डॉ. होमी जहांगीर भाभा मराठी माहिती | Dr Homi Bhabha Information in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dr Homi Bhabha Information in marathi: होमी जहांगीर भाभा हे केवळ भारतामधलं नव्हे तर अणू आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामधलं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं नाव आहे. 30 ऑक्टोबर 1909 रोजी या महान वैज्ञानिकाचा जन्म झाला. मुळात पदार्थविज्ञान (Physics) हा डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या अभ्यासाचा विषय होता. या अभ्यासाविषयीचे जे मान्यवर शास्त्रज्ञ जगाच्या पाठीवर ओळखले जातात त्यात होमी जहांगीर भाभा यांचं नाव पहिल्या काही वैज्ञानिकांमध्येच घ्यावं लागेल, हे निःसंशय. या शास्त्रज्ञ वैज्ञानिकाचं वर्णन, ‘देशाच्या अणुसंशोधन तसंच अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामधला एक प्रमुख शिल्पकार’ असं केलं तर इतर मान्यवर वैज्ञानिकांना विषाद वाटण्याचं काहीच कारण नाही. अणुसंशोधनाचा तसंच अंतरिक्ष संशोधनाचा वापर शांततामय विकास कार्यासाठी होऊ शकतो यावर ज्या वैज्ञानिकांची ठाम आणि अढळ श्रद्धा होती त्यापैकी होमी जहांगीर भाभा हे एक होते.

अंतरिक्ष आणि अणुशक्ती संशोधन क्षेत्रातला खऱ्या अर्थानं हा एक दादा माणूस होता. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा देशाच्या विकास कार्यासाठी ज्या मोजक्या वैज्ञानिक तंत्रज्ञांवर दृढ विश्वास होता त्यांच्यापैकी एक म्हणून डॉ. होमी जहांगीर भाभा या शास्त्रज्ञाचं नाव घेतलं जायचं. आज गेली अनेक वर्षं मुंबईच्या चेंबूर-देवनार भागात देशामधलं पहिलं अणुसंशोधन केंद्र मोठ्या दिमाखात उभं आहे. या संशोधन केंद्राची कल्पना ज्या मोजक्या वैज्ञानिक-शास्त्रज्ञांच्या मनात आली त्यामध्ये डॉ. होमी जहांगीर भाभा हे नाव अग्रभागी घेतलं जातं. अत्यंत सुंदर अशा परिसरात आणि निसर्गानं नटलेल्या या भूभागावर हे देखणं संशोधन केंद्र उभं आहे. ते उभं करण्यात आणि त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यात डॉ. भाभा यांच्यासारख्या संशोधकाचा फार मोठा वाटा आहे.

Dr Homi Bhabha Information in marathi
Dr Homi Bhabha Information in marathi

डॉ. होमी जहांगीर भाभा | Dr Homi Bhabha Information in marathi


आयुष्यात किमान एकदा तरी हे अणुसंशोधन केंद्र बघावंच आणि त्यात भारतीय संशोधकांनी चालवलेल्या अमूल्य अशा संशोधनकार्याला कुर्निसात करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे. या केंद्राची आखणी ज्या भागात करण्यात आलेली आहे तो भाग निसर्गानं खूप नटलेला आहे. सभोवताली डोंगर, समुद्र, वनराई यांची भरपूर रेलचेल तर आहेच. पण संशोधनकार्यासारख्या महत्त्वाच्या कामाला पोषक असं वातावरणही या ठिकाणी असल्याचं जाणवतं. त्याचबरोबर पंडित नेहरू आणि होमी भाभा यांच्या परस्पर सहकार्य आणि नियोजनानं या केंद्रात ‘मिनी इंडिया’च वावरताना जाणवतो. केरळी, मराठी, बंगाली, पंजाबी, तामिळ, तेलुगू, उत्तर प्रदेशीय असे विविध प्रांतांमधले शास्त्रज्ञ इथं गुण्यागोविंदानं नांदताना आणि आपल्या संशोधनकार्यात स्वतःला झोकून देताना दिसतात.

