प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | Pradushan ek samasya marathi nibandh

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradushan ek samasya marathi nibandh: प्रदूषण एक समस्या आपल्या भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत पातळीवर स्वच्छता राखली जाते पण जेव्हा सार्वजनिक स्वच्छतेचा विषय येतो तेव्हा मात्र सगळेजण त्याकडे दुर्लक्ष करू लागतात. आणि यामुळेच आपल्या भारतामध्ये च नव्हे तर जागतिक पातळीवर प्रदूषण एक फार मोठी समस्या बनलेली आहे. आपले घर स्वच्छ ठेवण्याच्या अट्टाहासापुढे आपण घरातील कचरा याची योग्य विल्हेवाट न लावता सार्वजनिक ठिकाणी टाकून देतो. प्रदूषण ही एक समस्या फक्त घराच्या पुरतीच मर्यादित न राहता, वायु प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण इथपर्यंत जाऊन पोहोचलेली ही प्रदूषणाची समस्या आहे. आज-काल श्वसनासाठी घेतला जाणारा ऑक्सिजन यापासून ते जेवणासाठी खाल्ले जाणारे अन्न सगळीकडे प्रदूषण ठासून भरलेले आहे.    

pradushan ek samasya marathi nibandh
pradushan ek samasya marathi nibandh

प्रदूषण एक समस्या निबंध |pradushan ek samasya marathi nibandh

नवीन तंत्रज्ञानाबरोबर आपण विकसित होत गेलो. पण त्याचबरोबर प्रदूषणाने आपण मागे पडत आहोत. तंत्रज्ञानाबरोबरच कारखानदारी सुद्धा वाढत गेली त्यामुळे दिवसेंदिवस हवा प्रदूषण वाढत जाऊन हवेचा दर्जा खालवत गेला. आणि यामुळेच ग्लोबल वॉर्मिंग सारख्या भयावह  गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. एक साधे उदाहरण द्यावे म्हटले तर भाजी विक्रेत्यांच्या मंडई मध्ये आपण बघितले तर ज्या उरलेल्या खराब भाज्या असतात त्या  तशाच रस्त्यावरती ढीग रचून ठेवलेला असतो, त्यामुळे किती प्रमाणात प्रदूषण होते याचा आपण विचारही करू शकत नाही जर याच भाज्यांचे व्यवस्थित नियोजन केले जसे की या सर्व खराब भाज्या यांच्या आपण पुनर्वसन करून सेंद्रिय खतासाठी याचा वापर केला. तर होणारे प्रदूषण ही वाचेल आणि आपल्याला सेंद्रिय खत मिळण्याचे मदत होईल.

पण आजकाल सगळ्यांनाच सोपे असे आयुष्यमान जगायचे आहे त्यामुळे आपण या सर्व गोष्टींचा काही विचार करत नाही. रोजच्या वापरातील कपडे सुद्धा आपण जुने झाले की फेकून टाकतो. संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की आपल्या पृथ्वीवरती हजारो टन जुने कपडेयांचा कचरा पडलेला आहे. त्यांची कोणत्याही प्रकारची नीट विल्हेवाट लावलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील प्रदूषण वाढत चाललेले आहे. रोजच्या वापरातील कपड्यांचा वापर आपण विचार करून केला तर याची आपण नीट विल्हेवाट लावू शकतो. म्हणजेच गरीब लोकांना या कपड्यांचे दान करून आपण प्रदूषण थांबू शकतो.

pradushan ek samasya marathi nibandh
pradushan ek samasya marathi nibandh

कारखान्यातील दूषित पाणी सर्रास नदी आणि समुद्रामध्ये सोडले जाते. त्या दूषित पाण्यामुळे नदी आणि समुद्रातील जलचरांना विषबाधा होऊन हजारो मासे दरवर्षी मृत्यूमुखी पडतात. काही माशांच्या जाती तर नाश होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांच्या जाती संपुष्टात येत आहे ‌. त्या दूषित पाण्यामुळे जलचरांना तर हानी होतेच पण त्याचबरोबर हे पाणी शेतीसाठी वापरले जाते त्यामुळे शेतीचा उत्पन्नाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत जात आहे.. आणि त्यामुळे मृदा प्रदूषण यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. पाणी प्रदूषणामुळे भरपूर साऱ्या प्रमाणात रोगराई वाढत चाललेली आहे. आजकाल तर कोरोना सारख्या गंभीर आजारांना सारे जग सामोरे जात आहे. हा सुद्धा एक प्रदूषणाचाच भाग आहे.

