Marathi Lekh: समाजात वावरताना पावलो पावली तसेच आजच्या वर्तमान काळात जे मला दिसल ती परस्थिती छोट छोट्या लेखांतून मांडली आहे. हे लेख वाचल्यावर तुम्हाला अनुभूती येईलच. हे सध्य परस्थितीवरील लेख आपल्याला नक्कीच आवडतील.
पिचलेला माणूस | Marathi Lekh
थोर संत आणि ज्ञानी लोक सांगून गेले. शरीर नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे. त्यात गैर असं काहीच नाही. पण, मी देवभोळा नसल्यामुळे एका अतिशय सामान्य माणसाच्याच बाजूने विचार करेल.कौटुंबिक, सामाजिक, आणि वैयक्तिक अपेक्षांचे डोंगर छातीवर घेऊन जाणाऱ्या माणसाला जेव्हा ठेच लागते तेव्हा जी कळ येते ती ह्या देशातूनच निघते.
भर उन्हात सिग्नल वर उभ्या असलेल्या माणसाला संध्याकाळच्या जेवणाची आणि पुढील महिन्यात औषधाच्या खर्चाची आठवण पहिले येते. तुकारामांच्या अभंगाने मनाला उभारी येत असेल ही. किंबहुना येतेच. पण, पगार अकाऊंट ला जमा झाल्यावर होणार आनंद त्याहून कदाचित जास्त असेल.
इमाने इतबाने कर भरणा-या व्यक्तीला जेव्हा खराब रस्ते, अपुरी बीज निकृष्ठ दर्जाचं शिक्षण दिल जात तेव्हा जो आक्रोश होतो तो जगातला कोणताही अभंग शांत करू शकत नाही. तिये हा देहच वेदना सहन करतो. प्रश्न दैववादी असण्याचा नाहीचे!
व्यवस्थेचं अपयश लपवण्याकरता जेंव्हा देवाचं भांडवल केलं जात, तेव्हा खऱ्या अर्थाने माणसातल्या दैवाची हत्या होते. भारतात ला माणूस हा दैवाच्या भक्तीत नाही तर अपयशी व्यवस्थेच्या विजत राहाणाऱ्या वडग्यात भिजतो.
व्यवस्थेकडून पूर्ण न झालेल्या प्राथमिक गरजा तो देवाच्या दारावर शोधतो. परंतु व्यवस्थेच्या ठेकेदारांनी तिथेही दानपेट्या आणि धर्माध लोकांनी नवस मांडून ठेवले आहेत.
पैगंबराची चादर असो, नैवेद्याचा पेढा असो की येशू ची मेणबत्ती असो. माणूस हा प्राणी सगळीकडे पिंचलाच जातो. सहज हातात लागणार व्यवस्थेचं सावज आहे तो.
जिगर लागत
खोलवर स्पर्श झालेल्या दुःखातून एका नवीन माणसाचा जन्म होत असतो. अतीव दुःखाची भावना व्यक्तीला विनंम्रचं करते. समाजातून आजवर जे समाजसेवक जन्माला आलेत त्यांनी ह्या दुःखाच्या समुद्रात अनेक गटांगळ्या खाल्ल्या आहेत. त्या मुळे असं विस्कटलेपण कुणाच्याही वाट्याला येऊ नये. ह्या साठी ते प्रयत्नशील असतात.
दुःखातून क्रोध तेव्हाच निर्माण होतो जेव्हा ते दुःख अहंकाराला शिवून परत येत. ते गळ्यात अडकलेल्या घासासारखं माणसाला हैराण करत. ते एकतर आत ढकलावं लागत किंव्या ओकाव लागत. ते चघळत बसलं की अहंकाराची जखम कुरतडत राहात.
अश्या मनुष्याची अवस्था फार दयनीय असते. त्या दुःखाचं आवरण अहंकाराभोवती इतक अभेद्य होत जात आणि त्यात नाहक बळी त्या माणसाचा जातो.हेच कारण आहे कि, अनेक वर्षांपूर्वी झालेले अपमान मनुष्य आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण तो अपमान अहंकाराला चिटकून असतो.
दुःख ही दुसरी आईच आहे. ती नवीन अर्भकाला जन्माला घालते. पण तिच्या करवी कुणाही मनुष्याचं पालनपोषण नं झालेलं चांगलं. असं असलं तरी माणूस तिला अहंकाराच्या कोपऱ्यात सजवून ठेवत असतो. आभाळाएवढं धैर्य लागत दुःख पचवायला..!
स्वगृही या
शंभर ग्रॅम वजनाच्या पक्ष्याला देखील माणसापेक्षा जास्त संवेदना आहेत. दिवसभर दाणे वेचून ते घरट्याकडे परतत. माणसाला विवेकाच दान असल्यामुळे त्याच घरी परतणं हे फक्त जगण्यातले सोपस्कार मानले जातील.
