अप्रतिम मराठी प्रेम कविता | Marathi Kavita On Love 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi Kavita On Love : मराठी मातीतील प्रेम युगुलांसाठी आम्ही आज या ब्लॉग मध्ये 50+ Marathi Prem Kavita / Marathi Kavita On Love हे अप्रतिम असा प्रेमावरती आधारित कवितांच गाठोड तुम्हाला अर्पण करणार आहोत. ते तुम्हा मराठी साहित्य प्रेमीना नक्कीच आवडेलहि आशा व्यक्त करतो.


मराठी प्रेम कविता | Marathi Kavita On Love


हळूहळू कळी जशी उमलत जाते,

तसेच काहीसे असते खुलणारे नाते,

उलघडणाऱ्या सुंदर नाजूक पाकळ्या,

बोलू लागतील थेट मन मोकळ्या…!

दरवळेल प्रीत खुलण्यास वेळ द्यावा

ओढ लावेल प्रेमगंध साठवून घ्यावा

सुवास विश्वासाचा गहिरा होत जातो

कळीला फुलाचा सुरेख आकार येतो

वाऱ्यावरती डुले रंगीत जीवन होई

स्वप्नवत सारे वर सुखाची निळाई

Marathi Kavita On Love
Marathi Kavita On Love


शतजन्मीची ओळख ऐसा भास आहे

त्याच्या सोबतीचा प्रत्येकक्षण खास आहे

उगा का कोणात कोणी एकजीव होते

खमंग होई नात्यात प्रित मिळूनी येते

बोलण्या वागण्यात दोघा बंध वगैरे

कैसा अश्या समाधानापुढे फोल होतो पैसा

अनोख्या मैत्रिची खरी व्याख्या कळते

भटक्या जीवाला हक्काची सोबत मिळते

हसणे रडणे चिडणे परीक्षेत सारे होते

कडाक्याचे उन्ह कधी थंड झुळूक येते

लग्नगाठ साधना अन प्रेम अभ्यास आहे

शतजन्मीची ओळख ऐसा भास आहे


अग तसे सखे कवितेशी माझे वैर नाही

शब्दांच्या प्रेमात पडता काही खैर नाही

मन हळवे होत जाते माणूस विचारी होतो

कल्पना शिजत जाती आपण आचारी होतो

कवितेची तलब येता कुठेतरी लिहू पाहातो,

तहानलेला माणूस जसा पाणी पिऊ पाहातो

कविता अन कवीचे जगच वेगळे असते

गुदगुल्या इथे कवीला तिथे कविता हसते

शब्दांची नशा करण्यात काही गैर नाही

अग तसे सखे कवितेशी माझे वैर नाही


शांत होते मन सुखाने मोहरून जाते

तुझ्यासवे असणेच किती गारवा देते

सातीजन्म तूच हवा माझे ठरले आहे

मनोमन मी तुला कधीच वरले आहे

जादूगरी तुझी मी लहान होऊन जाते

तू थंडगार पाणी मी तहान होऊन जाते

इतके कसे देखणे कोणी गोड हसताना

रमून जाते सत्य आज स्वप्न भासताना

मिठीची मफलर प्रेमाची शाल होते

तुझ्यासवे असणेच किती गारवा देते


शब्द सुचत जाती असेच कारण आहे

साथजन्म हे हृदय तुजपाशी तारण आहे

हो आहे वेडी मी माझे प्रेम वेडे आहे

तुजसाठी लिहावे ना तितके थोडे आहे

रागावर हक्क माझा प्रेमही माझे आहे

मनातूनी कागदावर इतके ताजे आहे

डोळ्यांना चिंब करी प्रेमाचे धोरण आहे,

साथजन्म हे हृदय तुजपाशी तारण आहे

Marathi Kavita On Love


Marathi Kavita On Love


तसे तुझ्याकडे काही मागावे लागत नाही

तू असाच हसत रहा मी और मागत नाही

खोल खळीच्या डोहात मनसोक्त भिजते

रोज नव्याने नकळत मनात प्रेम रुजते

बोलके तुझे डोळे सारे सांगून जातात,

मला दूर विचारांच्या पल्ल्याआड नेतात

तिथे रेशमी स्वप्नांची गुंफण करत जाते,

बघता बघता त्याची सुरेख नक्षी होते

कसले कमाल असते असे उलघडत जाणे,

शब्दात सूर मिळे अन बहरे जीवन गाणे

वेळ कमी पडतो भेटीत मन भागत नाही,

तू असाच हसत रहा मी और मागत नाही


मला मोहराया सांगा कारण हवे कशाला?

