आयुष्य जगताना आलेल्या अनुभवाचे बोल | life quotes in Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

life quotes in Marathi : आयुष्य जगात असताना आपल्याला बरेच अनुभव येतात. तसेच आपल्या आजूबाजूंने वावरणाऱ्या लोकांचे हि आपण निरीक्षण करत असतो. तेच अनुभव आम्ही या ठिकाणी कोट्सच्या माध्यामातून मांडलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच वाचण्यास आवडतील.


life quotes in Marathi

“लोक फायदा घेतात म्हणून घाबरायचं नसतं,

तहानलेल्या साठी नदी बनून संकटाच्या खडकाला तोडून,

समुद्रासारखं अथांग पासरायचं असतं”

“जे आपलं बोलून, आपलंच शिकून आपलीच वाट लावणार,

ते एक दिवस अभिमन्यू सारखे कर्माच्या चक्रव्यूहात नक्की अडकणार”

“स्वतःच्या पायावर खंबीर उभं असण्याच्या गुर्मीत,

चार माणसाच्या मनाचा विचार करु नका,

पण दोन पाय जेव्हा बंद पडतील तेव्हा खांदा द्यायला,

तीच चार माणसं लागणारेत हे विसरु नका”

“ज्या वळणावर सर्व काही गमावले,

त्याच वळणावर,

तुझ्या भेटीने पुन्हा जगावेसे वाटले”

“जीव जिथे रमतो,

आयुष्याच्या त्या वळणावर प्रत्येक क्षण थांबतो,

आणि तू माझे तेच वळण आहेस”

“हक्क मागून घेतला तर दैव देईल,

हक्क मारुन घेतलं तर कर्म नेईल”

“तो बांधतोय कोणाच्या तरी स्वप्नांचं घर, कोणाची तरी सावली,

कुटुंबाच्या पोटाची खळगी भरायला भर उन्हात उभा विठू माऊली”

“ध्येयामागे धावून धावून थकायला झालं असेल तर थोर्ड बसून घे,

पाठीमागे किती मोठं अंतर कापलंय आणि पुढे किती थोडं राहिलंय बघून घे,

जिद्दीचा घोट घे, विश्वासाचा श्वास घे, आणि तुझ्या ध्येयाकडे मोठी झेप घे”

life quotes in Marathi
life quotes in Marathi

“जिभेवर ताबा असला की,

आरोग्य आणि नाती दोन्ही ताब्यात राहतात”

“दिवस मावळला की पक्षी पण घरट्याकडे जातात,

आयुष्यात अंधार आला की मग आपले लोक दिसतात”

“जे सर्वांना जीव लावतात, लोक त्यांचाच जीव घेतात,

जे लोकांच्या मनाला जीवापाड जपतात,

त्यांच्याच भावना अबोल राहतात”

“शहरं आता मोठी होऊ लागली,

गावं माहिती नाय कुठं गायब झाली,

झाडं पडून गेली, चिमणी पाखरं उडून गेली,

इमारतीला इमारतीची सावली भेटू लागली”

“पहिली जरा कमीच गुणांनी शाळेत नापास झाली म्हणून लग्न करून पाठवून टाकली,

आणि दुसरी चांगल्या गुणांनी पास झाली बरं का,

म्हणून चांगल्या घरी लग्न करून पाठवली,

आहो शेवटी काय…?

मुलगी म्हणजे परक्याच्या धनाची पेटी नाही का,

परक्याला देऊन टाकली”

“सल्ला त्यांना द्या जे बुद्धीचे शहाणे असतात,

उंटावरच्या शहाण्यासाठी,

आपले अनमोल शब्द वाया घालवायचे नसतात’

“लढायला बळ देणारे, आणि लढायला लावून बळ काढून घेणारे,

यातला फरक समजलात की समजून जा तुम्ही जिंकलात”

“चुलीतली आग पोट भरते,

पोटातली आग हृदयातल्या इच्छा मारते,

आणि हृदयातली आग संघर्षाची मशाल पेटवते”

life quotes in Marathi

“सगळ्या बायका फक्त पैशावर प्रेम करतात,

असं म्हणता म्हणता तो थांबला, त्याच्यावर जीवापाड,

निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आईचा चेहरा त्याला दिसला”

“चंद्र तुझ्या आणि माझ्या आकाशात एक सारखा..

दोघांचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या आरश्या सारखा..

‘तू’ पाहिलं की माझ्या सारखा..