त्याच खरंच परत येणं म्हणजे “स्वगृही ” येणं. जिथून त्याचा उगम झाला आहे. उगम स्थानाची ओढ संपलेला माणूस कर्जाच्या हफ्त्त्यात गुंडाळलेल्या घरट्यात येणं हे स्वगृही परत येणं मानतो. शोकांतिका ही आहे की, त्याला उगम स्थानाचा विसर पडला आहे.ह्या सारखा भ्रम तो कोणता? आपल्या परतीच्या वाटा आपण शोधत राहायला हवं. तेच खरं R&D. बाकी जगणं फक्त उथळ प्रयत्न.
अंतिम थांबा
एक सधन आयुष्य आणि उत्तम आरोग्य हे Peripheral device आहे. त्याचा वापर आपण अंतिम ध्येयासाठी करायचा असतो आणि ते त्या साठीच दिलं गेलेलं आहे. अमुक एक गोष्ट असल्यामुळे त्यातून येणार माज हा त्या देणाऱ्याचा अपमान आहे.
चॉकलेट खांल्यावर त्याच wrapper आपण जपून ठेवतो का ? नाही ना तसंच मिळालेलं वैभव त्या अंतिम आनंद यात्रेसाठी वापरा जिथून परतीचा प्रवासच नाहीए थांबा. अधे मधे थांबे येतील.
तिथेच अडकून पडण्यात कसला आला पुरुषार्थ? One way लेन आहे ती. त्या भुयारी मार्गातून पार होणं हे सत्य आहे आणि त्या साठी करून देण्यात आलेली व्यवस्था ही मृगजळ आहे.
वेळीच सावरा
सुखी आणि समृद्ध होण्यावर समाजाने एवढा भर दिला की, दुःखाची झळ सोसणाऱ्या माणसाला आता स्वतःची लाज वाटते. त्यामुळे तो आता दुःख लपवायला शिकला.
त्यातून मग मोटिव्हेशन, योग आणि इतर आध्यात्मिक गोष्टींचा उदय झाला. पूर्वी माणूस एकमेकांशी बोलायचा. आता फक्त स्टोरी आणि स्टेटस बोलतात.
मी सामान्य माणूस आहे हे लपवण्याची स्पर्धा वाढीस लागली आहे.समाजातील तथाकथित उच्चभ्रू गर्दीत सामील करून घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्याचं सोन करून घेणं. ही वैचारीक वानवा माणसाला संपूर्णपणे बरबाद करेल.
रिक्याप
डेली सोप्स मालिंकांमध्ये “Recap” दाखवला जातो. कंटाळवाणा वाटत असला तरी महत्वाचा असतो तो. थोडं थांबून मागे वळून पाहायला शिकवतो तो.
असे रिकॅप सेशन्स आपणही करायला हवेत. आपले शॉट्स रेडी नसतात आणि आपल्याला भूमिका वठवायची खूप घाई असते. मग आयुष्यात परत तेच कंटाळवाणे रिटेक येत राहातात. प्रकृती परत परत तेच तेच सीन्स रिशूट करायला लावते.
त्याच अडचणी परत आणते कारण मनुष्य त्यातून शिकत नसतो. आपल्याला जिंकायचं असतं आणि प्रकृती ला आपल्याला शिकवायचं असत.”Recap” झक्कास झाला तर पुढील अनेक शॉट्स वन टेक घेता येतात.
थोड चालत
तुमच्या आयुष्य हे उन्हाने तापलेल्या वाळवंटासारखं होईल जर तुम्ही त्याला खूप व्यवस्थित सजवायचं प्रयत्न केलात. जर एवढा विचार करून तुम्ही बोलू लागलात तर मनातलं गाणं कधी वाजणारच नाही.
थोडं विस्कटलेल आणि वळण नसलेलं संस्कारहीन आणि समाजाच्या सभ्य अश्या चौकटीत न बसणार आयुष्य तुम्हाला सतत ताजतवानं ठेवत. “म्यानरिझम” चांगले असतात, त्याने संभाषणाची घडी मोडत नाही. पण, फालतू बडबड ही तुमच्यातील लहान मूल जिवंत ठेवते.
इस्त्री नसलेला शर्ट, एखादा डाग पडलेला कुर्ता, जेवतांना वरणाचा मारलेला भुरका, चहा पितांनाचा “फूर फूर आवाज, ताटातून बाहेर डोकावणारी भाताची चार शीत. “हे सगळं चालत हो”
विश्वास ठेवा..! देवाने देखील कुठे माणसाला परफेक्ट बनवलं आहे? खूप व्यवस्थीशीरपणा तणाव आणतो आणि माणसं ही दूर करतो. त्या मुळे तुमच्या ह्या अश्या खट्याळ सवयी जिवंत ठेवा तुमच्या मनात. वेळ पाहून त्यांना बाहेर डोकावू द्या थोडं. मजा आहे ह्यात..!