त्याच्यासारखा वसंत आता आहे चहूदिशेला

मलाच मी आताशा आणिक खुलून दिसते

एकटीच गुणगुणते अन एकट्यात हसते

अहा ! गारगार ही वेडी प्रीत झुळूक आहे

पिसासारखे मन त्यावर हलके होऊन वाहे

ओळखू लागले शब्द नी प्रेमाच्या भाषेला

त्याच्यासारखा वसंत आता आहे चहूदिशेला


इथे मोकळे आभाळ प्रेमाचा गारवा वसतो,

मांगल्याची किरणे येती चांदणीसवे चंद्रही हसतो

श्वेत सुमन माळता नाथ तुमची पत्नी खुलून येते,

शिव भाळता शक्तीवर सतीची पार्वती होते

वात्सल्याचे स्वर्गसुख हे माता म्हणती शिवगण,

मातृत्वाचे अमृत दिधले गणेश कार्तिक सारेजण

स्वामी तुमच्या कवेत आता माझे सारे विश्व व्यापले,

कैलासा सम सुख कुठे इतके देखणे घर आपुले


चहूकडे मधुर धून बासरी ऐकू येते,

मन मोरपीस होई गोकुळा घेऊन जाते

फुलासम दरवळणारा गंध प्रेम आहे,

जागोजागी भासे मनमोहन शाम आहे

डोळ्यांची घागर भरे त्याला पाहताना,

पाश हवेसे मजला नजर कैद राहताना

गुंजती बोल त्याचे नभी निळाई दाटे,

स्नान करी यमुनेत तिचाही हेवा वाटे

कृष्ण प्रेम ऐसे नटखट खोड्या काढी,

मोहून टाकतो कान्हा लावे लाडी गोडी

सावळ्यात रंगून सखये मी सावळी होते,

चहूकडे मधुर धून बासरी ऐकू येते

Marathi Kavita On Love

कैक आठवांना वेचीत मग जावे,

मनाच्या पदराखाली जपूनी ठेवावे

हिरमुसल्या हृदया फुंकर मारावी,

कोवळ्या भावनांची मशागत करावी

आनंद ओलावा डोळ्यातून येईल,

हास्य ओठी मन सुखावून जाईल

आंबट गोड तिखट सारे क्षण येतील,

उन्हाचा तडाखा कधी हिवाळा देतील

अश्या प्रवासातले पाखरू मग व्हावे,

कैक आठवांना वेचीत मग जावे


प्रीत तळे साचत होते

प्रत्येक क्षण वेचत होते

आवडीचे गीत तू माझे

धुंद होऊनी नाचत होते

स्पंदने सारी साथ देई

अधीर भावना निनाद होई

छुम छुम वाजे हृदय माझे

मन सुखाची गिरकी घेई

Marathi Kavita On Love


तू आलीस ते बरे झाले

जणू स्वप्न खरे झाले

हात धरलास माझा

या कोळशाचे हिरे झाले

आता उठून दिसतो

बघ मनापासून हसतो

बघ काय जादू केलीस

असा मी आनंदी असतो बघ

जैजुरीला न्यायाचे आहे

तुला उचलून घ्यायचे आहे

आणि काय हवे मला

आजन्म प्रेम द्यायचे आहे


नकळत एखादा कैसा सुगंध देऊन जातो

मंद मंद दरवळे माणूस पारिजात होतो

मोहक त्या प्रवासातले क्षण वेचून घ्यावे

अत्तराच्या कुपीत अलगद जपून ते ठेवावे

गंधाळून सोबतीने भिजणे खूप सुंदर असते

अशा सुवासिक फुलांचे मन मंदिर असते

Marathi Kavita On Love
Marathi Kavita On Love


Marathi Prem Kavita


मन

मनाला दुःख होता

डोळ्यांना त्रास भारी

कोण सांगेल भाबड्या

जगाची रीत न्यारी

अन वेड्याला त्यात

व्यवहार जमत नाही

मृगजळी हट्ट करे

सत्यात रमत नाही

मग ओरडावे लागते

तेव्हा ते शांत होते

दिवसाच्या स्वप्नातून

खडबडून जाग येते