‘मी’ पाहिलं की तुझ्या सारखा”

“छळ करणाऱ्याचा खेळ,

नक्की होणार आणि तो वेळ करणार”

“जिंकायचं असेल तर ध्येयावर नजर ठेवून बेभान होऊन धावत राहा,

मागचा कुठे पोहचलाय हे पाहण्यासाठी मागे वळून बघाल तर मागेच रहाल”

“जे पाण्यात जास्त हात पाय मारत असतात ते सावज बनतात,

आणि जे पाण्यावर शांत बसलेले दिसतात ते सावज टिपतात.”

“स्त्रीला सगळे पुरुष एक सारखेच वाटतात,

पण प्रत्येकीला तिचे वडील मात्र जगावेगळे वाटतात”

“दुःखाचं ओझं वाटून घेता येत नाही,

पण कोणी समजून घेतलं की हलकं वाटतं”

“आपण फ़क्त आपल्या आई-वडिलांनी पाळण्यात दिलेलं नाव राखायचं,

लोकं काय नावं ठेवतात म्हणून मागे नाही वळायचं”

 life quotes in Marathi

“विकत घेतलेला काट्याचा गुलाब जपून ठेवला,

अंगणातला मोगरा मात्र सुंगध देता देता सुकून गेला”

“विकत घेतलेला काट्याचा गुलाब जपून ठेवला,

अंगणातला मोगरा मात्र सुंगध देता देता सुकून गेला”

“गर्दीत हरवलेलं सापडतं,

घरात लपवलेलं शोधावं लागतं”

“स्वतः भावना व्यक्त करणं आणि समजणं महत्वाचे,

इतिहास साक्षीदार आहे,

‘ध’ चा ‘मा’ करणारे असले की नात्यात खेळ होतात शब्दांचे”

“लोक बदलले की आपण आपला रस्ता बदलायचा,

रस्ता बदलला की आयुष्य बदलते,

पण चुकीच्या व्यक्तिमागे पळण्यात रस्ता चुकला, की नशीब बिघडते”

“संकटात शांत राहणे म्हणजे हार मानायची नसते,

विजयाचा पुष्पहार गळ्यात घालण्यासाठी तयारी तेव्हाच करायची असते”

“आता अपमानाचा बदला घेईन तर स्वतःच आयुष्य घडवून,

मला काय भेटणारे कोणाचं किंवा कोणासाठी स्वतः चं आयुष्य बिघडवून,

अपमानाचं वादळ आलं म्हणून विझणार नाही,

संघर्षांची मशाल घेऊन पुन्हा पेटून उठेन”

life quotes in Marathi

“शब्दाने शब्द वाढतो, पुसला जात नाही,

शब्दाने झालेला घाव काशानेच मिटला जात नाही”

“चांगले भाग्य आणि लक्ष्मी कधीच कोणाशी बांधील नसते,

जिथे तिच्या गृहप्रवेशासाठी कष्टाचे माप ओलांडले जाते,

तिथे च थांबणारी हक्काची मालकीण असते”

“आता आयुष्यात सुख पेरण्यासाठी,

दुःखाची जमीन,

‘कष्टाने’ च नांगरावी लागेल”

स्वप्नांचं वेड..!

“हे चहा सारखं असलं पाहिजे,

ज्याची तल्लप डोळ्यांची झोप उडवेल”

‘मैत्री’ म्हणजे…!

“आपत्कालीन आणीबाणी च्या वेळी,

आपल्या भोवती असणारं सुरक्षा कवच”

“मनात भावना दाटून आल्या की हृदयावर भार वाढणारच ना,

शब्दांची फुंकर घालणार कोणी आलं की डोळ्यातुन मेघ बरसणारच ना”

“लोकं पाय ओढतात म्हणून कशाला थांबायचं…?

लोकांचे हात च पोहचले नाही पाहिजे स्वतःला अशा उंचीवर नेऊन ठेवायचं”

“पंख नसले तरीही भरारी घेण्याचा निर्णय पक्काच असेल,

छोटेसे का असेना आभाळ माझ्या हक्काचं असेल”

life quotes in Marathi
life quotes in Marathi

“कारखान्याकडे साखर बनण्यासाठी जाणारा ऊस दिसला,

जास्त गोड असलं लोकांच्या गरजांसाठी पिळले जाणार हे सांगून बसला”

“ज्यांच्या हृदयाच्या खिशात शब्दांची आणि प्रेमाची श्रीमंती असते,

त्यांच्या कपड्यांच्या खिशांना खरी नाती जोडण्यासाठी कागदाने ने जड होण्याची गरज नसते”

“मला नाही माहिती कधी, कुठे आणि कसं करेन,

पण जे बिघडलंय एक दिवस ते सगळं नक्की ठीक करेन,

माझी सर्व अपूर्ण स्वप्न पूर्ण करुनच दाखवेन,

हे वचन स्वतः ला दिलेले हृदयात कोरून ठेवेन”

“लोक गरजेपुरते आपली आठवण काढतात,

म्हणून नाराज व्हायचं नसतं,

संकटे नसती तर गाभाऱ्यातल्या दगडाला देव कोण म्हणलं असतं…?