या क्षेत्रातला एक महत्त्वाचा ‘पाथ फाईंडर’ म्हणून या साऱ्याचं श्रेय पंडित नेहरू आणि होमी भाभा यांना द्यायलाच हवं. देश घडत असतो तो तिथल्या केवळ नैसर्गिक साधन संपत्तीमुळं नव्हे, तर त्या देशामधल्या कर्तृत्ववान अशा माणसांच्या कर्तबगारीमुळं. सृजनशील निर्मितीची क्षमता असणारी मंडळी ही सर्वसाधारणपणानं एककल्ली असतात असं मानलं जातं. त्यांचं इतरांशी फारसं जमत नाही असंही बोललं जातं. पण होमी भाभा काय किंवा आजचे विद्यमान राष्ट्रपती, जे मुळात अव्वल दर्जाचे एक मान्यवर आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त वैज्ञानिकच आहेत, ते डॉ. कलाम काय, अशा काही मोजक्या का होईना, पण शास्त्रज्ञ-वैज्ञानिकांना, इतरांना बरोबर घेऊन जाण्याची किमया साधलेली आहे असं दिसतं. हे लोकशाही देशाच्या प्रशासनात फार फार आवश्यक आहे. डॉ. होमी भाभा या संशोधकाचं शास्त्रज्ञाचं वैज्ञानिकाचं महत्त्व त्यामुळंच आपल्याला सर्वाधिक वाटल्याखेरीज राहात नाही.

अलीकडच्या काळात अंतरिक्ष संशोधन क्षेत्राचं महत्त्व अनन्यसाधारण रितीनं वाढलं. अणुशक्तीविषयक संशोधनाचं क्षेत्रही खूपच विस्तारलं. परंतु होमी जहांगीर भाभा हे या क्षेत्रांच्या कार्याचे प्रवर्तक होते, आहेत हे आजही मान्य करावं लागतं. आता तर आपण उपग्रहाच्या माध्यमाचा वापर करून दळणवळणाची साधनं विकसित केली. हवामानाच्या संशोधनाच्या आणि हवामानविषयक अंदाजासाठी तर आपण जवळपास दैनंदिन स्तरावरतीच उपग्रहांचा वापर करतो आणि आवश्यक ती माहिती मिळवतो. त्यातून हवामानविषयक अचूक अंदाज वर्तवण्याचं प्रमाण वाढताना दिसतं आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या प्रसारणासाठी तर आपण सर्रास उपग्रहाद्वारे उपलब्ध होणाऱ्या माहितीचा वापर करतो.

आज ज्या इतक्या चित्रवाणी- मालिका आणि इतर कार्यक्रम आपण बघत असतो ते या उपग्रहांच्या आणि वेळोवेळी झालेल्या अंतरिक्ष संशोधन कार्यामुळंच. या साऱ्या कार्याची इतकंच काय पण अणुबॉम्ब तयार करण्याच्या प्रक्रियेची तसंच अणुशक्तीचा वापर शांततामय विकासासाठी करण्याच्या कामाची मुहूर्तमेढ डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्यासारख्या संशोधकाच्या कार्यानं रोवली गेली आहे हे आपण कध ीही विसरता कामा नये. भारतीय अंतरिक्ष यात्री राकेश शर्मा काय किंवा अंतरिक्ष यानात दुर्दैवानं मृत्यू पावलेली कल्पना चावला काय, या अंतरिक्ष वीरांना त्यांची कामगिरी पार पाडता आली ती डॉ. भाभा यांच्यानंतर त्यांच्यासारखी अनेक संशोधक मंडळी या क्षेत्रातल्या पायाभूत संशोधनासाठी ठामपणानं उभी राहिली म्हणूनच.

होमी जहांगीर भाभा यांचा जन्म मुंबईतील एका सर्वसामान्य व सदन पारशी कुटुंबामध्ये झाला. पारशी मंडळी ही मुंबई शहरावर विलक्षण प्रेम करणारी. सधन, तशी हुशारही. होमी भाभा शिकले ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि त्यानंतर ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस’ या संस्थेत. 1927 मध्ये भाभा यांनी केंब्रिज विद्यापीठातल्या ‘गॉनव्हिले अँड कायस’ या महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1930 साली त्यांनी ‘मेकॅनिकल सायन्सेस ट्रॉयपॉस’ ही परीक्षा उत्तीर्ण केली. 1932-34 या काळात त्यांना गणित या अवघड विषयाचा अभ्यास करण्यासाठी ‘राऊस बॉल’ ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली. 1934 मध्ये त्यांना केंब्रिज विद्यापीठाचीच पीएच.डी. ही प्राप्त झाली. डॉ. भाभा हे Principles of physics म्हणजेच सैद्धांतिक विज्ञान तसंच गणित या विषयांमध्ये खूप रस घेणारे असे वैज्ञानिक होते.

