असा करा अर्ज, कुक्कुट पालन योजना 2024 | Kukut Palan Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kukut Palan Yojana Maharashtra 2024: महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असो कष्टकरी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो त्यांना प्रपंच चालवण्यासाठी शेती उद्योग धंद्यांसोबतच जोडधंदेही ते करत असतात त्या मधलाच एक म्हणजे कुक्कुट पालन व्यवसाय हा शेतीला पूरक किंवा सर्वसामान्य नागरिक ही उत्पादनाचा व्यवसाय करतात व त्यांच्यापासून निघणाऱ्या अंडी, मांस यांसारख्या घटकांपासून ते आपले घर चालवून उदरनिर्वाह करत असतात. परंतु सर्वात जास्त कुक्कुट पालनाचा व्यवसाय हा शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेतकरी बांधव करतात तसेच इतरही नागरिक मोठ्या प्रमाणात या कुक्कुट पालनाचा व्यवसाय करतात.

कुक्कुट पालनाचा वाढता व्यवसाय व त्यामधून निर्माण होणारे उद्योगधंदे व त्यातून होणारा नागरिकांना फायदा या सर्व बाबी लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने कुक्कुट पालन योजना राबवली आहे. यामध्ये शासनाकडून कुक्कुट पालनाकरिता नागरिकांना अर्थसहाय्य केले जाते. यामध्ये शेतकरी बांधव असतील किंवा इतर सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना कोंबड्या विकत घेण्यासाठी कोंबड्यांना जे लागणार अन्न असतं ते विकत घेण्यासाठी कोंबड्यांना निवारा करण्यासाठी म्हणजेच एखाद्या नागरिकास पोल्ट्री फार्म उभा करायचा असेल तर त्यासाठी ही सरकार कुक्कुट पालन योजनेअंतर्गत आर्थिक मदत करते.

महाराष्ट्र सरकारच्या या कुकूटपालन योजनेसाठी नागरिकांनी अर्ज कुठे व कसा करावा यामागील सरकारची धोरणे हेतू व उद्दिष्टे काय आहेत. तसेच या योजनेत मधून मिळणारे नागरिकांना फायदे कोणकोणत्या प्रकारचे आहेत तसेच या योजनेसाठी पात्रता निकष व अर्ज कसा व कुठे करावा या प्रकारच्या सर्व महत्त्वाच्या बाबीं बद्दल आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेणार आहोत.

Kukut Palan Yojana
Kukut Palan Yojana Maharashtra 2024

कुक्कुट पालन योजना विषयी ठळक माहिती | Kukut Palan Yojana 2024

योजनेचे नाव – कुक्कुट पालन योजना ( Kukut Palan Yojana 2024 )
योजनेची सुरवात –महाराष्ट्र शासन ( पशूसंवर्धन विभागांतर्गत )
लाभार्थी नागरिक –शेतकरी व नागरिक
कर्ज लाभ रक्कम –50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत
अर्ज करण्याची पद्धत –ऑफलाईन ( Apply Here )
  • महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरी भागांमध्ये आज अंडी तसेच चिकन यांसारख्या गोष्टींची प्रचंड मागणी वाढते आहे. कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून सर्वसामान्य नागरिक ते शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांना या योजनेच्या अंतर्गत मोठा फायदा होणार आहे याच्या माध्यमातून ते शहराच्या ठिकाणी त्यांच्या पोल्ट्री फार्म मधील अंडी किंवा चिकन यांसारखे उत्पादन घेऊन ते मोठमोठ्या शहरांच्या ठिकाणी पाठवून योग्य तो व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात नफा करू शकतात.
  • दैनंदिन जीवनात मोठ मोठ्या शहरी ठिकाणी अंडी व मांस उत्पादनाची गरज जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी म्हणेल तेवढा प्रमाणात पुरवठा होत नाही त्यामुळे अंडी तसेच चिकन या उत्पादनांची मागणी शहरांमधून मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने कुक्कुटपालन योजना ही सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविले आहे याच्या माध्यमातून ते त्यांच्या स्वतःचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय त्यातून येणाऱ्या उत्पादनाचा पुरवठा ते शहरी भागांमध्ये होऊ शकतील व त्यांच्या हातात एक नवीन व्यवसाय मिळू शकेल.

