भारतीय अनुभौतिक शास्त्रज्ञ | Dr pk iyengar information in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dr pk iyengar information in marathi: पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान झालेल्या अनेक मान्यवर व्यक्ति या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अत्यंत नावाजलेल्या ख्यातकीर्त अशा वैज्ञानिक-शास्त्रज्ञ होत्या, आहेत वा पुढंही असणार आहेत असं माझं एक निरीक्षण आहे. ज्याप्रमाणं अणुशक्ती विषयक संशोधन करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त केलेल्या मुंबईमधल्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संचालकपदी आणि त्या खात्याच्या मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या व्यक्तिमध्येही ख्यातकीर्त वैज्ञानिक-शास्त्रज्ञांचा समावेश असल्याचं दुसरं महत्त्वाचं निरीक्षणही मला नोंदवावं लागेल.

भाभा अणुसंशोधन केंद्रात संचालकपद भूषवणाऱ्या वैज्ञानिकांमध्ये खुद्द डॉ. होमी भाभा तर आहेतच, पण त्यांच्याशिवाय डॉ. होमी सेठना, डॉ. राजा रामण्णा, डॉ. श्रीनिवासन अशी अनेक मान्यवर शास्त्रज्ञ मंडळीही आहेत. त्यांच्यात आणखी एक महत्वाचं नाव घ्यावं लागतं ते पद्मनाभ कृष्णगोपाल अय्यंगार या संचालकाचं. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संचालकपदी काम करणारी ही सारीच मंडळी केवळ राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामधली अत्यंत दिग्गज म्हणून ओळखली जाणारी अशीच मंडळी आहेत. या वैज्ञानिक-शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वामुळंच या देशामधल्या अणुऊर्जा विषयक विकासाची गती अत्यंत देखणी अशी राहिलेली आहे

आपल्या सगळ्या वैज्ञानिक-शास्त्रज्ञांच्या बाबतीत आणखी एक महत्वाचाभाग म्हणजे ते कुठल्याही एका विशिष्ट प्रांतामधले वा देशाच्या विशिष्ट भागातले आहेत, असं नाही. तर देशाच्या सर्वदूर भागातून अशा राष्ट्रीय आणि भागातराष्ट्रीय कीर्ती लाभलेल्या वैज्ञानिकांची नावं पुढं येताना दिसतात. हेच या सायामागचं एक वैशिष्ट्यही मानायला हवं. कारण या शास्त्रज्ञांमध्ये मराठी, गुजराथी, दाक्षिणात्य (तेलगू, तमिळ, केरळी, कानडी), पंजाबी, बंगाली, उत्तर प्रदेशी अशा विविध भागातून आलेले हे शास्त्रज्ञ-वैज्ञानिक वैसतात.

त्यामुळं देशाच्या सर्वांगीण वैज्ञानिक विकासात हरप्रकारची भर पड़ते आहे, हे विसरता येत नाही. त्याचबरोबर त्या-त्या भागातल्या हवामानाचा, आधनसंपत्तीचा, वैज्ञानिक प्रगतीचा, ज्ञानसंपदेचा सारासार विचार करून ही वैज्ञानिक मंडळी या संशोधनात भर घालताना दिसतात. एकंदर अवाढव्य अशा आपल्या भारतभूमीचा विचार केला, तर यातल्या विविधरंगी जीवनपद्धतीचाही या साऱ्या वैज्ञानिक संशोधनावर चांगला-वाईट परिणाम होताना दिसतो आहे. पण एक गोष्ट नक्की, की आपले हे वैज्ञानिक आपल्या भारतीय सैन्याच्या मानसिकतेप्रमाणंच, कुणाच्या आहारी जाताना वा कच्छपी लागताना दिसत नाहीत.