सगळ आपल्यात
वास्तविक पाहता तुम्हाला जगातलं कोणतंही साहित्य वाचायची गरजच नाहीए. तुम्ही स्वतःच च आयुष्य बघा. अनेक प्रश्नांची उकल इथेच सापडेल. नैराश्यात पडलेल्या मनाला उभारीची गरज नसते. ह्या उलट त्याने आतमध्ये डोकावून पहाव.
माझी शक्ती स्थान काय आहेत ? नेमकी माझ्यात काय कमतरता आहे ? मी समाजासाठी काय करू शकतो ? माझ्या काय गरजा आहेत ? नक्की मला काय हवं आहे ? हे प्रश्न स्वतःलाच स्वतः ने फार प्रामाणिक पणे जर विचारले तर पैजेवर सांगतो.
उभ्या आयुष्यात कुणाचही आत्मचरित्र वाचायची गरज पडणार नाही. अडचण ही झाली आहे, बुडाखाली सोन्याची खाण असतांना, त्या वर बसून माणूस भीक मागतो आहे सहानुभूतीची.
घरातच पंढरी
सगळं धुडकावून, भगवे कपडे धारण करून. जंगलात निघून जाणं फार सोप आहे. पुंडलीकाने जिवंत माणसांच्या सेवेसाठी देवाला ताटकळत उभं केलं.
त्याच्या ह्याच भक्तीपायी अठ्ठावीस युगांपासून तो आजही त्याच विटेवर उभा आहे. प्रेमासमोर, आत्मसाक्षात्कार ही तोकडाच असतो.संन्यासात वैराग्य असेल, पण परमेश्वर संसारातच भेटतो.
इथेच आहे..! हेवे, दावे, मत्सर आणि द्वेषातून मुक्त झालो की. घरातच पंढरी आणि अंगणात चंद्रभागा येते. हे एकच योग सुत्र आहे आणि हेच पुरेसं आहे तुमच माझं आयुष्य समृद्ध करायला.
खरा संस्कार
एखाद्या व्यक्तीबद्दल जेंव्हा आपल्या मनात राग किंव्वा द्वेष जन्माला येतो, तेव्हा जी आग लागते त्यात सर्वप्रथम आपण जळतो.विवेक जागृत ठेऊन जर विचार केलात तर खोलवर कुठेतरी तुम्हाला समजेल, व्यक्तीला समाज घडवत असतो आणि समाज देखील व्यक्तींच्या समूहाने घडत असतो.
लादेन असा का ? किंव्वा विवेकानंद एवढे छान कसे ? ह्यांची उत्तर ही समाजातूनच येतील.आपण फक्त मुलं जन्माला घालून पिढ्या घडवायच्या गप्पा मारतो. दुर्दैवाने तीच पिढी पुढे जाऊन नियंत्रणाबाहेर जाते. कारण आपण त्यांच्या गळ्यात संस्कारांचे पट्टे बांधले खरे, पण माणूस म्हणून सामाजिक विषमता दूर करण्याचे प्रयत्न केले नाहीत.
असणाऱ्या, आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला आपण सामाजिक घटक म्हणून जवाबदार आहोत. हा खरा संस्कार मुलांच्या कानात गायत्री मंत्रा अगोदर फुंकायला हवा. आणि त्या अगोदर तो आपल्यातही उतरवावा.शेवटी माणूस हा त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीचच आपत्य असतो.
विरोध
सततची नकारघंटा वाजवणारी लोक आयुष्यात काहीही सृजनशील करत नाहीत. अडचण विरोध करण्यात नाहीचे. विरोध हा घृणेतून आणि मनभेदातून आला की मन आणि बुद्धी कलुषित होतात.माणसांमधलं वैर वाढत. विरोध हा रचनात्मक असावा. त्यातून उत्तम काहीतरी जन्माला यावं हा हेतू असावा.
कुणाला उगाच आडकाठी करण्यासाठी केलेला विरोध ही जगातील सर्वात निच दर्जाची मानसिकता आहे.विरोध हे सृजनशील मनाचं आपत्य आहे.
संवेदना युक्त विरोध हा नेहेमीच माणसांचे संभंध वृद्धिंगत करतो. मतभेदातून आलेला विरोध समाजाला दिशा देतो. तर, मनभेदातून केलेला विरोध व्यक्तीतला तमस वाढवतो.
मन
“मन” ह्या एका अदृश्य शक्तीने सगळं जग धावत आहे. मला वाटत, निरागस गोष्टी कधीही कुणाच्या शत्रू अथवा मित्र नसतात.मन हे त्याच निरागस विश्वाचा भाग आहे. निसर्गाने काही Settings by default करून ठेवल्या आहेत.
निरभ्र आणि अल्लाहददायक आठवणी मन नेहेमी साचवून ठेवत असत. रस्त्याच्या कडेने जातांना, कानावर पडलेल्या राम कृष्ण हरी भजनाने पाय आपोआपच मंदिराकडे वळतात.आनंद देणाऱ्या आठवणी ते नेहेमी रजिस्टर करून ठेवत. दुःखाच्या क्षणांवर मायेचा मुलामा लावण्याचं काम करत.