कुक्कुट पालन योजना बद्दलची उद्दिष्टे व वैशिष्टे

महाराष्ट्र सरकारने कुक्कुट पालन योजना ही सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे या पाठीमागील सरकारची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत हे थोडक्यात खालील प्रमाणे,

  • महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच देशात दिवसेंदिवस चिकन व अंडी यांसारख्या गोष्टींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे या उत्पादना मधून सर्वसामान्य नागरिकांना फायदा व्हावा व त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारावे.
  • कुक्कुटपालन व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे याच्या माध्यमातून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेऊ शकतात शेतीबरोबर असते कोट पालन व्यवसायातून चांगला नफा कमवू शकतात त्यामुळे शेतकरी बांधवांना एक जोड धंदा म्हणून या योजनेच्या माध्यमातून फायदा निश्चित होणार आहे. त्यांना शेती वरती पूर्णपणे अवलंबून राहता या जोडधंदाच्या साह्यानेही ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात.
  • कुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्ये बरेच सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी आहेत त्यांना या कुकूटपालन योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे व स्वयंरोजगारीत करणे.
  • महाराष्ट्र राज्य मध्ये वाढती चिकन व अंड्यांची मागणी होत आहे परंतु बाहेरच्या ठिकाणाहून सुरक्षित असे कोणत्याही प्रकारचे मांस व अंडी मिळत नाहीत व योग्य त्या प्रकारची स्वच्छता त्यामध्ये पाळली जात नाही त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोगराई पसरते ही त्यामुळे थांबणार आहे नागरिकांना उत्तम प्रकारचा चिकन व अंड्यांचा पुरवठा या कुकूटपालन योजनेअंतर्गत करता येणार आहे.
  • सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षित सर्व तरुण-तरुणी बेरोजगार वर्गास या उत्पादन योजनेअंतर्गत कमी व्याजदरावरती कर्ज उपलब्ध करून त्यांना स्वयंरोजगारीत करणे तसेच कुक्कुट पालनावरती वेगवेगळे प्रक्रिया उद्योग उभारून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हा आहे.
Kukut Palan Yojana
Kukut Palan Yojana Maharashtra 2024 ( Image Source – Instagram )

कुक्कुट पालन योजना मधून होणारे फायदे

कुकुट पालन योजनेचे अंतर्गत जनसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना कोणकोणते प्रकारचे फायदे या योजनेच्या माध्यमातून होणार आहेत हे आपण खालील प्रमाणे,

