kadaba kutti machine Yojana 2024 : पशुपालक व दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. महाराट्र शासन तसेच केंद्र शासन यांच्या नवनवीन योजना जनतेच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राबवत असते. तसेच सरकार शेतकयांच्या हिताचे निर्णय हे नेहमीच घेत असते. देशातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी सरकार तत्पर असते.सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने कडबा कुट्टी मशीन या योजने अंतर्गत सरकार शेतकयांना कडबा कुट्टी मशीन विकत घेण्यासाठी भरगोस मदत मिळणार आहे. जे शेतकरी आपल्या शेती बरोबरच जोडधंदा म्हणून जनावरे पाळतात त्यांच्यासाठी हि योजना वरदान ठरणार आहे.
यामध्ये पशुपालन करणाऱ्या पशु पालकांना कडबा कुट्टी मशीन चा मोठया प्रमाणात फायदा होणार आहे. सध्याचा परिस्थिती मध्ये पशुपालक शेतकरी त्यांच्या जनावराना चारा हा शेतातून काढून आणला कि लगेच टाकतात. पण तो आणलेला पूर्ण चारा हा आहे तसाच जनावरांना घालतात त्यामुळे तो चारा जनावरे तो टाकलेले सर्व चारा खात नाहीत. त्यामुळे जनावरांच्या होणाऱ्या दूध उत्पादनात मोट्या प्रमाणात घट होते. त्यामुळे पशुपालकांच्या आर्थिक उत्पनावरती त्याचा मोट्या प्रमाणात परिणाम होतो.
महाराष्ट्र शासन प्रत्येक वर्षी हि योजना सर्व पशुपालका साठी राबवत असतात. प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. त्याच्याकडे पशुधन असणे गरजेचं आहे. शासन हे या योजनेसाठी योजना चालू झालेल्या वर्षी पासून प्रत्येक वर्षी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्या कडून अर्ज घेत असते. हे वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेतले जातात. या योजने बद्दलची सर्व सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला अगदी व्यवस्थित पणे घेऊयात.
कडबा कुट्टी मशीन योजना व त्याचे उद्देश । kadaba kutti machine Yojana
राज्यातील ग्रामीण भागात जे शेतकरी जुन्या प्रकारे पशुपालन करत आहेत. या शेतकऱ्यांकडे भरपूर प्रमाणात दुभती जनावरे असतात. त्यांना योग्य प्रमाणात व योग्य तो ओला वाळला चारा मिळण्याची गरज असते. आणि तो चारा कापण्यासाठी ते जुन्या पद्धतीचा वापर करतात. त्यामुळे त्यांचा खूप वेळ तसेच चारा वाया जातो.
तो चारा व्यवस्थितरित्या कापण्यासाठी त्यांच्याकडे योग्य ती यंत्र सामग्री नसते. व ती विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक परिस्तिथी तशी नसते. त्यामुळेच या कडबा कुट्टी मशीन योजने अंतर्गत पशुपालक शेतकरी बांधवाना मोट्या प्रमाणात मदत होणार आहे. तसेच चारा कुट्टी करण्यासाठी ( कापण्यासाठी ) मशीन घेण्यास सरकार 75 टक्के अनुदान देऊ करत आहे.
या योजनेमुळे पशुपालकांना होणारे फायदे । kadaba kutti machine Yojana benefits
तर या कडबा kutti machine Yojana या योजने मुळे होणारे फायदे पाहू.
- या कुट्टी मशीन च्या बारीक केलेल्या चाऱ्यामुळे जनावरांच्या दुधामध्ये मोठयाप्रमाणात वाढ होते.
- या मुळे शेतकऱ्याच्या वेळेचे, चाऱ्याचे खूप मोट्या प्रमाणात होणारे नुकसान वाचते.
- शेतकयांच्या उत्पन्न वाढण्यास मदत होते.
- कुट्टी मशीन हे शेतकऱ्यांना कमी खर्चात म्हणजेच ७५ टक्के अनुदांवरती उपलब्द्ध होते.
- शेतकऱ्यांच्या गाई म्हशी यांचे आरोग्य सुधारते.