Dr Homi Bhabha Information in marathi
Dr Homi Bhabha Information in marathi

पी.ए.एम. डिरॅक या विख्यात गणितीकडे त्यांनी गणिताचे धडे घेतले. साधारण याच काळात 1930 मध्ये कॅव्हेन्डिश प्रयोगशाळेत ते सैद्धांतिक भौतिकीचा अभ्यास करीत होते. त्याचवेळी जे.डी. क्रॉफ्ट, ई.टी.एस. वॉल्टर, पी. एम्. ब्लॅकेट आणि जेम्स चॅडविक हे जग‌द्विख्यात अणुशास्त्रज्ञ अणुकेंद्राच्या एकंदर स्वरूपाविषयी आणि त्याच्या प्रारूपाविषयी चर्चा करीत होते. महत्त्वाचं संशोधन सिद्ध करीत होते. डॉ. भाभा यांनी झुरिच, रोम तसंच कोपनहेगन इथल्या संशोधन केंद्रांना भेटी देऊन त्यांची पाहणी केली होती. यातल्या काही केंद्रामध्ये प्रत्यक्ष संशोधन करण्याचीही संधी त्यांना प्राप्त झाली होती आणि त्यामुळं त्यांचा अनेक जगद्विख्यात शास्त्रज्ञ-वैज्ञानिकांशी अगदी जवळून परिचय झालेला होता. इंग्रजीत एक म्हण आहे. ‘Man is known by the company he keeps’ माणूस हा त्याच्या आसपास वावरणाऱ्या मंडळींमुळं ओळखला जातो. भाभांचंही पुढं तसंच झालं.

त्यांच्याभोवती वावरणाऱ्या अनेक मान्यवरांच्या आणि त्यांच्या स्वतःच्या अलौकिक अशा संशोधनकार्यामुळं होमी जहांगीर भाभा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले. इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन या कणांचं एकमेकांवर आपटणं आणि त्यातून त्यांच्या विखुरण्यानं किती क्षेत्रफळावर त्याचा परिणाम होऊ शकतो अशा आशयाचं डॉ. भाभा यांचं पहिलं संशोधन होतं. इलेक्ट्रॉन हे तसे आपल्याला ठाऊक आहेत. पण पॉझिट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनाइतकंच द्रवमान असणारा पण विद्युत भारयुक्त कण. या संशोधनाला ‘भाभांचं संशोधन’ असंच ओळखलं जातं. अवकाशामधून सर्व दिशांनी पृथ्वीवर येणाऱ्या भेदक किरणांविषयीचं हे संशोधन ‘प्रपात प्रक्रिया’ या नावानं ओळखलं जातं. आपल्याला गॅमा किरण कसे मिळतात त्याचाही अभ्यास डॉ. भाभा यांनी त्यांच्या संशोधनात केलेला आढळतो. त्यांच्या संशोधनात ‘भाभा हाइटलर सिद्धांत’ तसंच येसॉन या मूळ कणाच्या अस्तित्वाच्या संशोधनाचाही समावेश आहे.

डॉ. सी. व्ही. रामन यांच्याप्रमाणंच 1941 साली त्यांनाही लंडनच्या रॉयल सोसायटीनं सभासदत्व दिलं. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा फार मोठा बहुमान मानला जातो. 1939 मध्ये हा वैज्ञानिक त्याच्या संशोधन कार्यानंतर भारतात आला. पण तो काळ युद्धाचा असल्यानं त्यांना लगोलग परदेशात जाता आलं नाही. मग त्यांनी 1949 मध्ये बंगळूरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस’ मध्ये विश्वकिरण विभागाचे प्रपाठक म्हणून काम करायला सुरवात केली. त्यासाठी सर दोराबजी टाटा ट्रस्टनं आर्थिक सहकार्य देऊ केलं होतं. मग त्याच संस्थेत वर्षभरानं ते प्राध्यापक झाले. मग 1945 मध्ये डॉ. भाभा यांच्या पुढाकारानंच मुंबईत ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेची उभारणी करण्यात आली. त्या संस्थेचे ते संचालक झाले. ते सैद्धांतिक भौतिकी या विषयाचे प्राध्यापक म्हणून शिकवण्याचं काम करीत.

Dr Homi Bhabha Information in marathi
Dr Homi Bhabha Information in marathi

1948 मध्ये भारत सरकारनं अणुऊर्जा आयोग स्थापन केला आणि त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून होमी जहांगीर भाभा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वैज्ञानिकाची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर 1954 च्या ऑगस्ट महिन्यामध्ये अणुऊर्जा विकासासाठी भारत सरकारनं ज्या वेळी स्वतंत्र खातं निर्माण केलं त्या वेळी त्या खात्याचे पहिले सचिव म्हणून डॉ. भाभा यांचीच नियुक्ती करण्यात आली. या अणुऊर्जा विकास खात्यानं मुंबईत तुर्भे या चेंबूर जवळच्या भागात देशामधलं पहिलं अणु विषयक संशोधन करणारं केंद्र डॉ. भाभा यांच्याच नेतृत्वानं उभं केलं. त्यानंतर 1956 मध्ये याच केंद्रात देशामधलीच नव्हे, तर साऱ्या आशिया खंडामधली, अर्थात रशिया हा देश वगळून, पहिली अणुभट्टी सुरू करण्यात आली.