  • ग्रामीण भागामध्ये नागरिकांना व शेतकऱ्यांना नवीन रोजगाराच्या संधी या कुकूटपालन योजनेच्या माध्यमातून होणार आहे व महाराष्ट्राच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला भक्कम असा आधार मिळणार आहे.
  • महाराष्ट्रातील खेडपाड्यांमध्ये ज्या नागरिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध नाही किंवा ज्यांच्याकडे शेत जमीन उदरनिर्वाहासाठी उपलब्ध नाही अशा नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून त्यांचा छोटासा कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करून एक उपजीविकेचे साधन तयार करू शकतात व त्यांच्या घराचा पूर्ण करू शकतात.
  • कुकुट पालन योजनेचा फायदा हा शेतकरी बांधवांना त्यांचे उत्पन्न जास्त वाढवण्यासाठी हा एक सुंदर उत्पन्नाचा स्त्रोत आहे याच्या माध्यमातून ते शेतीला जोडधंदा म्हणून कोंबडी फार्म सुरू करू शकतात व याच्या माध्यमातून ते चिकन व अंडी यासारख्या गोष्टी विकून शेतीबरोबरच या जोडधंद्यातून ते चांगला नफा कमवू शकतात.
  • सुशिक्षित नागरिक व तरुणांकडे व्यवसाय करण्यासाठी भांडवल उपलब्ध नाही अशा लोकांना या योजनेच्या माध्यमातून कमी व्याज दारावरती कर्ज मिळून ते त्यांचा पोल्ट्री फार्म स्वतःचा उभा करून स्वतः रोजगारीत व इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात व नफा कमवू शकतात.
  • नागरिकांना कुक्कुटपालन उपक्रमाच्या माध्यमातून ज्या नागरिकांना कर्ज घ्यायचे आहे अशांना 50 हजार रुपयांपासून ते दहा लाखांपर्यंत पोल्ट्री फार्मचा संपूर्ण सेटअप तयार करण्यासाठी शासनाकडून मदत केली जाते व इतर कोणत्याही अडीअडचणी आल्यास त्या अडीअडचणी व्यवस्थित रित्या सोडवण्याकरता शासन मदत करते.
  • कर्जदार लाभार्थ्यास सरकार इतर बँका व संस्थांच्या तुलनेत अत्यंत कमी व्याजदरावरती कर्ज उपलब्ध करून देते. तसेच कर्जावरती अनुदानही दिले जाते त्यामुळे जास्त प्रमाणात आर्थिक भार त्या नागरिकांवरती पडत नाही.
  • कुक्कुटपालनाचा संपूर्ण पोल्ट्री फार्म तयार करण्यापासून ते कोंबड्यांच्या लसीकरणापासून त्यांच्या आजारा नियंत्रणापासून व कोणत्या पक्षाच्या जाती पोल्ट्री फार्म मध्ये वाढवण्यात याव्या व पक्षी तयार झाल्यानंतर त्यांना मार्केटपर्यंत पोहोचवणे या संदर्भातील सर्व प्रकारचे सल्ले हे पशुसंवर्धन विभागाकडून लाभार्थी नागरिकास दिले जातात.

कुक्कुट पालन योजनासाठी पात्रता व निकष

कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणकोणत्या पात्रता व अटी पाळाव्या लागतील हे आपण पुढील प्रमाणे,

  • सर्वप्रथम नागरिका महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा तसेच नागरिकाचे वय वर्ष आहे 18 ते 60 यादरम्यांचे असावे.
  • नागरिकाकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे कारण ते त्या जमिनीवरती स्वतःचा पोल्ट्री फार्म उभारू शकतात त्यामुळे जमीन आवश्यक आहे.
  • नागरिकाकडे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यासाठी नोकरी नसलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण शेतकरी ज्यांच्याकडे शेतजमीन नाही असे नागरिक मजूर तसेच महिलावर्गही या योजनेसाठी पात्र आहेत.
  • नागरिकाकडे असणारी शेतजमीन ही स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावावरती असणे म्हणजेच मालकीच्या असणे आवश्यक आहे.

वरील हे पात्रता निकष नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे.

Kukut Palan Yojana
Kukut Palan Yojana Maharashtra 2024 ( Image Source – Instagram )

कुक्कुट पालन योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

नागरिकांना कुक्कुटपालनाचा अर्ज करतेवेळी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते पुढील प्रमाणे दिलेले आहे.

  • व्यवसाय संबंधित कागदपत्रे
  • बँकेचे वार्षिक स्टेटमेंट
  • पोल्ट्री फार्म चा व्यवसाय परवाना
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • पोल्ट्री फार्म साठी खरेदी केलेल्या उपकरणांची पावती
  • विमा इन्शुरन्स तपशील
  • मोबाईल क्रमांक
  • अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो

वरील ही सर्व कागदपत्रे नागरिकांनी अर्ज करतेवेळी स्वतः सोबत ठेवणे अत्यावश्यक आहे.

कुक्कुट पालन योजना चा अर्ज कसा करावा

कुक्कुट पालन योजनेचा अर्ज कसा व कुठे करावा याबद्दल माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे.

