Marathi Kavita: स्वताच्या लेखनातून उतरविलेल्या काही मराठी कविता मी ठिकाणी मांडल्या आहेत. जीवन जगत असताना. जे भावल तेचं भाव लिहिण्याचा प्रयत्न्न तुम्हाला वाचण्यास नकीच आवडेल.
आई
घरापासून दूर राहता राहता,
तक्रारी सुद्धा खुंटीला टांगतो,
आई विचारते फोनवर तेव्हा,
मी तिला सगळ ठीक सांगतो !
नाही सांगता येत तिला,
सार दुःख मनात झाकून ठेवतो,
आई सोबत बडबड करणारा,
आता शब्द सुद्धा राखून बोलतो !
कधी कधी येतात डोळे भरुन,
एकट्यात जाऊन रडून टाकतो,
आई विचारते फोर्नवर तेव्हा,
मी तिला सगळ ठीक सांगतो !
किती झाल्या वेदना तरी,
आजिबात ओरडत नाही,
आईला वाईट वाटेल म्हणून,
तिच्या सामोर रडत नाही !
आलेच डोळे भरुन तर ,
गपचूप पटकन पुसून घेतो,
झाल दुःख तर अनावर,
एकट्या मध्ये बसुन घेतो !
पुन्हा आई आधीसारख,
तुला सगळ सांगायच आहे,
कुशीत डोक ठेऊन तुझ्या,
शांत छताकडे पाहायचे आहे !
तिच्या डोक्यावरचा पदर,
माझ्या डोक्यावर धरायची,
लहान होतो तेव्हा आई,
काखेत घेऊन फिरायची !
ओरडायची खूप मला पण,
स्वतःहून कशी काय रडायची,
समजूत घालून आंघोळ नी,
तीच तीच हाताने भांग पाडायची !
शाळेत जायचो बोट पकडून,
बिनधास्त बेफिकीर जिवन होत,
आईने दिलेली प्रत्येक गोष्ट,
माझ लहानपणी मानधन होत !
कितीही झालो मोठे आपण,
आई तरीही सोबत हवीशी असते,
रडताना आई हसताना ही आई,
जीवनाच्या वाटेवर पाठीशी असते आई !
निवडणूक
कोणी कोणाची जिरवली,
म्हणे कोणी कोणाला पाडले,
काय निवडणूक होती की कुस्ती डाव,
यासाठी जनतेने निवडले काय !
उणीवा काढत बसतील की,
विकासाचा विचार करतील,
करतील लोकांची सेवा की,
पैशा सामोर लाचार होतील !
काळजी फक्त कार्यकर्त्यांची,
त्यांचेच फक्त हाल होईल,
नेते घेतील पोळ्या भाजून,
आणि समर्थकांची लाल होईल !
हेवेदावे तर होतच राहतील ,
आपण आपले कामधंधे पहावे नेता,
आपल्याच पक्षात आहे का?
फक्त यावरती लक्ष आर्धे ठेवावे !
सार मित्र ही सुटल
शाळा संपली तेव्हा नी,
आमच टोळक फुटल,
दप्तर वही सोबतीने,
सार मित्र ही सुटल !
नंबर गेले पुसून,
आमच संपर्क तुटल,
बाटली डब्या सोबतीने,
सार मित्र ही सुटल !
मित्र दुरावले सगळे,
माझ नशीब फाटल,
खड़ फळ्या सोबतीने,
सीर मित्र ही सुटल !
आम्ही भेटतो कधीतरी,
जेव्हा मनाला वाटल,
आता शाळा ही सुटली
सार मित्र ही सुटल !
मिडल क्लास कुटुंब | Marathi Kavita
परततो रात्रीचा भात नाष्ट्याला,
सकाळी चहासोबत चपाती खातो,
मध्यम वर्गीय घरातील आहोत,
आम्ही थोडे काटकसरीनेच राहतो !
खरेदी करतो दोन जोड वर्षांला,
बाकी कपडे मोठ्या भावाची घेतो,
शिवतो फाटक्या तुटक्याची गोधडी,
आम्ही थोडे काटकसरीनेच राहतो !
करत असते आई बरीच कामे,
स्वतः बाबा स्वतःसाठी हात अखडून जगतो,
ठेवतो साठवून वापरलेल्या बाटल्या ही,
आम्ही थोडे काटकसरीनेच राहतो !
पतपेढीत पैसे थोडे असतील कमी,
कायम सुखाची साठवण करतो,
मध्यम वर्गीय घरातील आहोत आम्ही,
समाधानाची उधळण करतो !
पाश्यात संस्कृती
अर्ध नग्न शरीर आजकाल,
जीवनशैली झाली आहे,
साध्या सरळ वेषभूषेचीच,
आता खिल्ली चालली आहे !