वरवरली ही भूक नाही

लिखाणा सारखे सुख नाही

शब्दालंकारे नटतो कागद

ऐसे देखणे रूप नाही

भावनांना पाझर फुटतो

कल्पनेचा खजिना लुटतो

मनकवडा असतो लेखक

कवितेचे जग थाटतो

कित्येक मने मोहून जाती

कित्येक डोळे भरून येती

टाळ्यांच्या गजरात

आणिक सुंदरतेची दाद देती

Marathi Kavita On Love


गालावरी ओघळले थेंब पावसाचे

शहारुनी गेले हळुवार मन माझे

चिंबचिंब केस अन् लट सावरताना

साडीचा भिजलेला पदर आवरताना

पळत गेले त्याच्या मिठीच्या आडोश्याला

उधाण आले मग वेड्या पावसाला

पांघरूण घ्यावे ऐसे ऊबदार वाटले

भानावरी येता त्याला हलकेच लोटले

नजर चोरली अन् हळूच हसले गाली

आज प्रेमाची भलतीच सर आली


“ती झोपेत हसते”

तो म्हणतो

हिरव्या कंच नऊवारीत सुंदर सजले होते

सनई चौघडे दारी मनी काहुर माजले होते

अक्षदांच्या सरित सप्तरंगी भिजले होते

हाती हात दोघांचे कोवळे बंध रुजले होते

गाली हळूवार हसता दचकून जाग आली

खांद्यावर डोके त्याच्या मी गाढ निजले होते


ती – असं का बघतोस माझ्याकडे ?

तो –

रेशमात गुंतणे माझे

तुझ्या लटांशी खेळताना

गंधाळतो जीव आणिक

चाफ्याचे फुल माळताना

नव्याने प्रेमात पडतो

रोज तुझ्यावर भाळताना

सुखाचा अर्थ कळतो

असे तुला निहाळताना


चातका सारखी वाट पाही तुला स्मरताना

तू येण्याचा सोहळा मनी साजरा करताना

स्वप्नांच्या अंगणी किती स्वप्न सजलेली

बाळाची चाहूल आपल्या पालवी रुजलेली

ठोके चुकले काळजाचे काय भयंकर झाले

निष्प्राण माझ्या भावनांचे सारे रंग उडाले

एकटीला टाकून कायमचा दूर गेलास

कर्तव्याच्या परीक्षेत थोर हुतात्मा झालास

मोडकळले घर आता कशी सावरू मी?

तुझ्या शिवाय संसार कशी आवरू मी?

निष्पाप त्या बाळाला कसे सामोरे जाऊ?

हिरावलेला बाबा आता कसा आणून देऊ?

डोळे उघड उत्तर द्यावच लागेल तुला

परत ये ना राजा हवा आहेस रे मला

Marathi Kavita On Love
Marathi Kavita On Love


सारे कसे फिके फिके धुके पसरले

विरून गेले धागे अन् नाती विसरले

आत्या नजर चोरे हाक देत नाही

मोठे काका हक्काने धाक देत नाही

पैश्याचे नात्यांपुढे इतके मोल असते?

वाफ होई भावनांची इतके खोल असते?

हतबल आम्ही मोठ्यांपुढे सारे घडताना

आपल्याच घराचे असे तुकडे पडताना

कळते झालो आता हिच चूक झाली

विचारात आज भावंडे भावुक झाली


तुझे केस चिंब भिजलेले

शिंपड माझ्या गालावरती

मन मोहून जाते सखये

रेंगाळतो अवती भवती

तन मंद मंद दरवळे

उटण्याचा सुगंध येतो

नको नको म्हणताना

मी घट्ट मिठीत घेतो

तुझ्या मानेवरचा तीळ

भलताच खुणावतो

बांगड्यांचा खणखणाट

प्रेमाचा निनाद होतो

ओठांची जुगलबंदी

श्वासांची आणीबाणी

लाजून म्हणतेस मग

” सोडा, पाहिल ना कुणी “

Marathi Kavita On Love


तुझ्याकडे वेळ मागणे स्वार्थ आहे का?