Dr pk iyengar information in marathi
Dr pk iyengar information in marathi

डॉ. पद्मनाभ कृष्णगोपाल अय्यंगार मराठी माहिती | Dr pk iyengar information in marathi

सर्व वैज्ञानिक त्यांच्या त्यांच्या संशोधन कार्यात स्वतःला पूर्णपणानं झोकून देणारे हे सारे वैज्ञानिक म्हणजे मला तरी एक प्रकारचे प्राचीन काळातल्या ऋषिमुनींप्रमाणं अविरत तपश्चर्या करणारे, संशोधन-संशोधन आणि संशोधन हेच आपलं कार्यक्षेत्र मानणारे योगीपुरुषच वाटतात. मग त्यात अणुसंशोधन केंद्रातले संचालक वा अन्य छोटे मोठे वैज्ञानिक असोत की बंगळूरच्या सी. व्ही. रामन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या त्यांच्या संशोधनात व्यग्र असणारे वैज्ञानिक असोत. या देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घेऊन कार्य करणारी ही संशोधक मंडळी आहेत.

अशा अनेक मान्यवरांपैकी आणखी एक म्हणजेच डॉ. पी. के. अय्यंगार हे भाभा अणु-संशोधन केंद्राचे एक माजी संचालक. या वैज्ञानिक-शास्त्रज्ञांचं आणखी एक वैशिष्ट्य असं, की ते ज्याप्रमाणं देशाच्या विविध भागातून आलेले दिसतात, त्याचप्रमाणं ते असंख्य आणि विविध प्रकारच्या संशोधन कार्यात गुंतलेले दिसतात. कुणी एखादा संगणक क्षेत्रात समरसून आपलं संशोधन सुरू ठेवताना दिसतो. दुसरा आणखी एखादा शास्त्रज्ञ जैविक-तंत्रज्ञान या क्षेत्रात उठून दिसणारं संशोधन करण्यात गढून गेलेला दिसतो, तर एखादा अंतरिक्ष-संशोधनात स्वतःला अक्षरशः गाडून घेऊन खगोलशास्त्राच्या विविध अंगांचा शोध घेण्यासाठी जिवाचं रान करताना दिसतो.

एखादा संरक्षणाच्या क्षेत्रात लागणारी आयुधं बनवण्यासाठी आयुष्यभर संशोधन करीत राहतो, तर आणखी एखादा रसायनशास्त्राची कास धरून नवनवीन पेटंट आपल्याकडे कशी राहतील, वा आपल्याला मिळवता येतील, याच कामात आपल्याला गुतवून घेतो. पदार्थविज्ञानशास्त्र हा मूलभूत विषय अभ्यासून ही बहुतेक सारी संशोधक मंडळी त्यांच्या त्यांच्या मूलभूत संशोधनकार्यात पूर्णपणानं गढून गेलेली दिसतात. जनसामान्यांना या साऱ्या संशोधकांच्या संशोधनकार्याची माहिती होतेच वा असतेच, असा दावा करता येणार नाही.

यातलं काही संशोधनकार्य हे तर इतकं मूलगामी स्वरूपाचं असतं, की कधीकधी सामान्य माणसाला त्या कार्याचा दैनंदिन जीवनात फारसा व्यवहार्य असा उपयोग असतोच अशातलाही भाग नाही. परंतु कालांतरानं याच संशोधनामुळं सामान्य माणसाचं दैनंदिन जीवन, खास करून ऐहिक सुखाच्या वाटा शोधण्याचा त्याचा मार्ग हा अधिकाधिक सुकर होत असतो. त्यामुळं एकेकाळी अंतरिक्ष यान पाठवण्यासंबंधी झालेल्या संशोधनाचाच वापर करून पुढं सामान्य माणसाला दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या कमी-जास्त उंचीवरच्या वापरासाठी लागणाऱ्या आणि विविध प्रकारच्या हवामानात वापरता येऊ शकणाऱ्या अनेकविध वस्तू बनवल्या गेल्या, हे विसरता येणार नाही.

