माझे गाव मराठी निबंध क्र. 1
Maze Gav Marathi Nibandh: माझे गाव रामपूर आहे. माझ्या गावात खूप लोक राहतात. आमच्या गावात एक छोटसं देऊळ आहे. ते देऊ एका हनुमान देवाचं आहे. तो हनुमान सगळ्या गावातील लोकांच्या इच्छा पूर्ण करतो. तो हनुमान सगळ्यांना पावतो. लोक त्याला खूप मानतात त्या गावात पशुपक्षी झाडे झुडपे फळे फुले आहेत. मला माझ्या गावातील फुले खूप आवडतात. कारण माझ्या गावातील फुलांचा सुगंध खूप छान येतो. वेगवेगळ्या रंगाची फुले आहेत. आमच्या गावात छोटी छोटी घरे आहेत. माझ्या गावात एका घरात पाच-चार लोकांचं कुटुंब राहते. त्या कुटुंबात आजी आजोबा आई-बाबा भाऊ बहीण राहतात. गावात माझी एक चुलत आजी राहत आहे. माझे माझ्या गावात खूपच ओळखीचे लोक आहेत. त्या गावात अनेक प्रकारची दुकाने आहेत. मंदिराजवळ एक छोटसं वडाचे झाड आहे.
माझ्या गावात स्त्रिया वडाची पूजा करण्यासाठी येतात. आमच्या गावात एक पुराना छोटासा बंगला आहे. माझे रामपूर हे गाव खूप प्रसिद्ध आहे. गावात म्हणजेच रामपूर मध्ये फळे खूप स्वस्त असतात. फुलं सुद्धा खूप स्वस्त असतात. माझ्या गावाला जाताना लोक रेल्वेने प्रवास करतात. प्रवास करताना दोन तास जातात. गावात माझी एक जीवाभावाची मैत्रीण राहते. मी त्या गावात माझ्या चुलत आजीकडे राहते. कारण माझ्या मैत्रिणीचे घर खूपच लांब आहे. रामपूर गाव गावात काही लोकांच्या शेतात पीक उगवत नाही. कारण त्या शेताला पाणी खूप कमी पडते. माझ्या गावात जर पाऊस पडलाच नाही. तर लोकांच्या पिकाचा खूप नुकसान होतं लोक खूप उदास होतात. कारण त्यांना अन्न खायला नसतं. शेतात पीक लावतात माझ्या गावातील लोक खूप गरीब असतात. आमच्या गावात छोटी छोटी मुले सुद्धा राहतात.
शहरे कितीही प्रगत होऊ दे पण
गावाकडची माणुसकी प्रगत शहरात नाही भेटत
आमच्या गावात शिकवण्यासाठी मुलांना एक शाळा आहे. त्या शाळेत खूप शिक्षिका आहेत. मुलांना खूप छान शिकवतात. गावात फळे विकणारा फुले विकणारा हा व्यक्ती गरिबांना स्वस्त दरात फळे फुले देतात. रामपूर या माझ्या सुंदर गावात एक रेल्वे स्टेशन आहे. तिथे लोक तिकीट काढून रामपूर गावात येतात. आणि देवाचे दर्शन घेतात हनुमान लोकांमध्ये भेदभाव करत नाहीत. गावात काही लोक वाईट चालीची असतात.
त्यांना हनुमान वाईट शिक्षा देतो. जे लोक चांगले असतात. त्यांना देवाची श्रद्धा करतात. त्यांना चांगलं कामात यश देतो. आमच्या गावात एक गरीब वर्तमान काळ राहतो. त्या गावात पशु पक्षी प्राणी जंगलात राहतात. आमच्या गावातील निसर्गरम्य जंगल खूप मोठे आहे. खूप झाडेझुडपे आहेत त्या झाडांवर फुलपाखरे राहतात ते फुलपाखरे फुलांमधील मध पितात. अस आहे हे माझ छोटास आणि अत्यंत संदर गाव आणि आमचं मन हि तिथेच रमत.
