडताळणी करून ठेवतील तसेच सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना ई-टोकन दिले जाणार जे कोणी ऑनलाईन अर्ज भरतील त्यांना हेही ई-टोकन देण्यात येईल व जे कोणी ऑफलाइन अर्ज भरतील त्यांना फक्त नोंदणी पावती दिली जाईल.


प्रशासकीय पातळीवरती या सर्व कामांचे मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यानंतर पात्र नागरिकांची माहिती ऑनलाईन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने पुणे येथील समाज कल्याण आयुक्त आणि मुंबईतील सामाजिक न्याय आणि विशेष विभागाकडे सुपूर्त करण्यात येईल यामध्ये पात्र असणाऱ्या किंवा झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या यादीमध्ये त्यांचे डिटेल्स जसे की फोटो, नाव, बँक खाते, आधार नंबर, बीपीएल कार्ड नंबर, या सर्व गोष्टींचा समावेश असेल व ती सर्व माहिती त्या आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसारित करण्यात येईल.


पुढील काळामध्ये या योजनेबद्दलची येणारे सर्व अपडेट्स वेळोवेळी ही आपल्याला देण्यात येईल आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला राहणाऱ्या सर्व 65 वर्षे व त्याहून अधिक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेबद्दल माहिती द्यावी व त्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा.

निष्कर्ष

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ज्या नागरिकांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये हे राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. यामध्ये त्यांना त्यांच्या वृद्धावस्थेमध्ये उद्भवणाऱ्या अडीअडचणींवर उपाय योजना करण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य संबंधित औषधे व इतर सामग्री घेण्यासाठी त्यांना या मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. नागरिक हे वयाच्या 65 वर्ष ओलांडल्यानंतर त्यांच्याकडे ठराविक असा उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध नसतो त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवन जगताना आरती अडचणींना सामोरे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे राज्य सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत पुरवली जाते.


अधिक वाचा – PM Kisan FPO Yojana शेतकऱ्यांना १५ लाखाचा लाभ मिळणार

अधिक वाचा – आता फक्त 1200 रुपये भरा आणि कुठेही मनसोक्त फिरा

अधिक वाचा – आता शेतकऱ्यांना मिळणार प्रति वर्षी 36000 रुपये



तर ही महत्त्वाची माहिती तुम्ही तुमच्या नातेवाईक मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा व ज्येष्ठ नागरिकांना याबद्दलचा फायदा कसा मिळेल याबद्दल जेष्ठ नागरिकांना समजून सांगा

FAQ’s

1). मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक वय वर्ष किती असावे?
उत्तर-
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकाचे वय हे 65 वर्षे पूर्ण असावे.

2). मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता काय आहे?
उत्तर-
नागरिक या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असावे.

3). मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजे काय?
उत्तर-
महाराष्ट्र राज्यातील जे नागरिक 65 वर्षाच्या पुढचे आहेत अशा नागरिकांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये रक्कम दिली जाते या योजनेस मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हटले जाते.

4). वयोश्री योजनेच्या माध्यमातून कोण कोणत्या नागरिकांना लाभ मिळू शकतो?
उत्तर-
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिक तसेच बीपीएल श्रेणीमध्ये येणारे नागरिक तसेच जे अपंग आहेत अशा सर्व नागरिकांना या योजनेतून लाभ मिळू शकतो.

5). वयोश्री योजनेतून महिन्याला ज्येष्ठ नागरिकांना किती रुपये मिळतात?
उत्तर-
वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला तीन हजार रुपये मिळू शकतात.

येथून शेअर करा

4 thoughts on “आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये, मुख्यमंत्री वयोश्री योजना”

Leave a Comment