मन माणसासारख चांगला वाईट भेद करत नाही.त्याला शयनगृहातला प्रणय तितकाच आवडतो जितकी भजनात वाजलेली टाळी, ते मिसळीचा रस्सा ही त्याच तन्मयतेनं पीत, जितक्या आवडीने ते वरण भात खात. चांगल किंव्वा वाईट ह्याचे कोट आपण चढवतो. त्याला फक्त उपभोगणं माहिती असतं. मनाला वळण असं नसतंच. ते सरळ आहे.
वळण माणसांना असत. ते दमन करतात ह्याच मनाचं आणि त्यातून अहंकार बळावतो किंव्वा माणूस चारी मुंड्या चित्त होतो.माणसाने मनाचं दमन करणं सोडून त्याला तारतम्य शिकवावं, दमनाचे चौकोन आखण्यापेक्षा सैंयमाच्या रेखा आखाव्यात.आणि रेषांना वळणं नसतात. ह्या पुढे जायचं नाही एवढं एकच शहाणपण त्याच्यात असतं.
करून पहा
तुम्ही कधी अशी माणसं पाहिली आहेत का? ज्यांच्या हाताला बरकत नसतेच. कोणत्याही कामात हात घातला तर नुकसानच करून येतात. ह्या लोकांचे हेतू निर्मळ असतात. मनगटात ताकद आणि छातीत आत्मविश्वास असतो.
पण, काळ आणि नशीब कधी साथच देत नाहीत. सहनशक्तीचा आणि वैफल्याचा परमोच्च बिंदू गाठल्यावर ही लोक प्रयत्नांची तलवार खाली ठेवतात आणि परिस्थितीच्या हातून आपला शिरच्छेद स्वीकार करतात.
“परमेश्वरा ” तू दिलेलं आयुष्य आहे. तूच चालव कस चालवायचं ते ” गात्र आता थकले आहेत, डोळ्यांच्या काठावर अश्रू आले आहेत, तुझ्या ह्या कर्माच्या बीजगणितासमोर मी माणूस म्हणून हरलो आहे.
आता मागण्यासाठीही हाथ उचलले जात नाही. प्रार्थना तहानलेल्या ओठांवरच सुकल्या आहेत माधवा.प्राण कंठाशी आलेल्या व्यक्तीच्या मुखातून अशी प्रार्थना तुम्ही कधी ऐकलीच, तर त्याला बाजारू पुस्तकांचा आणि मोटिव्हेशन चा टेकू देऊ नका.जमलंच तर परमेश्वराला तुमच्या वाटेल आलेलं पुण्य थोडं त्याच्या खात्यात वर्ग करायला सांगा. पांडुरंग विटेवरून उतरेल तुमच्यासाठी.
बाकी तुम्हीच ठरवा
अंतस्तः विस्कटलेला माणूस स्वतःला बाहेरून मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. विस्कटलेपण तो आत मधे झिरपुच देत नाही. कारण त्याला भीती असते. त्या दुःखाच्या कायमच्या वास्तव्यांची.
आणि समाजातल्या गटार मानसिकता असलेल्या लोकांनी ह्या अस्वीकार्यतेला “personality development ” ह्या मथळ्याखाली घालून गडगंज पैसा कमावला.ज्योतिषांनी राहू, शनी ची वक्र दृष्टी म्हणून अमाप दक्षिणा मिळवल्या. पण त्यात माणूस मेला आणि जन्म झाला एका नव्या तुटपुंज्या आत्मविश्वासाचा.
दुःखाचं समूळ उच्चाटन तेव्हाच शक्य आहे जेव्हा ते पूर्णतः झिरपेल. अस्तित्वाचा कण ना कण त्याने नाहून निघेल.मन जेव्हा स्वीकार्यतेच्या ह्या पातळीवर उभं राहात, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यातून मुक्त होतं. दुःख कोळून प्यायलेला माणूस आत्मविश्वासाचं आडंबर करत नाही.
त्याच्या अंतरीच्या कळा इतक्या मजबूत असतात, की संपर्कात येणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात एक छाप सोडून जातात. आगीत हात टाकला की तो जळतोच ना ? आगीला विस्तव उसनवारी आणावा लागतो का ?तसंच प्रत्येक भावना तुमच्या आत झिरपू द्या. तिची स्पंदन लोकांच्या जाणिवांपर्यंत अगदी सहज पोहचतील.
हाच व्यक्तिमत्व विकास आणि हेच खरं संवाद कौशल्य.
अंतिम सत्य
असं कुणी म्हटलं आहे? की अंधारातून जातांना. तुम्ही लख्ख प्रकाशाचा विचार करू शकत नाही.हा विचार माणसांमधे कुणी रुजवला की दुःखाच्या भवसागरात आनंदाचं बीज अंकुरीत होऊ शकत नाही?
