माझा आवडता मित्र/मैत्रीण मराठी निबंध
Mazi Maitrin Nibandh in Marathi
Mazi Maitrin Nibandh in Marathi : माझी आवडती मैत्रीण इंशा आहे. माझी मैत्रीण माझ्या खूप जवळची आहे. माझी मैत्रीण खूप छान आणि सोज्वळ दिसते. माझी मैत्रीण आणि मी आम्ही एकाच वयाचे आहोत. माझी मैत्रीण माझ्याशी खूप गोड बोलते. ती माझ्यासोबत भांडण करत नाही. माझ्याशी भेदभाव करत नाही. आम्ही दोघी मिळून मिसळून राहतो. कारण आम्ही दोघी एकमेकीस बहिणी मानतो. ती माझं सगळं काम करते, मी सुद्धा तिचं काम करते. लागेल तेव्हा आम्ही एकमेकीना पाहिजे ती मदत करत असतो. आम्ही दोघी आता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहोत.माझी मैत्रीण माझ्यासाठी वाढदिवसाला गिफ्ट आणते.
आम्ही दोघी एकमेकींच्या डब्यात जेवतो ते ही अगदी वर्गातल्या एकाच बाकावर असते. कारण आम्ही दोघी आम्ही बहिणी आहोत असं समजतो आणि बहिणी पेक्षा हि कमी नाही आहोत. रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट फ्रेंडशिप आहे आमची. ती आणि मी अभ्यासाला एकत्र बसतो मिळून खेळतो कधीच आम्ही भांडण करत नाही. आमच्या दोघींना शाळेतील सगळे ओळखतात.
“वाचलेले पुस्तक, केलेले कष्ट,
आणि चांगल्या मानसाशी केलेली मैत्री,
कधीच वाया जात नाही”
आमचं आमच्या दोघींवर ती खूप निस्वार्थ प्रेम आहे जस दोन बहिणी मध्ये असत. इंशा चा आवाज खूप छान आहे. तिला अति सुंदर गायन करता येत. एक साधी, सरळ व प्रेमळ वागणारी मुलगी आहे. सतत दुसऱ्यांची मदत करते. इंशा माझी मैत्रीण अभ्यासात खूप हुशार आहे. सगळ्या शिक्षकांना तिचा खूप अभिमान वाटतो. कारण वर्गात तिचा पहिला किवा दुसरा क्रमांक असतो. तिला व मला वर्गात खूप छान मार्क्स पडतात.माझी मैत्रीण माझ्या बहिणीसारखीच आहे.
माझी मैत्रीण माझ्यावरती कोणतेही संकट येते तेव्हा माझी मैत्रीण माझी साथ देते व कायम खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी असते. माझी बहीण जशी माझी काळजी घेते, तशीच माझी पण काळजी माझी मैत्रीण घेते. माझी इतकी कोणी सुद्धा काळजी घेत नाही, तेवढी काळजी माझी मैत्रीण घेते. मैत्रीण म्हणजे आपल्या सोबत प्रेमळ बोलणारी आपल्यावर कोणतेही संकट आले तरी त्या संकटात साथ देणारी मैत्रीण पाहिजे.
“एक मित्र असावा जो कुठल्याही,
स्वार्था शिवाय आपल्या मैत्रीत बांधलेला असावा”
माझी मैत्रीण तिच्या आईच्या घर कामात मदत करते. जरी माझ्या घरी आले तर मला सुद्धा घर कामात मदत करते. ती जर माझ्या घरी आले तर आम्ही दोघी मिळून आईला स्वयंपाकात मदत करतो. माझ्या मैत्रिणीला स्वयंपाक खूप छान बनवता येतो. तिला नवनवीन गोड गोड पदार्थ बनवायला येतात. माझी मैत्रीण माझ्यासोबत भांडते पण आम्ही दोघी परत एक होतो. माझी मैत्रीण माझ्या छोट्या बहिणीला हि तिची बहीण आहे असं समजते.
माझी मैत्रीण माझ्या कुटुंबाशी खूप प्रेमळ मनाने बोलते. आमच्या कुटुंबासाठी खूप छान खायला घालते. आमच्या घरचे तिला मनाने खूप छान बोलतात. तिला आमच्या घरी राहायला सांगतात. जर घरी काही कार्यक्रम असला तर ती आम्हाला तिच्या घरी बोलवते. तिच्या हि घरचे माझ्याशी खूप छान बोलतात जसे कि मी त्यांच्या मुलीसारखीच आहे. माझ्या मैत्रिणीच्या परिवारात तिचा एक लहान भाऊ, आई बाबा व आजी आजोबा असे सर्वजण प्रेमळ माणस आहेत. तिचे आजी आजोबा तिची खूप काळजी घेतात माझी मैत्रीण जर मी आजारी असले तर माझी खूप काळजी घेते.