अणुविषयक तसंच अंतरिक्षविषयक अशा दोन्हीही क्षेत्रात संशोधनाचा महत्वपूर्ण आणि भक्कम पाया घालण्याचं श्रेय हे डॉ. होमी जहांगीर भाभा याच आणि याच वैज्ञानिकाला द्यावं लागेल. त्या काळातले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉ. भाभा यांच्यावर शंभर टक्के विश्वास व्यक्त करून त्यांना त्यांच्या क्षेत्रात पूर्ण स्वातंत्र्य देऊन काम करण्याची मुभा दिली होती हेही या ठिकाणी मुद्दाम नमूद करणं आवश्यक वाटतं. 1962 मध्ये ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ या नावाची समिती अंतरिक्ष संशोधन कार्यक्रमांचा तपशील ठरवण्यासाठी नेमली गेली.

1944 मध्ये जपानच्या हिरोशिमा-नागासाकी या ठिकाणांवर अणुबॉम्ब टाकले गेले होते. पण मुळातल्या तत्त्वचिंतक प्रवृत्तीच्या डॉ. भाभा या थोर अणुशास्त्रज्ञानं अणुशक्तीचा वापर हा शांततामय विकासासाठीच झाला पाहिजे असा ठाम विचार मांडलेला होता. अणुशक्तीचा वापर वीज निर्मितीसाठी करता येईल हेही त्यांनी फार पूर्वीच लिहून ठेवलं होतं. 1955 मध्ये जिनिव्हात भरलेल्या आणि संयुक्त राष्ट्रांमार्फत आयोजित ‘अणु ऊर्जेचा शांततामय विकास कार्यासाठी वापर’ या विषयाच्या परिसंवादाचे डॉ. भाभा हे अध्यक्ष होते. सर्वच राष्ट्रांनी अणुबॉम्ब तयार न करण्याचा निर्णय केला पाहिजे असंही त्यांचं ठाम मत होतं. अनेक आंतरराष्ट्रीय समित्यांचे तसंच केंद्र सरकारला सल्ला

Dr Homi Bhabha Information in marathi
Dr Homi Bhabha Information in marathi

देणाऱ्या शास्त्रीय सल्लागार समितीचे ते 1965 पासून अखेरपर्यंत अध्यक्ष होते. त्यांना पद्मभूषण या महत्त्वाच्या नागरी सन्मानापासून असंख्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा बहुमान मिळालेले होते. हा शास्त्रज्ञ भौतिक शास्त्राबरोबरच संगीत, चित्रकला, वास्तुशिल्प अशा अनेकविध कलांचाही अभ्यास करीत असे. त्यांना त्यात रस होता. 24 जानेवारी 1966 रोजी स्वित्झर्लंड मधल्या माँ ब्लाँ या उंच शिखरावर झालेल्या भयानक विमान अपघातात या महान वैज्ञानिकाचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या मृत्यूनंतर 12 जानेवारी 1967 रोजी तुर्भे मधल्या अणुशक्ती केंद्राचं नाव बदलून त्या केंद्राचं ‘भाभा अणुसंशोधन केंद्र‘ असं नामाभिधान त्या वेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आलं.

या केंद्रानं आज एवढी प्रगती केलेली आहे, की अणुऊर्जा तर आपण निर्माण करतोच पण त्याचबरोबर शेती-विकासासाठी अणुऊर्जा वापरून शेती तसंच धान्योत्पादन कसं वाढवता येईल याबाबतचं संशोधनही या केंद्रात सुरू आहे. मुख्य म्हणजे अणुऊर्जेचा केवळ शांततामय विकास कामासाठीच वापर करायचा असं आपलं धोरण असलं तरी अणुसंशोधनाच्या आधारेच एकदा इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत आणि एकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत असे दोन वेळा आपण अणुस्फोट किंवा यशस्वी अशा अणुचाचण्या करून आपलं या क्षेत्रामधलं सामर्थ्य संबंधितांना दाखवून दिलेलं आहे हेही नोंदवायला हवं.


हेही वाचा

डॉ. कल्पना चावला मराठी माहिती | kalpana chawla information in marathi


येथून शेअर करा

Leave a Comment