हे कुणी प्रस्थापित केलं की आज तुमच्या सोबत जे होत आहे. तेच तुमच्या संपूर्ण जीवनाचं सार आहे. मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. तुमची चेतना तुमच्या परिस्थिती आणि प्रारब्धापेक्षा खूप मोठी आहे.तुमच्या अंधारलेल्या आकाशात इंद्रधनुष्याची छटा आजही मंद मंद चमकत आहे.
तुमच्या आयुष्यातील अंतिम सत्य कुणीही बनवलेल्या सीमारेषांमधे बांधलेलं नाहीए. ते मुक्त आहे आणि कायम राहाणार.तुमच्या कल्पनांना तुमचाच एक जिवंत स्पर्श हवा आहे पुन्हा एकदा पल्लवित होण्यासाठी. जर तुम्ही स्वतःला संपूर्णपणे स्वीकृती देणार असाल तर असं नक्कीच घडेल.
सहज तेच अगदी सुंदर | Marathi Lekh
अंतरंग घोळून निघालेल्या लिखाणाला. व्याकरण, अलंकारीक भाषा, फॉन्ट, अस्खलित शब्द आणि असं बरंच काही. “वगरे वगरे “. कडबोळं जमा करण्याची गरजच नसते. लिहिणारा सहज लिहून जातो आणि जातिवंत वाचक ते समजूनही घेतो.
तुम्ही इतिहास चाळून पहा. जे काही नैसर्गिक आणि उपजत आहे. ते तितकंच सहज आणि सोप आहे. “क्लिष्टता ” हा निसर्गाचा स्वभाव नसून माणसाचा स्थायीभाव झाला आहे.
सिद्धार्थाची समाधी ही सहज होती. म्हणून ती क्षणार्धात घडून आली. त्या अगोदरच संघर्ष हा सत्यामागे अंग दुमडून बसलेल्या वासनेचाच होता.
मानवीय आयुष्यात जे अतिउच्च, सुंदर आणि श्रेष्ठ आहे. ते सहज आणि सोपं आहे. सहजतेसाठी प्रयत्न नाही तर शरणागती लागते. प्रयत्न फक्त वासनापूर्ती साठी लागतात. आणि विरोधाभास एवढा की लोक त्यालाच यश मानतात.
साद प्रतिसाद प्रतिक्रिया
आपल्या सोबत होणाऱ्या प्रत्येक घटनेला आपण प्रतिक्रिया देत असतो. हे ह्या जगाचं गणित झालं.पण सृष्टीचं विधान प्रतिक्रियेवर नाही तर प्रतिसादावर चालत..!
घडलेली घटना, त्या मागील कारण आणि त्याचा परीणाम ह्या तून तुम्ही स्वतःला मानसिक कोषातून मुक्त करून त्या घटनेकडे तिन्हाईत म्हणून (as a witness म्हणून) पाहिलं की तात्काळ तुम्हाला एक मोठा परिपेक्ष सापडतो.
आणि घटनेची उकल ही सापडते. प्रतिक्रियेत अडकलेलं मन. सुख, दुःख आणि द्वेष ह्यात अडकून पडत आणि मग त्याच जाळ्यात गुरफटून जात.
प्रतिसादात frequency असते. प्रतिक्रियेत फक्त विषाद आणि विव्हळणं असत. आपलं tuning set नसलं की मग वाजत ते फक्त रडगाणं वाटत. त्या मुळे व्यवहारात प्रतिक्रिया असावी आणि संवादात प्रतिसाद.
भावनांचं उगम स्थान
समाजाने स्वतःला हवा तसाच माणूस घडवला आहे. प्रत्येक भावनेला एक corresponding भावना उभी केली.नैराश्या समोर मोटिव्हेशन, क्रोधा समोर प्रतिशोध, असुरासमोर दैव, कामुकतेसमोर सैयम, नास्तिकतेसमोर आस्तिकता आणि चांगल्या विरुद्ध वाईट.
माणूस ह्या स्पर्धेत पडला आणि सतत जिंकण्याच्या तैयारीतच राहून गेला. मुळात ह्या भावनांचं “उगम स्थान “कुठे आहे. आणि कोणतं आहे. हे जाणून घेण्याची इच्छा असलेला माणूस ह्याच शोधात संपून गेला. ते जाणून घेण्यासाठीच वातावरण आणि शिक्षण देण्यास आपला समाज नेहेमीच कमीच पडत आला आहे.
राग आला तर त्याला खोल श्वास घ्यायला शिकवलं. पण पण तो आला. तर त्याच उगम स्थान काय आहे? ही कुतुहलता माणसात कधी जागृत झालीच नाही. माणूस म्हणून आपल्याला सुखी आणि स्वैराचाराचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आणि हा अधिकार ज्या कुण्या गोष्टीमुळे पतित होणार असेल. त्या व्यक्तीला, परिस्थितीला आणि वस्तूला पराजीत करणे.