स्वच्छ सुंदर प्रदूषण रहित निसर्गा आपण ठेवला असता तर कोणत्याही नवीन प्रकारच्या रोगरांना वेळीच आळा बसला असता.    त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण ही एक सर्वात मोठी समस्या बनलेली आहे. गाड्यांच्या वाढत्या वापरामुळे प्रत्येक ठिकाणी गोंगाट दिसून येतो.. कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम असतील किंवा मिरवणूक असतील तर मोठ्या प्रमाणात आवाज करून गाणी डीजे वाजवले जातात. याचा परिणाम मुख्यतः लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींना होतो. ध्वनी प्रदूषणाचा थेट संबंध हृदयाशी मानला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस ध्वनी प्रदूषण ही एक मोठी आणि गंभीर समस्या वाढत चाललेली आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे माणसांची वस्ती जंगलाकडे चाललेली आहे. त्यामुळे वृक्षतोड भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. आणि त्यामुळे हवेतील ओझोन वायूचा थर दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. या ओझोन वायूच्या थरामुळे जागतिक तापमानामध्ये भरपूर बदल झालेले आहेत. वाढत्या तापमानामुळे हिमनग वितळत चाललेले आहेत. आणि‌ आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग सारख्या भयंकर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे जंगलामधील महत्वाच्या वनस्पती औषधांचे सुद्धा संख्या कमी होत चाललेली आहे.

pradushan ek samasya marathi nibandh
pradushan ek samasya marathi nibandh

जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणून वेळीच वृक्षतोड थांबवली कारण झाडामुळे भरपूर प्रमाणात प्रदूषण रोखले जाते. हवेचा दर्जा चांगला टिकून ठेवला जातो. प्लास्टिक प्रदूषण इतर सगळ्यात मोठी आणि न सोडवणारी पृथ्वीतला वरती गंभीर गोष्ट बनलेली आहे. माणसाच्या आयुष्य हे प्लास्टिक भोवती बांधून गेले आहे. आजकाल आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्लास्टिकचा वापर हा होतोच. एकदा वापरले जाणारे प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष वापरले गेलेले प्लास्टिक आजही या पृथ्वीतला वरती टिकून आहे.

संशोधनामध्ये असे आढळून आलेली आहे की , समुद्रामध्ये प्राण्यांच्या पोटामध्ये सुद्धा प्लास्टिक आढळून येतात तसेच पृथ्वीवरील काही प्राण्यांच्या पोटामध्ये सुद्धा प्लास्टिक आढळून आलेले आहे. इतकी ही गंभीर समस्या बनलेली आहे . प्लास्टिक बंदी जर नाही झाली तर पुढे जाऊन या पृथ्वी भोवती माणसे कमी आणि सगळीकडे प्लास्टिकच दिसून येईल. आणि या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे हे आपल्या हाती नसेल त्यामुळे आत्ताच प्लास्टिक बंदी करून, प्रदूषण रोखले तर या पृथ्वीवरील ७० टक्के प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. प्रदूषण ही एक खूप मोठी अशी गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

आपल्या दररोजच्या जीवनातील आपल्या प्रत्येक कृती मधून प्रदूषणामध्ये भर वाढत चाललेली आहे. जर आपण वेळीच साऱ्या गोष्टींचे नियोजन केले नाही. तर येणाऱ्या पुढील पिढीला खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. आजकालच्या वाढत्या प्रदूषणामुळे माणसाचे जीवन दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. दररोजच्या जेवणात मिळणाऱ्या भाज्या मध्ये सुद्धा भरपूर साऱ्या प्रमाणात औषध फवारणी केली जाते. हा सर्व केमिकल यांचा मारा आपल्या आरोग्यासाठी घातक तर आहेच पण त्याचप्रमाणे शेतीमधील मातीचा दर्जा सुद्धा या सर्व औषधामुळे दिवसेंदिवस कमी होत आहे.

pradushan ek samasya marathi nibandh
pradushan ek samasya marathi nibandh

दररोजच्या वापरातील वाहने यांना लागणारे इंजन म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. या वाहनामुळे ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण तर होतेच याशिवाय वाढत्या इंजन साठ्याच्या मागणीमुळे त्यांचा साठा भविष्यात पूर्णपणे बंद होईल. त्यामुळे आत्ताच आपण आपल्या प्रत्येक कृती मधून प्रदूषण होणाऱ्या गोष्टी त्यांचा कमी वापर केला तर आपल्या आरोग्यासाठी चांगल्या राहतील आणि आपले आयुष्यमान सुधारेल. वैद्यकीय भागामध्ये वापरले जाणारे साहित्य हे सुद्धा एक प्रदूषण निर्माण करणारी मोठी समस्या बनलेली आहे.

वाढते आजार त्यामुळे आजारांवर उपचारासाठी वापरले जाणारे साहित्य त्यांची विल्हेवाट निसर्गामध्येच केली जाते निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टी या एकमेकांच्या वरती अवलंबून आहे म्हणजेच निसर्गाला जर आपण अनुकूल असे वातावरण दिले तर त्या बदल्यात निसर्ग कडून आपल्याला प्रदूषण रहित वातावरण भेटेल. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजेत. आपल्या प्रत्येक कृती मधून प्रदूषण कसे कमी करता येईल याचा वापर आपण प्रत्येकाने जर केला. तर प्रदूषण ही गंभीर समस्या जी बनलेली आहे. त्यावरती आपल्याला लवकरच मार्ग काढता येईल. त्यामुळे जर आपण लवकर नियोजन करून प्रदूषणाचे विल्हेवाट लावली नाही तर प्रदूषण आपल्याला त्याच्या विळख्यामध्ये दिवसेंदिवस ओढतच राहील. यावर एकच उपाय म्हणजे प्रदूषणावरती मार्ग काढणे.


असेच नवनवीन निबंध वाचा


येथून शेअर करा

Leave a Comment