तुझे वरवरचे टाळणे सार्थ आहे का?

माझ्याही मनाची बघ घालमेल होते

प्रेमाची वीण मग अलगद सैल होते

नकळत आपला माणूस दूर होत जातो

भावना साचे मनी अन् भरती पूर येतो

तू प्रेमाने बोलावे इतकीच अपेक्षा असते

तुझे दोन शब्द जग आनंदी भासते

तुझ्या सोबतीची भूक कशी भागवू मी ?

जीव आहे ना तुझ्यावर कशी रागवू मी?

वाट पाही मन वेडे दुखावले जाते

क्षणोक्षणी तुझे भास तुझी आठवण येते


तुझ्या मिठीत दरवळून गेलो

गंधाळलेला मोगरा झालो

लाजऱ्या सरींचा स्पर्श खुळा

नजर डोहात खोल बुडालो

रेशमाची हुळहुळ सावरताना

तुझ्या बटिंना आवरताना

हळुवार फुंकर घालत होतो

गुलाबी हवेत वावरताना

वाराही भलताच छेडत होता

हृदयाचा ठोका वाढत होता

श्वासात श्वासांची गुंफण ऐसी

ओठांचा किनारा जोडत होता

पापण्यांनी लाजून होकार दिला

उंच झुले स्पंदनांचा झुला

उबदार प्रेम ओसांडताना

प्रीतीला अबोल बहर आला


डोळे बंद करता पैजणांचा निनाद घुमतो

आसवे हसती गाली आठवात मी रमतो

येऊनी मिठीत घ्यावे मज सारखे वाटते

व्याकुळ होतो सखये मनी आभाळ दाटते

असे मेघ दाटता वृंदावनी बरसात होते

भावनांचा स्पर्श ओला तुला भिजवून जाते

रडू नको तू राधे हा कृष्ण तुझाच आहे

विरह रस प्रीतीचा राधे दुजाच आहे

Marathi Kavita On Love


बासरीच्या सुरात अलगद लाजणेही सुंदर होते

मनी केशव वसले की मनाचेही मंदिर होते

माधवाचे रूप निराळे सागरासम गहिरे डोळे

हलके कुरळे केस काळे स्मरता तयास

ओठी नीलकमल खुलून येते बासरीच्या सुरात

अलगद लाजणेही सुंदर होते मनी

केशव वसले की मनाचेही मंदिर होते

हात पकडूनी मज चेडतो वाट रोखतो

खोड काढतो घागर फोडे फार द्वाड तो

यशोधेस सावळ्याची गोड तक्रार जाते

बासरीच्या सुरात अलगद लाजणेही सुंदर होते

मनी केशव वसले की मनाचेही मंदिर होते

बाळ होऊनी जवळी येतो लाडे लाडे मिठीत घेतो

अन् मांडीवर झोपी जातो लाघवी रूप मनोहर प्रेम निळाई दाटे

बासरीच्या सुरात अलगद लाजणेही सुंदर होते

मनी केशव वसले की मनाचेही मंदिर होते


थांब राधे पळतेस कुठे

रंगात रंगून जाऊ

बासरीच्या सुरात धुंद

दोघे दंगून जाऊ

यमुनाही बोलावी

आज चिंबचिंब न्हाऊ

हातात हात फेर धरू

आनंदी नाचू गाऊ

नजर चोरूनी अशी

सखये दूर नको

राहू तुझ्या गाली

माझी निळाई चढताना पाहू

थांब राधे पळतेस कुठे

रंगात रंगून जाऊ

बासरीच्या सुरात धुंद

दोघे दंगून जाऊ


असा कसा कृष्ण माझा दूर निघून गेला ?

इंद्रधनू बेरंगी अन् वारा अबोल झाला

बासरीच्या आठवात कशी रे रमून राहू ?

परत येशील ना ? किती काळ वाट पाहू ?