हेच एकमेव उद्दिष्ट शिकवलं गेलं. आणि मला माणूस म्हणून स्वतःची आणि संपूर्ण समाजाची कीव येते. खरं तर, अश्या जागृत माणसांच्या समुहाने मिळून असल्या भिकार शिक्षणपद्धती हाणून पाडल्या पाहिजेत.
झाडाच्या मुळांना पाणी मिळाल्याशिवाय झाड वाढत का हो? मग आपल्यात येणाऱ्या भावभावनांच मुळ कोणतं आहे? हे जाणून घेणं महत्वाचं नाहीए का? असा विचार करणाऱ्या माणसांच्या समुहाची आज आपल्याला आत्यंतिक गरज आहे.
आयुष्य म्हणजे गंमत
आयुष्यातली गंम्मत अशी आहे की माणूस स्वतःच्या अनुभवातून च बरंच काही शिकतो. शाळा फक्त जगात वावरण्याच साधन देते ! तुम्ही स्वतःला कित्येक वेळा रडता रडता हसतांना पाहिलं असेल. “आता संपलं सगळे “. असं वाटत असत आणि गोष्टी अचानक सावरलेल्या पाहिल्या असतील.
दुष्काळ नंतरचा धरणी मातेला शांत करणारा पाऊस ही पाहिला असेल. बाकी सोडा पण काही पावसाळे पाहिलेली माणसं एक मताने हैं मान्य करतील. की अंधारातून नेहेमी एक नवीन सकाळ जन्माला येतेच.
पण, अंधार कधीही कुणालाच चुकला नाही. मनापासून सांगतो. जे काही घडत ते सरतेशेवटी चांगल्यासाठीच असत. त्याची व्याप्ती आपल्या नजरेत मावत नाही एवढी एकच अडचण मला माणूस म्हणून परमेश्वराला सांगायची आहे.
दुर्दैवी फाटक्या झोळ्या
भोग संपत नाहीत आणि सुख कधी येतही नाही. ही आजच्या माणसाची अवस्था आहे. माणूस इतका हपापलेला आहे की सुखाच्या आडून येणाऱ्या भोगावर त्याच लक्ष लागून राहिलेलं असतं.
सुख भोगण्यातला सैयम नाहीसा झाला की. त्या सुखाचं परीवर्तन भोगात होतं. म्हणून लोक अंन्नावर “ताब ” मारतात.” अंन्न ग्रहण ” करत नाही. त्या सुखातला भोग संपला की मग ते सुख डोईजड होतं, कंटाळवाणं वाटत. “आयुष्यात नवीन काही होतंच नाही” असं म्हणणारी टोळी ह्याच माणसांची असते.
सुखातला सैयम आणि भोगातलं शहाणपण जोवर प्रस्थापित होत नाही तोवर मनुष्य हा कफल्लक आणि भिकारडाच राहाणार.किती ही ओंजळी भरा. अश्या लोकांच्या झोळ्या नेहेमी फाटक्याच राहाणार.
वाचत चला
लाखो सुविचार, दैदिप्यमान इतिहास, आयुष्य अपुरं पडेल इतकं साहित्य आणि अजीर्ण होईल इतके मोटिव्हेशन असलेल्या समाजात आजही आनंदाने बहरलेला माणूस का दिसत नाही? हा खरा मूलभूत प्रश्न आहे. आणि हीच मेख आहे. माणसाचं संपूर्ण आयुष्य हे बाहेरील आवरण सांभाळण्यात खर्ची झालं. मनुष्याचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून तत्कालीन समाजाने ज्या चौकटी आखल्या त्यात माणूस सुरक्षित आहे.
पण, त्यात ग्राच माणसाचा सर्वांगीण विकास गुदमरला गेला. पिढी दर पिठी माणूस कमकुवत होत चालला आहे.ह्या सामाजिक दलदलीतून बाहेर येण्यासाठी माणसाला पराकोटीची सामाजिक करुणा आणि प्रधाड़ अशी विवेक बुद्धी जागृत करावी लागेल.जी मुळात त्याच्याकडे आहे. परंतु ती अच्छादित आहे.
रूढी, परंपरा आणि अत्यंत गलिच्छ अश्या सामाजिक मानसिकतेने.पण, मला मनुष्य म्हणून निसर्ग न्यायावर विश्वास आहे. आणि त्या मुळेच है मी अधोरेखित करून सांगू शकतो, ह्याच समाजातून एक बंड करणारा मनुष्य वर्ग निघेल जो ह्या मानस कल्पना उधळून टाकेल, जो जातीवादाला गाडेल, जो धर्माध मनुष्याला फक्त “माणुसकी “हाच धर्म शिकवेल.
आणि मला माणूस म्हणून अशीच व्यक्ती कलकीचा अवतार म्हणून स्वीकार आहे.जे काही शुभ आणि दैदिप्यमान म्हणून प्रकट होईल ते इथूनच होणार आहे. आपण फक्त ह्या समूहासोबत उभं रहाणं गरजेचं आहे. जगातली कोणतीही अदृश्य शक्ती दृश्य परिस्थिती बदलू शकणार नाही.विवेकाच दान मिळालेला माणूसच की किमया घडवून आणू शकतो.