स्वातंत्र्याच्या नावाखाली,
अंगप्रदर्शनाचा बाजार भरलाय,
चाहते वाढतात म्हणे,
असे दृश्यांचा टप्पा हजार चाललाय !
सौंदर्य करता करता सगळी,
नजर शरीरावर ओढली जाते,
सहानुभूती मिळवून फुकट,
चूक बघणाऱ्याची काढली जाते !
स्त्रीवादाच्या ठिणग्या उडवल्या,
पाश्चात्त्य संस्कृती बिंबवली आहे,
संस्कृती जपणारी भारतीय नारी,
आजकाल घरातून हरवली आहे !
कलयुगातील पोरगा
कष्ट केल लेकरांसाठी अन,
बापानं भुकेन पोट मारलं,
ढीग पैसे त्यांच्याकडे म्हणून
पोराने दारुच घोट भरलं !
आईने भाकरीवर चटणी लोणच,
सोबत चण्याचं पिठलं वाढलं,
लोणच्याची फोड चकण्यासाठी,
पोराने फुटाण्याच पाकीट फोडलं !
म्हणे घरच्याच जबाबदारीचा तान,
याच्या डोक्यावर असतोय,
तिशीतल्या पोराला कलियुगात,
साठीतला आई-बाप पोसतोय !
अवकाळी पाऊस
गडगडल आभाळ अचानक,
गडबड काळजाची झाली,
शेतमालाच झाल नुकसान,
कुजवण माळवाची झाली !
सरीन वाहणार पाठाच पाणी,
डोळ्यातील अश्रूची धार आहे,
कोणी पावसात घामाने भिजतो,
कोणासाठी हवामान गार आहे !
गळक्या छताला ठेवलाय टोप,
सर्व घरांमध्ये साठल्यात तळी,
मरण आलय गरिबांच कदाचित,
की पाऊस आलाय अवकाळी !
कोंडी मोठी झाल्या आयुष्याची,
जून साठवलेल सगळ भिजतय,
थट्टा आगळी चालल्या देवाची,
नवं पिकवलेल तिथेच कुजतय !
स्वतः
भाकरी खाणारे साधे आपण,
उगाच पिझ्झ्याच कौतुक का,
जगाचा भार वाहणारे आपण,
नोकरीच्या ओझाच नाटक का !
संघर्ष जन्मापासून पाठीशी मग,
दडपणाला घाबरतोस का,
गुणधर्म आपापल्या गाठीशी,
मग साधेपणा लपवतोस का !
माहितेय आला आहेस शहरात,
मग गावची लाज कशासाठी,
ज्यांच्या सोबत मोठा झालास,
त्यांना शहराचा माज कशासाठी !
वाट चुकशील या गडबडीमध्ये,
मोठ्या शहरात अडकून जाशील,
जगाला दाखवायच्या ओघात तू,
स्वतःलाच हरवून बसशील !
निरोप | Marathi Kavita
संपला प्रवास संपली सोबत,
आता निरोप घ्यावा लागेल,
या फांदीवरुन त्या फांदीवर,
आता झोक घ्यावा लागेल !
इतक्या दिवसच्या आठवणी,
शिदोरी आपुलकीची पुरेल,
डोळ्यात राहतील आसवे अन,
नाळ फ़क्त बांधिलकीचे उरेल !
भेटू भेटू आपण म्हणतोय पण,
पुन्हा खरच भेट होईल काय,
वेळेमध्ये वेळ काढून इकडे,
कोणी परत थेट येईल काय ?
प्रवासाचा आनंद आहेच पण,
दुःख असेल सुटणाऱ्या जागेचं,
नवीन जुळतील ही बंध पुढे,
गुंते राहतील तुटणाऱ्या धाग्याचं !
स्त्री शक्ती
शक्ति स्वरूप जगदंबा तू,
रक्ताने कधी अपवित्र होत नाही,
खराब होतात कपडे फक्त,
पाळीने दूषित चरित्र होत नाही !
ज्या कुशी मध्ये जन्मच झाला,
ते स्थान स्वगपिक्षा शुद्ध आहे,
तुला बंधने नाहीत कशाशीच,
तुझ्या प्रेमाखातरच हद्द आहे !
पूजा करावी न करावी गोष्टीला,
विज्ञान-शास्त्राची जोड असावी,
तू आराम करवा आनंदी राहावे,
तुझ्याकडे दुःखाची ओढ नसावी !
श्रद्धा अंधश्रद्धेच्या घोळामध्ये उगाच,
तुझ्या विचारात खोट नको,
मासिक पाळी पाया स्त्रीत्वाचा,
उगाच तुझ्या स्त्रीत्वावर बोट नको !