यमुनेच्या तीरी मज तुझाच भास होतो

डोळ्यातून अश्रू दबक्या पावलांनी येतो

विचारांचे झोके घेत हल्ली शून्यात असते

मोरपीस काटेरी हृदयी कवटाळून बसते

कर्तव्याच्या पारड्यात कान्हा प्रेम झुकून गेले

मथुरेस बहर आला रे वृंदावन सुकून गेले


अत्तराच्या कुपीत ती फुलराणी नाहुन गेली

खबर पसरली प्रेमाची बागेत चर्चा झाली

पंख मखमली त्याचे नयन मोहक ज्योती

चहूकडे नजर त्याची तिलाच शोधत होती

पाहताच तिला तो अलगद हसला गाली

तिनेही पाहिले दुरुन नजरा नजर झाली

मग भरारी घेऊन तो तिजपाशी आला

हात धरला तिचा ‘ मी आलो ग’ म्हणाला

लाजून पाकळी मिटून मिठीत त्याच्या आली

अत्तराच्या कुपीत ती फुलराणी नाहुन गेली.

Marathi Kavita On Love
Marathi Kavita On Love


सारेकाही विसरून जावे कामात रमून गेले

एकटे राहणे हळुहळू मलाही जमून गेले

आसवांसवे झोपेला मी कवटाळून घेते

आईसारखी तीही मजला कुशीत घेते

विचारांची वादळे गरगर फिरत राही

आजकाल स्वप्ने सुद्धा मुक्काम करत नाही

कोणास काय सांगावे म्हणून हसत असते

जबाबदारी मोठेपण आता जवळून दिसते


रंगीत स्वप्ने येती सखये रात्र जागताना

आठवांच्या तरंगात मी तुला पाहताना

काळोख्या विचारात मग टिपूर चांदणे

दिसते तुझी बडबड आभासी

मन हे वेडे हसते भान विसरतो

एकटक मी तुला स्मरताना

रंगीत स्वप्ने येती सखये रात्र जागताना

आठवांच्या तरंगात मी तुला पाहताना

तुझे बोलके डोळे एकटक वाचत बसतो

पुन्हा पुन्हा गुंततो पुन्हा पुन्हा मी फसतो

काजव्यांचे जग भासे तुजसवे वाहताना

रंगीत स्वप्ने येती सखये रात्र जागताना

आठवांच्या तरंगात मी तुला पाहताना

हलके हलके थंड वारा तुझीच चाहूल देतो

तुझ्यासारखा छेडत कानी फुंकर घालून जातो

झोपी जातो देवाकडे तुला मागताना

रंगीत स्वप्ने येती सखये रात्र जागताना

आठवांच्या तरंगात मी तुला पाहताना


अल्लड मी वाऱ्यासवे चारी दिशांना वाहुदे

लाटांवरले तरंग वेचीत स्वप्न सागरी जाऊदे

दिसेल किनारा मजला हक्काची कुस देईल

प्रत्येक पाऊल माझे मज तळहाती घेईल

निजेन मिठीत त्याच्या चांदण्या मोजित

मग दाटून येईल गारवा आभाळी धुक्याचे ढग

हवेहवेसे बेट वाटे पाऊले रोवून घेई

भरधाव नाव आता किनाऱ्यापाशी शांत होई

Marathi Kavita On Love


संसार रुक्मिणीचा अन् मी सखी झाले

भक्ती पर प्रेम माझे चरणी अर्पण केले

पूर्वी सारखी आता तो फिरकी घेत नाही

रास नाही आता मी गिरकी घेत नाही

दहीपोह्याचा काला अजूनही तो खातो

आठवात माझ्या दाद रुक्मिणीस देतो

तो आनंदी आहे अशी आशा मी करते

स्मरणात रोज त्याच्या अजूनही घागर भरते


एक दिवस अचानक भेट तयांची होते

नकळत अलगत हळूहळू मन गुंतते जोडले जाते

खळखळणारे हास्य तिचे तो स्मित हास्य करतो

अवखळ अल्लड ती तो हात तिचा धरतो

न थांबणारी बडबड तिची तो आवडीने ऐकून घेतो

लाडेलाडे कधी रागे थोडे तो साथ तिची देतो

प्रेम कळू लागते साताजन्माची मैत्री होते

श्रीं ची इच्छा स्वर्गामध्ये रेशीमगाठ जोडली जाते


प्राजक्ताचा सडा आता कुठेच दिसत नाही

वाऱ्याची झुळूक आता मोरपीस भासत नाही

एकटीच विचारात मी हल्ली हसत नाही

गोड भास विरला मृगजळी फसत नाही

अचानक का व्हावे ? कविताही सुचत नाही

दिवसाचे चांदणे लुप्त हे ही खासच, नाही ?