हे लक्षात ठेवायचं असतं”

“आक्रीत घडलं म्हणत सारा गाव गोळा झाला,

एक पिळदार दंडाचा गडी तिच्या एका नजरेत घायाळ झाला”

“जोडीदार हा स्वतःच्या सावली सारखा असतो,

सुखाच्या पावसात एकजीव होऊन भिजतो,

संकटाच्या उन्हात जगाला पाठीशी उभा दिसतो”

“तुटलेलं मन आणि फुटलेली काच,

यांना जरा जपूनच हाताळायचं ते नेहमी,

जोडणाऱ्याला आणि वेचणाऱ्यालाच घायाळ करतात”

“चंद्र हा कधीच अपूर्ण नसतो,

तो तर धारणीच्या प्रेम छायेत बुडालेला असतो”

life quotes in Marathi

“जे जिवाच्या आकांताने इतरांना सल्ला देत असतात,

बहुतेकदा त्यांच्या चुकलेल्या निर्णयाचे अनुभव असतात,

आणि अशे अनमोल सल्ले सोडायचे नसतात”

“आयुष्यतल्या संकटे आली कशाला घाबरायचं,

फक्त कवी कुसुमाग्रजांना वाचून देवाला म्हणायचं,

मोडून पडला संसार तरीही, मोडला नाही कणा,

पाठीवरती हात ठेवुनी फक्त लढ म्हणा”

“त्या चंद्राभोवती असंख्य चांदण्या फिरतात,

पण तो जिच्या भोवती घुटमळतो,

तो येताच फक्त त्या धरणीवर आनंद लहरी उठतात”

“ज्यांच्या मनाने सर्व अंतराचा टप्पा पार केलेली असतो,

मग त्यांच्या शरीराला दुराव्याचा फरक पडत नसतो”

एक विचारु का?

“बोलण्याची सुरवात जेव्हा अशी होऊ लागते,

तेव्हा नात्यात दुरावा आणि मनात व्यक्त भावनांची लाट पसरलेली असते”

“आयुष्य हे असं व्याकरण आहे,

जिथे आपला एक निर्णय ठरवतो,

की कर्ता, कर्म आणि क्रियापद काय असेल”

“ज्यांना समजून घेणारं कोणी नसतं,

त्यांच्या वाटयाला समजून घेणाऱ्यांची भूमिका असते”

“माहिती पडण्याआधी सांगून टाकलं ना,

की बरेच गैरसमज दूर होतात,

आणि सांगितल्यावर समजून घेतलं ना,

की बरेच वाद टळतात”

life quotes in Marathi

“आयुष्याच्या वळणावर प्रवास करणारे खुप भेटतात,

पण प्रत्येक वळण सुंदर बनवणारी व्यक्ती भेटली की जगण्याचा आनंद घेता येतो”

असं म्हणतात…!

“स्त्री काहीच विसरत नाही, दिलेला त्रास, झालेल्या वेदना पुन्हा पुन्हा उगाळत बसते,

एकदा तिला हवं असलेलं प्रेम आणि आदर देऊन तर बघा,

तिच्या इतकं विसरभोळे या जगात कोणच नसते”

“सुख आणि दुःखाची व्याख्या फ़क्त एवढीच,

आपल्या पेक्षा जास्त असणाऱ्यांच्याकडे पाहिलं की कमी वाटतं,

आणि आपल्या पेक्षा कमी असणाऱ्यांच्याकडे पाहिलं की अनुभवता येतं”

“एखाद्याला दिलेली शिक्षा एवढी ही मोठी नसावी,

की त्या पुढे केलेली चूक छोटी वाटेल,

आणि शिक्षा त्यांनीच द्यावी,

ज्यांनी कधी चूकच केली नसेल”

“डोळ्याला आणि मनाला आवडलेली प्रत्येक गोष्ट जवळ ठेवण्याच्या जिद्दीत,

नजरेतून आणि हातातून निसटून जाण्याची शक्यता असते”

“आणि मग गुंतवलेल्या भावना आणि मिळालेल्या प्रेमाची बाकी शुन्य राहिल्यावर,

गपचुक निघून जायचं एकटंच नवीन ध्येयाच्या प्रवासावर”

“भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की,

गपचूप मनाच्या गाठोड्यात बांधून ठेवायच्या,

शब्दात मांडत बसलं की,

पायाखाली तुडवल्या जाणारच”

“ज्यांना आपल्या भावना कळतात,

त्यांना समजवाव्या लागत नाहीत,

आणि जिथे समजवायची गरज लागते,

याचा अर्थ, त्यांना आपल्या भावना कधीच कळत नाहीत”

life quotes in Marathi
life quotes in Marathi

ऐक ना सखे…!