विठूराया
नाम गजरात विठोबाची भक्ती,
घातले पारायण मन मंदिरात,
आषाढीच्या वारीसाठी श्री हरी,
अवतरले नारायण पंढरपुरात !
खचता दगड सापडली वीट,
विटेवर उभारला पंढरीनाथ,
घेऊनी चतुर्भुजी शंक नी चक्र,
विठूरया प्रगटला गाभाऱ्यात !
जळी स्थळी काष्टी पाषाणी भाव,
असेल तिथे देव पाहिला कधी राम,
कधी कृष्ण कधी हरी भक्त,
तिथे उभा पांडुरंग राहिला !
आईच लेकरू
आई काय होतय माहीत नाही,
थोड चुकल्यासारख होतय,
मी करतोय ग खरच प्रयत्न,
थोड थकल्यासारख होतय !
तुमचं कष्ट अमाप आहेत,
पण मी हारुन चाललोय गं,
ओढता ओढता अपेक्षांना,
स्वतःला मारुन चाललोय गं !
काय करावे समजत नाही,
दुःख कोणाला बोलता येईना,
अर्ध्यात आलोय कसाबसा,
मध्येच हातातील सोडता येईना !
काय कराव तूच सांग आता,
पाखरु तुझ हरवून जाईल गं,
तू काढ काहीतरी मार्ग यातून,
लेकरू तुझ संपून जाईल गे !
स्वताच्या विश्वात
स्वतः मध्ये मग्न राहतो तो,
जणू एक मायाजाल आहे,
कोडे ही थोडा समजतो ही,
वेगळा तरी तो कमाल आहे !
हसत मुखी कायम खुश,
माझा ऊर्जेचा कोश आहे,
शब्दात हरवून जावे त्याच्या,
डोळ्यांनी मदहोश आहे !
जीव लावतो माझ्यावर,
कधी उगाच चिडणार नाही,
समजूतदार इतका की,
अर्थात साथ सोडणार नाही !
रोज रोज मरता मरता,
मी एक दिवस जगणं शिकलो,
प्रत्त्येक येणाऱ्या गोष्टीकडे,
बारकाईने बघण शिकलो !
फरक नाही पडत कोणाचाच,
अपेक्षा सगळी संपली आहे,
जाणाऱ्याने जावे हरकत नाही,
माझी दिशा वेगळी झाली आहे !
नको कोणाच्या भरवश्यावर,
स्वतः स्वतः मध्ये खुश राहीन,
थकलो जगून दुसऱ्यांसाठी,
आता स्वतःसाठी श्वास घेईन !
मी असाच असेन
होतील वाद थोडा मतभेद ही,
कदाचित मी तास तास रुसेन,
दुःख असो किंवा सुख असो,
शब्द आहे मी असाच असेन !
निघतील अश्रू वेदनेत आणि,
सुखात सदा मनापासून हसेन,
समोर राहीन संकटात तुझ्या,
दुःखात कायम सोबत दिसेन !
डोळे झाकून तुझ्या हक्काचा,
एका हाकेंसरशी उभा ठाकेन,
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत,
विना गाठीचा धागा असेन !
शब्द आहे मी असाच असेन !
आई बापाची व्यथा
पोरांना खांद्यावर मिरवले,
हलका बापाचा खांदा झाला,
आई बाप जड झाले लेकाला,
त्याला महत्वाचा धंदा झाला !
वेगळे रहायचं म्हणे त्याला,
आपले त्याला अडचण झाले,
घर छोटे पडते सांगतो तो,
जिथे त्याचेच बालपण गेले !
आधी भावांमध्ये भांडण व्हायची,
आता त्यांच्यामध्ये दुरावा आहे,
लोकांमधील भावना संपत गेल्या,
हा बहुधा कलियुगाचा पुरावा आहे !
गावाकडचा मी | Marathi Kavita
भाकरी खाणारे साधे आपण,
उगाच पिझ्झ्याच कौतुक का,
जगाचा भार वाहणारे आपण,
नोकरीच्या ओझाच नाटक का !
संघर्ष जन्मापासून पाठीशी मग,
दडपणाला घाबरतोस का,
गुणधर्म आपापल्या गाठीशी,
मग साधेपणा लपवतोस का !
माहितेय आला आहेस शहरात,
मग गावची लाज कशासाठी,
ज्यांच्या सोबत मोठा झालास,
त्यांना शहराचा माज कशासाठी !
वाट चुकशील या गडबडीमध्ये,
मोठ्या शहरात अडकून जाशील,
जगाला दाखवायच्या ओघात,
तू स्वतःलाच हरवून बसशील !