तुला कोणा सोबत पाहून मन का त्रासत नाही ?

प्राजक्ताचा सडा आता कुठेच दिसत नाही.


नको फुंकरीचे लेप काळजाचा घाव आहे

आजारा औषध नाही प्रेम त्याचे नाव आहे

लावूनी पाहिला मी हास्याचा पाचोळा दुखणे

विसरण्या मन रमविले कित्येकवेळा

मलम नाही त्याला मी शोधाशोध केली

अशी विचारात माझी कित्येक वर्षे गेली

आजकाल मनाला कवडीजोगा भाव आहे

नको फुंकरीचे लेप काळजाचा घाव आहे


भावनांचा कल्लोळ सारा

आसवांच्या सरींचा मारा

अंगी पेटून उठे शहारा

माणूस गमवण्याची भिती

विचारांच्या त्सुनामी लाटा

नेई दूर दुःखाच्या बेटा

काळोखाच्या कित्येक छटा

माणूस गमवण्याची भिती

अबोल धुके चौफेर पसरे

बोलणे टाळे हास्य विसरे

सुचेनासे काही दुसरे

माणूस गमवण्याची भिती

Marathi Kavita On Love
Marathi Kavita On Love


प्रेममय मराठी कविता Marathi Kavita On Love


फ्लिपकार्ट वरून नवरा मी ऑर्डर करते

आई शोधाशोध नको आता कसलीच चिंता नाही

अगदी गुणी शोधते ना सिगारेट ना दारू

तस काही असल्यास आठवड्यात रिटर्न करू

तुमच्यासारखे प्रेमळ सासू सासरे पाहू

कार्टमध्ये टाकते मग लगेच मागवून घेऊ

अॅमेझॉनवर पाहते जाऊबाई आणि दीर

रिव्यू पाहून घेऊ नंतर नको किरकिर

झालं आता ठरलं ऑफर सुद्धा आहे

ऑर्डर तर करून पाहू माझा हाच मुद्दा आहे


लग्न बोलणी वगैरे कुठली अतिशहाणे होते

चालून दाखव हसून दाखव विचित्र पाहाणे होते

किती द्याल किती घ्याल मुलगा विकत होते

पोकळ मोठ्या बाता बडेजाव फुकट होते

राग येण्या भाग पाडेल असे बोलणे होते

कोण श्रीमंत कोण गरीब नुसते तोलणे होते

मग काय माझे चिडणे रक्त उसळणे होते

ठसकेदार शाब्दिक पोहे विचार विसळणे होते

असा ठसका दिला की अवाक झाले होते

नजर काय मिळवतील ते होरपळून गेले होते

मग सारवासारव खोटी नुसते बहाणे होते

लग्न बोलणी वगैरे कुठली अतिशहाणे होते


रंभा उर्वशी फिक्या साऱ्या

रेखीव ललना सुंदरीच

तू मोहिनी जैसे रूप तुझे

अप्सरा माझी परीच तू

नजर तुझी घायाळ करी

बोलके बदामी हासरे डोळे

ओठांवरला नाजूक तीळ

जो पाही तो पुरता भाळे

मधाळ मधुर भाष्य तुझे

लाल ओठ गुलाब जणू तरतरीत

नाक चाफेकळी नाजूक

बांधा मखमली तनु

सालस सोज्वळ रूप देखणे

मोह डोह तू दरीच तू मोहिनी

जैसे रूप तुझे अप्सरा

माझी परीच तू


तो म्हणतो

मी बोलेन बाबांशी समजावू समजून घेऊ

येईल लक्षात त्यांच्या थोडासा वेळ देऊ

अशीच कशी ते मुलगी कोणाच्या हाती देतील

ओरडतील रागावतील परीक्षा सुद्धा घेतील

कठीण असेल पेपर पण पास होता येईल

प्रयत्न दोघांचे असतील तर नशीब साथ देईल

स्वप्नवत असेल बघ आपल्या प्रेमाची गाथा

अग सोडून दे विचार थोडे हस पाहू आता


त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नकोस

सोडेल तो इतका घट्ट हात धरू नकोस

होईल सवय हळूहळू तुझ्या असण्याची

तुझ्या बडबडीची खळखळून हसण्याची

जबाबदारी सोबत त्याला सारकाही जमेल

तुझ्या माणसात सुद्धा तो नकळत रमेल

ऑफिस नंतर रोज पाऊल घराकडे वळेल

लादू नकोस काहीच त्याला त्याच कळेल

त्याची माणस त्याच्यापासून तोडू नकोस

कलहाचे विषय टाळ वाद छेडू नकोस

नवरा होणे सोपे नाही त्याला थोडा वेळ दे

मैत्रीण हो त्याची कलेकलेने समजून घे.