- ओला व वाळला चारा या कुट्टी द्वारे मशीन व्यवस्थित भरडून जनावरांना देता येतो.
हे सर्व फायदे पशुपालकांना होतात.
या kadaba kutti machine Yojana योजनेसाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
या योजनेचा अर्ज करण्यासाठी पशुपालक व शेतकऱ्यांना या ठिकाणी खालील प्रमाणे दिलेली आहेत.
- पशुपालक शेतकऱ्याचे आधार कार्ड
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- राष्ट्रीयकृत बँक पासबुक प्रत.
- पशुपालक रहिवाशी दाखला
- ई-मेल आयडी.
- कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्याचे बिल.
- मोबाईल क्रमांक.
- जनावरांचा विमा केल्याचे प्रमाणपत्र.
तर हि सर्व कागदपत्रे कुट्टी kutti machine Yojana या योजने साठी अर्ज करते वेळेस तुम्हाला लागणार आहेत.
कुट्टी मशीन अनुदान प्राप्त करण्यासाठी पात्रता व निकष
कडबा कुट्टी मशीन योजनाने पात्रतेसाठी कोणकोणते निकष पशुपालक शेतकर्यानी पूर्ण करावयाचे आहेत हे पाहुयात.
सर्वप्रथम शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे गरजेचे आहे. तसेच पशुपालक शेतकऱ्याकडे किमान २ जनावरे असणे आवश्यक असते. तसेच या योजनेत गावाकडील तसेच वाड्या, वस्त्या दुर्गम भागातील पशुपालक शेतकरी पात्र असतील.
तसेच अर्ज करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा जास्त नसावे तरच ते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात व पात्र ठरू शकतात या योजनेसाठी अर्ज हा अर्जदाराने ऑनलाइन व आपला या दोन्ही पद्धतीमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
या kadaba kutti machine Yojana योजनेमध्ये पात्र झाल्यानंतर जी त्यांना कडबा कुट्टी मशीन मिळणार आहे ती मशीन विकून टाकू शकत नाही तसेच यामध्ये अर्ज करणाऱ्या अर्जदार पशुपालकाचे बँक खाते त्याच्या आधार कार्ड सोबत जोडलेले असावे.
जे पशुपालक आहेत त्यांना केंद्र सरकारच्या इतर योजना अंतर्गत कडबा कुट्टी मशीन मिळालेले आहेत ते शेतकरी या योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभासाठी पात्र नसणार आहेत याप्रमाणे वरील सर्व निकष पशुपालक शेतकरी पूर्ण करू शकत असल्यास तो या कडबा कुट्टी योजनेचा पूर्णपणे लाभ घेऊ शकतो कृपया तुम्ही यातील कोणतेही निकष पूर्ण करू शकत नसाल. तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार नाहीत याची दक्षता अर्ज करणाऱ्या पशुपालक व शेतकरी बंधूंनी घ्यावी
Kadaba Kutti Machine Yojana साठी अर्ज कसा व कुठे करावा ?
तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता या ठिकाणी ते आपण पाहणार आहोत तर या योजनेसाठी तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
या ठिकाणी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे केला जातो. त्याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती पाहू
आम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट ओपन करायचे आहे.
कडबा कुट्टी मशीन योजना Apply Kadaba Kutti Machine Yojana | Website कृपया येथून अर्ज करा |
त्यानंतर वेबसाईट ओपन होईल वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर वडील साईडला कोपऱ्यामध्ये नवीन अर्जदार नोंदणी असा पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक करून तुमच्या संपूर्ण नावासहित तुमच्या अर्जाची नोंदणी करून घ्यावयाची आहे. एकदा तुमच्या नवीन अर्जाची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या संपूर्ण नावासहित युजर आयडी व पासवर्ड मिळेल त्यानंतर तो युजर आयडी व पासवर्ड उजव्या कोपऱ्यात दिलेल्या अर्जदार लॉगिन या बटनावरती क्लिक करून त्या ठिकाणी टाकायचा आहे.