मला गोळ्या औषधे खाऊ घालते. माझी मैत्रीण मला म्हणते की जरी कोणाला बहीण नसले तर मैत्रीण असते. तिची तिला बहीण मानते तिची देखभाल करते. माझी मैत्रीण मोडनिंब या गावची आहे. माझी मैत्रीण माझी खूप माया करते. माझी मैत्रीण खूप प्रेमळ आहे. माझी मैत्रीण माझी मैत्रीण माझ्या आईसारखी आहेत. माझ्या आईसारखी काळजी घेते प्रेम करते. माया करते माझी मैत्रीण माझ्यासाठी खूप काही करते. आम्ही दोघी शाळेत बहिणी असल्यासारखं राहतो. सगळे शिक्षक म्हणतात तुम्ही दोघी खरंच बहिणी असल्यासारखं वाटतंय. आम्हा दोघांना सेमच मार्क्स मिळतात. आम्ही दोघी एकामेकींना खूप जिव लावतो. दोघी एकामेकींची माया करतो, काळजी घेतो.
मला जरी पेन नसेल तर, ती मला तिचा पेन देते. जर मी डब्बा आणला नसेल, तर मला ती डब्बा आणून देते. मला शाळेत जाण्यासाठी मला ती घरी न्यायला येते. आम्ही दोघी एका प्लेटमध्ये जेवतो. सोबतच खेळतो, जर मला कोणी शाळेत मारलं असेल तर माझी मैत्रीण त्या व्यक्तीला किंवा मुलांना शिक्षकान कडून शिक्षा देते. आम्ही दोघी शाळेतून येताना सायकलवर येतो. जर मी सायकल आणली नसेल तर ती मला तिच्या सायकल वरती बसून आणते. माझी मैत्रीण मला खूप समजून सांगते. जर माझा कुठला प्रश्न अडकला असेल तर ती मला स्पष्टीकरणासोबत समजावून सांगतो.
“शांत नि खिन्न चेहरा वाचता क्षणी,
काय प्रभृति तिवानी शब्दववर झालं?
हे जाणून घ्यायची उत्सुकता असणारा,
मित्र म्हणजे आयुष्यातला अनमोल हिरा”
जर मी माझ्या मैत्रिणीला काही मागितलं असेल तर, ती मला निसंकोच पणे लगेचच आणून देते. इंशा खूप मन लावून वाचन, लिखाण असं अभ्यास मन लावून करणार असं तिने मला वचन दिलं आहे. कारण माझ्या मैत्रिणीचे स्वप्न खूप मोठे आहे. तिला पुढे जाऊन खूप तिला एक यशस्वी डॉक्टर व्हयाच आहे. त्यामुळे ती आता पासूनच खूप मेहनत घेतेय. माझी मैत्रीण माझी इतकी काळजी घेते की ती कोणाचीच मैत्रीण एवढी काळजी घेत नसेल. माझ्या मैत्रिणीचा वर्ग शिक्षकांना तिचा खूप अभिमान वाटतो की तिचं किती मोठं स्वप्न आहे. त्यामुळे ती मन लावून शिकते. माझी मैत्रीण शेतातील सर्व काम करते. माझी मैत्रीण मला म्हणते की तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस नि ते अगदी खरे आहे हे तिच्या वागण्यावरून समजते.
माझ्या मैत्रिणीला पुस्तक वाचायला खूप आवडतात. माझी मैत्रीण मला म्हणते तू काही काळजी करू नको मी सगळं काम करते. तू फक्त आराम करत बस. माझ्या मैत्रिणीचा आवाज नाजूक मंजूर सुरेख असा आहे. ती सगळ्यांशी चांगुलपणाने बोलते कधीच कोणा कोणाला वेडावाकडे बोलणार नाही, कोणाशी भांडणार नाही, सगळ्यांशी नीट पणाने बोलते. माझ्या मैत्रिणीला देवाची श्रद्धा करायला खूप आवडते. जर माझी आई घरी नसेल किवा म्हणजे आई गावाला गेली असले तर ती मला जेवण बनवून माझ्यासाठी डब्बा पाठवून देते .
माझी मैत्रीण तिच्या सर्व कुटुंबाची काळजी घेते. आई बाबांना खूप चांगलं सांभाळते माझी मैत्रीण मला काही सुद्धा कमी पडू देत नाही लगेचच आणून देते. माझी मैत्रीण माझ्यासाठी चॉकलेट आणून देते. मला बुक्स कमी पडले असले तर मला बुक्स आणून देते. मैत्रिणीला कधीच सोडू नयेस शाळेत सुद्धा तिची बेंच पार्टनर म्हणून तिच्यासोबत बसायचे. तिची साथ द्यायचे, तिला जर काही कमी पडत असेल तर आणून द्यायचं. माझी मैत्रीण मला नेहमी मला म्हणते की तू माझी इतकी का काळजी घेते. काही हवय का तर मी म्हणते की मला काही सुद्धा नको आहे. फक्त आयुष्यभर तुझी साथ माया काळजी आहे. अशी माझ्या बेस्ट फ्रेंड सारखी मैत्रीण सर्वाना मिळावी हीच अपेक्षा आहे, मी मला खूप लकी समजते कि मला इंशा सारखी मैत्रीण भेटली.