माझे गाव निबंध | Maze Gav Marathi Nibandh
माझे गाव निबंध क्र. 2
Maze Gav Marathi Nibandh: माझे गाव मोडनिंब आहे. आमच्या मोडनिंब गावात खूप लोक राहतात. म्हणून गावात खूप दुकाने आहेत. मोडनिंब गावात खूप मंदिरे आहेत. पहिला मंदिर म्हणजे यमाई देवीचा दुसरा मंदिर अंबाबाई देवीचा या देवी खूप प्रसन्न आहेत. माझ्या गावात ग्रामपंचायत सुद्धा आहेत. ग्रामपंचायत मध्ये आपल्या समस्या सांगितल्या जातात. ग्रामपंचायतीमध्ये गावातील कामकाज पाहते. ग्रामपंचायत मध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच असते. ग्रामपंचायत मध्ये निवडणूक असतात. गावांमध्ये चार शाळा आहेत. त्या गावात मुलांना शिकवण्यासाठी शाळा आहेत. त्या शाळेत शिक्षक खूप आहे. ती शिक्षक मुलांना खूप छान शिकवतात. आमच्या गावात शाळेजवळ रेल्वे स्टेशन आहे. गावात अनेक प्रकारची दुकाने आहेत. माझ्या गावात जिल्यातील सर्वात मोठी ग्रामदैवताची यात्रा असते. ती यात्रा सगळ्या देवांची असते.
जगातल्या कानाकोपऱ्यात कितीही फिरा
शेवटी मन हे आपल्या गावाकडचं रमत
गावात खूप मोठी दुकाने मोठी घरे आहेत. लोकांना काम नसते म्हणून मोडनिंब गावात त्यांना काम दिलं जातं. ग्रामपंचायत सगळ्यांची मदत करते. ज्या ज्या लोकांना अडचणी आल्या आहेत. त्या अडचणी दूर घालवते. ग्रामपंचायत गावात सोय स्वच्छता सुद्धा करते. गावात रस्ते बांधते ज्या गावा शाळा नसतील. त्यांना शाळा बांधते गावामध्ये तलाठी कार्यालय आहे. पोलीस चौक सुद्धा आहे. गावातील पोलीस ज्या व्यक्ती चुकीचे काम जर केलं असेल तर त्याला पोलीस खूप मोठी शिक्षा देतात. चोरी करणे हा वाईट गुन्हा आहे. असा पोलिसांचा विचार आहे. म्हणून या गावात यात्रा असते. ती यात्रा वेताळ साहेबाची असते. म्हणून हे गाव खूप छान आहे. त्या गावातील वेताळ साहेब हा ग्रामदैवत आहे. म्हणून या गावात अनेक प्रकारचे देव असतात.
मोडनिंब या गावातील यात्रेमध्ये खूप रंजक कार्यक्रम असतात. अनेक प्रकारचे तिथे खेळ दाखवले जातात. यात्रेमध्ये दारूगोळा काम सुद्धा डोळ्याचे पारणे फेडणारे असते. खूप मोठे आकाश पाळणे, ब्रेक डान्स, ड्रॅगन ट्रेन यामध्ये सगळी लोक बसतात. या सगळ्यात बसण्यासाठी 80 किंवा शंभर रुपये तिकीट असते. स्त्रिया सोंगाच्या या गाड्या बघायला येतात. आणि पुरुष शेरण्या बघण्यासाठी येतात. यात्रेत सोंगाच्या गाड्या अनेक प्रकारच्या असतात. यात्रेत खाण्यासाठी वेगळे पदार्थ असतात. पिण्यासाठी पाण्याची दुकान असते.
वेताळ साहेब या देवाला पाया पडण्यासाठी दूर गावावरून खूप लोक येतात. त्याची देणगी सुद्धा देतात. जवळजवळ यात्रा बघण्यासाठी हजार किंवा पाचशे लोक असतात. काही लोकांनी वेताळ साहेब या देवाला नवस सुद्धा बोलला जातो. जर नवस पूर्ण झाला तर बोकड कापतात. त्या देवाला मोनीम या गावात अनेक प्रकारचे देव देवी आहेत. अंबाबाईचा देव मारुतीचे देऊळ खंडोबाचे देऊळ अशी अजून देवा आहे. की लोक जर एका देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आले तर सगळ्या देवांना दाखवतात. वेताळ साहेब सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो. तर अस हे अनोख्या पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी परंपरा जपणार माझ गाव आहे.
नवनवीन मराठी साहित्य येथे वाचा