गाव नावाची सावली
माणसाने गाव सोडलं आणि त्या सोबत चांदण्यांनी भरलेलं आकाश ही आपसुकच सुटलं.कर्जाच्या हफ्त्याने अच्छादित असलेल्या सिमेंट च्या भिंतींमध्ये थकलेला जीव जेव्हा देह टाकतो, तेव्हा झोपतांना तो अपूर्ण इच्छा, स्वतःच अपयश आणि दुसऱ्याच्या यशाची असुया छातीवर घेऊन झोपतो.
झोपतो कसला ? विव्हळतो. ते ही आतल्या आत. तो दिलखुलास रडणं आणि मनमुराद हसणं विसरला आहे.त्याच शरीर जरी स्पर्धेत धावत असलं तरी. मन मात्र गावातल्या मातीत आणि नदीकिनारी च वसलेलं असत. माणूस असा का झाला असेल,
ह्याची कारण शोधायला गेलो तर डोकं काम करणं बंद करेल?समाज इतका क्रूर आहे की त्याला धोतर रुचतंच नाही. बदलत्या काळात माणसाने बदलावं असं म्हणतात. पण ते बदलणं जर त्याच मुळ अस्तित्वच हिरावून नेत असेल. तर ह्याला बदल नाही तर गुलामगिरी म्हणावी लागेल.
धोतर नेसलेला गावातल्या माणसाप्रती लोकांना सहानुभूती आहे. पण तो स्वीकार नाहीए.गावाच्या कहाण्या आणि गुणगान करणाऱ्यांनी गाव मोठं केलं पण गावपण नाकारलं. ह्यात कुणाची चूक आहे, हे सांगणं कठीण आहे.पण आपल्यापैकी कुणाला स्वतःच्या गावात स्थायिक होण्याची संधी मिळालीच तर तीच सोन करा.
–
प्रार्थना
दाही दिशांनी पराभूत झालेलं मन, मेलेल्या इच्छा आणि भविष्यात सर्वदूर भासणारा अंधार, साथ सोडलेले पाठीराखे, इज्जतीचे निघालेले पंचनामे, काळाचे विस्कटलेपण आणि मग त्यातून येणार डिप्रेशन. तुम्ही कधी ह्या नरकातून गेलेले आहात का ? गेले नसाल तर “तथास्तू “..!
ह्या घनघोर काळातून जातांना, डोळ्यातील अश्रू जेव्हा वाहातात, तेव्हा त्या अगतिकेतूनच खन्ऱ्या “प्रार्थनेचा ” उदय होत असतो.मनुष्य जेव्हा संपूर्णपणे हरलेला असतो तेव्हाच खरी शरणागती घडून येते. संकट शरणागती घेऊन येतात.इतर वेळी जे हात दैवासमोर जोडले जातात.
त्यात व्यापाराचा दुर्गंध असतो. त्यात देवासोबतचे करार असतात. त्या contract मध्ये अटी आणि शर्ती लागू असतात. पण, दुः दुःखाच्या डोहात बुडालेलं मन अटी आणि शर्ती घालण्याचं बळ गमावून बसलेलं असत. प्रकृतीला असं निखालस आणि निरागस मन साद घालत आणि चमत्कार तिथूनच घडतात.
इतर वेळेस जे आवाज करतात ते माणसांच्या अहंकाराचे “चित्कार “असतात. त्यात माणूस ऐकत नसतो तर ऐकवत असतो.अशी प्रार्थना घडून येणं हैं खऱ्या अर्थाने मनुष्य जंन्म सार्थक होण्याचं लक्षण आहे. चित्कारातून होणाऱ्या इच्छापूर्ती ह्या काळसापेक्ष असतात.प्रार्थनेतून होणारे चमत्कार कालातीत असतात. कुतर्कात अडकलेलं मन हे मान्य करत नाही.
आणि त्यातूनच खोटी नास्तिकता उदयास येते.आपण मनुष्य म्हणून सर्वच ठिकाणी विजयाची अपेक्षा ठेवणं हे घातक आहे. “सर्वार्थाने ” हरलेल्या मनातच प्रार्थनेचा उदय होत असतो. चमत्कार तिथेच वास्तव्य करतात. विजयी मुद्रेत भविष्याचे चित्कार गोंदलेले असतात.
ते पुसट असतात, रसातळाला शिवून प्रार्थनेच्या गरुडावर आरूढ झालेला मनुष्यच हे पुसट चित्कार स्वछ पणे वाचू शकतो.तो फक्त करुणेने भरलेल्या नजरेने “तथास्तु” म्हणून चमत्काराच्या आभाळात मुक्त विहार करतो.