लाख म्हणतील ऐसे की प्रेम गुन्हा आहे

अनेकांचे अनेक सल्ले हा वाद जुना आहे

कुणा नशिबी विरह कुणा प्रतीक्षा आहे

कुणासाठी परमसुख कुणास शिक्षा आहे

प्रत्येक कहाणी येथे प्रेमाची व्याख्या देते

कुणी राधा कुणी मीरा कुणाची सीता होते

खरी अनुभूती प्रेमाची प्रेम करूनच मिळते

हे प्रेम काय आहे प्रेमात पडूनच कळते.


तसे तुला आधीच नाही म्हंटले असते

हे ते कारण अगदी काही म्हंटले असते

बघ मी सहजा सहजी लाजत नाही

रोज कोणासाठी इतकी सजत नाही

पण तुला पाहिले अन् चक्क भाळले मी

नकळत होकाराचे मग फुल माळले मी

न थांबणारी तुझी बडबड चालू होती

घरात गोंगाट नुसती गडबड चालू होती

तुझे गोड बोलणे मी ऐकतच बसले

वाटले आता साता जन्मासाठी फसले

आपले विचारही किती जुळून येत होते

प्रश्न पडण्याआधी घरचे उत्तर देत होते

वेळे सोबत हळुहळू तू उमजत गेलास

मित्र म्हणून मग मला समजत गेलास

बहर आणणारा तू सुंदर वसंत आहेस

आज उत्तर देते तू मला पसंत आहेस

Marathi Kavita On Love
Marathi Kavita On Love


मन माझे

ते मोरपीस भासावे इतके नाजूक होते

मोठाली लाट कधी तरंग होऊन जाते

ते रात्रीची शांतता जणू भावनाहीन सारे

कधी उष्णता उच्चांक कधी गोठ्णारे वार

ते लाजाळू सारखे अलगद पाने मिटते

अथांग सागर होते किती काय साठते

ते निरागस हट्टी मूल कधी ऐकेनासे होते

बाप होऊनी कधी जगण्याचे सल्ले देते


इवले ते जीवन, त्यात डोईला भार

आयु सरता अशीच, कसा होई कारभार ?

क्षण क्षण जगूया, मग मन ही हसेल जग वेगळे होईल

बघ सुंदर भासेल जगू आजचा दिवस,

अती विचार आजार इवले ते जीवन,

त्यात डोईला भार आयु…..

हास्य वाटता येईल, तर वाटू थोडे थोडे किती

अफाट दुनिया, कमी पडतील जोडे वाटाड्या अनुभव,

थोडे लाड थोडे मार इवले ते जीवन,

त्यात डोईला भार आयु….

आता तयारीत राहू, देऊ उत्तरही खास नशिबाची परीक्षा,

थोडे सुख थोडे भास येरझारा घालती,

दंगा विचारांचा फार इवले ते जीवन,

त्यात डोईला भार आयु…..


उगा आता माझी परीक्षा नको पाहू

बोल ना काहीतरी शांत नको राहू

नाकावरच्या रागाच कराव तरी काय ?

तु रागावता लटपटे माझे हातपाय

मग अश्या शांततेची धडकीच भरते

चैन पडत नाही वेळ हळूहळू सरते

तुला ठाऊक आहे मला सुचत नाही

तुझा असा अबोला मला रुचत नाही

हसताना किती गोड गोड दिसतोस

लाल लाल गोंडस सफरचंद वाटतोस

ऐक ना असं रागवत नको जाऊ

बोल ना काहीतरी शांत नको राहू.

Marathi Kavita On Love


अशा या नात्याला नाव तरी काय द्यावे ?