त्यानंतर तिथून पुढे तुमचा फॉर्म ओपन होईल तिथून ओपन झालेल्या फॉर्म वरती आत मध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या सर्व डिटेल्स कागदपत्रे अपलोड करून घ्यावयाचे आहेत. तो अर्ज ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी कृषी प्रणाली पुढील पर्याय निवडा असं ऑप्शन दिसते नंतर अर्ज उघडेल त्यानंतर पहिल्या क्रमांकावरती शेती अवजारांच्या खरेदीसाठीचे मूल्य तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचे आहे.
त्यानंतर पुढील संख्या मध्ये उत्पादित अवजारे वगैरे असे ऑप्शन असेल त्यात उत्पादित अवजारे यावरती क्लिक करा. त्यानंतर खाली कटर श्रेडर हा पर्याय निवडावा, हा पर्याय निवडल्यानंतर मशीनचे प्रकार स्क्रीनवर दिसतील त्या ठिकाणी तुम्ही त्या मशीनचा योग्य आकार व इतर बाबी निवडाव्या.
त्यानंतर खाली क्लिक करून तुम्ही संपूर्ण फॉर्म एकदा चेक करून व्यवस्थित SAVE करावा हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 23 किंवा 60 रुपये ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर हा अर्ज व्यवस्थित रित्या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वरती सबमिट होईल तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला एकदम लक्षपूर्वक करावयाचे आहे.
जर समजा ही प्रोसेस तुम्हाला खूपच अवघड वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ऑनलाईन CSC केंद्रात जाऊन हा फॉर्म भरला तरी चालेल.
Kadaba Kutti Machine Yojana निष्कर्ष
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी तसेच जे शेतकरी शेती बरोबरच दूध व्यवसाय करतात. अशा सर्व शेतकऱ्यांना कुट्टी मशीन घेण्यासाठी राज्य सरकारकडून 75 टक्के अनुदान हे दिले जाते. या कुट्टी चा उपयोग करून शेतकरी त्यांच्या जनावरांना व्यवस्थित ओला व वाळला चारा नीट बारीक करून खायला घालू शकतात. त्यामुळे जनावरांच्या दुधाची गुणवत्ता वाढून शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होऊ शकेल. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कडबा कुट्टी वरती 75 टक्के अनुदान हे दिले आहे
अधिक वाचा – 30 वस्तूंचा मोफत भांडी संच मिळणार
अधिक वाचा – आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये
अधिक वाचा – आता फक्त 1200 रुपये भरा आणि कुठेही मनसोक्त फिरा
वरील सर्व kadaba kutti machine Yojana माहिती तुम्हाला आवडली असेल व उपयोगात आली असेल तर तुम्ही तुमच्या पशुपालक व शेतकरी परिवारामध्ये पाठवू शकता व त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सांगू शकता तुमचे एक शेअर हे त्यांच्या फायद्याचे ठरू शकते.
FAQ’s
1).कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी शेतकऱ्याला किती टक्के पैसे लागतील?
उत्तर – कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी शेतकऱ्याला 35 टक्के पैसे भरावे लागतील व 75 टक्के पैसे हे शासन अनुदानमार्फत देणार आहे.
2).कडबा कुट्टी अनुदान मिळवण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?
उत्तर – कडबा कुट्टी अनुदानासाठी शेतकऱ्याचे उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असावे.
3).कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा?
उत्तर – कडबा कुट्टी अनुदानासाठी शेतकरी कर्ज हा ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तो जवळच्या सीएससी केंद्रात जाऊ शकतो
4). कडबा कुट्टी मशीन अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे जनावरे असणे आवश्यक आहे का?
उत्तर – कडबा कुट्टी मशीन अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे जनावरे असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याकडे त्या जनावरांचा विमा उतरवलेले चे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
5).कडबा कुट्टी च्या माध्यमातून चारा जनावरांना दिल्यास दूध वाढते का?
उत्तर – कडबा कुट्टी च्या माध्यमातून जनावरांना चारा दिल्यास तो चारा जनावरे व्यवस्थितपणे खाऊन दुधामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.
I am Kishan 7 pashu
7
7 pashu