भय
“भय ” सर्व दुःखाचं मूळ आहे. भीतीयुक्त अंतःकरणातून माळेतून ओढलेला मणी आणि मुखातून निघालेलं देवाचं नाव माणसाला फक्त तात्पुरतं मानसिक संरक्षण देत.
ह्या उलट आत्मविश्वासाने आणि अभेद्य अश्या निश्चयाने धरलेला मद्याचा प्याला देखील परमेश्वराच्या अस्तित्वाची साक्षच देऊन जातो.प्रश्न माळेचा किंव्वा इतर तत्सम गोष्टींचा नाहीए.प्रश्न आहे त्या हाताचा आणि त्या मनगटात असलेल्या ताकदीचा.
माणसाचं असलेपणच सर्व गोष्टींना जिवंत रूप प्रदान करत.दैवाने माणूसपण दिल आणि माणसानेच परमेश्वराचं अस्तित्व पृथ्वीवर अधिक खुलवल.माणसाने देवाला मोठा करून मंदिरात स्थान दिलं आणि त्यातून जन्माला आलेल्या भीती नावाच्या भुताला मानगुटीवर बसवलं.
दैववाद आणि माणूसपण ही एकाच आईची आपत्य आहेत आणि त्यांनी हातात हात घालून चालावं.हात सुटले की मार्ग चुकतात.
कलियुग
समाजात खोलवर रुजलेली शिक्षणपद्धती आणि लग्न पद्धती हह्यांनी मिळून माणसांची आयुष्य बरबाद केली आहेत.” गृहपाठात” अडकलेला माणूस मूळ मुद्यांकडे पाठ फिरवायला लागला.आणि, वासना शांत करण्याचं लग्न नावाचा लायसन वारेमाप वाटत सुटला.
“गरज” आणि “वासना “ह्यातल अंतर अधिक वाढत गेलं. त्यातून वासनेप्रती महत्वाकांक्षा वाढीस लागली. मनुष्य इतका चाणाक्ष निघाला की सगळं काही “कलियुगावर “ढकलून मोकळा झाला.
तुमच्या आयुष्यातले कली कुणी असतीलच तर इथल्या फालतू व्यवस्था आहेत आणि त्या आपल्यात राहणाऱ्या लोकांनीच घडवल्या आहेत.पुढील पिढीने त्या फुलवल्या. ह्या कलीच्या अंतासाठी जर आपण नारायणाची वाट पाहात असू.
तर माणसाइतकी खोटारडी, दांभिक आणि अहंकारी प्राणिजात दुसरी कोणतीही नाही. कलीच असं कोणतं युग नाहीचे. तो अनंत काळापासून इथेच वावरतो आहे. स्वतःच्या चुकांचा बोजा कुणावरतरी लादण्याकरता माणसाने जन्माला घातलेलं मृगजळ आहे ते.
हाच तो माणूस | Marathi Lekh
गोष्टी अचानक घडून येत नसतात. त्या चाहूल देतात. मन अचानक उदास होत नाही.हसू असलेल्या डोळ्यात अचानक अश्रू येत नाहीत. बोलघेवडा माणूस अचानक मौन होत नाही. हाच तो माणूस.
वर्षांनुवर्षाच्या प्रयत्नांना जेव्हा अपयश येत. ते अपयश एके दिवशी मानसिक त्राग्यातून बाहेर येऊ पाहात.
जेव्हा आपल्याच लोकांना आपल्या मनीचे भाव उमगत नाही. त्यातूनच एकाकीपण जन्माला येत. जेव्हा नाती फक्त सामाजिक सोपस्काराच्या व्हेंटिलेटर वर जिवंत असतात, तेव्हा माणसाचा धैर्याचा श्वास तुटतो.
अश्या वेळेस माणसाने स्वतःला जोडण्याचे प्रयत्न केले तरी त्याला स्वतःचा भूतकाळ फक्त जखमांनी भरलेला दिसतो.त्या वेळेस त्याच अंतर्मन असहा वेदनेनं भरून जात. काय करावं, कुठे जावं, कुणाला सांगावं ? ह्या मनात उठलेल्या बादळी दुःखाला कस सावराव? ह्या वेदनेला कस सहन करावं ?
ह्या वेळेस सगळं शिक्षण, संस्कार, मोटिव्हेशन, तत्वज्ञान फिर्क पडत, हतबल होतं. दयेची भीक मागत. पण, ह्याच द्वंद्वातून एका अद्वैत ज्ञानाचा उदय होतो. माणसाला त्याच्या सगळ्या व्यवस्था फालतू आहेत ह्याच जान होत. निसर्ग सर्वोतपरी आहे, हे उमगत..!
अहंकारात उठणारे हात, परोपकारासाठी पुढे येतात, आणि विनासायास अद्वैतासमोर जोडले जातात.आणि खरं सांगतो. असाच माणूस प्रकृतीला अभिप्रेत आहे..!
असेच लेख , प्रेरणादायी विचार वाचण्यासाठी येथे क्लिक करा