सूर्य उगवला नाही तर या विषयावरती मुद्देसूद असा कल्पनात्मक मराठी निबंध लिहिला आहे. तो निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल व उपयोगात येईल.
सूर्य उगवला नाही तर | Surya Ugavala Nahi Tar
Surya Ugavala Nahi Tar : सूर्य उगवला नाही तर या वाक्यानेच आपल्याला किती भीती वाटते. जर समजा खरोखरच असं झालं आणि सूर्य नाही उगवला तर काय असेल परिस्थिती कसा असेल हे जग कशा असतील ह्या दैनंदिन जीवनात आपण ज्या करतो त्या सर्व गोष्टी. सूर्य नाही उगवला तर अख्खा विश्व हे अंधाऱ्या काळोख्याखाली येईल. आपण जे आज जगत आहे ते केवळ सूर्यप्रकाशामुळे जर सूर्यप्रकाशात नसेल तर पूर्ण सजीव सृष्टीला धोका उत्पन्न होऊ शकतो. कारण प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते. तो सूर्यप्रकाशच नाही मिळाला तर सर्व सजीवांना जगता येणार नाही.
पृथ्वीवरती असणारी वने अभयारण्य किंवा जंगले ही सर्व कोमेजून जातील. तसेच वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी जो उपयुक्त असणारा सूर्यप्रकाश आहे. तो त्यांना न मिळाल्यामुळे संपूर्ण वने व अभयारण्य संपुष्टात येतील. एकदा का वने अभयारण्य संपुष्टात आली की त्या अरण्यामध्ये जगणारे जे ही सजीव जंगली प्राणी असतील. त्यांना अन्न मिळणार नाही त्यामुळेही जंगलातील पशु पक्षांचा मृत्यू होईल.
सूर्याच नाही बोला तर पृथ्वीवर पाऊस देखील पडणार नाही. कारण पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते पाणी आकाशात जाते. त्यानंतर तेथे त्याचे ढगात रूपांतर होते. व त्या ढगांना गार हवा लागल्यानंतर पाऊस पडतो. ही सर्व पाऊस पडण्याची प्रक्रिया बंद पडेल त्यामुळे पाऊसही पडणार नाही. व सूर्यप्रकाशही नसल्यामुळे सगळीकडे काळोख असेल. लहान जीव जंतूंपासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत सर्वांना सूर्यप्रकाशाची नितांत गरज असते. जिवंत राहण्यासाठी सूर्यप्रकाश हा लागतोच लागतो. सूर्याच नाही उगवला तर आत्ताचे जे सुरू असणारे वर्तमान सर्व जग आहे ते ठप्प होईल. कोणत्याही पद्धतीचे काम व क्रिया होणार नाहीत.
माणसांना कामावरती जाता येणार नाही. तसेच सूर्यप्रकाश न पडल्यामुळे सर्व कामे बंद राहतील. व प्रकाश तयार करण्यासाठी आपण जी वीज वापरतो. ती वीजही आपल्याला मिळणार नाही. कारण ती वीज ही कोळशापासून तयार होते. व कोळसा खाणीतून काढण्यासाठी कामगारांची गरज असते. जर समजा सूर्य उगवला नाही तर हे कामगार कामावर नाही जाणार त्यामुळे कोळसा निघणार नाही व आपल्याला वीज मिळणार नाही. आहे तो साठवणीतील कोळसा किती दिवस पुरणार त्यामुळे आपल्याला विजेपासून सुद्धा प्रकाश मिळणार नाही.
शेतकरी बांधवांना धान्य पिकवता येणार नाही. कारण पिकांच्या वाढीसाठी व तसेच पिकांमध्ये दाणे भरण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. तो सूर्यप्रकाशच नाही पडला तर पिकांना पिके येणार नाहीत. तसेच वीज नसल्यामुळे पिकांना पाणी देता येणार नाही. व पाऊसही पडणार नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याचेही भरपूर प्रमाणात दुर्भिक्षता आपल्या सर्वांना जाणवेल. केवळ सूर्याचं न उगवल्यामुळे जगावरती जिवंत राहण्याचे फार मोठे संकट उभा राहील.
या संकटावर ती कोणत्याही प्रकारे मात करता येत नाही.कारण सूर्याभोवतीच संपूर्ण आकाशगंगा व इतर पृथ्वीसारखे ग्रह अवलंबून आहेत. पृथ्वी सोडून इतर ग्रहांवरती पृथ्वी सारखे वातावरण नाही. व तसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे सजीव सृष्टी पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर ती अस्तित्वात नाही. त्यामुळे सूर्यप्रकाश व सूर्य उगवणे खूप गरजेचे आहे तो. जर नाही उगवला तर पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टी संपुष्टात येईल.
प्रकृतीने बनवलेल्या या सूर्याला अनन्यसाधारण आपल्या सौरमालेमध्ये व आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे.मोठमोठ्या शहरांमध्ये जे लोक राहतात त्यांचेही जीवन सर्वात अगोदर अस्तव्यस्त होईल. कोणालाच कामावरती जाता येणार नाही तसेच विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होतील. कोणत्याच कामे व्यवस्थित रित्या पूर्ण करता येणार नाही. तसेच सूर्य न उगवल्यामुळे जे आपल्याला सौर ऊर्जा च्या माध्यमातून वीज मिळते तीही आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे विजेचा तुटवडा हा भरपूर प्रमाणामध्ये वाढेल.
वीज न मिळाल्यामुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतील. त्यामुळे लोकांच्या हाताला कोणत्याही प्रकारचे काम राहणार नाही. व त्यांचे कुटुंब उपाशी राहील. म्हणजे केवळ फक्त सूर्यच उगवला नाही तर आपण काहीही करू शकणार नाही कारण खूप काही समस्या आपल्या समस्त मानव जाती पुढे उभा असतील.आज पृथ्वीवरील सूक्ष्मजीवांपासून ते मोठ्या जीवा पर्यंत पृथ्वीवरील जीवंत आहे. तो फक्त केवळ सूर्यप्रकाश असल्यामुळे आज आपण काही एवढं सुंदर जीवन जगत आहे. तेही केवळ सूर्यप्रकाशामुळे जगतो आहे. हा प्रकाशात नष्ट झाला तर उत्पन्न होणाऱ्या समस्या व जीवसृष्टीला होणारा धोका आपल्या सर्वांच्या लक्षात येऊ शकतो परंतु आपण कधी हा विचारच करत नाही.
तर असे हे चित्र आपल्या काही सर्व पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे असेल. आपण कल्पनाही करू शकणार नाही. अशा प्रकारचा हाहाकार या पृथ्वीवरची उडेल. त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यायला हवे की सूर्याचं आपल्या जीवनात किती अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे सूर्य उगवला नाही तर हे आपल्या जीवनावरती प्रश्नचिन्ह निर्माण करते.
- भारतीय अनुभौतिक शास्त्रज्ञ | Dr pk iyengar information in marathi
- परम संगणकाचे निर्माते डॉ. विजय भटकर | Dr Vijay Bhatkar Information In Marathi
- होम लोन कसे मिळवावे? प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे | home loan information in marathi
- डॉ. होमी जहांगीर भाभा मराठी माहिती | Dr Homi Bhabha Information in marathi
- डॉ. कल्पना चावला मराठी माहिती | kalpana chawla information in marathi