त्यामुळंच डॉ. पी. के अय्यंगार यांच्यासारख्या अणुशक्ती वा अणुऊर्जेसंबंधी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ वैज्ञानिकाचं काम हे जनसामान्यांच्या कधी लक्षात आलं नाही तरी त्या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संशोधकांनी डॉ. पी. के. अय्यंगार या वैज्ञानिकाच्या संशोधनकार्याची फार मोठ्या गांभीर्यपूर्वक दखल घेतलेली आहे हेही विसरता येणार नाही. 25 जून 1931 रोजी जन्म झालेले डॉ. पी. के. अय्यंगार यांनी 1963 मध्ये मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर मुंबई मधल्या भाभा अणुसंशोधन केंद्रामधल्या पदार्थविज्ञान अभ्यासगटाचे संचालक म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला प्रारंभ केला.

डॉ. पी. के. अय्यंगार हे इंडियन ॲकॅडमी फॉर सायन्सेस या संस्थेचे ते सदस्य झाले. फेलो झाले. हंगेरीमध्ये असलेल्या रोलँड इव्होट्व्होस ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’चेही ते सदस्य झाले. परदेशातल्या अकादमीचे सदस्य असा त्यांना बहुमान मिळाला. इंडियन फिजिक्स ॲकॅडमी तसंच इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन या सोयेचेही ते सदस्य झाले. अनेक भारतीय वैज्ञानिकांनी ‘डॉ. शांतीस्वरूप भटनागर ॲवॉर्ड मिळवलं आणि ते मिळवण्यात ज्याप्रमाणं धन्यता मानली, त्याचप्रमाणं डॉ. पी. के. अय्यंगार यांनाही डॉ. शांतीस्वरूप भटनागर या पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलं.

1971 मध्ये त्यांना सी.एस. आय. आर. म्हणजेच केंद्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या पारितोषिकानंही गौरवण्यात आलं. 1975 साली पी. के. अय्यंगार यांना प‌द्मभूषण हा किताब बहाल करण्यात आला. केरळच्या सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी या संस्थेनं त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना पारितोषिक बहाल केलं. 1981 मध्ये त्यांना एफ. आय. सी. आय. या संस्थेचा गौरव प्राप्त झाला. इन्सा कौन्सिल या संस्थेनं 1982 मध्ये त्यांना सभासदत्व बहाल केलं. अशा तन्हेनं त्यांना अनेक प्रकारचे मानसन्मान मिळाले. वैज्ञानिक क्षेत्रात, खास करून अणुऊर्जा विषयक संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक प्रकारचं यश संपादन केलं. पी के. अय्यंगार हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक म्हणून ओळखू जाऊ लागले.

सॉलिड स्टेट फिजिक्स हा डॉ. पी. के. अय्यंगार यांच्या खास अभ्यासाचा विषय आहे, होता. पुढंही त्याच विषयात त्यांनी अधिकाधिक संशोधन सुरू ठेवलं. न्युट्रॉन स्पेक्ट्रॉस्कोपीचं तंत्रज्ञान आणि त्याचा वापर या विषयातही त्यांनी नेत्रदीपक असं संशोधन करून दाखवलं. ॲटॉमिक फोर्सेसमधले अंतर्संबंध आणि ते शोधून काढण्यासाठी न्यूट्रॉन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतचं तंत्रज्ञान विकसित करणं हेच क्षेत्र निवडून डॉ. पी. के. अय्यंगार यांनी या संदर्भात महत्त्वाचं संशोधन करून दाखवलं. याच तंत्राचा वापर करून डॉ. अय्यंगार यांनी अनेक प्रकारच्या धातू कणांचा आणि विविध प्रकारच्या क्रिस्टलचाही अभ्यास केला. याच अभ्यासाचा आणखी सखोलतेनं विचार व्हावा, याकरता त्यांनी खास प्रकारची उपकरण व्यवस्थाही विकसित केली.