“तुझ्या पोळपाटावरच्या पोळीला आकार देत असताना,

तुझ्या स्वप्नांना आकार द्यायला विसरु नको,

आणि तुझ्या तव्या वरच्या भाकरीला भाजतनाना,

तुझ्या अपेक्षांना होरपळू देऊ नको”

“तो सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे,

त्याला ना पुराव्याची गरज आहे, ना साक्षीची”

“परक्या माणसात हिम्मत नसते,

आपल्या नखाला सुद्धा धक्का लावायची,

पण आपलंच कोणीतरी त्यांच्या सोबत असतं,

तेव्हा सुरवात होते आयुष्य उद्धवस्त होण्याची”

“घर चालवण्यासाठी घरा बाहेर जाण्याऱ्या मुलींवर,

घर न सांभाळण्याचा आरोप हा असतोच”

“पितळं पासून सोनं तयार करण्याचे,

स्वप्न पाहणे हा काहींचा आवडता छंद”

“असेल संपवायच संपवून टाक उगाच वेळे पुरते टाळू नको,

ओल्या करून जखमांना माझ्या सतत त्यांच्याशी खेळू नको”

“संस्काराच्या सीमेत राहिले की लोक त्याला कारावास म्हणतात,

स्वातंत्र्याचा गैरवापर करतात त्याला घरच्यांचा विश्वास म्हणतात”

“प्रेम तुझं आणि माझं नाही आपलं असेल,

एक पाऊल तू उचल दुसरं सोबत माझं असेल”

life quotes in Marathi
life quotes in Marathi

“वेडी आहे ती, उगाच छोट्या छोट्या गोष्टींवर गाल फुगवून बसते,

सांगा तिला कोणीतरी, हसताना तीच्या गालावर काय सुंदर खळी पडते”

“तिचा हात हातात घेताच, तिच्या प्रेमाची उब जाणवते,

पण तीचा संघर्ष कळतो, ते आई झाल्या नंतरच”

“आणि मग गुंतवलेल्या भावना आणि मिळालेल्या प्रेमाची बाकी शुन्य राहिल्यावर,

गपचुक निघून जायचं एकटंच नवीन ध्येयाच्या प्रवासावर”

“पोरीची जात, बाईची जात म्हणत तिला सर्वांनी मर्यादा तर शिकवल्या,

पण माणुसकीचा धर्म म्हणून तिच्या भावना कोणी समजल्याचं नाहीत”

“तिच्या कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातलं डोरलं,

तिच्या आयुष्याला हक्काचा आधार असावं,

तिच्या विखुरलेल्या स्वप्नांचा, इच्छा – अपेक्षांचा भार नसावं,

तिच्या अश्रूला अन अपमानाला कार नसावं”

“ती’ रडून पावसप्रमाणे कोसळून मोकळी होते,

तीचे दुःख सर्वांना दिसून येते,

‘तो’ मात्र आभाळासारखा सगळं साठवून ठेवतो,

खांद्यावर जबाबदाऱ्याचं ओझं घेऊन उभा असतो,

जगाला जो दगडाच्या काळजाचा वाटतो”

“माझ्या मनातील त्या चार ओळी तुला कधीच कळणार नाहीत,

कितीही शोधल्यास तरीही कुठंच मिळणार नाहीत,

काय सांगू तुला मी माझ्या चार ओळींची कथा,

होती ती तुझ्या माझ्या प्रेमाची कविता…

जी बनून राहिली आहे आता फक्त जीवनाची व्यथा,

भाव होते जे मनातले ते ओठांवर कधी आलेच नाहीत,

माझ्या मनातील त्या चार ओळी तुला कधीच कळणार नाहीत”

“संस्काराच्या सीमेत राहिले की लोक त्याला कारावास म्हणतात,

स्वातंत्र्याचा गैरवापर करतात त्याला घरच्यांचा विश्वास म्हणतात”

life quotes in Marathi
life quotes in Marathi


तुम्हाला हे हि वाचायला आवडेल – मराठी लव्ह कोट्स


आम्हाला आशाआहे कि हे life quotes in Marathi तुम्हला नक्कीच आवडले असतील.

येथून शेअर करा

Leave a Comment