मी शांत होता तुज डोळ्यातले समजावे

चांगलेच जमते तुजला सारे वदवून घेणे

मन शांत करणे माझे मला पटवून देणे

अबोल भावनांना माझ्या अलगद वाचा फुटते

कवटाळूनी तुजला मी निश्चिंत डोळे मिटते

नकळत मन माझे तुला सारा हक्क देते

दरवेळी कसे ते तुजपाशीच मोकळे होते

असे कसे एखाद्याने एखाद्याला ओळखावे

अशा या नात्याला नाव तरी काय द्यावे ?


तुझे परत येणे किती खास होते

ते सारे खरे की मनीचे भास होते

अशी स्तब्ध झाले मज काही कळेना

शून्यात रात सरता दिवस मावळे ना

उत्तरू काय तुजला विषय टाळले मी

कठीण धडे मनीचे हळूवार चाळले मी

अशी विचित्र द्विधा हि मनाची स्थिती

असे कसे हे प्रेम अन् प्रेमाची भीती

Marathi Kavita On Love
Marathi Kavita On Love


तो आजन्म साथ देणारा हवा

अभिमानाने हाती हात घेणारा हवा

पहिला पाऊस अथांग सागर

सारी जादुगरी कळणारा हवा

एखाद वेळी रागे भरेल कदाचित

पण जाणीवेने कळवळणारा हवा

कित्येक तारका चमचमती आकाशी

तरी माझ्यावर भाळणारा हवा


अक्षदांच्या सरीत नाहलो

तू माझी मी तुझा जाहलो

प्रवास सुरू झाला

आणिक सोबतीने संसारात वाहलो

चाचपडलो धडपडलो

आपण हसलो रडलो भिडलो

आपण चिमुकल्या बाहुल्या घरी

आल्या शिकलो नव्याने घडलो आपण

किती प्रसंग असेही आले

भांडलो रुसलो संव्वाद झाले

किती अनपेक्षित वळणे होती

मिळूनी रस्ते सोपे केले

पंचवीस वर्षे भुरकन सरली

डोळ्यांची घागर तुडुंब भरली

आंबट गोड मुरंबा आपुला

चव वाढली नाती मुरली.


काय वेडी ही ओढ मजपाशी उत्तर नाही

तुझ्या सुगंधा सारखे बघ दुसरे अत्तर नाही

बसsss एक मिठी तुझी जग सारे विसरून जातो

तुझ्यासवे असलो की तो दिवस देखणा होतो

हिरमुसलेल्या जगात माझे हास्य बनून आलीस

कोऱ्या चहात माझ्या मधाळ साखर झालीस

जपून ठेवलय तुला मनाच्या कुपीत आहेस

पहिले अन् अखेरचे माझे गोड गुपित आहेस


आठव त्या पहाटे मी गार निजलेलो

तू झटकले केस मी चिंब भिजलेलो

कळे ना पावसाची ही रिमझिम कैसी

शहारा अंगावर आली झुळूक ऐसी

मी डोळे उघडता तू उभी पाठमोरी

नजर स्थिर झाली अशी जादूगरी

एकटक मी तुला पाहत बसलो

मनी गुदगुल्या गाली हळुवार हसलो

सरसावूनी पुढे तुजपाशी आलो

मिठीत दोघे दंग नाहून गेलो

बस्ssss लवकर ये मन लागतं नाही

बघ मी बाकी काही मागतं नाही

तुजविण ही पहाट कंटाळवाणी

तू माहेरी जाणं ही शिक्षा जीवघेणी

Marathi Kavita On Love

Marathi Kavita On Love
Marathi Kavita On Love


असे काही नाही की तो आवडत नाही

असे काही नाही की मी भाव खात नाही

असे काही नाही की त्याविना जेवण जात नाही

असे काही नाही की त्याला लपून पाहात नाही

असे काही नाही की मला रितभात नाही

असे काही नाही की माझे मन वाहात नाही

असे काही नाही की तो आवडत नाही


हे हि तुम्हला आवडेल – मराठी साहित्य


आमच्या या नविन व प्रेममय करुन टाकणाऱ्या Marathi Kavita On Love कश्या वाटल्या. आशा करतो की त्या नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील.

येथून शेअर करा

1 thought on “अप्रतिम मराठी प्रेम कविता | Marathi Kavita On Love 2024”

Leave a Comment