  • नागरिकांना कुक्कुटपालन योजनेचा अर्ज करावयाचा आहे अशा नागरिकांनी योजनेचा अर्ज हा जिल्हा पशुवर्धन कार्यालयामधून घ्यावा व व्यवस्थित रित्या तो अर्ज भरून त्याच्यासोबत नागरिकाच्या सर्व वरील दिल्याप्रमाणे आवश्यक असणाऱ्या मूळ कागदोपत्रांची प्रत व त्याची झेरॉक्स कॉपी अर्धा सोबत जोडावी.
  • नागरिकांनी त्याच्या पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे त्यामध्ये त्याचे ओळखपत्र असेल किंवा आधार कार्ड रेशन कार्ड याही सर्व कागदपत्रांची प्रत अर्जासोबत जोडावी. समजा कोणी नागरिक अनुसूचित जाती जमातीमध्ये मोडत असल्यास त्यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे ही त्याच्यासोबत जोडणे आवश्यक आहे.
Kukut Palan Yojana
कुक्कुट पालन योजना Website ( Kukut Palan Yojana Apply )
  • नागरिकांकडे असणाऱ्या शेत जमिनीचा तपशील अर्जासोबत जोडणे बंद करण्यात आहे त्यामध्ये नागरिकाकडे स्वतःची शेत जमीन असणे बंधनकारक आहे व ती शेतजमी स्वतःच्या मालकीची असावी त्या शेती जमिनीचा सातबारा आठ उतारा अर्ज करताना अर्ज सोबत जोडावा.
  • सर्व अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी तो सर्व अर्जाचा मंच हा ज्या बँका कुकुट पालन योजनेमध्ये सहभागी आहेत अशा बँकांमध्ये जाऊन तो अर्ज सबमिट करायचा आहे त्यानंतर त्यांच्या अर्जाची तपासणी होऊन त्यांना कर्ज हे उपलब्ध करून दिले जाईल.

अशा पद्धतीने नागरिक कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करू शकतात, ज्या त्या भागांमध्ये ही अर्ज करण्याची प्रक्रिया वेगळी असू शकते.

Kukut Palan Yojana निष्कर्ष

महाराष्ट्र शासनाने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तसेच सर्वसामान्य नागरिक शेतकरी यांच्यासाठी ही कुक्कुटपालन योजना राबवली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व नागरिकांना कुक्कुटपालन करायचे आहे. त्यांना बँकांकडून कमी व्याज दरावरती पन्नास हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच त्यांना पशुसंवर्धन विभागाकडून योग्य तो सल्ला दिला जातो याच्यामध्ये मधून नागरिक स्वयंरोजगारीत होऊन इतरांसाठी ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकतात. सरकारने ठरवून दिलेल्या बँकांकडे या कुक्कुट योजनेसाठी कर्ज मिळते.


अधिक वाचा – अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अधिक वाचा – शेळी पालन योजना म्म्हाराष्ट्र शासन


FAQ’s

1). कुक्कुट पालन योजनेसाठी किती कर्ज रक्कम मिळते?

उत्तर- नागरिकांना कुक्कुट पालन योजनेसाठी 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज रक्कम मिळते.

2). कुक्कुट पालन योजनेचे फायदे काय आहेत?

उत्तर – कमी व्याजवर बँकेकडून हे योजनेचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. व कर्ज रक्कम हि 50 हजार ते 10 लाख रुपये एवढी आहे.

3).कुक्कुट पालन करण्यासाठी किती शेतजमीन आवश्यक आहे?

उत्तर – कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 12 ते 13 हजार स्क्वेअर फुट जमीन असणे आवश्यक आहे.

4). कुक्कुट पालन योजनेस पत्र होण्यासाठी नागरिकाचे वय वर्ष किती असावे?

उत्तर – कुक्कुट पालन योजनेस अर्ज करण्यासाठी नागरिकाचे वय हे 18 ते 60 च्या दरम्यान असावे.

5). कुक्कुट पालन व्यवसायातून आपण किती उत्पन्न घेऊ शकतो ?

उत्तर- कुक्कुट पालन व्यवसायातून किमान 50 हजार ते 1 लाख रुपये इतके उत्पन्न घेऊ शकतो.

येथून शेअर करा

1 thought on “असा करा अर्ज, कुक्कुट पालन योजना 2024 | Kukut Palan Yojana Maharashtra”

Leave a Comment