न्यूट्रॉन फिजिक्सच्या क्षेत्रात संशोधन करता करता डॉ. पी. के. अय्यंगार यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रात पूर्णिमा ही अणुभट्ट्यांची एक साखळीच निर्माण करण्यात भाभा अणुसंशोधन केंद्राला यश मिळवून दिलं. या विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाबरोबरच मॉसबाऊर स्पेस्क्ट्रॉस्कोपी या विषयावरच्या ग्रंथाचं संपादन करून या विषयाशी संबंधित अशा क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भर घातल्याचं मानलं जातं. बी.ए.आर.सी. म्हणजेच भाभा अणु संशोधन केंद्राच्या अनेक विभागांचे धुरीणत्व स्वीकारीत-स्वीकारीत त्यांनी केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारीही पार पाडली.

सर्व भारतीय वैज्ञानिक मंडळी साऱ्या देशातून येणारी दिसतात. एका विशिष्ट प्रांताचीच या बाबतीत मक्तेदारी नाही हा या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा आहे. एक काळ असा होता की क्रिकेटच्या क्षेत्रात एकेकाला फक्त मुंबईमधूनच खेळाडू पुढे येताना दिसत असत. पण पुढे हळूहळू साया देशातून हे क्रिकेटपटू पुढे येताना दिसू लागले. वैज्ञानिकांच्या बाबतीत तसं नाही. ते फार पूर्वीपासूनच साऱ्या देशातून येताना दिसतात त्यातला पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, गुजरात, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र अशा काही राज्यांमधून येणाऱ्या वैज्ञानिकांची संख्या ही मात्र तुलनेनं बोडीशी जास्त आहे. त्यातही पदार्थविज्ञान (फिजिक्स) या विषयाशी मूलभूत संबंध असणारे किंवा रसायन-गणित याही विषयांचा अभ्यास असणारेच पुढं मोठे वैज्ञानिक-शास्त्रज्ञ होताना दिसतात.

भाभा अणुसंशोधन केंद्र, पुणे विद्यापीठ, बंगळूरच्या सी. व्ही. रामन किंवा कलकत्त्याच्या जगदीशचंद्र बोस संस्थांसारख्या संस्था यामधून उच्चशिक्षण घेणारी मंडळी पुढं संशोधनाच्या क्षेत्रात अधिक प्रमाणात चमकताना दिसतात. अणुशक्तीचा वापर करून भाजीपाला, फळफळावळ यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल, त्यांचा दर्जा कसा सुधारता येईल, अणुऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेत अणुशक्तीच्या वापरानं अणुऊर्जा कशी वाढवता येईल, हेही संशोधनाच्या माध्यमातून पाहण्यात डॉ. पी. के अय्यंगार यांचा पुढाकार असे. वैज्ञानिक संशोधनाचा, अंतिमतः जनसामान्यांच्या कल्याणासाठीच वापर कायला हवा, यावर या साऱ्या भारतीय वैज्ञानिकांचा सातत्यानं भर होत. आजही भर आहे. आणि भविष्यकाळातही तो राहणार आहे, हे भारतीय समाजाच्या जडणघडणीत फार महत्वाचं आहे, हे विसरता येणार नाही.

विध्वंसापेक्षा विकास हाच भारतीय वैज्ञानिकांच्या संशोधनाचा पाया आहे. अणुऊर्जेचा वापर करून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ करता येईल, हा प्रयोग अणु संशोधन केंद्रात करून पाहण्यात आल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर त्या संशोधनाचा वापर झाला आणि नंतर मग त्याच संशोधनाच्या माध्यमातून दैनंदिन शेतीच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आले. असे प्रयत्न करणाऱ्या वैज्ञानिकांत डॉ.पी. के. अय्यंगार हे शास्त्रज्ञ आघाडीवर होते, हे या ठिकाणी नमूद करण्याची गरज वाटते. एक गोष्ट खरी की या साऱ्या संशोधनांचा, खास करून अणुऊर्जेचा, शेती उत्पादन वाढीसाठी केवळ प्रायोगिक तत्त्वावर नव्हे, तर व्यापारी तत्त्वावर उपयोग ज्या दिवशी सुरू होईल तो दिवस या देशात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.


पुढे नवीन माहिती वाचा


येथून शेअर करा

Leave a Comment